आज १४ जून . . प्रदीर्घ सुट्टीनंतर पहिल्यांदा शाळेत जायचा दिवस . . .नवीन गणवेश . . नवीन वह्यापुस्तकं . . . नवीन वर्ग . . . . नवीन सवंगडी . . . आपलं नाव कुठल्या वर्गात येतंय त्याची उत्सुकता . . . आपला हजेरी क्रमांक काय असेल , मग तो लकी आहे की नाही याचा अंदाज घेणे . . . नवीन शिक्षक कोण आले आहेत ते बघणे . . . . बाहेरच्या कुंद पावसाळी वातावरणात ते वाहनांचे आवाज आणि पादचारी लोकांची लगबग . . . शेजारच्या मशिदीतली ती भोंगावाली अजान . . .
आपला वर्ग आणि खोली पहायला प्रवेशद्वारी उसळलेली गर्दी . . .आपलं नवंकोरं दप्तर,ते भिजू नये म्हणून आपला चाललेला आटापिटा.... त्यातले ओळखीचे आणि अनोळखी चेहरे . . . गेल्या वर्षी चांगले मार्क मिळाल्याने काही उगाचच शिष्टपणा करणारी मुलं . . . त्यांच्या आजूबाजूला त्यांच्यासारखं बनू पाहणारी किंवा मार्कांच्या बाबतीत जवळपास असणारी मुलं . . (आमच्या शाळेत बहुधा तुमचे मार्क तुमचं वर्तुळ आणि बेंच ठरवतात) . . .
पावसामुळे ओलसर दमट झालेले ते बेंच . . . त्या पोपडे पडलेल्या वर्गाच्या भिंती . . . . अभ्यासू,मध्यम, टवाळ सगळ्या प्रकारची मुलं . . . वरवर शांत वाटणार्या पण प्रत्येक गोष्ट बारीक नजरेने टिपणार्या मुली. . . फळा, डस्टर, खडू आणि बरंच काही . . . प्रत्येक तासाचं निराळं कुतूहल . . . अभ्यासाची वाढलेली जबाबदारी . . . या वर्षी चांगले मार्क मिळवायचेच असा केलेला निश्चय . . . . इतर वर्गातला कोलाहल . . . स्वच्छतागृहाच्या बाजूने जाताना नाक जाळणारा भपकारा . . . टीचर रुममधली गडबड . . .
आपला आवडता बेंच पकडण्याची चढाओढ . . तेवढ्यात शिपायाने दिलेली घंटा . . . . तेच सुपरिचित गाणे . . . कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर . . . . त्यानंतर प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत . . . . मग वर्गात पसरलेली शांतता . . . हजेरी पट . . आपला नंबर पुकारला तरी सवय नसल्याने इकडे तिकडे बघत राहणे मग शिक्षकाचा वाढलेल्या स्वरात ओरडणं . . एकामागून एक सरकणारे तास . . प्रत्येक विषयाची तोंडओळख होते पहिल्या दिवशी . . . शिकवत असं कोणी नाहीच . . . . मधली सुट्टी . . . . डबा खाणे . . . . ग्राउंड बरं असेल तर खाली फेरी , अन्यथा आमचा बंदिस्त रंगमंच झिंदाबाद !
हे असे भरलेल्या पावसाचे दिवस आठवले की मनही भरून येतं . . . शरीर शिकून बाहेर पडलं फक्त शाळेतून आणि एकामागोमाग नित्यकर्म करत राहिलंय आयुष्याची. . . मग अजूनही घुटमळतंय तिथेच . . . ओल्या दमट बेंचवर . . कायमचं . . . . एक विद्यार्थी म्हणून !
प्रतिक्रिया
14 Jun 2017 - 5:35 pm | मुक्त विहारि
@ माप,
काय चाललंय काय? पावसावर कविता करून झाली आणि आता ह शाळेतला पहिला दिवस....
14 Jun 2017 - 5:54 pm | किसन शिंदे
परिक्षा संपल्यानंतर रिझल्ट ज्या दिवशी हातावर पडायचा तेव्हाच कुठल्या तुकडीत ढकललंय हे कळायचं.
रच्याकने, साफसफाई करायला लागेल या भितीने पहिल्या दिवशी शाळेत कधीच नव्हतो गेलो. :D
14 Jun 2017 - 5:57 pm | मुक्त विहारि
ते त्यांना ही कळाले असेलच पण वर्ग नक्की कुठे असेल ह्याचा अंदाज नसावा.
