(पार्श्वभूमी: मिपासदस्य अतृप्त आत्मा यांनी नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्यांना ऐकवावी असे वाटले. )
खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली
खुंखार खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता.
खासेपाटील यांचा खानसामा खच्चून खटकी होता. त्याला खासेरावांचा मुलगा खगेंद्र डोळ्यात खटकत होता. खगेंद्र खूप खाऊ खात असल्याने खानसामा खार खाऊन होता. खानसामा खारे दाणे, खिचडी खाद्यपदार्थ बनवून कंटाळत असे. 'खाई त्याला खवखवे' अशी स्थिती असल्याने खा-खा करणारा खादाडखाऊ खगेंद्र खाऊ खाऊन खो-खो खूप खेळत असे. खगेंद्राचा खून करून यंदाच्या खानेसुमारीत खासेपाटलांच्या खानदानीतून एक नाव कमी करण्यासाठी त्याने खडकसिंग खरबंदा या डाकूला पैसे दिले.
"खडकसिंग च्या खडकण्याने खडखडतात खिडक्या", असे खंकाळ (दुष्ट, रागीट, क्रृर, तिरसट), खुजा असलेला खडकसिंग वारंवार खोकलत बोले. खाल्ल्या पैशाला जागत खडकसिंग खबरदारीने खंदकातून बाहेर पडला. खास खेचरावर तो बसला अन खुरडत खुरडत खुशमस्कर्या खेळगडींसह खडकवाडीत आला.
खोडकिडीसारखा खालावलेला खडकसिंग खगोलात खूप तारे असतांना खडकेवाड्यातील खंदक ओलांडून खोलीत खोलवर शिरला तेव्हा खकाणा उडाला. एक खंगलेला दरवाजा खंगारातून (वीट, पक्की वीट) खिटी (अडसर, पाचर) नसल्याने उखडला होता. खट्याळ खुशमस्कर्यांनी खडकसिंगची खुशामत केली. खुशालचेंडू खडकसिंग खुशीत आला. खुन करण्याची खुणगाठ बांधलेला खडकसिंग खळखळून हसला.
खडकेवाडा खंगाळल्यानंतर त्याला खुलासा समजला की खगेंद्र खानदेशात खर्डे खरडतो आहे. या खीळ बसणार्या खात्रीलायक खबरीमुळे खूनाच्या कामाचा खेळखंडोबा झालेला खडकसिंग खुळ्यासारखा खचला आणि खासेपाटील खुदुखुदु हसून खदखदू लागले. खवळलेला खडकसिंग खुळा झाला.
तलवारीने खडाखड खडाजंगी झाल्यानंतर खासेरावांनी आपला खास खुपीया खबरी खंडू खोडके याचा खुबीने वापर करून खडकसिंगाच्या कामात खो दिला. खडकसिंगने खलबत करून खोड काढण्याच्या आत पोलीस खात्यात ख्यातनाम असलेला ख्यातनाम फौजदार ख्वाजा खुर्शीद खान तेथे आला. त्याने खडकसिंग आणि त्याच्या खोगीरभरतीचा खरपूस समाचार घेतला आणि खटल्याचा खलिता खंडन्यायालात रवाना केला.
खुन करण्याचे खूळ करणारा खानसामा खडकेवाड्याच्या शेजारी खाणीच्या खड्ड्यात असलेल्या एक खिडकी, एक खांबी खोलीत खितपत पडला.
खरोखर, खरे खडक खडकवासल्यासारख्या खोल खड्ड्यात खचत नाही व खोट्याची खोड खोड्यात पाडते.
प्रतिक्रिया
10 Nov 2020 - 8:13 pm | टवाळ कार्टा
खत्रा खरडलयं :)
10 Nov 2020 - 8:43 pm | योगी९००
खो खो खो... ख्या ख्या ख्या..... खि खि खि..!!
तलवारीने ऐवजी खडगाने असे टाकले असते तर मिटरमध्ये बसले असते...
10 Nov 2020 - 9:20 pm | अनिंद्य
:-))
10 Nov 2020 - 11:16 pm | अत्रुप्त आत्मा
10 Nov 2020 - 11:21 pm | चित्रगुप्त
खूप पूर्वी लहानपणी एकदा खुसखुशीत खाकरा, खमण, खोबरेपाक खाता खाता खेळताना खच्चदिशी खड्ड्यातला खडा खुपला होता, ते आठवले.
10 Nov 2020 - 11:22 pm | अत्रुप्त आत्मा
खडक-वाडी हे नाव सार्थ करणारा खडखडीत खडकी रस्ता
https://m.facebook.com/video_redirect/?src=https%3A%2F%2Fvideo.fnag1-2.f...
आणि हा थितल्या आम्ही घडवलेल्या पूजेचा फोटू...
10 Nov 2020 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा
ह्यो खास दिसायलाय.. ह्योच लावा हो!
11 Nov 2020 - 3:25 am | निनाद
मस्त जमले आहे.
11 Nov 2020 - 9:44 am | ज्ञानोबाचे पैजार
शब्दसंग्रह अफाट आहे तुमचा
पैजारबुवा,
11 Nov 2020 - 11:44 am | अमरेंद्र बाहुबली
भारी लिहीलंय.
12 Nov 2020 - 12:37 pm | चांदणे संदीप
खूप खिदळलो! =))
सं - दी - प
12 Nov 2020 - 1:38 pm | टर्मीनेटर
खतरनाक खरडलंय खाषाणखेद खाऊ...ओह सॉरी पाषाणभेद भाऊ...
😀