या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ.
शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’.
शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो. चित्रपट प्रत्यक्ष पहावा, त्याबद्दल लिहित नाही.
चित्रपटाचा उत्तरार्ध किंचित रेंगाळल्यासारखा वाटू शकतो, पण एकूण या विषयाची प्रकृती पाहता, तसे होणे साहजिक आहे. स्मरणरंजनाचा पारा दिग्दर्शकाने फार मनापासून, कसोशीने हाताळला आहे, म्हणून आपल्या मनातल्या कोणत्याही फ्रेमला हा चित्रपट तडा जाऊ देत नाही.
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
जाता जाता ..... एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’ ❤️ (हे अर्थात, इंग्लिश सबटायटल्सचे मराठीकरण आहे. मूळ भाषेत ते आणखी आर्त, मधुर असणार.)
वास्तव नेहमीच अंगावर येणारे, सेन्सेशनल असते, असे नाही, तर असे निष्कपट, निरागस, जीव ओवाळून टाकणारेही असते, ही जाणिव या चित्रपटाने जागी ठेवली. एकदा तरी पहावा असा चित्रपट.
प्रतिक्रिया
8 May 2019 - 1:10 am | कंजूस
जिप शाळा , यत्ता आठवी ढ.
:-) :-)
8 May 2019 - 7:15 am | चांदणे संदीप
बघणेत येईल.
शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी.
"सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे
इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे"
असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P
Sandy
8 May 2019 - 7:16 am | चांदणे संदीप
टायपो.
Sandy
8 May 2019 - 9:09 am | टर्मीनेटर
96 बघण्यात येईल!
असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.
8 May 2019 - 12:25 pm | महासंग्राम
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे.
शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.
8 May 2019 - 2:29 pm | मराठी कथालेखक
मॅच्यूअर = परिपक्व
8 May 2019 - 2:29 pm | मराठी कथालेखक
हिंदीमध्ये उपलब्ध आहे का ?
8 May 2019 - 4:04 pm | महासंग्राम
नाही पण इंग्रजी सबटायटल उपलब्ध आहेत
8 May 2019 - 4:43 pm | शिव कन्या
https://drive.google.com/file/d/15_6frqeryTIoKIlMbS97si5FacybsIRb/view
8 May 2019 - 4:44 pm | शिव कन्या
https://drive.google.com/file/d/15_6frqeryTIoKIlMbS97si5FacybsIRb/view
9 May 2019 - 6:37 pm | यशोधरा
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे!
सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee..
शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.
11 May 2019 - 12:04 am | शिव कन्या
केवळ माहिती इथे दिली. बाकी सगळे श्रेय त्या सिनेमा निर्माण करणार्यांचे.
8 May 2019 - 4:48 pm | शिव कन्या
मंदार भालेराव....
मान्य.
शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय.
शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच.
धन्यवाद.
9 May 2019 - 1:18 pm | लई भारी
बघायला हवा!
आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-)
तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!