विसरून जाण्याजोग्या आठवणी
आंतरजालावर हल्लीच शाळा कॉलेजातील अविस्मरणीय आठवणींबद्दल चर्चा वाचली होती. त्यावर लिहिण्यासारख्या बर्याच आठवणी आहेत, पण माझ्यापाशी शाळेतल्या दिवसांमधल्या कायमच्या विसरून जाण्याजोग्याही बर्याच आठवणी आहेत. आज त्याच लिहाव्या असं वाटलं. माझ्या शाळा होती मुंबईत. म्हणजे अगदी शिवाजी पार्क, गिरगांव अशी खुद्द मुंबईतल्या भागांमध्ये नाही तर एका उपनगरामध्ये. शाळा चांगली होती, उत्तम शिक्षक होते. अभ्यास, परिक्षा, इतर उपक्रम सगळ्याची योग्य सांगड घातली जाई. शाळेतली मुलंही सुसंस्कृत, मध्यमवर्गीय घरांमधली होती.