मि ती नव्हेच [मिपावरील पहिली खो कथा]
खो कथेला शिर्षक सुचवण्याचे आवाहन करणारा धागा
खो कथेला शिर्षक सुचवण्याचे आवाहन करणारा धागा
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.
राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....!
.
नमस्कार मंडळी!
आपल्या मिपावर जागतिक मातृभाषा दिनाला म्हणजे २१ फेब्रुवारीला बोलीभाषा सप्ताह या आपल्या मातृभाषेच्या उत्सवाची सुरुवात झाली. वटवृक्षाच्या पारंब्याप्रमाणे असलेल्या तिच्या अनेक बोली लेख, कविता, कथांच्या स्वरूपात आपल्यापुढे येत गेल्या. जागतिक मराठी दिनाला म्हणजे २७ फेब्रुवारीला या उत्सवाची सांगता होत आहे. समारोप म्हणवत नाही, कारण ही अखंड तेवावी अशी ज्योत आहे.
मी महिन्या पूर्वी ठाण्यात हायलँड हेवन या ठिकाणी वन बीचके बुक केलाय, आता अश्या बातम्या येऊ लागल्यात कि घराच्या किंमती कमी होणार आहेत म्हणून काय करावे सुचत नाही. कृपया तज्ञ मंडळी कडून या विषयावर मदत हवी आहे.
.
घराची किंमत ५३ लाख + पार्किंग + २ वर्षाचा मेंटेनन्स + क्लब आणि इतर धरून ७४ लाखाला पडलाय.
अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, बुकिंग ८०-२० स्कीम मध्ये केलेले आहे. आता १४ लाख सुरुवातीला भरले आहेत. बाकी ६० लाख घर ताब्यात मिळाल्यावर २०१९. अजून बिल्डिंग चे काम सुरु झालेल नाही.
काय करणे योग्य ठरेल; कृपया तज्ज्ञ मिपाकरानी आपले बहुमोल मार्गदर्शन करावे.
धन्यवाद
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते. कांही वृत्तवाहिन्यांच्या बातमीप्रमाणे ट्रॅक बंद पडल्यावर गायक आणि वादकांनी खरेच गायला-वाजवायला सुरुवात केली तेव्हा एनर्जी लेव्हल मधे कमालीचा फरक पडून गाणे नीरस झाले.
Please, Look After Mom ही Kyung-sook Shin या कोरियन लेखिकेची कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या नावातच तिचा कथा विषय, आई, ठळकपणे सूचित होतो.
खरंतर आई या विषयावर विपुल लेखन झालेले आहे. पण ही कादंबरी मनात रेंगाळत राहते, ती तिच्यातले सखोल तपशील,निवेदनशैली आणि कथनातील कमालीच्या प्रांजळपणामुळे !
कादंबरी सुरु होते तीच मुळी वाचकाचे चित्त जखडून ठेवणाऱ्या, 'स्टेशनवर आई हरवली' या वाक्याने!
[इथे Albert Camus च्या 'The Outsider' मधील Mother died today या प्रसिद्ध ओळीची आठवण आल्याशिवाय रहात नाही!]
लहानपणी येणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोर 3 -3 वेळा नमस्कार करून जाणारा मी , देवासमोर खूप खाबरून जणू त्याला मी केलेल्या सगळ्या लहान लहान चुकांची माफी मागून पुढे जात होतो .....शाळेतून घरापर्यंत येताना लागणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोरून मागंन तेच असायचं फक्त त्या मध्ये जास्त कळकळ आणायचा प्रयत्न करायचो.
कालच्या टाईम्स ऑफ इंडिया पेपरमधे मी ऑनलाईन ऑर्गन डोनेशन बद्दल वाचलं.
खाली दोन साईट्स दिल्या आहेत जिथे जाऊन हे करता येईल
www.dmer.org
www.ztccmumbai.org
काही विचारपूस करावयाची असल्यास हेल्पलाईन नंबर्स
helpline numbers: 1800274744, 1800114770
मला ह्याबाबतीत बरंच कुतुहल आहे.