<<<<<पंगत-नवमिपाकरांची-भाग ३(अंतीम)>>>>>>
http://www.misalpav.com/node/29468 भाग दोन...http://www.misalpav.com/node/29344...भाग एक
http://www.misalpav.com/node/29468 भाग दोन...http://www.misalpav.com/node/29344...भाग एक
(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून)
खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार
इवलसं दुःख पिउन टाक
बघ माझी आठवण येते का?
रिक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे,
पदर सांभाळ, हात दाखव
इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर ये
तिथे गर्दी उसळलेली असेलच, फलाटावर पाय रोवून उभी रहा
सारी गर्दी सरकेल एकाच डब्यात, बघ माझी आठवण येते का?
हसी तो फसी या हिंदी सिनेमातलं 'ज़हनसीब' हे अत्यंत आवडतं गाणं ऐकत असताना सुचत गेलेल्या ओळी. विडंबन नाही, पण ज़हनसीब च्या चालीवर बसणारी ही कविता.
कधी कधी
कधी कधी
मी गातो एकट्याने
कधी कधी
अजूनही
अजूनही
आठवते एक गाणे
कधी कधी धृ
कधी काळी त्या ओळी माझ्या मला वाटल्या
मनाच्या गोष्टीही त्या शब्दांमध्ये दाटल्या
धूळीच्या राशी त्या दिवसांवर आता साठल्या
तरी पुन्हा
तरी पुन्हा
उलगडतो तीच पाने
कधी कधी १
मागील भाग
व्यनी वाचुन मी बसल्या जागी उड्या मारायला चालु केल्या. हुर्रे !! मला संपादक मंडळावर तर
घेत नाहीत , निदान पंगतीच्या आयोजन मंडळावर तर घेत आहेत. संधि का सोडा ?
लगे हात मुविंना होकार कळवला आणी संध्याकाळची वाट पाहु लागलो.
=============================================================================
हे व्हिसी ( व्हिडीओ कॉन्फरन्स) करण म्हणजे आवघड काम होत. कारण ते आमच्या मोबल्यावर होणार नाही.
त्यासाठी एखादा चांगला सायबर कॅफे गाठणे भाग होत.मग लक्षात आल अरे आपला मित्र शेखरच सायबर कॅफे
पडुन आहे सार्त्र अजुनी
पाठ शिवा हो पाठ शिवा
वार्धक्यातही वाघ रडवला
डाव टाकूनि नवा नवा
बन कमळांचे मुदित* सापळे
लपायास मज असे मोकळे
सत्तांधाला काय का कधी
शिवाशिवीचा खेळ नवा?
टिकटिकविरहित जरी तव पाऊल
अचूक मला पण लागे चाहूल
कित्येकांची चळते बुद्धी
तुझ्या ऐकता पायरवा
उमटू न देईन साद पाऊली
सर्रकन जाईन जशी सावली
सामावून मज घेईल अलगद
हा कमळांचा उभा थवा
मालकी घेशील परी कशाची
तुझ्या पदांची तुझ्या यशाची
पाठलाग मग कुठे संभवे
महाराष्ट्र जर तुला हवा !! ;)
*मोद-मोदी-मुदित
१. विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ? विधानसभेचे जागावाटप म्हणजे गणेशोत्सवातली खिरापत वाटण्यासारखं असतं का ?
२. विधानसभेसाठी युती तोडायची आणि केंद्रात व राज्यातल्या एक महापालिकेत ती कायम ठेवायची असा पवित्रा म्हणजे गल्लीत गोंधळ अनं दिल्लीत मुजरा नव्हे काय ?
३. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ?
४. समोरच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणजे आपला पक्ष जिंकला असं संविधानात कुठे लिहिलंय ?
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना )
अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना
उघडे तसेच फेस्बुक
लॉगौट.. मन धजेना ..
मी फेस्बुकासमोरी
फेस्बुक-अॅडिक्ट आहे ..
मी हेच सांगताना
रुसुनी कधी बसावे
मी का इथून उठावे
समजूत का पटेना
धरसी अजब अबोला
तुज मौन सोडवेना ..
का पोस्ट मी लिहावी
चर्चाहि होत आहे
मेजवानी वाचका त्या
जाणून उत्सुकाहे
काही अटीतटीने
कुढता अढी सुटेना
कॉमेंट ये स्टेटसला
ऐसी स्थिती इथे ना ..
ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी,
कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’.
कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली,
स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली .
पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले,
निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले
कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे
राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे
खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला
‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला.
कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून.....
(मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे)
------------------------------------------------------
दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले
हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले
शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली
मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली
जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले
कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले