केस
प्रेरणा
दमामी यांची डोळे
जे हवे ते नेमके का तूटती केस,
अन सुपलीभरुन बाथरूमात जमती केस.
बंद कर चोचले आता तेल मालीशचे,
सांग किती तेल पिनार अजून हे केस.
दिवस वर्षांचे युगांचे जन्म जन्मीचे,
कोणत्या गुणसुत्रास फितुर झाले हे केस.
भेटली होती जिथे कौतुकाची थाप,
का आज त्या आरशास टाळती हे केस.
तू जरा नवा होऊन ये भ्रतारा,
त्याच त्या न्हाव्यास माग क्रुत्रीम केस.
जीवघेणे असे तू हासू नये राजा,
"टकलू हैवान आला" बघ चित्कारती पोरे.