मि ती नव्हेच [मिपावरील पहिली खो कथा]

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
1 Apr 2017 - 10:00 pm

खो कथा प्रकाराबद्दल थोडसं :

खो कथा म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेखकांनी एकमेकांना खो देत लिहलेली कथा. काही दिवसांपूर्वी खो खो चा सामना बघत असतांना मला हे नाव सुचलं आणि या प्रकारासाठी चपखल वाटलं. ही कथा लिहायची कशी तर एका लेखकाने पहिली पोस्ट टाकून कथेला सुरुवात करायची आणि दुसऱ्या कुठल्याही लेखकाला खो द्यायचा. त्या लेखकाने मग पुढचा भाग लिहायचा, त्याने तिसऱ्याला खो द्यायचा वगैरे वगैरे. हे करत असतांना एकमेकांशी कथानकासंदर्भात अजिबात चर्चा करायची नाही हा नियम मात्र पाळायचा.
---------------------------------------------
मितिकऱ्यांच्या विश्वात भ्रमण करून आलेल्या मिपाकऱ्यांना रामराम. या प्रयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सुधारणा सुचवण्यासाठी आपण आपल्या प्रतिसादांचे बिटकॉइन्स खर्च केलेत त्याबद्दल आभार. तुमच्यामुळेच कथेचा ट्रस्ट इंडेक्स वाढायला मदत झाली.

मिपावर यायला मला काही महीनेच झालेत. अर्थात त्याआधी बऱ्याच वर्षांपासून लिहतोय पण मराठी लिखाण वेबसाईट्सवर आतापर्यंत लिहलं नव्हतं. इथे आलो आणि नगास नग लेखक भेटले. उत्तम गोष्टींची जाण असलेले कदरदान, खराखुरा प्रतिसाद टंकवणारे स्पष्टवक्ते, एकमेकांच्या मदतीला सदैव तत्पर असलेले सह्रुदयी, उत्तम लेखक यांचं गाव आहे हे. तरंगलांबी जूळली आणि मन रमलं. तरीपण कथालिखाणाच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळेल याबद्दल मनात शंका होतीच. पण जबरदस्त प्रतिसाद मिळाला. कुणी तयार आहे का माझ्यासोबत खो कथा लिहायला ? या प्रश्नाच्या उत्तरादाखल तब्बल नऊ लेखक कथा लिहायला तयार झाले, (काहींना कार्यव्यस्ततेमुळे इच्छा असूनही भाग घेता आला नाही) सर्वांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या. मनास खूप संतोष जाहला. नऊपैकी तिघांना मार्च एंडिंगच्या कामांमुळे वेळेत पोस्ट लिहायला जमलं नाही त्यामुळे उर्वरित सातजणांनी मिळून कथा पुर्ण केली. अर्थात पहिला प्रयत्न असल्यामुळे काही कमतरता राहिल्या असतील. पुढील वेळी आपण मिळून त्या दूर करण्याचा प्रयत्न करू.

सरतेशेवटी माझ्या सहलेखक भिडूंचे मी आभार मानतो, कौतुक करतो.

आधी कबूल केल्याप्रमाणे कथेला शिर्षक सुचवण्याचा मान वाचकांना मिळणार आहे. लेखक भिडूसुद्धा शिर्षक सुचवू शकतील. या क्षणापासून चोवीस तासांनी मतदान संपेल. चला तर मग, पटापट शिर्षक सुचवा. धन्यवाद.

सलग कथावाचनाचा आनंद मिळावा यासाठी आठही पोस्ट इथे एकत्र केल्या आहेत.

-------------------------------------------
-------------------------------------------

पोस्ट क्र. १: जव्हेरगंज

रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ रंगात आला होता. बाजारतळावर ही गर्दी. लिंबाच्या झाडाखाली बरीच म्हातारी कोतारी बसलेली. तमाशाचा फडावर एक उफाड्याची बाई गल्ल्यावर बसलेली दिसली आणि आजचा मुक्काम सार्थकी लागणार याची मला खात्रीच पटली. येताळबाबाचा बुटका डोंगर चढायला बराच वेळ लागला. धापा टाकत तिथला लिंबू सोडा पिल्यावर नवचैतन्यात न्हाऊन निघालो.
उंच टेकडीवर जांभळाची आणि चिंचेची मुबलक झाडे होती. बघावं तिकडे त्यांच्यावर चिरगुटे बांधलेली आढळली. गार सावलीत शेंदूर फासलेले दहाबारा येताळबाबा ठाम उभे होते. मधल्या भव्य मुर्तीसमोर हात जोडून मी "आज तरी हूं दी बाबा" अशी गळ घातली. सव्वा रूपया काढून दगडावर ठेवला. कपाळावर बुक्का फासून घेतला. अनवाणी प्रदक्षिणा मारायला मग मी मोकळा.
मोबाइलवर '11PM' अशी धडक बातमी मिळाली अन डोंगर उतारावर आमचा वेग आपसुकच वाढला. पण आता कुठे चार वाजले होते. घटकाभर डोंबाऱ्याचा खेळ बघावा म्हटलं पण तो ही संपला होता. मग खुशाल बसलो लिंबाच्या झाडाखाली दाढीवाल्या बुवाचं किर्तन ऐकत. टाळ, मृदुंग आणि ढोलकीच्या आवाजात ही म्हातारी माणसं बरंच इरसाल बोलून जातात. 'आतल्या' विनोदांना काताचा बकणा भरून हसतात. एका म्हाताऱ्यानं मला सुपारी दिली खायला. मग मी पान मागून घेतलं आणि त्यावर चुना माखून तोबरा भरला. अशी किर्तने यापुढे चुकवायला नकोत. बराच 'माल' असतो याच्यात. यालातर 'आध्यात्मिक तमाशा'च म्हटलं पाहिजे.
रात्र झाल्यावर जरा बरं वाटलं. बाजारतळावरची गर्दीही हटत चालली होती. लांब नळीच्या टूपा सगळीकडं पेटल्या होत्या. जिलबी आणि भज्याचा घाणा मात्र अजूनही कायम होता. कुठे 'सोय' होतेय का बघत मी विचारणा केली. देशी काय आपल्याला चालली नाही. ती तमाशावाली बाई अजूनही गल्ल्यावर बसून गल्ली दाखवत होती. किर्तनाने कर्ण तृप्त झाले होते आता नेत्र तृप्त करण्याच्या इराद्याने मी बराच वेळ तिथे उभारलो. शेवटी कांदाभजी खातखात रस्त्याला लागलो.
चौकात आल्यावर खिशातल्या 'की'नं गाडी पॉकपॉक केली. दरवाजा उघडून आत बसल्यावर अजूनही न दिसलेले ते दृश्य नजरेस पडलं. तमाशाच्या फडाच्या मधल्या उंच टोकावर एक लेझर बीम दिमाखानं झळकत होता. त्याचा हाय वोल्टेज झोत आभाळाला जाऊन थडकला होता. आपल्याही घरावर असाच एक झोत असावा असं मला वाटून गेलं. तो हास्यास्पद विचार झटकून मी गाडीचा झोत सुरू केला.
गाडी पळाय लागली. धूर काढून जळाय लागली. एका हातानं स्टेअरींग पकडून मी थोडी का होईना 'मळाय' घेतली.
फाट्यावर एक ट्रक आडवा गेला. मग जरा स्लो केली. रामगल्लीतून जातजात दत्ताच्या देवळामागं पार्क केली. हायवे इथून फारसा लांब नव्हता. थंडगार वाऱ्यात हुडहुडी भरत होती. नाशिकला मी काय पहिल्यांदाच आलो नव्हतो. दर आमुशा पोर्णिमा इकडंच साजरी व्हायची. त्र्यंबकेश्वर तर त्यासाठीच खास राखीव होतं. पण आता गिराण लागल्यासारखं सगळं बदललं होतं. रामगल्लीत दरोडेखोरासारखं घुसावं लागत होतं. वर रातभर जागणं आणि उघड्यावर मुक्काम. हालहाल व्हायचे.
मी देवळाच्या कठड्यावर बसलो. मोबाईलवर स्टॅटस घेतला. उत्तर काही आले नाही. सालं हे नेहमीचंच लचांड. ऐनवेळी पार्टी माघार घेते. हात हलवत परत जावं लागलं तर पुन्हा कधी इकडं फिरकायचं नाही. हे खूप वेळा ठरवून झालं होतं. पण पुन्हा बोंबलत इकडं यावंच लागायचं.
सिगरेट फुकत मग बराच वेळ घालवला. शेवटी त्या घराकडं जायचंच ठरवलं. एव्हाना बारा वाजून गेले होते. चंद्रप्रकाशाचं चांदणं रस्त्यावर विखुरलं होतं. बरीचशी घरे आणि तीव्र वीजेचे दिवे. अंधार शोधणं तसं अवघडंच होतं.
ते दुमजली घर एखाद्या बेडकाप्रमाणे दबा धरून बसलं होतं. नेहमीप्रमाणेच तिथे सामसूम असेल वाटलं होतं. पण तिथे तर भरपूर गाड्या उभ्या होत्या. असंख्य लोकं मांडी घालून खाली ओट्यावर बसली होती. एका भिताडाजवळ उभा राहून मीही त्यांच्यात मिसळलो. दबक्या आवाजात 'वाईट झालं', 'चांगला हुता', 'अलिकडं पिणं वाढलं हुतं' अशा काही चर्चा कानावर पडल्या. मी मनात चरकलो. नाही म्हटलं तरी धडकीच भरली.
शशिकांतला म्हणे लागलीच दवाखान्यात हलवला होता. मी जरा आत डोकावून पाहिलं. सोफ्यावर शालू जाम टेन्शनमध्ये दिसत होती. तिची अवस्था मला पाहवली नाही. क्षणभरच तिने माझ्याकडे बघितले. मग अनोळखी असल्यासारखी पुन्हा खाली बघत बसली. नाही म्हटले तरी डोळ्यात दोन थेंब घेऊन मी त्या घरातून बाहेर पडलो.
दत्ताच्या देवळाजवळ आल्यावर मी अजून एक सिगारेट पेटवली. कठड्यावर बसून बराच विचार केला. काहितरी गूढ घडलं असणार नक्की. तिकडं परत जाणं मला योग्य वाटलं नाही. थंडगार वाऱ्यात तिथंच पसरलो. झोप कधी लागली कळलंच नाही.
गुहा. गुहेत गुहा. तिच्यात अजून एक गुहा. शेवटच्या गुहेत आरसेच आरसे. आणि आरश्यांच्या आड लपलेला महंमद खुदीराम. साला चेटूक करतो.
मी म्हणालो, "केवड्याला दिला?"
तो म्हणाला, "खाली टाक. फुटला तर पाच हजार. नाहितर फुकट"
चांगला धंदाय साल्याचा. मी पाकिटातून हजाराच्या पाच नोटा बाहेर काढून ठेवल्या.
"काम तर करंल ना?"
त्यानं नुसतीच दाढी कुरवाळली.
उंच हातात धरून मी आरसा खाली फेकला. धप्प आवाज आला. पण फुटला अजिबात नाही. च्यायला. लूटला साल्याला. फुकटचं आपण काय सोडणार नाय. आरसा घ्यायला खाली वाकलो तर...
भल्या पहाटे मोबाईलच्या आवाजानं मी जागा झालो. दत्ताच्या देवळात झोपलो तरी कसली विचित्र स्वप्नं पडतात. डोळे चोळत पटांगणात आलो. दोन हात वर करून कडकडून आळस दिला. सकाळ होत आली होती. हापश्यावर जाऊन तोंड धुतलं. दूर बांधावर एक चिता धडधडत होती. मी मोबाईल बघितला. शालूने एक मॅसेज पाठवला होता. तो पाहून मी हादरलोच.
"काल मी त्याला तुझ्याविषयी सगळं सांगितलं. आणि तो..."
बापरे!

पोस्ट क्र. २ : अॅस्ट्रोनाट विनय

मला वाटलं होतं त्याप्रमाणे शशिकांतचा मृत्यू गूढ वगैरे काही नव्हता. त्याचा दहातल्या पाचजणांना येतो तसा हार्ट अटॅक येऊन एंड झाला होता. टेन्शन असं काहीच नव्हतं. सुखी कुटुंब, मोठ्या पगाराची नोकरी अन पार्ट्या करायला मित्र. पण जीवनाचा काय भरवसा. रात्री झोपायला गेला पण सकाळी उठलाच नाही. दुर्दैवी जीव, दुसरं काय.
पण मला आरशात त्याचाच चेहरा का दिसला ? योगायोग होता, भास होता की अजून काही ? कळायला मार्ग नव्हता. शेवटी जास्त विचार करायचा नाही असं मी ठरवून टाकलं.
शशिकांतचं क्रियाकर्म आटोपून त्याच दिवशी मला निघावं लागलं. थांबावंसं वाटत होतं पण आमचा ढेरपोट्या बॉस आग्यावेताळासारखाच मानगुटीवर बसला होता. "मी मेलो होतो" या सबबीशिवाय इतर कुठलंही कारण असेल तर सुट्टी मिळणार नाही असं त्याने कुत्र्यासारखं वसकावून सांगितलं. इन शॉर्ट, मला निघावं लागलं.
निघेपर्यंत अंधार पडू लागला होता. मधे एका धाब्यावर गाडी थांबवून मी पोटात इंधन टाकलं अन निघालो. बाहेर वारा मंद वाहत होता. सोबतीला किशोरचे दर्दभरे नगमे होते. अर्धा रस्ता कसा पार पडला कळालंसुद्धा नाही. उरलेलं अंतर कापलं की घरी जाऊन अंथरुणावर कोसळायचं एवढंच उद्दिष्ट समोर होतं.
अन... एका वळणावर अचानक गाडीचे लाईट बंद पडले. समोर काळाकुट्ट अंधार पसरला. मी रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन थांबवली. अवघड रस्ता, काळीशार रात्र अन त्यातच दृष्टीहीन बनलेली माझी गाडी. दहा वर्षांपासून कार चालवतो पण बिघडली की मला दुरुस्त फिरूस्त करायला जमत नाही. इथून दूरदूरपर्यंत कुठलंच गॅरेज नव्हतं. मी मनातल्या मनात गाडीला अन X डू नशिबाला शिव्या देऊ लागलो. उद्या ऑफिसला जाण्यासाठी आज घरी पोहोचणं भाग होतं. माझ्याकडे जर पर्शियन जादूगारासारखा जादूचा गालिचा असता तर त्यावर बसून आत्ता उडून गेलो असतो. पण तो ऑप्शन नव्हता. मी गुपचूप कारखाली उतरून एखाद्या वाहनाची वाट पाहू लागलो. मोठं वाहन असलं तर त्याच्या टेललॅम्पच्या उजेडात मी सहज पुढे सरकलो असतो.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा वाहता हायवे असूनसुद्धा एकही वाहन दिसत नव्हतं .पंधरा वीस मिनीट निघून गेले, अर्धा तास झाला पण साधं चिटपाखरुही नाही. कंटाळून शेवटी मी गाडीत बसलो अन सहज चाळा म्हणून त्या चेटक्याने दिलेला आरसा बाहेर काढला (आजकाल चोवीस तास तो आरसा माझ्याजवळ असतो.) स्वतः चं प्रतिबिंब पाहण्यासाठी मी गाडीतला लाईट ऑन केला... अन काय आश्चर्य ! आरशावर प्रकाश पडताक्षणी तो शतपटींनी अॅम्प्लीफाय झाला अन डोळ्यांत घुसला. प्रतिक्षिप्त क्रियेने मी आरसा दूर फेकला. डोळे चोळून थोड्या वेळाने नजर सरावली, अजूनही प्रकाश बाहेर पडतच होता. मला एक कल्पना सुचली. आरसा उचलून मी डॅशबोर्डजवळ ठेवला; क्षणात त्या तिलस्मी प्रकाशाने दहाबारा फुट रस्ता झक्क उजळून टाकला. हे का झालं, कसं झालं हा विचार करण्याच्या भानगडीत मी पडणार नव्हतो. टॉप गेअर टाकून मी सनान गाडी पळवंत निघालो.
तब्बल अर्ध्या तासाच्या प्रवासात एखादा रस्ता सुतासारखा सरळ राहू शकतो का? तर नाही. मुंबई नाशिक रोड तर अजिबातच नाही. पण गेल्या अर्ध्या तासापासून माझी गाडी कुठेही वळण न घेता सरळ चालत होती. एवढ्या वेळात ओव्हरटेक करणारी एकही गाडी दिसली नाही की अंगावर धावून येणारा ट्रक नजरेस पडला नाही. ओळखीच्या खुणासुद्धा नाहीत. चारीबाजुनी मन सुन्न करणारी भयाण गूढता अन फक्त कधीच न संपणारा एकसुरी सरळ रस्ता. घाबरट, पळपुटा अशा शिव्या मला अजून बायकोनेसुद्धा दिलेल्या नाहीत. याचा निर्विवाद अर्थ असा की मी निडर आहे. म्हणून मी हिंमत धरून पुढे जात होतो. पण माझी ## तेव्हा फाटली जेव्हा मे महिन्याच्या त्या रात्री नाशिक मुंबई हायवेवर (खरंच मी तिथे होतो का?) चक्क बर्फ पडायला सुरुवात झाली! गारगोट्या नाहीत- हिमालयात पडतो तसा मऊसूत बर्फ आणि अंग गोठवून टाकणारी थंडी !! गाडी बंद करण्याचा किंवा चालत्या गाडीतून उडी मारण्याचा सल्ला मेँदुने दिला पण मनाला मात्र कुणीतरी खेचून नेऊ लागलं. मी संमोहित झाल्यासारखा गाडी चालवत होतो .अलगदपणे तरंगणारं बर्फ अन गारुडी आइण्यातून बाहेर पडणारा हिरवट प्रकाश...रस्ता कधी संपूच नये; मग तो नरकात नेणारा असला तरी चालेल.
दाणS S...गाडीच्या छपरावर काहीतरी आदळलं... आरसा खाली पडून खळsकन फुटला. प्रकाश क्षणात छूमंतर. सगळीकडे अंधारच अंधार.सगळं अंग बधिर झालं, ओरडायला गेलो तर सगळी बाराखडी घशात गोठली. अंधाराच्या पलीकडे बघण्यासाठी मी डोळ्यावर शक्य तेवढा ताण दिला. पण अंधाराच्या विवरात मी हरवत गेलो; खोल खोल जात राहिलो.
झटक्यात डोळे उघडले. पाठीखाली काहीतरी मऊ लागंत होतं अन डोळ्यांसमोर होतं बेडरुमचं पांढरंशुभ्र छत. मी माझ्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये, माझ्याच बेडरुममधल्या पलंगावर होतो! - नाईटड्रेसमध्ये, व्यवस्थित चादर पांघरलेला. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटलेला होता.
बापरे !काय विचित्र स्वप्न होत. नाशिकहून केव्हा आलो, काय मला काहीच आठवत नव्हतं. डोकही जाम दुखतं होतं तो आरसा आल्यापासून हे सगळं झालंय. संध्याकाळी जाउन तोंडावरच मारतो त्या चेटक्याच्या. मी आळोखे पिळोखे दिले आणि टेबलाकडे पाहिलं. घड्याळ सकाळचे नऊ वाजल्याचं दाखवत होतं. तो खडुस बॉस आता मला फाडून खाणार.
मी बायकोला आवाज दिला, घरभर फिरलो पण घरात कुणीच नव्हतं.
"आता ही कुठे गेली सकाळी सकाळी ?"मी करवादलो.
अवघ्या अर्ध्या तासात कसाबसा तयार होऊन मी बाहेर पडलो. गाडीचा दरवाजा उघडून आत बसलो खरा, पण घाईगडबडीत दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या नाहीत. एक, माझ्या गाडीच्या छतावर मऊसूत बर्फाचा थर साचला होता अन दुसरं…
मी आत्ता बाहेर पडलो ती इमारत हवेत तरंगत होती!!!

पोस्ट क्र. ३ : प्राची अश्विनी

पॉक पॉक करून गाडी बंद केली आणि किल्ली खिशात टाकली .
मी आत्ता बाहेर पडलो ती इमारत हवेत तरंगत होती!!!..........
नक्की काय चाललंय? आरशात शशिकांत का दिसला? मी आणि शालूमध्ये काय घडलंय? काही कळेना. परवा तो दाढीवाला म्हातारा बुवा कसल्यातरी शापाबद्दल बरळत होता. हीच तर त्या शापाची सुरुवात नाही ना??? पुढं काहीतरी फार अभद्र घडेल असं वाटू लागलं. आणि ते थांबवायचं तर लवकर काहीतरी करायला हवंं होतं. तेही मलाच. कारण आरश्यानं माझीच निवड केली होती. पण काय करायचं? आरसा तर फुटला. आणि तो दाढीवाला बाबा कुठं असेल कोण जाणे. कुठून झाली याची सुरुवात? काही आठवत नव्हतं. The only way out is the only way in. म्हणत गाडीतून खाली पाय ठेवला.
कुठच्या अरी अदृश्य शक्तीनं ओढून घेतल्यासारखा मी त्या ढगांच्या भोवऱ्यात खेचला गेलो. गोल गोल गोल गोल ....... प्रचंड वेगात फिरू लागलो.... मला गरगरायला झालं. ..
जाग आली तेव्हा टळटळीत दुपार होती. मी एका अजस्त्र वृक्षाच्या सावलीत होतो. मी आजूबाजूचा अंदाज घेऊ लागलो. समोरच्या रस्त्यावरून माणसं ये जा करत होती. पण ना कुठचा चेहरा ओळखीचा होता की पेहराव. कुठं येऊन पोचलो बरं? विचार करकरून डोकं दुखायला लागलं होतं. पण काळाचं कोडं काही सुटत नव्हतं. कानात दडे बसल्यासारखं झालं होतं. उठून चालायला लागलो. मैलोनमैल पसरलेला भला भक्कम रुंद दगडी रस्ता होता. कडेला ठराविक अंतरावर डेरेदार झाडं किंवा एखादी पाणपोई. अन मध्येच कुठल्यातरी प्राण्याचं शिल्प असलेला उंचच उंच स्तंभ. अगदी थक्क करणारा.
अचानक डोळ्यावर लखलखीत तिरीप आली. समोरून धारदार पाजळलेल्या कुऱ्हाडीसारखं काहीतरी शस्त्र हातात घेऊन एक बारका माणूस येत होता. मी घाबरलो. त्यानं चमकून वर माझ्याकडं बघितलं. क्षणभर थांबला. हातातली कुऱ्हाड खांद्यावर टाकली आणि पुन्हा मान खाली घालून चालू पडला. माझ्या मनातले विचार त्याला कळले की काय?
तो पूर्ण नजरेआड होईपर्यंत मी जागीच खिळून होतो. मोबाईल मध्ये वेळ बघायला मी खिसा चाचपडला. मोबाईल गाडीत राहिला होता. च्यायला! आता आली का पंचाईत? सिग्रेट पेटवली. चार झुरके मारल्यावर जरा बरं वाटलं. शीळ वाजवायला तोंड उघडलं आणि एकदम ट्यूब पेटली. इतक्या वेळात आपल्या लक्षात कसं नाही आलं? सगळीकडं डबक्यासारखी प्रचंड शांतता साचून राहिली होती. माणसं, पक्षी, झाडं, वारा, आकाश सगळं चिडीचूप. म्हणूनच कान दडपल्यासारखे झाले असणार. मी शीळ वाजवली खरी पण आवाजच फुटेना. पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण छे! आता मात्र टरकलो. ती शांतता आपल्याला गिळून टाकतेय की काय असं वाटायला लागलं. इतक्यात समोरून एक बाई येताना दिसली. ती माझ्या समोरच येऊन थांबली. जवळंच गाठोडं उघडायला लागली. आधी तिनं काही शेंदूर फासलेले दगड बाहेर काढले. मग मोडक्या बाहुल्या. मग एक खेळणं. खुळखुळा की काय? हो खुळखुळाच. तिनं तो माझ्या हातात दिला. आणि पुन्हा आपलं गाठोडं बांधून निघून गेली.
खुळ्ळ खुळ्ळ. मी तो वाजवायला लागलो. काय आश्चर्य! मिट्ट शांततेत तो आवाज घुमू लागला. हळूहळू तो आवाज वाढत गेला आणि त्या नादानं सभोवतालच्या ठिकऱ्या उडाल्या. माणसं, झाडं, रस्ता अणुरेणू बनून विखुरले गेले. प्रचंड धुरळा उठला. माझ्या मेंदूचा पण जाम चुरा झाला होता. त्यातून एकेक प्रकाशाच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या .. जन्मोजन्मीच्या आठवणी होत्या त्या. चमचमणारे असंख्य काजवेच जणू.
"श्या! असं कसं सांगितलं तिनं शशिकांतला? मी कधी बोललो का माझ्या बायकोला? नाही ना? या बायकांच्या पोटात एक गुपीत राहील तर शपथ. शालूला त्या दिवशी पांडवलेण्यांच्या गुहेत न्यायलाच नको होतं. हजारो वर्षांची परंपरा उगाच मोडली आपण. तिच्या गोड हसण्याला भुललो. "जे पाहिलं ते कुणाला सांगणार नाही. अगदी कुंकवाची शपथ" असं म्हणाली होती ....च्! काही प्रकाश पडेपर्यंत विझलाच तो काजवा .
हे सगळं, असं काही आपल्याच आयुष्यात घडून गेलं होतं यावर विश्वासंच बसेना. बऱ्याचदा स्वप्नात यातलं काहीबाही दिसायचं खरं पण...
बाजूच्या सगळ्या धुरळ्यात ते काजवे आता हरवतात की काय असं वाटू लागलं. त्यांना पकडून ठेवायची मी व्यर्थ धडपड करू लागलो. कारण आता मला पुढची दिशा दाखवायला मम्मद्याचा आरसा नव्हता. माझ्या आठवणींवरंच पुढचा सगळा खेळ अवलंबून होता. मी भराभरा काजवे गोळा करू लागलो. पण गोळा करून ठेवणार कुठं? मेंदूचा तर भुगा झालेला... ते ठेवायला म्हणून मी खिशात हात घातला तर गाडीची की सापडली.. .
पॉक पॉक.
मी पुन्हा गाडीत बसलो होतो. डॅश बोर्डवर मोबाईल तसाच होता. वेळ बघितली . 6 PM. मेसेज बॉक्स मध्ये एक नवीन मेसेज माझी वाट पहात होता.

पोस्ट क्र. ४ : निशदे

##
आता या सगळ्या राड्यातून फक्त खुदीरामच वाचवू शकेल. मोबाईलवर मेसेज पाहिला. फक्त एक पत्ता लिहिला होता तिथे. पांडवगडाच्या लेण्यांच्या खाली एक झोपडी होती. तिथे जाऊन पोचलो. आत जाऊन बघतो तर खुदीराम बिडीचे झुरके भरत बसला होता.
"साल्या, काय केलेस मला? डोक्याला कसला भुंगा लावून ठेवला आहेस?"
"मैने क्या किया? तुला पाहिजे होतं त्याची किंमत घेतली आणि दिलं तुला..." खुदीराम हसत बोलला.
"काय चेटूक केलंस त्या आरशात? आणि मला इथे कशाला बोलावलंस?" त्याचं हसणं अन् माझा संताप वाढायला लागला.
"बोलावलं???? मैने नही बुलाया तुझे..... "
(क्रमशः)
***************
मी अजून हसतच होते. शशिकांतचे मित्र सगळे अवलियाच आहेत की. आणि इतकी वर्षं येताएत नाशकात तर लेणी कशी नाही पाहिली? आम्हाला दोघांना लेणी दाखवायला आणलं आणि स्वतः कुठे गायब झाले? केसांची बट उगाचच सावरत मी पुढे निघाले.
"शालू, तुला आरसा हवाय का?"
"लेण्यांत आरसा?"
"लेण्यात नाही. मला एका चेटूक बाबाजीने दिला. बायकांनी बघायचा नसतो म्हणे!"
चेष्टा करताएत का माझी? माझा विश्वास नाही असल्या गोष्टींवर माहित आहे की याला..... याने आणि शशिकांतने मिळूनच प्लॅन केला असणार माझ्या चेष्टेचा.
"दाखव की. कसले चेटूक होते म्हणे त्याने?"
अशोकने हसत हसत त्याच्या बॅगमधून एक आरसा काढला. जेमतेम ८-१० इंचाचा आकार असेल त्याचा. पण चारही कडा सोनेरी नक्षीकामाने बंदिस्त केल्या होत्या. लेण्यांमध्ये बर्यापैकी अंधार असल्याने नक्षी नीट दिसेना.
"नीट दाखव की आरसा. थांब माझ्या मोबाईलचा लाईट लावते" एव्हढे म्हणून मी माझा मोबाईल चालू केला.
पुढचे काही कळलेच नाही. एकदम संपूर्ण लेणी उजेडाने लखलखून निघाली. आरशाच्या उजेडाने आम्ही डोळेच मिटून घेतले. डोळे उघडले तर मी गडावरून खाली फेकली जात होते. एक मोठ्ठी किंकाळी फोडून मी बेशुद्धच पडले.
डोळे उघडले तर घरातच होते. ही काय भानगड? हा शेजारी बसलेला शशिकांत इतका थकलेला का वाटतोय? आणि अशोक कुठे गेला?
***************
##

च्यायला काहीच समजेनासे झालेले. खुदीरामने अजून पाच हजाराला बुडवला. आरसा विकत दिला. पण मी कशाला घेतला परत? कोण कोणाला बांबू लावतोय काही कळत नाही. बाहेर येऊन सिगरेट पेटवली. सगळ्या राड्यात शर्ट मळला होता. गाडीत एक्स्ट्रा कपडे असतातच. आरशात बघूनच शर्ट बदलायला लागलो. एकदम गडावरून किंकाळी ऐकू आली. वर पाहिलं तर काहीच नव्हतं. सायको झालोय आपण. डॉक्टरकडे जायचा विचार आला तसाच झटकला. काय वेडे झालो का काय डॉक्टरकडे जायला?
आरसा मागच्या सीटवर ठेवला. सिगरेट संपवली अन् खायला हॉटेल शोधायला लागलो.
(क्रमशः)
***************
रात्रीच्या वार्यात बिब्ब्याचा अन् मोहरीचा वास तडतडत होता. झोपडीच्या आत आवाज चढले होते.
"देख खुदीराम, दोस्त है वो मेरा...... "
"वा रे वा...... आता दोस्ती आठवली तुला. माझ्याशी दोस्ती केलीस त्याचं काय मग?"
"त्याचा काही संबध नाही त्याच्याशी. आणि तुला काय झाले याच्याशी माझा काही संबंध नाही"
"तुझा संबंध नाही? एक बात मत भुलो शशिकांत...... या दुनियेत तू आणलंस मला आणि आता खुशाल पलटी मारतोस? ही जागा, हे आयुष्य माझं नाही आणि मी इथे राहणार नाही."
"अरे हरामखोरा, त्यासाठी माझ्या आयुष्याचं वाटोळं करणार आहेस का?"
"तुझं आयुष्य?" खुदीराम खदाखदा हसायला लागला. "अरे दुबळ्या, तुझ्यात इतकी ताकद कुठली? माझ्या लक्षात आधीच यायला हवं होतं. हरकत नाही. तुझ्या दोस्ताकडून मात्र माझं आयुष्य परत मिळवीनच."
"बघतोच मी कसा हात लावतोस माझ्या दोस्ताला. आत्ता बोलावून घेतो इथे."
शशिकांतने मोबाईलवरून मेसेज केला.
पुढे कोणी काही बोलण्याआधीच खुदीरामने आरसा समोर धरला. झोपडीतल्या एव्हढ्याश्या मेणबत्तीनेसुद्धा आरसा उजळून निघाला. त्याच्या उजेडापासून वाचण्यासाठी शशिकांतने डोळ्यावर हात धरला......
***************
##

जेवणसुद्धा बकवासच निघाले. अर्धं तसंच गिळलं आणि उठून शशिकांतच्या घराकडे चालायला लागलो. पुन्हा पहिल्यासारखं सामसूम घर. दरवाज्यावर ठॉकठॉक केले. कोणीच नाही उघडला. दोनतीनवेळा तसंच केलं. शेवटी कंटाळून एक लाथ घातली दरवाज्याला तर तसाच उघडला. म्हणजे उघडाच होता की च्यायला! इतक्या रात्री? हॉलमधे गेलो तर पूर्ण अंधार. मोबाईल गाडीत. दिव्याची बटनं शोधायलाही वेळ लागला. बटन दाबल्यासरशी सगळा हॉल मंद पिवळ्या रंगात चमकायला लागला. समोरच्या पांढर्याशुभ्र सोफ्यावर रक्ताचे डाग दिसले. चरकलोच. सोफ्याच्या मागे डोकावलो. काचेचे असंख्य तुकडे सर्वत्र विखुरले होते. रक्ताचे पाट फरश्यांमधल्या चिरांतून सगळीकडे वाहत होते. एका हातात एक तुकडा अन् दुसर्या हातात काच नसलेला नुसताच सोनेरी प्रभावळीचा आरसा घेऊन गळा चिरलेल्या अवस्थेत शालू पडली होती.

पोस्ट क्र ५ : दीपक

[खो कथा पोस्ट १ ते ४ - आतापर्यंत... आणि पोस्ट ५ ]
शालू आणि शशिकांत हे नवरा बायको आहेत. नाशिकमध्ये राहतात. अशोक हा शशिकांतचा लहानपणीचा मित्र आणि अगदी घरातला मेँबर असल्यासारखा आहे. तो मुंबईला राहतो.
खुदीराम नावाचा गुढ इसम पांडव लेण्यांच्या राहत असतो. एकदा खुदीरामची आणि शशिकांतची भेट होते. या भेटीत तो शशिकांतला त्याच्याजवळ असलेल्या गुढ आरशाबद्दल सांगतो. आरसा पाहिल्यावर शशिकांतला तो खुपच आवडतो त्याला त्याच्या पुढिल संशोधनासाठी फायद्याच असतो. तो खुदीरामकडे आरशाची मागणी करतो. खुदीराम त्याच्यासमोर दोन अटी ठेवतो -
१. आरशाबद्दल तू कुणालाच सांगायचं नाहीस. सांगितलं तर तुझा मृत्यू अटळ आहे.
२. तुला माझी मदत करावी लागेल.
बोल कबूल आहे? यावर शशिकांत म्हणतो कबूल आहे पण माझा एक मित्र आहे, अशोक. त्याला अशा गोष्टींत इंटरेस्ट आहे. फक्त त्याला सांगतो, चालेल का? खुदीराम म्हणतो ठीक आहे पण याद राख... याव्यतिरिक्त जर अजून कुणाला कळाले तर तुझा मृत्यू अटळ आहे.
ह्या आरशाबद्दल शशिकांत अशोकजवळ बोलतो व त्याला नाशिकला येण्याची गळ घालतो.अशोकही उत्सुकतेपोटी नाशिकला जातो. नंतर शशिकांत आणि अशोक पांडवलेणीकडे जातात सोबत शालूही असते. शशिकांत जेव्हा पांडवलेणीच्या आसपास खुदिरामला शोधत असतो तेव्हा चुकून अशोक आरशाविषयी शालूजवळ बोलतो व तिला आरसा दाखवतो.नंतर ही गोष्ट शालू शशिकांतला सांगते. हे ऐकून धक्क्याने/ भितीने शशिकांत मरतो. शशिकांतच्या मरणाला आपणच जबाबदार आहोत असे वाटुन काही दिवसांनी शालूही आत्महत्या करते.
मधल्या काळात अशोक खुदिरामला गाठतो. खुदिरामकडून तो आरसा मिळवतो. तो आरसा मिळाल्यानंतर अशोकच्या आयुष्यात बराच गोंधळ उडतो. या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी अशोक पुन्हा खुदिरामकडे जातो. त्या दोघांमध्ये खूप बाचाबाची होते. शेवटी खुदिराम नरमतो व त्याला सत्य परिस्थिती सांगतो.

खुदिराम:> मी खुदिराम तांत्रिक नसून एक शास्त्रज्ञ आहे. हा आरसा माझ्या संशोधनाचा भाग आहे. प्रकाशाच्या विशिष्ट परिवर्तनातून एका मितीतून दुस-या मितीत तो घेऊन जातो. परंतु हा माझा शोध अजून पूर्णत्वाला गेलेला नाही. हा आरसा घेऊन मी माझ्या मुलांवर प्रयोग केला होता परंतु ते कुठल्या तरी मितीत अडकले आहेत. मी जर त्यांना शोधायला गेलो तर मीही कुठेतरी अडकून बसेन म्हणून मी शशिकांतकडे मदत मागितली होती. तोही तयार होता. पण नियतीने घात केला यामागे माझं कोणतंही चेटूक वगैरे नाही. शशिकांत आता जिवंत नाही .त्याचा मित्र म्हणून तू मला मदत कर. तुला करावीच लागेल. कारण ह्या आरश्याच्या चमत्कारात तू अडकला आहेस. एक तर तुला माझी मदत करावी लागेल किंवा अशीच उलथापालथ सहन करत मृत्यूला कवटाळावं लागेल.
बोल काय म्हणतोस?
आशोकः५>- एवढ सोप नाही आहे हे, माझा मित्र सुध्दा शास्त्रज्ञ होता तो ही प्रकाशासी संबंधित संशोधन करत होता. शशिकांत ने मरणापूर्वी मला पाठविलेला मेल मी तुझ्याकडे येण्याआधीच वाचला आहे. त्यानुसार तर तु दुस-या मितितुन आला आहेस. "ही जागा, हे आयुष्य माझं नाही आणि मी इथे राहणार नाही" अस तु शशिकांतला म्हणाला होतास तसेच तु हे सुध्दा म्हणाल होतास की "...तुझ्या दोस्ताकडून मात्र माझं आयुष्य परत मिळवीनच", म्हणजे माझ्याकडून. आणि आता तू स्वतःला
शास्त्रज्ञ म्हणतोस आणि प्रयोगात तुझे मुले कुठल्या तरी मितीत अडकले आहेत अस सांगतोस आणि माझी मदत मगतोस. तुझ्यावर विश्वास कसा ठेऊ. मला तर वाटत तु माझ्या मित्राला मारुन त्याच संशोधन चोरल आहेस. आणि आता माझा पण जीव घेशील तुझं इप्सीत साध्या करण्यासाठी. बोल खर काय आहे. सोडव मला यातुन नाही तर मी मरेलच पण सोबत तुलाही नेईल.

