शिक्षण
Confession Box : शकीरा..बहूरुपी आणि..... भाग १
कांदेपोहे खाताखाता टिव्हीवर म्युझिक चॅनलवरील गाणी बघत असताना दारावरची बेल वाजली. टिव्हीचा आवाज म्युट केला व दरवाजा उघडला.
साहेब आहेत का? खाकी वर्दीतल्या व्यक्तीने विचारले.
हो. - मी
कोण आहे ? - बाबांनी विचारले.
पोलिसकाका आहेत. - मी
हातातील वर्तमानपत्र बाजुला ठेवून बाबा पटकन उठून दाराजवळ आले.
आपल्या सोसायटीतील मैदानात कार्यक्रम करायचा आहे, सोसायटीच्या सेक्रेटरीने आपली सही घेऊन यायला सांगितले आहे.
- पोलिसकाका
बाबांनी वाचून वहीत सही केली. ११ वाजता कार्यक्रम बघायला या असे आमंत्रण देऊन पोलिसकाका निघून गेले.
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!
शिक्षण संस्थांच्या जाहिराती; किती ख-या-खोटया?
सध्या एप्रिल महिना सुरू आहे. सध्या विविध शिक्षण संस्थांच्या मोठमोठया जाहिराती सुरू झाल्या आहेत. या जाहिरातींना भाळून न जाता पालक व विद्यार्थ्यांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. त्यातून दोघांचेही होणारे नुकसान टळू शकेल. कारण सध्याचे कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क लाखोंच्या घरात असते. त्यामुळे जाहिरातींच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मदतीसाठी ASCI आहेच. त्याचा वापर ग्राहकांनी करून स्वत:ची फसवणूक टाळावी.
जर्मनीमध्ये एम.एस - माहिती
जर्मनी हा देश अनेक गोष्टींमध्ये अत्यंत प्रगत देश समजला जातो. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी तर जर्मनी म्हणजे पंढरीच! म्हणुनच मी इथे उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले. जर्मनीमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षण मोफत आहे. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांशिवाय जर्मनी हा ही एक उत्तम पर्याय आहे.
एक हवीहवीशी शाळा
शाळा सुटण्याचा आनंद जिथे शाळा भरण्याच्या आनंदापेक्षा छोटा असतो, अशा शाळा विरळाच. अशाच एका शाळेबद्दल नुकतंच वाचलं. वाचून मनात प्रचंड कौतुक, प्रचंड आदर, प्रचंड प्रेरणा असे अनेक भाव दाटून आले. शाळेबद्दल; परंतु त्याहून अधिक या शाळेचा ख-या अर्थाने कायापालट करणा-या त्या एका व्यक्तीबद्दल.
श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव
श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव
जय जय रघुवीर समर्थ !
प्रस्तावना :
( माघकृष्ण नवमी , गुरुवार मार्च ३, २०१६)
सर्व साधकांना दासनवमीनिमित्त सादर प्रणाम!
सज्जनगडावरील दासनवमी निमित्तची विशेष पुजा
जीवनशाळा
गणिताच्या तासाला, उत्तर फारच सोपं असतं
एक अधिक एक बरोबर दोनच असतं
शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं
इथे मात्र एक नि एक 'अकरा'च करावं लागतं.
फळ्यावर सोडविली कितीशी किचकट समीकरणं
लांबच लांब सूत्रांची कसली ती प्रकरणं
यशाच्या पायऱ्या चढताच कळतं
इथे मात्र एकच यावं लागतं 'बेरजेचं' राजकारणं.
ते म्हणाले, आम्ही उंचावतो तुमच्या पिढीची बुद्धिमत्ता (IQ)
मग का बरं खालावली आज समाजजीवनाची गुणवत्ता
नोकरी-व्यवसायात उतरताच कळतं
इथे महत्त्वाची असते फक्त तुमची मालमत्ता.
शब्दांची ताकद
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी
अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द
किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही
शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस
उभा राहतो. माणसामुळे समाज, समाजामुळे एखादं गाव, गावांपासून
राज्य,असा अनंत प्रवास छोट्याशा शब्दांपासून सुरू होतो.कौतुकाच्या
समान संधीच महत्व
जेव्हा एखाद्या बाबतीत/ठिकाणी समान संधीच तत्व पाळल जात नाही तेव्हा सहसा जे संधी पासून मुकले ज्यांना संधी नाकारली गेली त्यांचाच विचार आपण सहसा करतो, समान संधीच्या तत्वाकडे दुर्लक्ष करणार्यांना खरेतर त्यांचे अथवा त्यांच्या संस्थेचे जे काही उद्दीष्ट आहे त्या उद्दीष्टाचीच संधी नाकारली जाती आहे हे लक्षात येत नसते, कदाचित कामास सर्वोत्कृष्ट न्याय देऊ शकणार्या व्यक्तिपासून नकळत तुमच्या उद्दीष्टाची संधी गेली असू शकते -शेवटी नुकसान कशाचे तुमच्याच उद्दीष्टाचे.