अरविंद बाळ यांची अंनिसवरील अप्रकाशित प्रतिक्रिया
प्रास्ताविक - आमचे ज्येष्ठ मित्र श्री अरविंद बाळ यांचे दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.आंतरजालावरील उपक्रम या संकेतस्थळाविषयी मी जेव्हा जालाबाहेरील लोकांशी चर्चा करत असतो त्यावेळी त्यांना मराठी संकेतस्थळाविषयी उत्सुकता तर असतेच पण येथील चर्चांविषयी एक आकर्षणही असत. श्री अरविंद बाळ यांचे लेखन हे जालाबाहेरील वर्तुळात असते. गप्पांमधुन ते भरभरुन बोलतात पण लिखाणाबाबत जरा उदासीनच. अरविंद बाळ हे B.E. (Civil) व्यवसायाने सिव्हिल इंजीनिअर . या क्षेत्रातील कंपन्यातून नोकरी व नोकरीनिमित्त भारतभर प्रवास. तीन वर्षे इराकमधे वास्तव्य. निवृत्ती सन 2000 घेतल्यावर पुण्यात कर्वेनगरला स्थायिक.