पोस्ट क्र. ६: चॅट्सवूड

या दोघांची भांडण बघून मला कंटाळा आला होता.
मी एक जांभई दिली, मान, बोट, पाठ मोडली आणि उठलो. पायातली चप्पल नीट केली, चप्पलेचा अंगठा तुटला होता, या पगारात मला एक बूट पण घेता येत नाही, जाऊ दे या दोघांचं काहीतरी बघायला पाहिजे.
मी लांबूनच हाक मारली "ए भावड्या"
तसं दोघांनी माझ्याकडे बघितले, मी हातानेच त्यांना 'इकडे या' असा इशारा केला, अशोककुमार ने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले, खुदिराम बाप्पू तर कुठंतरी दुसरीकडं बघायला लागले.
आयला एवढा पण रिस्पेक्ट नाय?
मग मीच पायातली चप्पल घासवत त्यांच्याकडे गेलो, मी जवळ आलेला बघून दोघे ही भांडायचे थांबले, खुदिराम माझ्याकडे एकटक बघायला लागला, मी कोण आहे ते याला बहुतेक कळाले असावे, अशोक तर अजून काय भाव देत नव्हता.
अशोक यार तो फिट हैं, जिम करतो वाटतं, मला पण डायट...
"सॉरी आपण?" अशोकने मला विचारले.
"मी.." एवढे बोलून जरा ड्रॅमॅटिक पॉंझ घेतला, खुदिरामकडे बघितले, माझ्या शॉर्ट्स मधल्या खिशातला गॉगल काढून डोळ्यावर चढवला आणि मनात विचार आला,
'गॉगल पुसायला पाहिजे'
"मला माहितेय" खुदिराम सावकाश माझ्या चेहऱ्याकडे निरखून बघत म्हणाला, "मी यांना प्रत्येक मितीत बघतो"
"मी यांना प्रत्येक मिठीत बघतो" लोल. मी माझ्या मनातल्या जोकवर हसत, शर्टच्या कोपऱ्याने गॉगल पुसत खुदिरामकडे बघत म्हणालो, "भावा, बस्स का? नाव पण माहित असेल ना?" मी खुदिरामला म्हणालो.
खुदिरामने नाही म्हणून मान डोलावली.
"आपण यांचे भाऊ का?" अशोकने मला विचारले.
काय पण म्हणा, एवढे मॅनर्स देऊन आज काल कोण बोलतं? अशोकने बहुतेक एमबीए केलय, मला पण करायचं होत यार.. त्या मितीत कॉलेज पण चांगलं होत, कुठं बँक पीओची परीक्षा देत बसलो..
"तुम्ही....?" खुदिराम माझ्याकडे बोट दाखवत म्हणाला, मी उगाच चेहृऱ्यावर माज दाखवत म्हणालो, "कसं आहे, तुम्ही जे इकडून तिकडे मितीत शिरता, ते चुकीचं आहे, ते कायद्यात आय मिन, कायद्यात नाही, पण ते बसत नाही, नियमांमध्ये बसत नाही"
एमबीए करायलाच पाहिजे होतं, माझ्याकडे अजिबात कम्युनिकेशन स्किल...
"नियम, कसले नियम? आणि आपण कोण?" 'आणि' मधल्या 'ण' वर भर देत अशोक म्हणाला.
"मी..मितीकरी.."
"मतकरी?"
"नाय, ते आपले आवडते लेखक आहेत, पण मी मि-ती-क-री, मी मित्या संभाळतो"
"अरे हां, मी ऐकलंय, मला माहितेय" खुदिराम अशोककडे बघत म्हणाला, खुदिराम पाठीत वाकून, दोन्ही हातांनी माझ्या पाया पडायला लागला, मी त्याचे लागलीच हात पकडत म्हणालो,
"सर काय हे, तुम्ही लाजवताय"
"नाही नाही, असं कसं, तुम्ही स्वतःहून आलात, कधीच कोणाला भेटत नाहीत..."
"एक्सक्यूझ मी" अशोकला हा प्रकार काय आहे ते कळेना तो म्हणाला,
"मित्या संभाळता?"
"हो, तुम्ही खूपच इकडे तिकडे जाता..आणि मग" मी पुण्याच्या एक्सेन्ट मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला.
"म्हणजे नेमकं काय करता?" अशोकने त्याचा प्रश्न पूर्ण केला आणि तो पुण्याचाच आहे हे दाखवून दिले.
"अरे, कस सांगू, अरे हे सगळं बघतात, म्हणजे मित्यामध्ये जे लोक प्रवास..." खुदिराम ने सांगण्याचा प्रयत्न केला.
"मला नाही वाटतं...." अशोक म्हणाला.
मी चिडलो, याला का नाही वाटतं, माझ्याकडे बघून कोणालाच का..
"मला नाही वाटतं 'मिती' च अनेकवचन मित्या असेल" अशोक माझ्याकडे बघत म्हणाला.
"नाही हो, मित्याच आहे, काही मित्यांमधले लोक त्याला मिटीज असंही म्हणतात, मिट्या, मितीबाई पण म्हणतात"
मी माझ्या विनोदावर खूप खुश होऊन हसलो, खुदिरामने रिस्पेक्ट म्हणून थोडेसे हसून दाखवले, अशोकच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा बदलली नाही.
मग शिक्षक चिडल्यावर, मुलगा जस खरं सांगतो, तस सांगायला मी सुरुवात केली.
"मिती मध्ये जगण्याचे, आय मिन राहण्याचे काही एटीगेट्स आहेत, म्हणजे....."
कायदे म्हणायचं का तुम्हाला? अशोक म्हणाला.
"नाही, एटीगेट्स म्हणजे, हां बरोबर कायदे, नियम आहेत" च्यामारी माय कॉम्युनिकेशन सक्स!! मी मनात म्हणालो.
"तर नियम असे आहेत की.." मी बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात,
"पहिला नियम काय आहे?" अशोकने मला विचारले.
"मिती नियम कोणाला सांगू नका"
"काय?"
"हो, म्हणजे, आय मिन, मिती प्रवास करता येतो, हीच गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती, काही थोड्याच लोंकाना माहित आहे, ती सगळ्यांना सांगितली तर, खुपजण त्याचा गैर वापर करतील, कारण ही मोठी शक्ती.."
"हे नियम कोणी ठरवले?" अशोक ने परत विचारले.
"काही अशा लोंकानी, ज्यांनी पहिला मिती प्रवास केला, त्यांनी मग त्यावर पुस्तक लिहिली, मग ती प्रसिद्ध झाली, मग ती वाचून अजून काही लोक प्रवासाला गेले, पण ते परत आले नाहीत, मग असं होऊ नये म्हणून परत पुस्तक लिहिली गेली, मग परत.."
"पण मग तुम्ही, कसे..??"
"कस आहे, एक मितीमती मंडळ आहे"
"मिती?"
"मती"
"माती?"
"मितीमती.."
"मित्रमंडळ म्हणा ना" खुदिराम वैतागून म्हणाला.
"तर तेच, सहा- सात जणांचं मंडळ आहे, तर त्यांनी मिती प्रवासाला सुरुवात केली आणि काही पहिल्या मितीत परत आलेच नाहीत, ते मितीच्या मिठीत अडकले"
मी विनोद करून टाळीसाठी हात पुढे केला, पण दोघांनी मला टाळी दिली नाही.
"सॉरी गाइज, आय एम रिअली गुड ऐट बॅड जोक्स"
पण माझा हा सुद्धा जोक त्यांना कळाला नाही.
"त्यांनी तुम्हाला हे काम दिलंय का?" अशोकने मला विचारले.
"तूच रे तू" असे म्हणून मी अशोकच्या खांद्यावर थोपटले. "पगार नाही हो पण..सात वर्ष झाली अजून ग्रॅच्युइटी नाही.."
"पण मग तुमचं नेमकं काम काय आहे" अशोकचा परत प्रश्न आला.
"ज्या चांगल्या लोकांनी वाईट वळणं घेतली आहेत, त्यांना मी पुढचा मार्ग दाखवतो" मी हातवारे करत म्हणालो, बेस्ट!!! हाच व्हाट्सएप्प स्टेटस ठेवुयात!
"माझ्या मुलांचं तेवढं बघा ना" खुदिराम कळवळीने मला म्हणाला.
"सर, असं असतं का? मुलांवर कोणी मिती प्रवास लादत का? मी माझ्या सासूला पाठवले होतं, पण.." मी जरा जास्त बोलून गेलो.
"पण.."? दोघांनी एका सुरात मला विचारले.
"पण परत आल्या, आता आमची ही म्हणतेय, सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या मितीला न्या"
"तुमची मुलं बहुतेक मागच्या मितीत गेली असतील" मी पटकन मुळ विषयावर आलो.
"मागची मिती?" खुदिरामने विचारले.
"जनरली या मितीतून लोक मागच्या मितीत जातात"
थोडक्यात मला हे दाखवायचं होतं की मी लय एक्स्पर्ट आहे, तुम्हाला काही माहित नाही.
"मग मागच्या मितीत कस जायचं?" खुदिरामने विचारलं.
मी खुदिरामकडे मितीचा आरसा मागितला, खुदिरामने मला आरसा काढून दिला, मी उगाच एकदम एक्स्पर्ट असल्याचा आव केला आणि म्हणालो,
हे काय हा तर मागच्या मितीचा आरसा आहे, तुम्ही परत मागच्या मितीत जा"
"मुलं तिथं असतील?" खुदिरामने फार आशेने विचारले.
"हां तिथं असू शकतात, पण बऱ्याच वेळा पोर एकदा मितीतून बाहेर पडली की घरच्या मितीत परत येत नाहीत, त्यांना ती नवीन मिती आवडून जाते, मी लय पोरांचं बघितलं, त्यांना एकदम फ्रीडम मिळतं ना.. मग कशाला.."
एवढं सांगत असताना खुदिराम बापू दुसऱ्या मितीत गेले सुद्धा!!
आयला एवढा पण रिस्पेक्ट नाय?
"हे बघ, असं असत या जॉब मध्ये काय रिस्पेक्ट च नाय, माझं कोण ऐकतच..."
मी हे बोलत असताना अशोक सुद्धा आरसा समोर धरून उभा होता, अशोक ने माझ्याकडे बघितले, मी त्याच्याकडे बघून खांदे उडवले.
याला मिती प्रवासाचा दुसरा नियम सांगावा का? का नको? काय करावे? मला काय करावे ते कळत नव्हते.

