< वाटतं असं …. की >

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
20 Jun 2015 - 12:44 am

अतृप्त यांच्या वाटतं असं… की ह्या सुंदर कवितेचे वाईट विडंबन करीत असल्याबद्दल अतृप्त आणि सर्व थोरा मोठ्यांची क्षमा मागते.

वाटतं असं… की
तुझ्या घोरण्याचे सगळे नमुने रेकॉर्ड करून ठेवावे,
आणि एक दिवस तू झोपल्यावर ते चालू करावे,
नक्की माझी झोपमोड करणारा खर्ज कुठला ते शोधण्यासाठी!

वाटतं असं… की
तुझे मळलेले सगळे मोजे गोळा करून तुलाच धुवायला लावावे,
तू बूट काढल्यावर पसरणारा दुर्गंध,
तुला कळण्यासाठी

वाटतं असं… की
तुझ्या हाताशी एकरूप झालेल्या त्या फोनचा चक्काचूर करावा,
भावना आणि यंत्र यातला फरक,
तुला समजण्यासाठी

वाटतं असं… की
हरेक दुकानी, हरेक मॉली तुझेच पैसे तुझी निवड किती छान म्हणत उधळावेत
उरवावेत थोडेसेच पैसे,
पाकिटाची तुझ्या लाज राखण्यासाठी

( चित्र म्हणून प्रत्येकाने आपापल्या बायको किंवा प्रेयसी किंवा बायको आणि प्रेयसीचा फोटू आठवावा ही इनंती, शी. सा. नमस्कार)

भयानकविडंबन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2015 - 12:48 am | श्रीरंग_जोशी

अफाट जमलय हो विडंबन.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jun 2015 - 12:58 am | अत्रुप्त आत्मा

@ वाटतं असं… की
तुझ्या हाताशी एकरूप झालेल्या त्या फोनचा चक्काचूर करावा,
भावना आणि यंत्र यातला फरक,
तुला समजण्यासाठी>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

अफाट हाणलय हो,निव्वळ अफाट! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

आणि फ़ोटो बद्दलच्या कोमेंट ला तर १०० पैकी २०० मार्क आहेत.
सं'रस विडंबन! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif सल्लाम तुम्हाला आपल्याकडून!

रातराणी's picture

20 Jun 2015 - 1:15 am | रातराणी

ठांकू वेरी वेरी म्च!

फारच भारी! मला तर विडंबन नसून अनेकांच्या (अनेक जणींच्या) भावना मांडल्या आहेत असंच वाटत आहे ;)

रातराणी's picture

20 Jun 2015 - 3:16 am | रातराणी

ही ही :) धन्यवाद! अजून बरीच आग आहे, ह्या कवितेत भरपूर भर घालता येईल पण हात आवरला :D

हो ना.. मीही विचार करत होते आणखी कायकाय भर घालता येईल याचा, पण "फोनचा चक्काचूर" नंतर बरीच आग शमली ;)

रातराणी's picture

20 Jun 2015 - 4:50 am | रातराणी

टी.वी पण आहे ग त्या फोडायाच्या लिस्ट मधे :)

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2015 - 7:55 am | श्रीरंग_जोशी

टिव्ही फोडायचा का बरे? विकून टाकावा किंवा दान करावा.

या माणसाने तर सुवर्णमध्य काढलाय ;-) .

बॅटमॅन's picture

22 Jun 2015 - 5:58 pm | बॅटमॅन

इंडीड =))

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jun 2015 - 4:11 am | अत्रुप्त आत्मा

@ अजून बरीच आग आहे, ह्या कवितेत भरपूर भर घालता येईल पण हात आवरला :D >> :-D कित्ती कित्ती तो दू दू हिंसकपणा! :P ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ :P

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Jun 2015 - 7:44 am | श्रीकृष्ण सामंत

कविता आवडली

एक एकटा एकटाच's picture

20 Jun 2015 - 8:23 am | एक एकटा एकटाच

एक नंबर.........

मुळ कवितेप्रमाणे
विडंबनही..........जबराट

पैसा's picture

20 Jun 2015 - 9:09 am | पैसा

विडंबन अवडले. पण विडंबन करायची परवांगी द मामि यानी मागितली आणि विडंबन रातराणीने केले. आयडी चुकून दुसरा वापरलात काय?

