खोपडी सटकली
असाच एकदा कधीतरी प्रवासात होतो. गाडीत. मी चालकाच्या भूमिकेत नव्हतो. त्यामुळे अर्थातच अर्धं लक्ष चालकाकडे, रस्त्याकडे, चालवण्याकडे होतं. अचानक भयानक ट्रॅफिक लागला. थोडा वेळ गप्प बसण्याची औपचारिकता झाल्यावर चालकाने ठणाणा सुरू केला. मग हळू हळू ट्रॅफिकमधून बाहेर आलोही. पण ती धुसफूस आता ड्रायव्हिंगमधून बाहेर पडत होती. तेंव्हा सुचलेलं विडंबन. अगदी त्याच्या ड्रायव्हिंग इतकंच सेन्सलेस.
जेंव्हा ट्रॅफिक जॅमात, माझी गाडी अटकली
खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली
चाल अर्थातच नवरी नटली ची.