('मी' ची कहाणी )
हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो .