हिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा ?
भाजपचे अश्विन कुमार उपाध्याय ह्यांनी अल्पसंख्यांक दर्जा आणि त्यातून शैक्षणिक संस्था चालवण्याचे विशेष अधिकार ह्यांचे महत्व लक्षांत घेऊन भारतातील ८ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा ह्यासाठी सुप्रीम कोर्टांत अपील केले होते. पण न्यायालयाने ते मंजूर नाही केले आणि उलट उपाध्याय ह्यांनी NCMEI ह्या संस्थेकडे हा विषय न्यावा असे सूचित केले जाते.