पोस्ट क्र. ७ : ५० फक्त

खुदिराम प्रथम पुरुषी एकवचनी..
...
शालु आणि शशिकांत दोघंही गेले, निदान या मितिमध्ये तरी मेले, पण मग इतर मितीमध्ये कुठं जिवंत असले तर् काय ? माझा आणि त्यांचा तिथ्ं कधी सामना झाला तर ते बदला घ्यायचा प्रयत्न करतील ना ? त्यांच्या मरणाला मी उघड उघड नसलो तरी जबाबदार आहेच ना का मिती बदलली की जबाबदारीतून देखिल् मुक्तता होते ? तो नैन्ं छिंदन्ती वाला आत्मा, तो कुठं गेला त्या दोघांचा ? तो मिती बदलु शकतो का, बदलुन देखिल पुन्हा नव्या शरीरात् प्रवेश मिळवु शकतो का ? त्या नव्या शरीराला तो या जुन्या आठवणींच्या आधारे वापरु शकतो का ?
बापरे एक ना अनेक् प्रश्न् मला गेले काही दिवस् छ्ळताहेत्, झोप् नाही, धड् जेवण् खाण् नाही, ही अवस्था फार् वाईट्, मागे बराच् वेळा दोन् मिती प्रवासात् वस्तुमान् आणि वारंवारितेच्ं गणित् चुकल्यान्ं अडकुन् पडलेलो आहे, पण् त्यापेक्षा देखिल् हे वाईट्. यातुन् सुटका होईल् म्हणुन् मी आतापर्य्ंत् पाचही, म्हणजे आता आहे ती, वरची, खालची,डाविकडची अन् उजवीकडची, पाची मिती आणि काळ् बदलुन् पाहिलेत्, पण् हे प्रश्न् माझ्या मनाच्या आणि बुद्धिकेंद्राच्या मुळ् रचनेत स्थापल्यासारखे झालेत्, माझ्या जिवन् मरणाच्या नियमासारखे, जसे मी ते काढुन् टाकु शकत् नाही तस्ंच् झाल्ंय हे पण्.
यावर् उपाय् हवाय्, मला यावर् उपाय् हवाय् काहीही करुन् आणि कोणत्याही किमतीला मला उपाय हवाय्, अगदी त्यासाठी अजुन् काही मरणांना जबाबदार् व्हाव्ं लागल्ं तरी चालेल्. नाहीतर् मग् अस्ं शक्य् आहे, सरळ् मुख्य स्ंघ् गाठायचा, इच्छा मरणाचा अर्ज् भरुन् द्यायचा, आणि वाट् पाहायची, हल्ली तिथ्ं देखिल् बराच् काळ् द्यावा लागतो म्हणे, आई बाबांची हा रस्ता पत्करला तेंव्हा अस्ं नव्हते, ते तिथ्ं गेले, अर्थात् मी देखिल् बरोबर् होतो, मला त्या त्रिमितीय् खोलीत् बसवल्ं आणि मला तो मोठा शरभ् आवडायला लागला होता तेवढ्यात् तिथल्या मॅडम् एक् सर्टिफिकिट् घेउन् आल्या, त्यात् लिहिल्ं होत्ं की आज् या क्षणापासुन् त्या दोघांची जी काही स्ंपत्ती होती ती माझी झाली आहे. माझ्ं वय् लक्षात् घेउन् मला घरी सोडायला एक् चालक् स्ंघान्ं दिला होता, तो आमच्याच् गाडीतुन् मला सोडायला आला.
अरे हो आठवल्ं, तोच् तर् माझा पहिला खुन् होता, त्याला घरात् बसवुन् मी किचन् मध्ये गेलो आणि त्याच्यासाठी ते पिवळसर् र्ंगाच्ं सरबत् बनवल्ं, जे आईन्ं बाबांच्या दोन्ही हत्तीना दिल्ं होत्ं, आणि त्यान्ंतर त्या दोघांच्ं प्रच्ंड् भांडण् झाल्ं होत्ं. तो चालक् ते सरबत् एका घोटात् पिउन् गेला, आणि बरोबर् आठ तासात् स्ंघाचे अधिकारी आमच्या घरी आले, चौकशी करायला. पण् मला पकडुच् शकले नाहीत्, मी सरबत् करण्याआधीच् ग्लास् चिमट्यान्ं धरुन् ट्रे मध्ये ठेवला होता आणि न्ंतर् ट्रे जाळुन् टाकला होता त्या हत्तीच्या विष्ठेबरोबर्.
त्यान्ंतर् मला व्यसन् लागल्ं, खुन् करायच्ं नाही, पुरावे नष्ट् करायच्ं, आता ह्याला माझा नाईलाज् आहे की पुरावे नष्ट् करावे लागतात् कारण् तस्ं केलं नाही तर ते खुन्याला पकडुन् देतात्, आणि हो खुन् केलाच् नाही तर् पुरावा तयार् तरी कसा होणार्, मग त्यासाठी मी खुन् करायला लागलो, पण् ते माझ्ं व्यसन् नाही, म्हणजे काल् ही नव्हत्ं आणि आज ही नाही. मला फक्त् पुरावे नष्ट् करायला आवडत्ं. पण् आता झाल्ंय् काय् माहितिय् का, खुन् मी केले नाहीत्, त्यामुळ्ं त्यांचे पुरावे नाहीत्, पण् मला अस्ं वाटत्ंय् की ते खुन् माझ्यामुळ्ं झालेत् पण् मला त्यांचे पुरावे सापडत् नाहीत् आणि ते सापडत् नाहीत् म्हणुन् नष्ट करता येत् नाहीत्, आणि म्हणुन् मला हा एवढा त्रास् होतो आहे. काल् पासुन् मी जवळपास् पाच् ते सहावेळा नवनवीन् पुरावे तयार् करायचा प्रयत्न् केला, पण् ते देखिल् शक्य् होत् नाहीये, शशिकांतचा हार्ट अॅटॅक, शालुच्ं घाबरुन् पाय् घसरण्ं, हे सगळे काहीतरी नैसर्गिक् कारणांनी मेलेले आहेत्, माझा काही संबंधच नाही तिथ्ं, एक् माझी आणि अशोकाची मैत्री सोडली तर् पुढ्ं काही स्ंब्ंधच् नाही, पण् तरीही या सगळ्याला मीच् जबाबदार् आहे. म्हणजे ही कल्पना नाही माझी तर खात्रि आहे, पण् पुन्हा तोच् पण्, ते का आणि कस्ं हे समजत् नाही, आणि पुन्हा पुरावा नाही म्हणुन् तो नष्ट होत् नाही आणि म्हणुन् माझ्ं चारित्र्य् स्वच्छ होत नाही, याचा अर्थ् मी येत्या निवडणुकीत् स्ंघाध्याक्ष होउ शकत् नाही, ते जेंव्हा माझी मानसिक् आणि आत्मिक् परिक्षा घेतील् तेंव्हा मी सपशेल् नापास् होईन्.
आज् पुन्हा एक् प्रयत्न् करतो, पहिल्यांदा शशिकांत्, त्याला काही त्रास् होता का, बघु त्याच्या मेडिकल् डिटेलस् मध्ये अस्ं काही लिहिलेल्ं नाही, पण् एकदा त्याच्या बायकोन्ं तो शारिरिक् सुख् देउ शकत् नाही अशी तक्रार् केलेली आहे. या बायका पण् ना, कोणत्या गोष्टी कुठ्ं उघड् कराव्या ह्याच्ं काही भानच् नसत्ं यांना. आता मलाच् बघा मी तरी आजपर्यंत कुणाला………
तर शशिकांत तब्येतीन्ं उत्तम् होता काही झालेल्ं नव्हतं त्याला मग मी अस्ं काय् केल्यावर् त्याला मरण् आल्ं असत्ं, भिती दाखवली असेल् त्याला मी, कसली भिती मरणाची का बेइज्जतीची ? कशाला तरी तो घाबरत असेलच् ना, अशी एखादी तरी गोष्ट असेल् जी होउ नये अस्ं त्याला वाटतं आणि म्हणुन् तो घाबरतो. नोकरीची गरज् अशी त्याला नव्हतीच्, त्याच्ही माझ्यासारख्ंच्, आई बाबांनी इच्छामरण् पत्करलेल्ं आणि सगळी संपत्ती याला मिळालेली. माझ्यावर् निदान् माझ्या प्रयोगशाळेसाठी काढलेल्ं कर्ज् आहे, ह्यान्ं तर् हरतर्हेचे खर्च् टाळलेले दिसतात्, २२ वेळा अॅडव्हान्स् भरुन् मोठी घर्ं, गाड्या आणि दोन् वेळा परमिती प्रवास् बुक् केलेत् आणि सगळी रक्कम् भरायची वेळ् आली तेंव्हा पैसे नाहीत् अस्ं कारण् देउन् सगळ्ं रद्द् केल्ंय्.
त्याच्या एक दोन् हॉटेलच्या बिलांत् मात्र गडबड् दिसते आहे, नाही गेल्या चार वर्षातल्या सगळ्याच् बिलांमध्ये आहे हे, टिपिकल् बायकी ड्रिंक्सची बिल्ं आहेत् ही, हो अगदी हार्मोन्स् एक्स्ट्रा पण् आहेत् त्यात्, फोटो मात्र कसलेच् टाकलेले नाहीत् या हुशार् माणसान्ं, म्हणजे बरोबर् कुणी बाई होती का हा स्वताच् असले चाळे करायचा, हे शोधुन् काढल्ं पाहिजे आता. शेवटी जग कितीही पुढ्ं गेल्ं अगदी ह्या अनेकमिती प्रवासापर्य्ंत् तरी माणसाचे मुळ् शौक् काही बदलत् नाहीत्, पुरुषाला परस्त्री आणि स्त्रीला पुरुषाची फसवणुक् यातुन् कुणी सोडवु शकत नाही हे खर्ं.
पण् जेंव्हा एखादा पुरुष् त्याच्या स्त्रीशी प्रतारणा करतो तेंव्हा ती देखिल् अस्ं काही करत् असेल् याची कल्पना त्याला असतेच् ना, किंवा त्यान्ं ते स्वातंत्र्य तिला दिलेल्ं असत्ंच्. तुम्ही घराबाहेर् पडताना दरवाजा घट्ट् लावुन् घेत् नाही म्हणजे घरातल्या इतरांना बाहेर् पडण्याची मुभा आणि बाहेरच्यांना घरात् येण्याच्ं आम्ंत्रणच् नाही का, दरवाजे घट्ट् लावुन् घेण्याचा नियम् आणि शिस्त् तुम्ही पाळली पाहिजे आधी मग् इतरांबद्दल् बोला.
अरेच्चा हा कोन् पाहिलाच् नाही मी तपासुन् शशिकांतचा, आता त्याचे मित्र, नातेवाईक्, त्यातले पुरुष् आणि बायका असा एक मोठा डाटा तपासायला लावतो आणि झोपतो थोडावेळ्, नाहीतरी मुलांच्ं कारण् देउन् या मितीत् पळुन् आलेलो आहे मी, तो मतकरी का मितीकरी आणि अशोक् त्या दोघांना मी सापडेपर्य्ंत् बराच् वेळ् जाईल्,आणि बहुदा अशोक् एव्हाना मेलेला असेल्, मग पुरावा आणि मग तो नष्ट करण्ं, यावेळी मात्र काम् अगदी व्यवस्थित् कराव्ं बाबा, उगा घोर नको जिवाला.
बराच् वेळान्ंतर् जाग आली, झोप् अगदी मस्त् झाली. उठुन् मी पुन्हा ते पिवळसर रंगाच्ं सरबत् प्यालो, तेच् ते हत्तीना दिलेल्ं, चव फार घाण् आहे त्याची पण् छान् लागत्ं, झोपेतुन् उठल्यावर् तर् एकदम् मस्त्. बहुदा ते हत्ती आणि तो चालक् सगळे झोपलेले नव्हते ते पिण्यापुर्वी म्हणुन् मेले असावे, झोपुन् उठल्यावर् पिल्ं की नाही मरत्, अस्ं मला वाटत्ं. असो.. मॉनिटर्स् समोर् बसलो, हो अनेकवचनच माझ्या लॅबमध्ये एकुण् ४० वेगवेगळे मॉनिटर आहेत्, मला एकच् मोठा मॉनिटर् आवडत् नाही, क्ंटाळवाणा होतो आणि मान वर करुन् पहाव्ं लागत्ं, अरे हो पुढच्या महिन्यातली मितिराईट् च्या डॉक्टरांनी बोलावलं आहे मान् दाखवायला. तर ते मॉनिटरवर् काय् काय् आहे, खालच्या कोप-यात् वेळ् पाहिली, १९ तास् शोधाशोध् करुन् जे सापडल्ं ते १० ओळीत् लिहिलेल्ं आहे,
१. शशिकांत हा इच्छापुरुष् आहे.
२. त्याला त्याची बायको आवडत् नाही.
३. त्याच्या बायकोला तो आवडत् नाही.
४. तिच्या मुलांना तो आवडतो.
५. त्याच्या मुलांना तो आवडतो का नाही हे सांगता येत् नाही.
६. त्याच्या बँकेत् एकुण् ९५ हजार् बिटकॉइन् आणि ९९७५४९५९२७ इतके भारतीय् रुपये पडुन् आहेत्, शेवटचा खर्च् ४० दिवसांपुर्वी.. कॉटन् बँडेज् आणि चिकटपट्टी .. मध्यवर्ती दवाखाना मितिअप्.
७. त्याच्या नावावर् ४५० भारतीय् रुपये इतक्ं कर्ज् आहे… यापुढील् माहिती मिळ्ण्यासाठी मितीअप् मध्ये जावे लागेल्.
८. त्याच्या बायकोच्या मुलांना त्यान्ं प्रत्येकी दोन् घर्ं आणि २ गाड्या दिलेल्या आहेत्, तसेच् त्या २ जणांसाठी त्यान्ं परमिती प्रवासाची प्रत्येकी ५ तिकिट्ं खरेदी केलेली आहेत्.
९. तो अशोकचा मित्र आहे हे त्यान्ं जवळपास् सिद्ध केलेल्ं आहे, अशोकचा त्याच्यावरचा ट्रस्ट् इंडेक्स् ६.५ % इतका आहे, सध्याचा सरासरी ट्रस्ट् इंडेक्स् ४.२% आहे.
१०. क्र्. ५ च्ं कारण् शालुचा म्रुत्यु असु शकेल् अशी शंका आहे, अधिक् माहितीसाठी मितीडाउन् मध्ये जावे लागेल्.
मी दोन् गोष्टी चेक् केल्या, माझा ट्रस्ट् इंडेक्स्, तो ३.९% होता, वाढवायला हवा, कारण् निवडणुक्, कमीत् कमी, ४.७% असायला हवा, तत्कालीन् सरासरीपेक्षा १०% जास्त्. म्हणजे आतापर्य्ंत् अशोकन्ं पिवळसर् रंगाच्ं सरबत्, हो तेच् हत्ती वाल्ं,पिल्ं असेल् आणि तरी तो मेला नाही तर मला किमान् ०.३% तरी मिळतील्, आणि तेच् त्या मतकरीने पिल्ं आणि तरी जिवंत राहिला तर् डायरेक्ट् १% मिळणार् ट्रस्ट् इंडेक्सला. याचा अर्थ अशोक् मेला तरी चालेल् पण् मतकरी जिव्ंत् राहिला पाहिजे, ते सरबत् पिउन.
आणि दुसरी गोष्ट् म्हणजे, मितीअप् आणि मितीडाउनची शोध परवानगी मागितली, क्र्. ५ आणि क्र. १० मधला दुवा हुडकायलाच हवा आहे, तस्ंच क्र. ७ च्ं काय्, का कर्ज् घेतल्ं होत्ं शशिकांतन्ं, एवढे प्रच्ंड् पैसे त्याच्याकडे असताना. पण् ते जरा कमी महत्वाच्ं आहे, आधी ५ ते १०, मग बाकीच्ं. परमिती शोधाची परवानगी मिळेपर्य्ंत् आवरुन् घेतल्ं सगळ्ं, हे परमिती शोध् म्हणजे एक् मोठी भानगड् आहे, सगळ्या अधिकार्यांना कळते कोण् शोधत्ं आहे ते, अर्थात् काय् ते कळत नाही, त्यासाठी अजुन् एक् पायरी वर् जाव्ं लागत्ं, बरोबर् स्ंघाध्यक्ष्. माझी शेवटची महत्वाकांक्षा.
३ तासांनी परवानगी मिळाली, अर्थात् त्यासाठी मला १२० बिटकॉइन् खर्चावे लागले, हे लाच प्रकरण् मला जाम् आवडते, माझ्या व्यसनासाठी फार गरजेच्ं आहे, पुरावे नष्ट करताना फार उपयोगी पडत्ं, आणि ही प्रकरण्ं एवढी पडुन् आहेत् मुख्यस्ंघाकड्ं की पुढची पन्नास वर्षे तरी माझ्ं नाव् त्या यादीत् येत् नाही, तोपर्य्ंत् मी चार् वेळा स्ंघाध्यक्ष् झालेलो असेन्. परवानगीच्या मेल् मध्ये असलेला पासवर्ड् सिस्टिमला टाकला, लाच् देउन् घेतलेला ट्रॅकर् चालु केला, आणि घात् झालाय हे कळाल्ं.. मतकरी मला ट्रॅक् करतोय् मी या मितित् आल्यापासुन् आणि त्याचा प्रायव्हेट् पिंग पण् आला लगेच्..
प्रिय् खुरा, कसा आहेस्, बोलु शकतो का ?
म्हणजे तुला बोलाव्ंच् लागेल्, जर तुला स्ंघाध्यक्ष् व्हायच्ं असेल् तर्..
मी अजुन् सरबत् पिलेल्ं नाही..
अशोकन्ं पिल्ंय् पण् तो अजुन् उठलेला नाही..
मी त्याला उठवु शकतो..
आणि तुझा ट्रस्ट् इंडेक्स् अपडेट् होईपर्य्ंत् जिव्ंत ठेवु शकतो..
सरबताच्या बाटलीवरचे तुझ्या हाताचे ठसे पुसुन् टाकु शकतो..
इच्छा तुझी प्रश्न् तुझा महत्वाकांक्षा तुझी..
प्रतिस्पर्धी तुझा..
.
.
.
एक् न् थांबणा-या टिंबांची मालिका, मला काही लिहिताच् येईना, टिंब्ं स्ंपण्याची वाट् बघण्याखेरीज् माझ्या हातात् काहीच् नव्हत्ं, आणि ती काही स्ंपत् नव्हती. दहा मिनिटांनी स्ंपली एकदाची. अतिशय आन्ंद झाला मला, मी मेसेंजर् ब्ंद् केला आणि शोध् सुरु केला पुन्हा एकदा.
दहा मिनिटात् सगळे दुवे आणि पुरावे, माझी सगळ्यात् आवडती गोष्ट पुरावे समोर् येउ लागले. शशिकांत् आणि शालुचे स्ंब्ंध्, एकत्र फिरण्ं, हॉटेलात् जाण्ं, अशोकच्ं कर्जबाजारी असण्ं आणि शशिकांतन्ं मतकरीला दिलेली लाच् ४५० भारतीय् रुपये,
मेसेंजर् पुन्हा पुन्हा पिंग् करत होता, मला त्याकड्ं लक्ष् द्यायच्ंच् नव्हत्ं. पण् फारच् जास्त् टिंग् टिंग् आवाज सुरु झाला तस्ं पुन्हा मेसेंजर् चालु केला, पुन्हा बरीच् मोठी टिंबाची मालिका होती.. आणि त्याखाली लिहिलेल्ं होत्ं,
मी सरबत् झोपुन् उठल्यावर् पिल्ंय्, चव् छान् आहे.
तुझ्या मेलेल्या प्रतिस्पर्ध्याचा जिव्ंत प्रतिस्पर्धी
अशोक.
म्हणजे मतकरी मेला, माझा १% गेला, फक्त ०.३% मिळणार्, अजुन् थोड्याश्या टक्क्यांसाठी अजुन् काही लोकांना मारुन् वाचवाव्ं लागणार्, त्यातले मारल्याचे पुरावे नष्ट करायचे, जिव्ंत् ठेवल्याचे सांभाळायचे, अरे माझ्या नशिबा फार अवघड् झाल्ं हे सगळ्ं आता. परत मागच्या मितीत् जाउन् मतकरी मरणार् नाही हे बघावं लागेल् आता, आवरा आता इथल्ं सगळ्ं, मॉनिटरवरचा मेसेंजर ब्ंद् झाला, त्याचा सिग्नल ट्रॅक् केला तो मितिअप मधुन् होता, म्हणजे अशोक् माझ्याआधी तिथ्ं गेला आहे, आणि तो शशिकांतला जिव्ंत करायचा प्रयत्न् करेल् शेवट त्याचा ट्रस्ट् इंडेक्स् वाढण्यात् होणार् आणि तो स्ंघाध्यक्ष् होणार्, सगळा पसाराच् स्ंपणार्, वेळ् फार कमी आहे, फार झटकन् सगळ्या हालचाली करायला हव्यात्. बरीच् लाच् द्यावी लागणार् आता, तत्वांच्ं काय् होणार् काय् माहित्, माझी बुद्धिस्ंस्था प्रत्येक् वेळी ब्ंद् करायची लाच् देताना, ती पुन्हा चालु होताना पन्नास् फक्त् प्रश्न् विचारणार् आणि वेळ् खाणार्.
अरे, पण् अशोकचा सध्याचा ट्रस्ट् इंडेक्स् काय् आहे, मी चेक् करायला टाकला पण् आता मला ती माहिती ब्लॉक् आहे, शुद्ध लाचखोरी आहे ही, माझ्याकडे मितिअप् आणि मितिडाउन् शोधाचे पुर्ण अधिकार् असताना देखिल् एवढी छोटि माहिती मला ब्लॉक् कशी होते आहे. म्हणजे अशोक् माझ्यापेक्षा जास्त् मोठा लाचखोर् आहे, मग सुरक्षा व्यवस्था चेक् केली, तिथ्ं अजुन् देखिल् मतकरीच्या मरणाची नोंद् नाही, म्हणजे तो मेला नाही. अशोक मेल्याची नोंद् नाही, मतकरी मेल्याची नोंद् नाही मग काय् चालल्ंय् नक्की, माझ्या खेळात् मलाच् स्ंपवण्याची चाल् आहे का यांची ? शालु आणि शशिकांतच्या मरणाला मीच् जबाबदार् आहे का ? अरे हा मुळ् प्रश्न् अशाअडचणीच्या वेळी पुन्हा का डोक्ं वर् काढतो आहे. माझ्या बुद्धीस्ंस्थेला भ्रष्ट करण्यात् आल्ं की काय् ? काल् मतकरीच्या आरशातुन् इकड्ं आलो तेंव्हा हे अस्ं झाल्ंय का ?
होय्, मतकरीच्या आरशातुन् खोट्ं बोलुन् दुस-या मितित् जाता येत् नाही, आणि गेलात् तर् तुमची बुद्धीसंस्था कुणालाही सहजसाध्य् होते, आणि आता हे कस्ं टाळावं, मी काय् खोट्ं बोललो होतो काल्, अरेच्च्या माझ्या मुलांबद्दल् विचारल्ं होत्ं अशोकला. चला पुन्हा लाचखोरी, मितिलेफ्टचे रेकॉर्ड् बदलुन् किमान् दोन् मुलांना माझी मुल्ं आहेत् हे दाखवावं लागेल्. आणि लाच द्यायचीच् असेल् तर शशिकांतच्या बायकोचीच् मुल्ं माझी दाखवता येतात् का ते पाहाव्ं. आवरा आवरी सोडुन् मी पुन्हा सिस्टिमवर् येउन् बसलो. एक् दोन् अधिका-यांना मेसेज् केले, ट्रस्ट् इंडेक्स् वर् ते सगळ्यात् खाली होते,, म्हणजे माझ्ं काम् निश्चित होणार्. बिटकॉइन्सनी खात्ं बदलल्याचा मेसेज् आला, आणि काही क्षणांतच् अशोकाच ट्रस्ट् इंडेक्स् माझ्या समोर् होता ३.८८% आणि आता माझ्या बुद्धिसंस्थेला आता कुणि भ्रष्ट् करु शकणार् नव्हत्ं. स्पर्धा फारच् अटितटिची होती.. पुन्हा काही बिटकॉइन्सनी खात्ं बदलल्ं, आणि अशोकच्या बुद्धिसंस्थेचा पासवर्ड् माझ्यासमोर् होता. तो वापरुन् मी त्याच्या बुद्धिसंस्थेचा ताबा घेण्याचा प्रयत्न् केला, पण् ते शक्य् होईना. त्याचवेळी पहिला प्रश्न् उभा राहिला, शशिकांत आणि शालुच्या मरणाला मी जबाबदार् आहे का ? अरे हे काय् चालल्ंय् ?
मी माझी लेव्हल् डाउन् केली, तज्ञ् मधुन विद्यार्थी दशेत् गेलो, माझ्या बायोइलेक्ट्रोच्या नोटस् समोर् घेतल्या, उत्तर् सापडल्ं, माझ्या बुद्धिस्ंस्थेनं एक् विशिष्ट विचार वार्ंवारिता ओलांडली की पुन्हा तोच प्रश्न् पुढ्ं येण्याची व्यवस्था अशोक् किंवा मतकरीन्ं केली होती. मला फार् जास्त् तांत्रिक् किंवा फार जास्त् वेगान्ं हालचाली करण्यावर् ब्ंधन्ं आलेली होती यामुळ्ं. मी स्वताला फार मोठा तज्ञ् समजत् होतो, आणि माझे प्रतिस्पर्धि अगदी बेसिकला खेळत होते, मिती आणि यांत्रिकतेच्या अतिशय् मुळ् नियमात् मला अडकवत् होते, ते नियम् जे नियमावलीच्या पहिल्या दोन् पानात् असतात्, आणि मला पुन्हा पुन्हा त्यांची गरज् नाही म्हणुन् मी थेट् नियमावलीच्या शेवटी वाढवण्यात् आलेले नविन् नियमच् वाचतो.
कधी कधी एखादा खेळ् फार बेसिक लेव्हलाच् खेळावा लागतो, आणि हाच विचार् मी पुरावे नष्ट करताना करत असतो, मग तो मी इथ्ं का विसरलो, ह्या उच्च पदावर् आल्याची स्वप्न्ं पडायला लागल्यापासुन् अस्ं व्हायला लागल्ंय् का? माझा मोहन् रानडे झाला आहे. तुम्हाला मोहन् रानडे माहित् नाही.. नीट् वाचा मोहन् रानडे.
वाचलंत का बरोबर , समजलं का नाही , हरकत नाही, तोडुन तोडुन वाचा मग कळेल.. आता तोच झालाय माझा. असो हे स्पष्टीकरण्ं द्यायची वेळ् नाही ही. आता मला हालचाली करायचा वेग कमी करायला हवा किंवा शशि आणि शालुच्या मरणाचा माझा संबंध तरी लावायला हवा, आणि तो पुरावा मिटवायला हवा, म्हणजे ०.३% +०.३% = ०.६%, म्हणजे ४.५% म्हणजे तरी देखिल ०.२% कमीच्, एकतर ते मिळायची सोय् हवी किंवा सरासरी ट्रस्ट् इंडेक्स् ४% व्हायला हवा. जसजसा या संघाध्यक्षपदाच्या जवळ येतो आहे तसतसा गोंधळ वाढतो आहे. गरजा वाढत आहेत. हि सिस्टिम बेकारच अर्थात प्रत्येक नविन संघाध्यक्ष असे काहितरी नियम वाढवतो जे त्याच्या सोईचे असतात आणि मग हे असे घोळ होत राहतात, आणि मी काय सोडणार आहे का, मी देखिल हेच करणार आहे.
पुन्हा लेव्हल बदलली, तज्ञ पातळीत प्रवेश केला, मतकरीच्या मेसेंजरवरच अशोकचे मेसेज होते.. बरेच आणि त्यातले बरेच फक्त टिंब असलेले, मला न आवडणारी टिंबांची मालिका. एकच महत्वाचा वाटला, अशोक म्हणत् होता..
शोध शोध् आणि शोध, आता तुला फक्त् शोधच तुला वाचवु शकतो..शोध तुझा, तुझ्या आत्म्याचा आणि तुझ्या अस्तित्वाचा, तुझ्या मतिचा, तुझ्या मातीचा आणि तुझ्या मितिचा आणि तुझ्या.
.
.
.
पुढं बरीच टिंबं होती, पण् मी काही खालीपर्यंत वाचायला गेलो नाही एव्हाना मला त्याच्या बुद्धीची आणि सामर्थ्याची खात्री पटलीच होती, त्यानं लिहिलेलं असणार्..
मौतीचा..
इथं कुणीच अमर नसलं तरी शेवट कुणालाच नकोय, अगदी शशि, शालुला आणि मतकरीला देखिल शेवटाचा तिटकाराच असणार, त्या अनादि अनंताचा ध्यास आणि मोह सगळ्यांनाच् आहे, तसे तर सगळेच् मोहन् रानडे इथे. तुमच्या जन्मदात्यांच्या शेवटाला कारणीभुत झाला तरी देखिल तुमच शेवट तुम्हाला नकोच असतो, उलट बाकी सगळ्यांचा शेवट तुम्हाला हवाय, होय सगळ्यांचा म्हणतोय मी, सगळ्याचा नाही, ते टिंब् तो अनुस्वार् नीट वाचा, तुम्हाला सगळं हवं असतं, सगळे नको असतात. पुन्हा तोच मला न आवडणा-या टिंबानं घातलेला गोंधळ…. हे सगळ्ं टाइपताना मला एकदम् जाणवलं की मी हे शेवटाच्ं लिहितोय् की काय्… शेवट आणि तो ही संघाध्यक्ष न होता,
छे शक्यच नाही, एकतर मी माझा शेवट होउ देणार नाही म्हणजे स्ंघाध्यक्ष झालो की तसा नियमच करणार आणि माझा शेवट झालाच तरी तो संघाध्यक्ष् म्हणुनच् होणार्.. . ..
पुन्हा एकदा अशोक आणि मतकरीला ट्रॅक करायला घेतल्ं, प्रवासात आहेत सिस्टिमन्ं कळवल्ं, म्हणजे अजुन् दोघ्ंही जिव्ंत होते आणि आता माझ्याकडे पुन्हा सगळ्यात् मोठा पर्याय् मोकळा होता, मतकरीला मारण्ं, आणि वाचवणं, तो १% मला वेड लावत होता पुन्हा पुन्हा…

