असाच एकदा कधीतरी प्रवासात होतो. गाडीत. मी चालकाच्या भूमिकेत नव्हतो. त्यामुळे अर्थातच अर्धं लक्ष चालकाकडे, रस्त्याकडे, चालवण्याकडे होतं. अचानक भयानक ट्रॅफिक लागला. थोडा वेळ गप्प बसण्याची औपचारिकता झाल्यावर चालकाने ठणाणा सुरू केला. मग हळू हळू ट्रॅफिकमधून बाहेर आलोही. पण ती धुसफूस आता ड्रायव्हिंगमधून बाहेर पडत होती. तेंव्हा सुचलेलं विडंबन. अगदी त्याच्या ड्रायव्हिंग इतकंच सेन्सलेस.
जेंव्हा ट्रॅफिक जॅमात, माझी गाडी अटकली
खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली
चाल अर्थातच नवरी नटली ची.
पुढे बाजूला मागं गाड्या, गाडी हलेना जागची
जरी दिसतोय ट्रॅफिक पुढं, हॉर्न मारते मागची
रागारागात बघूनी मग मी दंताळी विचकली
खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली
संधी साधून काढलं नाक, घुसलो बाजूच्या लेनीत
हळू हळू निघालो पुढे, कट मारीत मारीत
एक सिग्नल लागला अन माझी गाडी लटकली
खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली
मग कहर झाला भारी, मीही निघालो रामसुम
रस्ता दिसला एक मोकळा, होती अजब सामसुम
नो एन्ट्रीत मामाने माझी गाडी हटकली
खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली
जेंव्हा ट्रॅफिक जॅमात, माझी गाडी अटकली
खोपडी सटकली, काल बाई खोपडी सटकली
प्रतिक्रिया
24 Feb 2015 - 3:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=)) जमलीये मस्तं =))
24 Feb 2015 - 4:25 pm | सूड
ओके
24 Feb 2015 - 4:29 pm | वेल्लाभट
मेन्शन नॉट
24 Feb 2015 - 5:10 pm | आदूबाळ
"कंबर लचकली"च्या चालीतही बसतीये!
24 Feb 2015 - 5:15 pm | सूड
बसणारच्!! वेल्लाकाकांचं काव्य म्हणजे काय वाटलं काय तुम्हाला!!
24 Feb 2015 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
24 Feb 2015 - 7:04 pm | खटासि खट
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
25 Feb 2015 - 11:36 am | नाखु
भटकून "पुसण्या"च्या अनुभवानंतर
सटकून "घुसण्याच " अण्भव मिपाकरांना दिला.
25 Feb 2015 - 4:38 pm | मदनबाण
छान !
हल्ली माझी पणं लयं सटकते, पण रस्त्याच्या कंत्राटदाराला मनातल्या मनात भयानक शाप देउन सटकलेली खोपडी शांत करण्याचा प्रयत्न करत असतो !
शापवाणी इथे टंकणार होतो... पण जाउ दे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months