रातराणी's picture

20 Jun 2015 - 10:25 am | रातराणी

नाही हो! आगाउपणा दुसर काय :) दमामी मी न्हवेच!

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2015 - 11:58 am | टवाळ कार्टा

खिक्क

रातराणी's picture

21 Jun 2015 - 1:07 pm | रातराणी

औं अस्स नाही हसाच! उद्या मला पण तुमचा दु दु आय डी म्हणतील.
काय करणार मग?

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2015 - 1:18 pm | टवाळ कार्टा

ल्ल्ल्लूऊल्ल्ल्लूऊ

इतके सुंदर विडंबन केले आहे की मी जिलबी पाडायचे रद्द केले आहे.

रातराणी's picture

23 Jun 2015 - 12:01 am | रातराणी

__/\__ आभारी आहे!

एस's picture

20 Jun 2015 - 9:22 am | एस

वाटतं असं की...
तुझे ठेवणीतले सग्गळे टोमणे गुपचूप ध्वनिमुद्रित करावेत,
आणि एक दिवस तू छान मूडमध्ये असताना तुलाच ऐकवावेत,
नक्की माझा मूड घालवणारा खास टोमणा कुठला ते शोधण्यासाठी!!!

वैधानिक इशारा: मुळात तुम्हाला ती छान मूडमधे आहे असे वाटत असेल पण ते खरच असेल याची शाश्वती नाही. त्यामुळे टोमणे ऐकवाय्च्या आधी खास मित्राला कल्पना देऊन ठेवावी.कधी कशासाठी गरज पडेल सांगता येत नाही.

एस's picture

20 Jun 2015 - 9:33 am | एस

वाटतं असं की
कपाटातल्या माझ्या कप्प्यात तू अतिक्रमण करून टांगलेल्या सर्व साड्या खाली फेकाव्यात,
आणि तुलाच त्या गाठोड्यात बांधायला लावाव्यात.
तुझ्या साड्यांची संख्या तुलाच कळण्यासाठी.

पैसा's picture

20 Jun 2015 - 9:37 am | पैसा

=)) माझा नव्रा मला गद्यात सांगतो. की तू मेल्यावर लाकडांची गरज नाही. साड्याच पुरेत! =))

अमितसांगली's picture

20 Jun 2015 - 10:08 am | अमितसांगली

....

रातराणी's picture

21 Jun 2015 - 1:58 pm | रातराणी

ताई दाजीना सांग
खबरदार् जर साड्यांविषयी माझ्या मनात आनाल असले काही,
सकाळी दुधी रात्री कारली वाढीनं ताटात जोवर आहे प्राण कुडीत.

एस's picture

20 Jun 2015 - 9:37 am | एस

वाटतं असं की...
तुझ्या त्या टीव्हीवर एक दिवस एक बॅटच घालावी,
बिनडोक मालिका आणि खरंखुरं आयुष्य यातला फरक
तुला दाखवून देण्यासाठी.

एक एकटा एकटाच's picture

20 Jun 2015 - 10:34 am | एक एकटा एकटाच

हे जबरी जमलय.....

नाखु's picture

20 Jun 2015 - 9:43 am | नाखु

वाटतं असं की...

तू पाडलेल्या कविता जिल्ब्या फ्रेम करून ठेवाव्यात
आणी लावाव्यात तुझ्या घरी-दारी हाफिसात नेहमी नजरेसमोर..
तुलाही कळू दे वाचकांना नक्की कशाचा आणि कसा डोक्याला शॉट लागतो ते.

एस's picture

20 Jun 2015 - 9:49 am | एस

वाटतं असं की...
तुला तुळशीबागेत नेण्याची लालूच दाखवावी
आणि तिथून काहीच्च न घेता तुला बाहेर आणावी
शेवटी एक लेडिज रुमाल घेऊन द्यावा
तुझ्या डोळ्यांतल्या पाणीदार अंगाराला अजून फुलवण्यासाठी!!!

पैसा's picture

20 Jun 2015 - 9:50 am | पैसा

दु..दु.. पुणेरी स्चॅप्स!

रातराणी's picture

21 Jun 2015 - 1:24 pm | रातराणी

रुमालपण तुळशीबागेतून? सो मिड्लक्लास यू नो! कधी सुधारनार ही मुलं!