14 Jun 2017 - 6:15 pm | माम्लेदारचा पन्खा
पण बरोबर कोण कोण आहे ते त्याच दिवशी कळायचं ना . . . .
आणि साफसफाई कुठे करायला सांगायचे ते विद्यार्थ्यांना . . . आपण एकाच शाळेत होतो की . . .
14 Jun 2017 - 6:20 pm | अभ्या..
बरंय बाबा, बरंच काही आठवतंय शाळेतलं.
मी पास कसा झालो तेपण आठवत नाही मला. :(
14 Jun 2017 - 9:49 pm | असंका
+1...
आठवू म्हणलं तर आठवेलही... पण नकोच...
14 Jun 2017 - 9:42 pm | पद्मावति
लेख आवडला.
14 Jun 2017 - 10:08 pm | राघवेंद्र
आमच्या वेळेस वर्ग शिक्षक कोण असेल याबद्दल कुतुहूल असे. तसेच प्रत्येक विषयाला कोणते शिक्षक असतील याचेही ?
सायंकाळी आमच्या 'ए' तुकडीला 'बी' पेक्षा चांगले शिक्षक आहेत यावरून 'बी' मधील मित्रांना चिडवणे.
15 Jun 2017 - 12:09 pm | खेडूत
त्यावरून उगीच आठवलं..
पाचवी ए चा निकाल लागला तेव्हा माझी मैत्रीण बी तुकडीत गेली, अन मी ए मधेच राहिलो. तर मी कोणते गाणे म्हणेन??
14 Jun 2017 - 11:12 pm | रातराणी
माझं मराठीचं पुस्तक वाचून झालेलं असायचं शाळा सुरू व्हायच्या आधीच, बालभारतीचं कव्हर, त्यातली चित्रं सगळं सगळं आवडायचं. बाकी पुस्तकं नवी कोरी राहायची =))
15 Jun 2017 - 10:03 am | चांदणे संदीप
अगदी डिट्टो म्हणजे शेमटूशेमच!
Sandy
15 Jun 2017 - 6:35 am | कंजूस
चानचानचान
15 Jun 2017 - 4:54 pm | कर्ण
triv aathwaz zali shalechi, kiti soneri diwas hote te
15 Jun 2017 - 7:19 pm | कंजूस
सर्वात कंटाळवाणा दिवस. अजून किती वर्षं यायचं हा विचार.
अकरावीचा शेवटचा शाळेतला दिवस- आयुष्यातला आनंदाचा दिवस .सुटलो एकदाचा यांच्या तावडीतून.
19 Jun 2017 - 7:30 pm | गामा पैलवान
खेडूत,
मेरा सुंदर सपना 'बी'त गया.
आ.न.,
-गा.पै.
20 Jun 2017 - 8:39 pm | मुक्त विहारि
+ १
20 Jun 2017 - 8:56 pm | राघवेंद्र
+१
19 Jun 2017 - 7:31 pm | गामा पैलवान
मा.प.
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर म्हणजे तुम्ही मो.ह.विद्यालयाचे का?
आ.न.,
-गा.पै.
27 Jun 2017 - 10:57 pm | माम्लेदारचा पन्खा
कसं ओळखलं ?
6 Jul 2017 - 11:41 am | गामा पैलवान
मापं,
अहो तुम्हीच म्हणालात ना की ते सुपरिचित गाणं आहे. एकतर दुसऱ्या कोणत्याही शाळेत अशी गाणी लावली जात नाहीत. कारण की ठाण्यात नाट्यगृह नसल्याने फक्त मोहवित यावसायिक नाटकं लागायची. त्यांमुळे ध्वनीवर्धक यंत्रणा उपलब्ध असे. शाळा भरण्याआधी तिच्यावरून गाणी वाजवली जायची. दुसरं म्हणजे हे गाणं आठवड्यातनं दोनदा तरी लागायचं. फारंच आवडतं होतं बुवा. हे गाणं ऐकल्यावर कुण्याही मोहविकराच्या डोळ्यासमोर वार्धक्याऐवजी बालपण उभं राहील म्हणतो मी! ;-)
आ.न.,
-गा.पै.
21 Jun 2017 - 11:15 am | सचिन काळे
छान लिहिलंय!!
कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन.