शिक्षण

अभियांत्रिकीच्या पद्व्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीत कसे जायचे?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Jun 2017 - 11:48 am

प्रिय मिपाकरांनो,

ह्या वर्षी आमचे मोठे चिरंजीव बी.ई. इंस्ट्रुमेंटेशन होतील.

त्याला पुढील शिक्षण जर्मनीत घ्यायचे आहे.

आपल्या मिपा कुटुंबातील सदस्यांना ह्या विषयी काही माहिती असल्यास विचारावे म्हणून हा धागा प्रपंच.

आपलाच,
मुवि.

शिक्षणमाहितीचौकशीमदत

मेंदू, भावना व वर्तणूक (१)

मंजूताई's picture
मंजूताई in जनातलं, मनातलं
2 May 2017 - 4:53 pm

सेतू – A Conscious Parents’ Forum ह्या पालकांच्या सपोर्ट ग्रुप च्या वतीने नागपुरात दर महिन्यात पालकांसाठी एका चर्चा सत्राचे आयोजन केले जाते. मुलांच्या वाढीच्या वयात शाळा- अभ्यास तर महत्त्वाचे असतातच पण मुलांचा नुसताच बौद्धिक विकास झाला तर तो विकास एकांगी होईल. मुलांसंदर्भात पालक म्हणून आपल्याला इतरही अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. मुलांची शारीरिक - मानसिक - बौद्धिक वाढ, क्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंचा विकास, विविध शास्त्रे, समाजजीवन, मूल्य – नैतिकता, कला – संस्कृती, सौदर्यदृष्टी ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

शिक्षणमाहिती

स्मृती संचय (मेमरी)

मंजूताई's picture
मंजूताई in जनातलं, मनातलं
1 May 2017 - 2:26 pm

सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीने(समुपदेशक) 'मेमरी' वर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांचं ती समुपदेशन करते.

शिक्षणलेखमाहिती

गती

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
22 Apr 2017 - 9:46 am

अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते.
काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही.

समाजजीवनमानतंत्रशिक्षणप्रकटनअनुभवमाहितीप्रतिभा

शिकण्याच्या पद्धती (Learning methods)

मंजूताई's picture
मंजूताई in जनातलं, मनातलं
20 Apr 2017 - 5:27 pm

सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीचा(समुपदेशक) शिकण्याच्या पध्दतीवर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांच समुपदेशन करते.
आज शिकण्याच्या पद्धती सांगितल्या, उद्या तुम्ही त्या अमलात आणल्या व लगेच मुलाचे मार्क्स वाढले असं खात्रीलायक होईलच, असं नाही पण ह्या पालकांना मार्गदर्शक नक्कीच ठरतील.

शिक्षणलेखमाहिती

वायूमंडल

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
9 Apr 2017 - 3:46 pm

ज्या पृथ्वीवर आपण राहतो, त्या पृथ्वीवरच्या भूपृष्ठाचा एक तृतियांश भाग पाण्याने अनावृत्त असला तरी दोन तृतियांश भागावर पाण्याचे विशाल साठे विपुलतेने विखुरलेले आहेत. महासागर आहेत ते. अनावृत्त भागही वस्तुतः वायूंच्या सुमारे दहा किलोमीटर उंचीच्या थराने आवृत्तच आहे. ह्या वायूंचे वजन, म्हणजेच वातावरणीय हवेचा दाब. जो ७६ सेंटीमीटर उंचीच्या पार्‍याच्या स्तंभाच्या दाबाइतका किंवा सुमारे १० मीटर पाण्याच्या स्तंभाच्या दाबाइतका दाब असतो. खरे सांगायचे तर पाण्याने आवृत्त असो वा अनावृत्त, भूपृष्ठाच्या सर्वच भागांवर हवेचा हा महासागर विहरत असतो.

जीवनमानतंत्रभूगोलविज्ञानशिक्षणप्रकटनमाहिती

असेही आहेत शिक्षक !

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
27 Feb 2017 - 7:46 pm

जिल्हा परीषद प्राथमीक शाळा, लमाण तांडा, बेळंब

मराठी भाषा दिवसाच्या निमीत्ताने मराठी विकिपीडियावर बरेच काही लेखन होत असते. सगळेच ज्ञानकोशीय परिघात बसणारे नसते. असाच एक अनुभव उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील लमाण तांडा, बेळंब येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेच्या श्री.खोसे उमेश रघुनाथ ( सहशिक्षक ) यांनी शेअर केला आहे. खरेतर तो त्यांच्याच शब्दात वाचणे उत्तम राहीले असते, पण विकिपीडियावरील माहिती स्थानांतराबाबत झालेल्या नाराजीमुळे माझ्या स्वतःच्या शब्दात अंशतः तरी रुपांतरीत करण्या शिवाय पर्याय नाही.

भाषासमाजतंत्रशिक्षणमाहितीप्रतिभा

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
22 Feb 2017 - 8:32 pm

तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड!
कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.

अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.

संस्कृतीकलाइतिहासभाषाव्युत्पत्तीसमाजजीवनमानप्रवासभूगोलराहती जागानोकरीशिक्षणप्रकटनविचारअनुभवशिफारससल्लामाहितीसंदर्भमदत

द मेन्स्ट्रुअल मॅन

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in जनातलं, मनातलं
10 Feb 2017 - 2:49 pm

द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय.
आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे.

समाजजीवनमानआरोग्यशिक्षणविचारसद्भावनाआरोग्य

राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
6 Feb 2017 - 1:31 am

मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.

धोरणमांडणीसंस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानशिक्षणविचारप्रतिक्रियासमीक्षामाध्यमवेधलेखमतशिफारस