प्रेरणा
जेपी म्हणे' गा मिपादेशी | या लिखाणाची ऐशीतेशी,
बेहतर आहे एका लेखाशी| पण लिहीणार नाही.
खड्यात जावो ही लिखाई| आपल्याच्याने होणार नाही.
समोर सारे हुशार बेणे|विजींनीयर डागटर ऐणे,
काखे वही,हाती पेन| डायरी माझ्या लिहीण.
पण हा कुठला कंपुपणा| आपसात चर्चा कुदवती.
या लोकांना नाही उद्योग |गायब झाले सगळे लोग.
लेंकानो लिहाना रोज |वाचुन तेच तेच बोर झालो.
लिखाई का असते सोपी| रोज कळफळक बडवती ,
कित्येक लेकाचे आयटी | मेगाबायटी प्रतिसाद देती,
मिपा म्हणे 'जेपुना | हा कुठला बे पळपुटेपणा ?
पहिल्याने तर टणाटणा | उडत होता लिहाया,
मारे धाग्यावर बैसला | प्रतिसाद काय दिला,
परि तुझ्या लेखाला सोडणार नाही कच्चमजी,
वाजवतो संघटनेची टिमकी| आहे म्हणतो ती खमकी,
आहारे भित्रा भाई | म्हणे मी लिहीणार नाही,
किबोर्ड सोडा रडुबाई | आणी बसा खफ खेळत,
कशाला जमविले कंपुबाज ? नसता बिचारे दिला ताप ,
धाग्यावर प्रतिसाद देत | निपचीत सारे पडले असे,
नव्हते पाहिले मेनबोर्डा | उगाच करी टणाटणा,
म्हणे यंव लिहीन त्यँव लिहीन| आहे का विकली नेट पॅक ?,
लेका वाचनमात्र रहावयाचे वेड| डोक्यात कुठुन शिरले ?,
जेपी म्हणे 'गा मिपाकरा| तुमची कटकट पुरे करा,
दहादा लिवले तरी| हट्ट तुमचाच खरा,
आपण काही लिहीत नाही| नेटबिल शिरी कोण घेई,
वाचनमात्र म्हणा की प्रतिसादक| आपुन आता लिहीणार नाही,
ऐसे बोलुन जेपुन | दुर कळफलक फेकुन,
नेट पॅक बंद करुन| मटकन खाली बैसला .
(इति चालचलाऊ मिपा प्रथमोध्याय समाप्त)
*क्रमश....
प्रतिक्रिया
12 Feb 2015 - 10:49 am | सविता००१
मस्तच
12 Feb 2015 - 10:49 am | नाखु
मस्तच रे! *good* *ROFL*
हा टक्या कुठेय दिसेना तो, जरा बघ हा एकलव्य (अंगठा न दाखवणारा आणि न मागणारा सुद्धा!) *wink*
पुभाप्र
12 Feb 2015 - 12:12 pm | टवाळ कार्टा
मी हाय हितंच
बाकी जेपीची प्रतिभा माझ्यापेक्षा लय म्हणजे लयच भारी आहे हे मला कधीपासून माहीती आहे :)
12 Feb 2015 - 11:15 am | ज्ञानोबाचे पैजार
दिसामाजी काही लिहावे, खफ, बोर्डावरी टाकावे
आणि मग तटस्थ पणे वाचावे, येकयेक प्रतिसाद
प्रतिसाद मिळाले नाही जरी, मनी जराही अढी न धरी,
उगाच "धन्यवाद" न देत राही , वाढवण्या प्रतिसाद लेखाचे,
जेव्हा कृष्ण गीता सांगता झाला , ठाउक होते का त्याचे त्याला,
इतुके वेड लावेल जगाला, एक एक श्लोक गीतेचा,
गाथा तुकोबाने गाईली, लोके ईंद्रायणीत बुडवीली,
त्याने का मग खुन्नस धरली, जगा वरती सगळ्या?
कोणास आवडे हिवाळा, कोणी म्हणे पावसाळा,
तर कोणा प्रिय उन्हाच्या झळा, तसेच असते विचारांचे
कोणी असतो आध्यात्मिक, तर कोणी संसारी सात्विक,
कोणी टवाळकीचे पुजक, समविचारी नसे प्रत्येक,
म्हणौनी आपण लिहीतच रहावे, सत्य जगापुढे मांडावे,
मग समविचारी शोधावे, प्रतिक्रीयांच्या मधौनी,
अशांना मग व्यनि करावा, फेसबुकावर अॅड करावा,
मग त्यांच्या कडुन जाणावा, दर्जा अपुल्या लेखनाचा,
फार झाले उपदेशांचे डोसु, मनी पडला असेल प्रकाशु,
घेउ नये लेखन संन्यासु, एवढेची सांगतो आता,
पैजारबुवा,
12 Feb 2015 - 12:24 pm | अत्रुप्त आत्मा
@जेपी म्हणे 'गा मिपाकरा| तुमची कटकट पुरे करा,
दहादा लिवले तरी| हट्ट तुमचाच खरा,>>> =)))))
लै जबरी हो जेपि =))
12 Feb 2015 - 12:26 pm | पैसा
=)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL:
12 Feb 2015 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
सन्यासाचीही इतकी आसक्ती ???!!! +D
12 Feb 2015 - 12:42 pm | आदूबाळ
:D
12 Feb 2015 - 1:21 pm | पगला गजोधर
मिपाकर जेणें व्हावें । खलांचे बोलणे सहावें ।
तरीच अंगी थोरपण यावे । जया नाही कंपूबाज ।
रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वधाग्याशी ।
ऐशी समदृष्टी कराजी । ताटी उघडा जेपीजी ॥
काकु काश्मीरी झाले कोणी । तेव्हा आपणा व्हावें पाणी ।
जाणोन सर्वांची ऐक जननी । धन्य ती मिपा माउली ।
शब्द शस्त्रें झालें क्लेश । अंतरी मानावा तो उपदेश ।
इतकें जाणोन शांती धराजी | ताटी उघडा जेपीजी ।
मिपागृह जो प्रवेश केला | उंच नीच काय त्याला ।
खटासखट व ज्याचेत्याला | संमं इच्छे धरून बोला ।
नटनाटयचा हा मोठा मेळा | स्थिर नाही तो एकवेळा ।
निवृत्तीच्या कल्पना टाकाजी । ताटी उघडा जेपीजी ।
12 Feb 2015 - 1:56 pm | नाखु
"ताटी" ऐवजी "तोटी" टाकून बघा !!!
13 Feb 2015 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा
@"तोटी" टाकून बघा !!! >> =))))))
12 Feb 2015 - 3:08 pm | कंजूस
सर्व प्रतिभावंतांना दंडवत. थोडीशी पाठवून द्या इकडं नरेंद्र, देवेंद्र, अरविंद.
13 Feb 2015 - 11:13 am | मूकवाचक
+१
14 Feb 2015 - 8:49 am | श्रीरंग_जोशी
ब्रह्मदेव काव्यप्रतिभा वाटत असताना मी नक्कीच फुले वेचायला गेलो असणार.
जेपी - __/\__.
12 Feb 2015 - 3:49 pm | अजया
सर्वांना दंडवत!
12 Feb 2015 - 4:17 pm | बबन ताम्बे
ज्ञानोबाचे पैजार ,
उगाच "धन्यवाद" न देत राही , वाढवण्या प्रतिसाद लेखाचे
हे बाकी खरे. मी पण तेच करतो :-)
12 Feb 2015 - 4:36 pm | सविता००१
________/\________
सर्वांना दंडवत
12 Feb 2015 - 5:52 pm | आतिवास
कोण कृष्ण? कोण अर्जुन? कोण संजय? ;-)
12 Feb 2015 - 6:48 pm | आदूबाळ
:))
13 Feb 2015 - 12:10 am | अत्रुप्त आत्मा
@कोण संजय? >>> =))))) वारलो रे वारलो!
12 Feb 2015 - 6:31 pm | प्रचेतस
जबराट रे जेप्या.
13 Feb 2015 - 2:28 am | खटपट्या
आज पासून जेपीपण गुरुस्थानी !!
13 Feb 2015 - 11:16 am | बॅटमॅन
अगदी अगदी!
13 Feb 2015 - 5:12 pm | चुकलामाकला
लय भारी!सर्वांचेच आवडले!
14 Feb 2015 - 6:30 am | मुक्त विहारि
छान जमलंय,,,
क्रमशः वाचुन बरे वाटले.
14 Feb 2015 - 7:55 am | मदनबाण
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझसे मुहब्बत का इजहार... ;) { Hum Hain Rahi Pyar Ke }
14 Feb 2015 - 9:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
खपलो.....!!! कच्चमजी हा नवा शब्द म्हराठी भाषेस बहाल केल्याबद्दल अखिल मिपा मापंकाढे मंडळ ह्यांजकडुन जे.पी. ह्यांचा एक प्रतिसाद, दोन नारळ आणि शालजोडी(तले) देउन सत्कार करण्यात येत आहे.... =))
30 Mar 2016 - 3:27 pm | नाखु
झालं पुढचा भाग कुठे आहे ?
30 Mar 2016 - 3:46 pm | नीलमोहर
हे तर पाहिलंच नव्हतं..
भारी लिहीता की जेपी, येऊ द्या पुढचे भाग लौकर..
31 Mar 2016 - 5:10 pm | मन्याटण्या
आवडल!