एस's picture

21 Jun 2015 - 3:12 pm | एस

अहो रोसेशच्या आई, आधी स्वतःचे शुद्धलेखन सुधारा. त्यानंतर रोसेशच्या बापाला सुधारा. मग आम्हां 'मुलां'चं पहा हं.

रातराणी's picture

21 Jun 2015 - 7:53 pm | रातराणी

काकू?काकू? मॅम म्हणत जा हो. काकू इज सो मिडलक्लास यू नो! इट्स ओके! पुढच्या वेळेस लक्षात ठेवा हं :) रोसेशचे डॅडी बिघडलेत हा तुमचा गैरसमज आहे. शुद्धलेखनाबद्दल मात्र आय टोटली अग्री बर का. काये ना रोसेश नवीन नाटक लिहतोय ना, पण त्याचा लॅपटॉप चोरीला गेला! इन्दुचच काम असणार ते! म्हणून त्याने माझा मॅक बॉरो केलाय. ते मोबाइल वरून लिहणे किती अवघड आहे! सो . . . . . . . ! तरी बर माझा s6 आहे! मोनिशा सांगत होती तिच्या मोटोरोला वर तर 2gच कनेक्षन आहे! मी घेऊन देत होते s6 तर म्हणाली बिल खूप येईल !सो..... !

वोक्के, द-रारामामि! :-D

सतिश गावडे's picture

20 Jun 2015 - 9:58 am | सतिश गावडे

वाटतं असं... की
हातापाशी एक टमरेल भरुन ठेवावं..
आणि निसर्गाच्या हाकेची वाट पहात बसावी..
आली की लगेच ओ देऊन, आत शिरण्यासाठी!

वाटतं असं... की
अंधारभरल्या कूपात एक पिवळट दिवा लावून तुझ्यासवे एकरूप व्हावं..
हळूच टुरटुर करत
शांतता भंगण्यासाठी!

अजया's picture

20 Jun 2015 - 10:12 am | अजया

वाटतं असं की
सा-या शौच कवितांवर एकदाच पाणी ओतावं
आणि वाट बघत नसावं
तांब्या परत येण्याची!

सतिश गावडे's picture

20 Jun 2015 - 10:15 am | सतिश गावडे

=))

तिमा's picture

20 Jun 2015 - 5:52 pm | तिमा

वाटतं असं ...की
सर्व शौचकवींना पुढनंच खो द्यावा
आणि तांब्या ओतून द्यावा
म्हणजे, जातील तसेच बरबटलेले
लोकांच्या नजरा चुकवत !

रातराणी's picture

20 Jun 2015 - 10:19 am | रातराणी

पे ट ले त स ग ळे च !

नाखु's picture

20 Jun 2015 - 10:20 am | नाखु

आणि वाट बघत बसावं
तांब्या (पाण्यासकट) फेकुन मारण्याची!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jun 2015 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा

बेफाम राडा चालु आहे! :-D
रातच्याला उतरतो अता मैदानात! ;-)

रातराणी's picture

21 Jun 2015 - 12:51 pm | रातराणी

गुरुजी बहुतेक मैदान साफ व्हायची वाट बघत आहेत. :)

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2015 - 10:46 pm | टवाळ कार्टा

या धाग्यावर बुवाबाजी कधी सुरु होणार आहे?

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2015 - 11:58 am | टवाळ कार्टा

अग्गागा...कै ते ईडंबन आणि कै त्या प्रतिक्रीया....सुटलेत सग्गळ्ळे

वेल्लाभट's picture

21 Jun 2015 - 11:36 pm | वेल्लाभट

पहिलं कडवं हास्यरस
दुसरं कडवं करूणरस
तिसरं कडवं गंभीररस
चौथं कडवं चैनरस

चपराक्क्क विडंबन !

हाण्ण्ण तेजायला, सगळेच सुटलेत तेजामारी =)) =)) =))

एक नंबर धागा =))

चुकलामाकला's picture

22 Jun 2015 - 6:19 pm | चुकलामाकला

भारी!

रातराणी's picture

23 Jun 2015 - 12:07 am | रातराणी

सर्वांचे आभार! पहिल्याच विडंबन प्रयत्नास इतके भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि नव विडंबनकारांची हौसला अफझाई केल्याबद्दल मंडळ शतश: आभारी आहे :)