सब्रका फल - स्पर्धे बाहेरची शशक
तो यवन त्याच्यावर पचकन थुंकला,
याच्या डोळ्यात अंगार फुलला,
“हरामी नजर नीचे” असे म्हणत त्या यवनाने त्याच्या खाडकन थोबाडीत मारली.
यवनाच्या नरडीचा घोट घ्यायला शिवशिवणारे हात मोठ्या मुश्किलीने आवरत तो म्हणला.
“गलाती झाली हुजूर, पुढच्या वेळी तलवार चालवा माझ्या गर्दनीवर, एकडाव माफी द्या गरीबाला”
त्याला उद्दामपणे बाजूला ढकलत तो यवन पुढच्या भोया कडे वळाला.
हिच संधी साधून तो त्याच्या साथीदारासह तो जडशीळ पेटारा कसाबसा उचलत लगबगीने तिथून सटकला.