(तुझे पाशवी बोलणे ते अवेळी)
विशाल कुलकर्णींची सुरेख गजल 'तुझे मजवरी भाळणे ते अवेळी वाचली आणि लगोलग वेगळ्याच अवेळा आठवल्या. सादर आहे ... ;)
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी
तुझे चक्रमी हासणे ते अवेळी
जसे नासिकेचे अकाली बरसणे
तुझे काहिही बरळणे ते अवेळी
लपे 'चंद्र' केसांमध्ये तातडीने
तुझे वीग शाकारणे ते अवेळी
नको आप्त, वीकांत हा फक्त माझा
तुझे तात का 'बैसणे' ते अवेळी?
नको स्वर्ग, मी कुंभिपाकीच जातो
तुझे रातचे घोरणे ते अवेळी
मिटे आसही या क्षणी ऐहिकाची
तुझे हालती पाळणे ते अवेळी!!