माझेच जगणे खरे.....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
4 Jan 2015 - 9:48 pm

पूर्वप्रकाशित...
नमस्कार मंडळी

आमचे आंतरजालीय मित्र कविवर्य श्री श्री श्री अमेय पंडित यांची शार्दूलविक्रीडित या वृत्तातली "परदु:ख" ही अप्रतिम कविता वाचली आणि आमच्या सुप्त प्रतिभेसही धुमारे फुटले (ही उच्च भाषा वाचुन कुणी अंतर्बाह्य ’फुटले’ असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही). वृत्त जपण्याचा, निभावण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केलेला आहे. काही चुकले असेल तर असो, त्याने काय फ़रक पडतो?

ज्यांना ही कविता (विडंबन) कळणार नाही, त्यांनी सरळ घरी जाऊन कार्टून नेटवर्क किंवा गेला बाजार ’झी मराठी’च्या मालिका बघाव्यात.

हुकूमावरून

(गेल्या धा वर्षापासून नवाच असलेला) नव-ईडंबनकार ईरसाल म्हमईकर

अमेयदांची मुळ कविता इथे आहे ...
https://www.facebook.com/amey.pandit.12/posts/10200756409655806

विडंबन :

गुत्त्याच्या पुढती उभे अजुनही आशाळभुत वीर ते
भाषा कृद्ध, तिची अनेक शकले, वाणीतुनी सांडते

वारूणीत तनू समस्त भिजली वैकुंठ झाले खुजे
जोशाने उठती अता, कचरले भार्येस ना शूर ते

दारूडा उठतो पहाट सरता.., साकी त्या हाकारते
अजुनही उरली, कशी न सरली? आश्चर्य त्या वाटते

ओकारी मग त्यां भरात करतो, शोधी नवे सोबती
शुद्धीच्या मिटल्या खुणा मग सुरा देहात साकारते

दारूड्यास असा तयार बघुनी इतरांसही ज्वर चढे
माझ्याहून इथे असे कुणितरी ज्याचे पिणे ना सरे

"मदिरेवीण उदास जिवन जसे भकास होउन झिजे"
दारूडा हसतो जनांस म्हणतो "माझेच जगणे खरे"

आहे मद्य जरी कटू, वचन हे साक्षात घ्या जाणुनी
क्लेशांचा अपुल्या पडे विसरही प्याला 'मधू' पाहुनी

वृत्त : शार्दूल विक्रीडित

ईरसाल म्हमईकर

हझलहास्यविडंबन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2015 - 10:51 pm | अत्रुप्त आत्मा

तोडीस तोड!

नगरीनिरंजन's picture

4 Jan 2015 - 10:51 pm | नगरीनिरंजन

ह्म्म्म, दारुडे व दारुच्या व्यसनाव्यतिरिक्त अजूनही काही गर्भितार्थ असेल (म्हणजे ओकारी, नशा वगैरे कशाची प्रतीके असतील) तर कळला नाही ब्वॉ. फार दिवसांनी कार्टून नेटवर्क बघणार मी आज. :-)

विशाल कुलकर्णी's picture

5 Jan 2015 - 12:29 pm | विशाल कुलकर्णी

नशा : २४ तास मिपावर पडिक असणे
ओकारी : कुठल्याही धाग्यावर विषयबाह्य प्रतिसाद देत राहणे ;)

तुम्ही यापासून दूर असल्यामुळे तुम्ही कार्टून नेटवर्क पाहण्यास पात्र नाही असे जाहीर करण्यात येत आहे.

हुकूमावरून ;)

पैसा's picture

5 Jan 2015 - 1:36 pm | पैसा

दारुडा आणि शार्दूलविक्रीडित!! =))