समान संधीच महत्व

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 12:29 am

जेव्हा एखाद्या बाबतीत/ठिकाणी समान संधीच तत्व पाळल जात नाही तेव्हा सहसा जे संधी पासून मुकले ज्यांना संधी नाकारली गेली त्यांचाच विचार आपण सहसा करतो, समान संधीच्या तत्वाकडे दुर्लक्ष करणार्‍यांना खरेतर त्यांचे अथवा त्यांच्या संस्थेचे जे काही उद्दीष्ट आहे त्या उद्दीष्टाचीच संधी नाकारली जाती आहे हे लक्षात येत नसते, कदाचित कामास सर्वोत्कृष्ट न्याय देऊ शकणार्‍या व्यक्तिपासून नकळत तुमच्या उद्दीष्टाची संधी गेली असू शकते -शेवटी नुकसान कशाचे तुमच्याच उद्दीष्टाचे. समान संंधीच्या तत्वाकडे दुर्लक्ष करणार्‍यांना, आपल्या व्यवसायाचे जाहीराती अथवा प्लेसमेंट एजन्सीचे पैसे वाचले, अनावश्यक मुलखती घेण्याचे टळले, 'आपल्या' लोकांसाठी काही केल्याच्या अथवा 'व्यक्तिगत स्वार्थ' साधला गेल्याचे समाधान मिळत असेलही पण वस्तुतः हे केवळ भ्रममुलकच नव्हे तर स्वतःचेच नुकसान करणारे ठरलेले असू शकते का ?

वृतपत्रिय जाहीरातीचे पैसे वाचले पण तुमच्या ओळखीत नसलेली एखादी व्यक्ति त्या कामास/उद्दीष्टास न्याय देण्यास अधिक पात्र राहू शकली असती, मुलाखती घेण्यात वेळ जातो हे खरे पण मुलाखती हे अप्रत्यक्ष असे बिझनेस इंटीलीजन्स जमा करणारे टूल आहे तुम्ही नीट लक्ष ठेवल्या मुलाखत देणार्‍या व्यक्ती तुमचे स्पर्धक आणि इंडस्ट्रीतील विवीध प्रकारची माहिती अप्रत्यक्षपणे शेअर करत असतात त्याचे तुम्ही मनातल्या मना विश्लेषण करून तुमच्या व्यक्तिगत अथवा व्यावसायिक प्रगतीसाठीही वापरु शकता.

ओळखीतील व्यक्तीस संधी देण्याचे आणखीही एक कारण आहे, ते म्हणजे विश्वास दोन्हीही व्यावसायिक कार्यकुशलतेस आणि व्यक्ती सचोटीची असल्या बद्दल विसंबण्यास सोपे जाते असे बर्‍याच जणांचे म्हणणे असते, यात तुम्हाला कुणितरी विश्वास देववत असल्यामुळे अंंशतः तथ्य असावे पण पूर्ण तथ्य नव्हे, तुमच्या ओळखीच्या व्यक्ती सुद्धा त्यांच्या व्यक्तिगत हितसंबंधातून कुणालातरी सूचवत असू शकतात म्हणजे सुचवणी करणार्‍या व्यक्तीचा उद्देश तुम्हाला मदत करण्यापेक्षा स्वतःचे हितसंबंध अपत्यक्ष जपण्याचा असू शकतो कि ज्यामुळे विश्वासार्हतेबाबतची तुमची अपेक्षा प्रत्यक्षात येऊ शकेलच असे नाही.

आणखीही असा एक मुद्दा येऊ शकतो की जी व्यक्ती ओळखीतून येते तीला कमीत कमी ओळख वापरुन घेण्याचे कौशल्य आपसूक आहे आणि नेटवर्कींगचे कौशल्य आहे हे सिद्ध होत असते, ते तसे शक्य असू शकेल पण नेटवर्कींगचे कौशल्य हे ज्या ठिकाणी स्पेसिफील आवश्यक नाही तिथे त्याचा हट्ट तर्कसुसंगत राहतो असे म्हणणे अवघड असावे.

समानसंधी नाकारण्याचा अजून एक प्रकार म्हणजे रेव्हेन्यू जस्टीफिकेशन एखादी व्यक्ती अमूक एवढे मोठे उत्पन्न त्याच्या सध्याच्या संस्थेत मिळवते म्हणजे तेवढे उत्पन्न जस्टीफाय करणारे स्किल आणि अनुभव त्या व्यक्तीत आहे असा एक निर्वाळा दिला जातो, त्यातील स्किल आणि अनुभव या मुद्द्यांना नाकारण्याचे काहीच कारण नाही परंतु हा मुद्दा लॉजीकली कितपत संपूर्ण असतो ? कमी उत्पन्ना वरील व्यक्ति अपात्रच असतील हे समान संधी न देता मुलाखत न घेताच कसे ठरवता येऊ शकते ? दुसरे तर या प्रकारात व्यवसायाचे फिक्स्ड ओव्हरहेड्स कायमस्वरुपी चढते राहतात, शेअर होल्डरचा प्रोफीट मार खातो त्या शिवाय मंदीच्या काळात हेच वाढवुन ठेवलेले ओव्हरहेड्स तापदायक ठरु शकतात.

समान संधी म्हणजे सकारात्मक कृती (अफर्मेटीव्ह अ‍ॅक्शन) सरसकट नाकारणे नव्हे तर अनरिप्रेझंटेड घटकातूनही उपयूक्त टॅलेंटे शोधून त्यांनाही/आणि आपल्या उद्दीष्टासही समान संधी देणे होय

समान संधीचे तत्वाचे महत्व प्रोक्युअरमेंट/पर्चेसच्या बाबतीतही तेवढेच असावे.

समान संधीवरचा असाच इललॉजीकल अन्याय शिक्षणाच्या क्षेत्रात होतो, ज्याला जे शिकण्याची इच्छा आहे आवड आहे ते त्याला शिकण्याची संधी मिळावयास हवी की नको, तिथे कृत्रिम टंचाई, पात्रतांचे कृत्रिम निकष, संधी नाकारण्याचे मोठेच काम बजावत असतात.

या सर्वात शेवटी नुकसान कुणाचे असते ? तुमच्या व्यवसायाचे आणि तुमच्या देशाच्या अर्थशास्त्राचेच ना ? मी तुम्ही आणि आपण या विषयाचा विचार करण्या एवढे मनाने खुले आहोत का ? मी आणि माझी आस्थापना समान संधीच्या तत्वात विश्वास ठेवते तशी आमच्या आस्थापनेची संस्कृती आहे हे आपण अभिमानाने सांगू शकू का ? अर्थात समान संधीचे तत्व जबरद्स्तीने लादण्या पेक्षा त्याची प्रबोधनातून महत्ता पटवून दिली आणि संस्कृतीने आत्मसात केलीतर अधिक प्रभावी असू शकेल किंवा कसे.

शिक्षणविचार