पोस्ट क्र. ८ : प्राची अश्विनी

मी त्या मितीकरीला हलवून हलवून उठवलं. "अहो मितीकरी, उठा. इथे कसे पोचलो आपण ? मला प्लिज सगळं स्पष्ट सांगाल का?" आम्ही एका स्तूपाजवळ होतो .
"हं" आळोखे पिळोखे देत तो उठला . आजूबाजूचा अंदाज घेत म्हणाला," सांगतो, तू माझा जीव वाचवलायस त्यामुळे तेवढं तरी माझं कर्तव्य बनतं. पण आधी तू सांग तू यात कसा अडकलास?"
"अहो ते सरबत प्यायल्यावर आपण एकत्रच आलो ना इथं? "
"अरे इथं नाही या सगळ्या प्रकरणात तू कसा अडकलास ?"
"अच्छा, ते होय. त्याचं काय झालं, शशिकांत माझा जिगरी दोस्त. व्यवसायानं गणितज्ञ. एक दिवस त्यानं मला एका महत्त्वाच्या कामासाठी त्याच्या घरी नाशिकला बोलावलं. काही दिवसापूर्वी शशिकांतची खुदिरामशी ओळख झाली होती. खुदिरामनं त्याला एक स्पेशल आरसा दिला होता. त्याबद्दल अजून काही माहिती घेण्यासाठी तो पुन्हा खुदिरामला भेटणार होता. पण त्याचा खुदिरामवर विश्वास नव्हता. अशावेळी विश्वासाचा माणूस बरोबर असावा म्हणून शशिकांतनं मला बोलावलं होतं. हे गुपित त्याने मी सोडून इतर कुणालाही सांगितलं नव्हतं. अगदी शालूला पण नाही. एवढंच नाही तर त्यानं मला शपथ घातली की मी जर यातलं काही कुणाला सांगितलं तर त्याचा म्हणजे शशिकांतचा मृत्यू होईल. नंतर तो मला आणि शालूला लेण्यापाशी घेऊन आला. शशिकांतनं तो आरसा माझ्याकडं दिला आणि तो खुदिरामशी बोलायला निघून गेला. शशिकांतनं सांगितलेलं मी काही सिरीयसली घेतलं नाही. गम्मत म्हणून मी शालूला तो आरसा दाखवला. त्यापुढं काय घडलं ते मला अजूनही नीट कळलं नाही. फक्त शालूची किंकाळी आठवते. मी डोळे उघडले तर मी वेताळबाबाच्या डोंगर पायथ्यापाशी होतो .
कुणी तरी हाताला धरून ओढत न्यावं तास मी शशिकांतच्या घरी पोचलो. बघतो तर तो मेलेला होता. तोपर्यंत मला पांडवलेण्यांवरचा प्रकार हा एक भासच वाटत होता. पण हे काहीतरी वेगळं चाललंय हे मला जाणवायला लागलं. मला त्यानं घातलेली शपथ आठवायला लागली. शशिकांत माझ्यामुळे मेला की काय अशी भीती वाटू लागली. या सगळ्याच कारण तो आरसा असावा हे माझ्या लक्षात आलं. पण लेण्यांमध्ये शालूला दाखवल्यानंतर तो आरसा गायब झाला होता. कसं कोण जाणे पण मला त्या रात्री पडलेल्या स्वप्नात खुदिराम दिसला आणि मी त्याच्याकडून तो आरसा विकत घेतला. आरसा दिसायला साधाच होता पण आरशात पाहिल्यावर माझ्या स्वतःच्या चेहऱ्याऐवजी शशिकांतचा चेहरा दिसत होता, हे गौड बंगाल काही कळेना . मी त्याचाच विचार करत झोपी गेलो. सकाळी उठलो तर शालूचा मेसेज आला होता. तो वाचल्यावर शशिकांतच्या मुत्यूला मीच जबाबदार असल्याची माझी खात्रीच पटली .
पण मला आरशात त्याचाच चेहरा का दिसला ? योगायोग होता, भास होता की अजून काही ? कळायला मार्ग नव्हता. शेवटी जास्त विचार करायचा नाही असं मी ठरवून टाकलं.गाडीत बसलो. काहीतरी चित्र विचित्र स्वप्नं पडली आणि त्या गोंधळात तो आरसा फुटून गेला. जेव्हा मी गाडीबाहेर पडलो तर कुठल्यातरी जुन्या पुराण्या काळात पोचलो होतो ."
"चायला तुला बनवला खुदिरामने."
"म्हणजे?"
"म्हणजे वाघाचे पंजे. शशिकांतकडचा आरसा हा दुसऱ्या मितीत नेत होता. तुला दिलेला आरसा त्याच मितीत फक्त दुसऱ्या काळात नेत होता. ते जाऊदे पुढं बोल."
"पण त्यानं असं का फसवलं?"
" ते मग सांगतो. आधी पुढं काय झालं ते सांग."
"पुढं??? हां. मला असं दिसलं की मी आणि शालू एका स्तूपापाशी उभे आहोत. Actually हाच तो स्तूप. आणि मी तिला सांगतोय की वर्षानुवर्षं हे रहस्य त्या भिक्षूंनी जपलंय आपणही ते कुणाला सांगता कामा नये. या गोष्टीबद्दल तू कुणाला काही बोलू नकोस. तिनं आपल्या कुंकवाची शपथ घेतली. एवढं दिसतंय तितक्यात मी माझ्या गाडीत परत आलो होतो . नंतर मला आठवतंय की मी खुदिरामला भेटलो. आणि पुन्हा त्याच्याकडून आरसा विकत घेतला .
"पुन्हा? एकदा जो राडा झाला तो कमी नाय काय?"
"पण मला शशिकांतला पुन्हा जिवंत करायच होता. कारण तो मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्याची मेल मिळाली. त्यात लिहिल्याप्रमाणे खुदिराम दुस-या मितितून आला होता आणि तो शशिकांतला म्हणाला होता की "ही जागा, हे आयुष्य माझं नाही आणि मी इथे राहणार नाही. तुझ्या दोस्ताकडून म्हणजे माझ्या कडून मात्र माझं आयुष्य परत मिळवीनच." शशिकांतनं त्या मेलमध्ये मला खुदिरामपासून सावध राहायला सांगितलं होतं."
"आयला दोस्त हो तो ऐसा. बरं मग?"
"मग मी तो आरसा घेऊन शालूकडे गेलो तर शालू मरून पडली होती. आणि तिच्या हातात शशिकांतने मला पहिल्यांदा दिलेला आरसा होता. पण फुटलेला. मी दुसरं कुणी तिथं येण्याआधी तिथून निघालो आणि तडक खुदिरामला भेटायला त्याच्या झोपडीत गेलो. आधी त्यानं खोटंच सांगितलं की माझी मुलं दुसऱ्या मितीत अडकलीत त्यांना शोधायला मी इथं आलोय . पण मला शशिकांतनं सगळं सांगितलंय कळल्यावर त्याचा नूर बदलला. पुढचं तर तुम्हाला माहितीय."
"हं.तो खुदिराम ने ऐसा गेम कियेला है "
"मितीकरी साहेब प्लिज, आता तरी मला हे काय चाललंय ते सांगता का?"
"ओक्के बॉस. ऐक .
हे विश्व असंख्य मितींचं बनलं आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक विश्व इथे गुण्यागोविंदानं नांदत असतात. या मिती बदलणाऱ्या आरशांमधून तुम्ही सहज दुसऱ्या मितीत जाऊ शकता. अशा या आरशाचा शोध सर्वात प्रथम तुमच्या मितीत इ स पूर्व ३०० वर्षांपूर्वी कात्यायन नावाच्या एका गणितज्ञाने लावला. त्याच्या मताप्रमाणे विशिष्ट कोनात जर यज्ञवेदी बनवली आणि त्यातून येणारा प्रकाश जर विशिष्ठ आकाराच्या ताम्रपटावरून परावर्तित केला तर दुसऱ्या मितीत जाता येईल. त्यालाच त्यानं स्वर्ग म्हटलं. पुढं त्यानं आणि त्याच्या शिष्यानी हे संशोधन अजून पुढे नेलं व मिती आणि काळ बदल करणारा आरसा बनवला .
तेव्हा सम्राट अशोक राज्य करत होता. त्याच्या तिष्यरक्षा नावाच्या तरुण पत्नीचं राजपुत्र कुणालवर प्रेम बसलं. पण कुणालनं, तिला तो त्याची आई मानतो, हे सांगून नाकारलं याचा सूड घेण्यासाठी तिष्यरक्षेनं कुणालला कपटानं अंध केले. हे जेव्हा अशोकाला कळलं तेव्हा त्याने तिला मृत्युदंडाची शिक्षा केली. पण तिनं कशातरी प्रकारे कात्यायनाकडून तो मिती बदलणारा आरसा मिळवला आणि दुसऱ्या मितीत निघून गेली. हे कळताक्षणी अशोकानं तिष्यरक्षेनं आत्महत्या केली असा प्रचार केला. पुन्हा असं घडू नये म्हणून कात्यायनाच्या शिष्यांचं सर्व संशोधन नष्ट केलं. पण तरीही त्याला तो आरसा किंवा तिष्यरक्षा मिळाली नाहीच. कात्यायनाच्या पट्टशिष्याला ती सर्व विद्या मुखोद्गत होती. अशोकाचा रोष होऊ नये म्हणून त्या सर्व शिष्यानी बौद्धधर्म स्विकारला. त्या पट्टशिष्यानं त्याला येत असलेली विद्या कुणाच्या हाती लागू नये पण नष्ट होऊ नये म्हणून गुपचूप भूर्जपत्रांवर लिहून काढली. त्याच सुमारास त्रिरश्मी पर्वतावर गुंफा खोदण्याचं काम चालू होतं आणि तिथली व्यवस्था काही बौद्ध भिक्षूंकडं होती. या शिष्यानं त्यांच्यामध्ये प्रवेश मिळवला आणि ती पत्रं कुणाला सापडणार नाहीत अशा प्रकारे तिथल्या एका खोबणीत लपवून ठेवली. त्याच त्या पांडवलेण्यांच्या गुंफा.
इकडे तिष्यरक्षा ज्या मिठीत आपलं ज्या मितीत गेली तिथं तिच्याकडं तो आरसा होताच. अनेक मिती तसेच अनेक काळ बदलत ती कुठेतरी स्थिरावली.. ती आमची मिती म्हणजे माझी ओरिजिनल मिती. तिथं अजूनही सत्ययुग चालू होतं. तिष्यरक्षेच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा (त्याला वेवेगळ्या विश्वात, संस्कृतीत वेगवेगळी नावं आहेत ) अनेक मितीत , अनेक काळात भ्रमण करू लागला. त्याच्याबरोबर एका मितीतील बातम्या दुसऱ्या मितीत जात. बऱ्याचदा त्यामुळं भांडणंसुद्धा होत असंत. आधी सर्व आलबेल होते पण कुणा एका भामट्यानं त्याच्याकडून काही वेळाकरता तो आरसा मिळवला आणि आरशाचे अनेक डुप्लिकेट आरसे बनवले आणि विकले. पण यात एक फॉल्ट होता. या नवीन आरशांमधून फक्त दुसऱ्या एकाच मितीत किंवा काळात जात येत असे. पण त्याचा वापर करून अनेक जण आजूबाजूच्या मितीत ये जा करू लागले. त्यामुळे गोंधळ माजला कारण कोणी आज इथे आहे तर उद्या नाही असं होऊ लागलं . एव्हाना सत्ययुग पण ओल्ड फॅशन्ड झालेलं. हळूहळू तिथंही लबाड्या होऊ लागल्या. मग मिती प्रवासाचे रुल्स बनले.. ते नीट पाळले जातायत ना हे बघायला एक सिस्टीम बनवली. त्याचा संघाध्यक्ष ठरवला. आरशांच्या निर्मितीवर नियंत्रण आणलं. एका व्यक्तीला एकच आरसा मिळेल. प्रवासाआधी इन्शुरन्स काढणं अपरिहार्य आहे. प्रवासाला जाण्याआधी आपली संपत्ती आणि कुठच्या मितीत जाणार ते डिक्लेअर करावं लागेल. वगैरे "
"आधी मला सांग संपत्ती म्हणजे सोनं? तुमच्या मितीत नक्की करन्सी कुठची वापरतात?"
" वेल, संपत्ती म्हणजे सोनं नाणं, पुस्तकं , अलीकडे बिटकॉईन्स वगैरे जे तुम्ही गोळा केलं असेल ते. पण करन्सी म्हणजे ट्रस्ट इंडेक्स"
"म्हणजे?"
"एखादी व्यक्ती किती विश्वासार्ह आहे, ह्यावर हा इंडेक्स ठरतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्व घटनांची नोंद स्पेशल मॉनिटर्सवर ठेवली जाते. तो माणूस किती खोटं बोलला, कुणाला फसवलं का, दिलेला शब्द पाळला का? कुणाला मदत केली का ? त्यानं स्विकारलेलं काम व्यवस्थित करतो का? यावर तो इंडेक्स प्लस मायनस होत असतो.”
"ओक्के. म्हणजे ज्याचा इंडेक्स सर्वात जास्त तो श्रीमंत."
"हो आणि तो संघाध्यक्ष बनतो. त्याला तो तिष्यरक्षेचा ओरिजिनल आरसा मिळतो. त्याला कितीही मितीत आणि काळात फिरता येतं.”
"हं. पण याचा आणि शशिकांतचा काय संबंध?"
"अरे धीर धर, सांगतो .
खुदिरामला ओरिजिनल आरसा हवा होता. किंवा तो तयार करायचा फॉर्म्युला. म्हणजे ट्रस्ट इंडेक्स शून्य असला तरी आणि संघप्रमुख बनू शकेल. मग त्याला कोणीच हात लावू शकणार नाही. पण तिष्यरक्षा इतक्या असंख्य मिती आणि काळात फिरली होती की डुप्लिकेट आरशांनी ही मिती शोधून काढणं म्हणजे गवतात पडलेली सुई शोधण्यासारखं कठीण काम होतं.
तर या खुदिरामनं त्याच्या मितीतील एकाचा खून केला. आणि त्याचा आरसा मिळवला. बरं खुनाचा त्यानं काही पुरावा नं ठेवल्यानं त्याला कुणी पकडू शकलं नाही. मग त्यानं असले धंदे चालूच ठेवले. लोकांना मारून अनेक आरसे मिळवले. त्यांच्या साहाय्यानं मित्या बदलल्या आम्ही त्याला पकडणार हे लक्षात येताच तो मिळवलेल्या आरशांच्या मदतीनं अनेक मिती बदलत तुमच्या मितीत पळून आला. इथे आल्यावर जरा संशोधन केल्यावर त्याला कळलं की हीच ती मूळ मिती.
खुदिराम इथपर्यंत पोचला खरा पण त्याचा ट्रस्ट इंडेक्स मायनसमध्ये असल्यानं त्याला कात्यायनाच्या काळात जात येईना. कारण संघाध्यक्षांनी कुणाच्या हातात ते संशोधन मिळू नये म्हणून आरसे बनवताना आधीच अशी पाचर मारून ठेवली होती, इथं आल्यानंतर खुदिरामला कळलं की आपल्याला एकट्याला ते संशोधन मिळवणं आणि आरसा बनवणं जमणार नाही. जरा चौकशी करता त्याला समजलं की शशिकांत सुद्धा याच विषयावर अभ्यास करणारा संशोधक आहे. मग त्यानं शशिकांतला गाठलं. आपल्या आरशानं दुसऱ्या मितीत फिरवून आणलं आणि शशिकांतचा विश्वास मिळवला. कात्यायनाचं संशोधन मिळवायला शशिकांतनं मदत केली तर त्या बदल्यात बिटकॉईन्स देईन अशी लालूच दाखवली. शशिकांतला या साऱ्यातून शालूला दूर ठेवायचं होतं. आणि पुरेसं श्रीमंत झाल्यानंतर तिला घेऊन वेगळ्या मितीत जाऊन राहायचं होत. पण खुदिरामच्या मनात मात्र काही और शिजत होतं आपलं काम करवून घेतल्यावर शशिकांतला मारायचं आणि त्याचं शरीर घेऊन राहायचं त्यानं प्लॅन केलं होतं. कुठंतरी पाणी मुरतंय हे शशिकांतच्या लक्षात आलं. आणि त्यानं आपल्या बाजूनं अजून कुणीतरी असावं म्हणून तुला इन्व्हॉल्व केलं. तू यात येणं खुदिरामला फायद्याचंच होतं कारण खुदिरामला तर जुन्या काळात जाता येत नव्हतं आणि शशिकांतला पाठवलं आणि तो जर परत आलाच नाही तर खुदिरामचं अस्तित्वच उरलं नसतं. त्यानं शशिकांतला पटवलं की अशोकला आपण जुन्या काळात पाठवू आणि नक्की कुठं संशोधन लपवलंय हे त्याच्याकडून काढून घेऊ .
तू शालूला आरशाबद्दल सांगशील असं शशिकांतला वाटलंच नाही . त्याला वाटलं की तूच त्या काळात जाशील. पण तुम्ही दोघं एकत्र गेलात. तुम्हाला बाकी काहीही माहिती नव्हतं. या गुंफांमध्ये ते संशोधन लपवून ठेवताना तुम्ही पाहिलंत. तिथल्या भिक्षुनी या संशोधनाबाबत घेतलेली गुप्ततेची शपथ ऐकलीत. आणि तुम्हालाही वाटलं की हे कुणाला सांगू नये तुम्ही तशी एकमेकांना शपथ दिलीत . आणि पुन्हा त्या मितीतून परत आलात."
"मग मला हे सगळं का नाही आठवत?"
"इथच तर मेख आहे. कारण आरशातून एकच व्यक्ती मिती प्रवास करू शकते. तुम्ही दोघं असल्यानं आरशाची शक्ती तुमच्या दोघांच्या प्रवासातच खर्च झाली, तुमची मेमरी पूर्णपणे परत येऊ शकली नाही" .
"आणि हे सगळं कधी झालं?"
"गेल्या दोन तीन दिवसातच. पण तुला खूप काळ गेल्याच वाटतंय. कारण तुझ्या मेमरीवर परिणाम झालाय. शालूला यातलं बरच आठवत होतं पण तिला ते स्वप्न वाटत होतं. ती त्या आरशातून परत आली ते डायरेकट तिच्याच घरी. तेव्हा शशिकांत तिच्या शेजारीच बसला होता. तिनं शशिकांतला आपल्याला पडलेलं स्वप्न सांगितलं. शशिकांतची आता खात्री पटली की खुदिराम आपल्याला वापरून घेतोय. त्याच्या हाती ते संशोधन जाणं धोक्याचं आहे. म्हणून तो जाब विचारायला तडक खुदिरामकडं गेला. खुदिराम आणि त्याची बाचाबाची झाली. बोलण्याच्या ओघात खुदिराम बोलून गेला की त्याला आता स्वतःच आयुष्य नकोय कारण त्यानं केलेले खून आता उघड झालेत. कात्यायनाचं संशोधन मिळालं की तो तुला मारून तुझ्या शरीरात प्रवेश मिळवणार होता आणि तुझ्या शरीरानं वेगवेगळ्या मितीत व काळात जगणार होता. शशिकांत हे ऐकून घाबरला. तो हे काही थांबवू शकत नव्हता. आपण बिटकॉईन्स च्या मोहापायी कसल्या भयंकर कटात अडकलोय हे लक्षात आल्यानं त्याला प्रचंड टेन्शन आलं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. शालूला कळलं की ते स्वप्न नव्हतं. तिला वाटलं की तिनं तुला दिलेली शपथ मोडली म्हणून शशिकांत मेला आणि त्या मागे तो आरसाच आहे. म्हणून तिनं तो आरसा फोडला आणि स्वतःला मारून घेतले.
इकडं खुदिरामनं तुला परत एक आरसा देऊन तुला त्या काळात पाठवायचा प्रयत्न केला पण तुझा आरसाच फुटला. खरं तर तू तिथेच अडकून पडायचास पण तुझं नशीब चांगलं की गाडीच्या रिमोटमुळं तू पुन्हा गाडीजवळ पोचलास आणि त्या आरशाचे तुकडे तुला परत घेऊन आले. अर्थात पुन्हा तुझी मेमरी पूर्णपणे नाही येऊ शकली. तुझा आता काही उपयोग नाही हे खुदिरामला कळून चुकलं तो तुला मारून दुसरा कुणी बकरा शोधणार होता. आणि जवळच्या आरशाने त्या बकऱ्याकडून संशोधन मिळवणार होता. तितक्यात खुदिरामाचा पाठलाग करत मी इथे पोचलो. खुदिरामने मग आपल्या दोघांना मारायचा प्लॅन केला. पण तू मला उठवलं आणि यातून वाचवलं. "
"मग आता खुदिराम कुठेय?"
"तो त्या लेण्यांच्या खालच्या झोपडीतच आहे. मी ते सरबत पिण्याआधी त्याच्या नकळत त्याच्या भोवती बुद्धिभ्रष्ट करायच्या बेड्या घातल्या होत्या."
"बेड्या? पण मला तर दिसल्या नाहीत" .
"अरे अशा नुसत्या डोळ्यांना नाहीच दिसत. संघाध्यक्षांनी मुद्दाम माझ्याकडे दिल्या होत्या त्या. जोपर्यंत मी त्या उघडत नाहीत तोपर्यंत खुदिरामच्या मनात चित्रविचित्र असंबद्ध विचार येतील. आणि त्यामुळे तो कुठलाही निर्णय घेऊ शकणार नाही. आहे तिथेच अडकून पडेल. मी त्याला आता परत आमच्या मितीत नेणार आहे. खुदिरामचं काय करायचं हा निर्णय आता संघाध्यक्षंच घेतील."
"आणि मी ?"
"तू जा परत मुंबईला. फक्त हे कोणाला सांगू नकोस.अर्थात तुला गेल्या काही दिवसात काय झालयं हे तसंही आठवणार नाहीच म्हणा."
अशोक उठला तेव्हा सकाळचे दहा वाजून गेले होते. त्याची बायको किचनमध्ये काहीतरी करत होती. सवयीने त्याने उठल्याउठल्या मोबाईल बघितला. मोबाईल मध्ये अनोळखी नंबरवरून एक वेब ऍड्रेस, अकाउंट नंबर आणि पासवर्डचा मेसेज आला होता.

-------------------------------------------
समाप्त

कथाप्रकटनप्रतिसादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

1 Apr 2017 - 10:11 pm | जव्हेरगंज

हे एक बरं केलंत विनय,
या प्रकारात काम करायला मजा आली.

माझ्याकडून सहज सुचलेले एक शीर्षके

'मेंदूतला खुदीराम'

:)

शेवटचा डाव's picture

1 Apr 2017 - 11:18 pm | शेवटचा डाव

"आरष्यातील मितपुराण"

दीपक११७७'s picture

2 Apr 2017 - 1:20 am | दीपक११७७

धन्यवाद अॅस्ट्रोनाट विनय

'कथा कल्पनेतल्या मितीतील'

अभ्या..'s picture

2 Apr 2017 - 1:46 am | अभ्या..

मि ती नव्हेच

प्राची अश्विनी's picture

2 Apr 2017 - 5:28 am | प्राची अश्विनी

+1

प्राची अश्विनी's picture

2 Apr 2017 - 5:27 am | प्राची अश्विनी

शतजन्म शोधताना

Ranapratap's picture

2 Apr 2017 - 11:59 am | Ranapratap

त्रिमिती

अॅस्ट्रोनाट विनय's picture

2 Apr 2017 - 11:44 pm | अॅस्ट्रोनाट विनय

मि ती नव्हेच हे शिर्षक फायनल करत आहोत. अभ्या यांचे पुछंगुच्छ देऊन स्वागत.

अभ्या..'s picture

3 Apr 2017 - 12:06 am | अभ्या..

धन्यवाद विनय,
थैंक्स प्राचीताई.

जव्हेरगंज's picture

3 Apr 2017 - 12:11 am | जव्हेरगंज

भन्नाट शीर्षक सुचवल्याबद्दल अभिनंदन राजे !!!

लॉल :-D हे भारी नाव आहे.

बर्यापैकी छान जमलीय खो कथा. मी सुरवातीच्या तीन पोस्ट वाचलेल्या. त्यानंतर आत्ता इथेच बाकीचे भाग वाचले.

आता गवि, अभ्या यांनी पहिल्या आणि दुसर्या भागावरील प्रतिसादात सुचवलंय तेदेखील करा ठिक वाटलं तर.

साहित्य संपादक's picture

5 Apr 2017 - 10:44 pm | साहित्य संपादक

टिप: लेखकाच्या विनंतीनुसार धाग्याचे शीर्षक बदलले आहे.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

6 Apr 2017 - 11:09 am | अॅस्ट्रोनाट विनय

आभारी आहे _/\_