सहज मिपावर नजर टाकताना लक्षात आले की मिपासदस्य होऊन मला १२ वर्षे झाली...!
त्या काळात माझ्याकडून ३०० धागे सादर केले गेले. हा ३०१वा असेल...
या धाग्यावर प्रियालींनी आल्या आल्या माझा बोल्ड उडवला. म्हणाल्या, मिपाचा दिवाळी अंक २००८चा येण्याच्या आधीच हा लेख प्रकाशित केला आहे? आता पाहता ९८०० टिचक्या त्याला पडल्या. नाडी ग्रंथ विषयाने धमाकेदार एन्ट्री घेतली.
त्यानंतर विविध विषयावर माझे लेखन सादर करायला हा मंच फारच उपकारक झाला. मिपाकरांच्या मेळाव्यात नवे मित्र झाले. मुंबईला जाऊन बोटीतील प्रवासकरून घारापुरीच्या लेण्याची माहितीपुर्ण सफर झाली. हवाईदलातील किस्से, अंधारछाया ही कादंबरी, गड आणि किल्ले या वरील घडलेल्या लढायांना मिपाकरांनी वाचले. मते मतांतरे सादर केली.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्र पोथीवर केलेले लेखन कार्य अजून मिपावर सादर केले नाही. यथावकाश करता येईल.
या काळात २५ पेक्षा जास्त ब्लॉग्जवरून काही लेखनपण सादर केले गेले. त्यातील मंगला ओक यांच्या महाभारतावरील प्रवचनांच्या ब्लॉगवर मिसळपावच्या लोगोला तिथे संपर्कासाठी चिकटवला आहे.
मिपाकरांचा स्नेह असाच राहो. आणि लेखनाला सुयोग्य प्रतिसाद मिळत राहोत.
प्रतिक्रिया
13 Sep 2020 - 3:52 pm | दुर्गविहारी
तीनशे धागा क्लबमध्ये प्रवेश केल्याबददल हार्दिक अभिनंदन ! :-)
14 Sep 2020 - 10:22 pm | शशिकांत ओक
तोळामासा असतो. तरीही ५शे टिचक्या पडल्या हेही नसे थोडके!
धन्यवाद दुर्गविहारी जी...
मिपाचा लोगो ब्लॉगर वर जोडलाय यावर काही प्रतिक्रिया अपेक्षित होती...
13 Sep 2020 - 4:41 pm | चांदणे संदीप
अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
सं - दी - प
13 Sep 2020 - 4:57 pm | चौथा कोनाडा
तपपुर्ती आणि त्रिशतकी धागेपुर्ती साठी हार्दिक अभिनंदन !
13 Sep 2020 - 5:14 pm | सतिश गावडे
तपपुर्ती आणि त्रिशतकी धागेपुर्ती साठी हार्दिक अभिनंदन !
तुम्ही त्या कट्ट्याला याल असे कुणालाच वाटले नव्हते. एक एक करत सारे जमा झाल्यावर तुम्ही अचानक प्रकट झालात आणि सारे आश्चर्यचकित झाले होते.
14 Sep 2020 - 12:28 am | शशिकांत ओक
आधी डांगोरा पिटायचा आणि नंतर काही न काही कारणाने जमले नाही तर मग इतरांनी विरस झाला म्हणण्याऐवजी, असे चकित करणे हे माझ्या स्वभावास जवळचे होते. व्हिटी च्या फलाटावर एकत्र आल्यावर फराळाचे पदार्थ अनुभवायला मिळाले आणि वयातील फरक कमी झाले... त्यात आपण देखील होता हे मला आत्ता माहिती झाले. असो. पुण्यातील लेणी पहायला प्रचेतसनी पुढाकार घेतला. डॉ म्हात्रे यांच्या ओळखीने चौफेर व्यक्तीला भेटल्याचा आनंद झाला होता.