ईयत्ता नववीचा नवा पुरोक्रम

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
5 Jul 2017 - 9:36 pm

नेमेची येतो पावसाळा तसे पावसाळ्या सोबत शाळाही सुरु होतात, काही ईयत्तांना नवे अभ्यासक्रम बदलून मिळतात. तसे या वर्षीचा नववीचा बदललेला अभ्यासक्रमाची पुस्तके नजरे खालून घातली. इंग्रजी गणितासारख्या काही विषयांचे अभ्यासक्रमातील बदल नक्कीच चांगले आहेत. पुर्वीची मराठी भाषेची क्रमीक पुस्तके वाचनांनद देत जुन्या कविता धडे पुन्हा वाचावे असे वाटत तसे नवीन क्रमीक मराठी पुस्तके हातात आल्यानंतर वाटत नाही, अर्थात मागच्या वर्षीपर्यंत बहुधा नववीच्या अभ्यासक्रमात इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटेल असे ग्रामीण मराठी होते (चुभूदेघे) , या वर्षी बहुधा क्लिष्टता कमी करुन उपयोजीत मराठीचा समावेश झाल्याचे दिसते.

धागा लेख काढण्याचा उद्देश ईयत्ता नववीचे नवे इतिहासाचे पुस्तक. मुळात संकल्पना चांगली असली तरी पण परंतु होते आहे असे वाटते. पहिला बदल पुस्तकाच्या नावातच आहे, इतिहास आणि राज्यशास्त्र म्हणजे एकुण भर अलिकडील इतिहासावर आहे.

पुस्तकातील पहीलेच प्रकरण इतिहासाचे स्रोत विषयावर आहे. अर्थात यात ताम्रपट शिलालेख राजाज्ञांचा समावेश नाही ! यात समावेश नियत कालीके (वृत्तपत्रे) संदर्भ पुस्तके, पत्रव्यवहार, अर्काईव्हस, गव्हर्नमेंट गॅझेट, पोस्ट स्टँप आणि एनसायक्लोपिडीया , नाणी असे अडमधडम आहे. साधने शब्दाला निकष असतो त्याच्या प्रामाण्याचा विचार करता येतो, सोर्स / स्रोत या शब्दाला निकष काय ? कोणते स्रोत / माहिती प्रमाण समजावी या बाबत मला प्रथमदर्शनी तरी काही मार्गदर्शन दिसले नाही. माहिती द्यावयाची आहे ती पूर्ण द्यावयास हवी पितपत्रकरीतेसारख्या समस्या असतात त्याशिवाय त्यावर एकेरी विचारधारांचा अथवा भांडवलशाहीचे प्रभाव असू शकतात याची विद्यार्थ्यांना कल्पना दिली जाताना दिसली नाही (चुभूदेघे)

या पुस्तकात अर्थशास्त्र, विज्ञान तंत्रज्ञान, उद्योग व्यापार अशा प्रकरणांचा समावेश आहे त्यामुळे इतिहासाच्या एकसूरीपणास छेद मिळतो इतिहास विषयात रुची नसणार्‍यांची सोय होते. शिक्षण या प्रकरणामुळे विद्यार्थ्यास उच्च शिक्षण व्यवस्थेचा वेळीच परीचय होतो हे चांगले वाटले.

चेंजींग लाईफ एंपॉवर ऑफ वुमेन हि प्रकरणे ठिक आहेत.

अजून नव्या दोन संकल्पनांचा समावेश झाला आहे. भारताचा १९६० नंतरच्या इतिहासाचा समावेश करण्याची संकल्पना चांगली असली तरी वर सुरवातीस म्हटल्या प्रमाणे मांडणीत गोची होते. उदाहरणार्थ इंदीरा गांधींची ओळख करुन देताना पहिले वाक्य त्या १९६६ मध्ये पंतप्रधान झाल्या आणि त्या नंतर लएच दुसरे वाक्य During her tenure Pakista's opressive policies in East Pakistan resulted in a big movement there असे येते. म्हणजे वाक्य रचना वेगळ्या पद्धतीने करण्याची संधी होती का असे वाटून जाते. बर्‍याच ठिकाणी विधाने खाल्ली असावीत असे उपसंपादन झाल्यासारखे वाटते. आधूनिक कालीन माहितीचा समावेश करण्याचा प्रयास असला तरी माहितीज्ञान पोकळी सारखी जाणवत रहाते आणि मग जबाबदारी आपसूक शिक्षकांवर पडते. India's Internal chalanges असे एक प्रकरण आहे त्यात पंजाब समस्ये नक्षलवादी सहीत स्वातंत्र्योत्तर समस्यांची माहिती आहे समस्यांची ओळख करुन देण्याची संकल्पना चांगली असली तरी कोणत्या प्रकरणाची किती माहिती द्यावी या बद्दल समतोल जाणवत नाही शिवाय मुख्य म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी देण्यात प्रकरण/ धडा कुठे तरी कमी पडतो मग विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न शिल्लक रहाणार; बहुसंख्य शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात प्रकरणामधील माहितीमुळे निर्माण होणार्‍या शंकांना कितपत न्याय देऊ शकतील याची शंका वाटत रहाते.

आणखी एका प्रकरणात पाकीस्तान आणि चीन संबंधातील समस्यांचा उल्लेख आहे,-समस्यांची माहिती देणे गैर नाही- भारताचाच दृष्टीकोण न मांडता, तिथेही पुरोगामी दृष्टीने पाकीस्तान आणि चीनच्याच द्ट्ष्टीकोणाचीच मांडणी करण्याचा अर्धवट प्रयत्न दिसतो,-एकुण पुन्हा शिक्षक चिवट आणि ज्ञानी असेल तर ठिक नाही तर वाट लागली- अशा अर्धवट मांडणीवर तयार झालेले विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचे पर्यंत भारताच्या एकतेची गरज नसल्या सारखे वागू लागले तर आश्चर्य वाटणार नाही. अशी मांडणी कम्युनीस्ट असलेल्या राज्यांच्या अभ्यासक्रमात असती तर आश्चर्य वाटले नसते, पण धड्यांच्या मांडणीची सुरवात पुरोगामीपणे होते पण कदाचित उजवे सरकार आहे तर सांभाळून घ्यावे म्हणून पुरोगामी सुर्वात उजवी कडे जात नाही पण ढिसाळपणे कोसळत रहाते.

कोणत्याही देशाच्या राजकीय अस्तीत्वासाठी वैध वाटणार्‍या कथासूत्राची (नॅरेटीव्हची) मांडणी करावी लागते. थॉमस हिबींक नावाचा लेखक आहे तो म्हणतो the power to compel obedience to the law, is derived from the power to sway public opinion, to the belief that the law and its agents are legitimate and deserving of this obedience .

पब्लिक ओपिनीयन बनवण्याचे जे दोन मार्ग असतात त्यातला एक महत्वाचा राजमार्ग शालेय शिक्ष्णाचा आहे. तेथिल पायाचीच मांडणी ढिसाळ असेल तर पुढील इमारतीच्या मजबूती कशी होणार हा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेसी काळात कमीत कमी राजकीय तत्वज्ञानाच्या कथासूत्राच्या मांडणीत सातत्य होते. इथे मांडणी पुरोगामी सुरवात असली तरी विद्यार्थी अणि शिक्षकांना ऊंच कड्यावर नेऊन सोडायचे आणि पुढे उडी तुमची तुम्ही मारा म्हणून सांगण्यासारखे आहे का अशी शंका वाटते.

बालभारतीची इतर पुस्तके आंतरजालावर असली तरी उपरोक्त चर्चीलेले पुस्तक आंतरजालावर दिसले नाही. कुणाला काही /उतारे स्कॅन करुन टाकणे शक्य झाल्यास तसे करण्यास हरकत नसावी.

शिक्षणसमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Jul 2017 - 10:47 pm | मुक्त विहारि

दहावी पास झाल्या नंतर माझा तरी शिक्षणावरचा विश्र्वास उडाला आहे.

शास्त्र आणि गणित, ह्यात तो हमखास नापास होईल अशी त्याला स्वतः लाच खात्री होती.

इतिहासाचा बट्ट्याबोळ करण्याची परंपरा ब्रिटिशांनी सुरु केली आणि आपण तीच परंपरा पुढे चालवत आहोत, असे वाटते.

शाळेत शिकलो ते फक्त अनावश्यक पाठांतर.

(ब्रिटिशांच्या वेळी इतिहासाचे पुस्तक प्रकाशीत करण्यापुर्वी, पाद्र्यांची आणि मौलवींची परवानगी घ्यायला लागत होती.त्यामुळे टिपूने, हैदरने किती हिंदूंची कत्तल केली? हा उल्लेख कुठल्याच शालेय इतिहासाच्या पुस्तकात आढळत नसावा.देवगिरी किल्ल्यातील किती स्त्रियांना पळवून नेले? हेमूने अकबराशी युद्ध का केले? राणा प्रतापने अकबरा बरोबर समझौता का नाही केला? जंजिर्‍याच्या सिद्दीने जंजिरा कसा बळकावला आणि मग त्या किल्ल्याच्या आसपासच्या हिंदूंचे कसे शिरकाण केले? छ, शिवाजी महाराजांना हिंदू स्वराज्य स्थापन का करावेसे वाटले? ह्याची खरी उत्तरे शालेय अभ्यास क्रमात कधीच मिळाली नाहीत.)