१. विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ? विधानसभेचे जागावाटप म्हणजे गणेशोत्सवातली खिरापत वाटण्यासारखं असतं का ?
२. विधानसभेसाठी युती तोडायची आणि केंद्रात व राज्यातल्या एक महापालिकेत ती कायम ठेवायची असा पवित्रा म्हणजे गल्लीत गोंधळ अनं दिल्लीत मुजरा नव्हे काय ?
३. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ?
४. समोरच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणजे आपला पक्ष जिंकला असं संविधानात कुठे लिहिलंय ?
५. केंद्रात बहुमतांनी सत्तेत असलेल्या सरकारनी आपल्यासमोर झुकावं ही अपेक्षा म्हणजे सूर्यानेच आता पृथ्वीभोवती फिरावं या अपेक्षेपेक्षा काय वेगळी आहे?
६. केंद्रातलं वाढीव मंत्रीपद जर आपल्याला नको होतं तर मंत्रीपदाच्या उमेदवाराला दिल्लीला तिथलं तापमान मोजायला पाठवलं होतं का ? आणी हे तापमान आपल्याला झेपणार नाही हे कळल्यावर वापस बोलावलं का ?
७. आपल्या शब्दकोशात सन्मान म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आणि लाचारी म्हणजे केंद्रीय मंत्रीपद असं लिहिलंय का ?
८. आधी भावकीत भांडणं करायची. नंतर सख्ख्या शेजाऱ्यांशी भांडायचं ! भविष्यात पुण्याला किंवा कोकणात स्थायिक होण्याचा आपला विचार आहे का ?
९. "भिजत घोंगडं " नावाच्या मराठी सिनेमाची निर्मीती करायला आपल्याला आवडेल का ?
१०. "अस्मिता " हा शब्द आपल्या पक्षातला कोणताही नेता न चुकता एकदातरी लिहू शकेल का ?
--चिनार
प्रतिक्रिया
10 Nov 2014 - 6:12 pm | hitesh
:)
10 Nov 2014 - 6:21 pm | प्राध्यापक
आधी भावकीत भांडणं करायची. नंतर सख्ख्या शेजाऱ्यांशी भांडायचं ! भविष्यात पुण्याला किंवा कोकणात स्थायिक होण्याचा आपला विचार आहे का ?
पुण्याचा संबंध इथे जोडण्याचे काय कारण?
10 Nov 2014 - 6:23 pm | स्पा
अता २०० फिक्स
11 Nov 2014 - 10:07 am | चौकटराजा
दोनशे कशाला ?तुम्ही त्यात क डोंं म पा घुसवा चारशे होतील. बाकी नाथाभाउ खडसे ना एक टोपी फुकटात मिळाली. सरकार पडले तर हाती काय लागले असा प्रश्न पडावयास नको !
13 Nov 2014 - 12:27 pm | पिवळा डांबिस
क डों म पा चा संबंध इथे लावायचे काय कारण?
आपला,
हरचंद पाटील
10 Nov 2014 - 6:32 pm | क्लिंटन
अहो महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा घेतला होता, अठराव्या वर्षी फत्तेखानाचा पराभव केला होता आणि शहाजहानला पत्र लिहून कैदेत पडलेल्या शहाजीराजांची सुटका मोठ्या युक्तीने करून घेतली होती हे विसरलात वाटते? पराक्रमाला आणि तेजाला वयाचे बंधन नसते. आणि मुळात शिवसेनेतला आणि त्यातून मातोश्रीवर जन्माला आलेला म्हणजे डायरेक्ट शिवरायांचाच अवतार तो हे तुम्ही कसे विसरलात?
(हा उपहास आहे हे वेगळे सांगायलाच नको :) )
10 Nov 2014 - 6:35 pm | hitesh
या ठाकरेंवर दोन दिवसात तीन नवीव धागे निघाले.
10 Nov 2014 - 6:37 pm | कपिलमुनी
त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा आला आहे
10 Nov 2014 - 7:21 pm | जेपी
मला पण कटाळा आला.
10 Nov 2014 - 7:21 pm | दुश्यन्त
राज्यात मोठा पक्ष भाजप. सरकार बनलेय भाजपचे (तरणार पवारांच्या मर्जीने) मात्र गेले महिनाभर मीडिया आणि चर्चेचा फोकस उद्धव आणि शिवसेनेवरच आहे.
10 Nov 2014 - 7:27 pm | प्रदीप
आमच्या अगदी रटाळ आयुष्यात गंमत निर्माण करणार्या जोकरने आमचे सर्व लक्ष वेधून घेतली आहे, हे अगदी खरे!
10 Nov 2014 - 7:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मस्तच रे चिनार्या.राज्याचे राजकारण जरा इण्टरेस्टिंग का काय म्हणतात तसे होतेय असे हेही म्हणतात. गेले २५ वर्षे महाराष्ट्राचे राजकारण अगदी रटाळ असे होते.अन्य भारतात अनेक पक्ष आलटून पालटून सत्तेवर आले,समीकरणे बदलली पण मराठी मतदार ढिम्म्.काँग्रेस एके काँग्रेस.यावेळी मात्र अगदी असे काही मतदान केले की उलथापालथच करून टाकली.कोणी जातोय मुंबईहून नागपूरला तर कुणी नागपूरहून दिल्लीला तर कुणी विमानतळावरूनच परत....
10 Nov 2014 - 8:00 pm | आनन्दा
बाकी माईसाहेबांचा सूर बदललेला पाहून अंमळ मौज वाटली
10 Nov 2014 - 11:54 pm | बोका-ए-आझम
माईसाहेबांनी एकसमयाच्छेदेकरून समस्त मतदारांचा परामर्श घेतलेला पाहून आमोद सुनास जाहल्याची भावना होऊन राहिली आहे!;)
11 Nov 2014 - 9:02 am | अजया
=))
माई,मी तुझी पंखी आहे!अनाहितामध्ये येतोस का गं?
लेखक साहेब,अवांतराबद्दल क्षमस्व!
11 Nov 2014 - 9:58 am | खटपट्या
म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत ?
11 Nov 2014 - 10:10 am | जेपी
म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत ?
माई एकटी येत नाहि ना कुठे. त्यांचे "हे" सोबत आसतात. *wink*
11 Nov 2014 - 12:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा हा. आणी आमच्या मागून श्रीगुरूजी कवायत करत व आपण जेपी,संपूर्ण क्रांतीच्या अपेक्षेत!
11 Nov 2014 - 12:29 pm | टवाळ कार्टा
तेथे कॉलवून कंफर्म करतात ना??? म्हणुन असेल कदाचित ;)
11 Nov 2014 - 12:47 pm | जेपी
12 Nov 2014 - 11:40 am | इरसाल
मी नाव बदलुन इरसाली किंवा इ-रसाली (रसना रसाळकर सारखे) केले तर अनाहिता मधे प्रवेश मिळेल काय ?
आणी हो मी तोपर्यंत अगं, गेले, आले, बोलले, चालले, ची प्रॅक्टीस करते.....आपलं करतो.
12 Nov 2014 - 1:27 pm | hitesh
अनाहिता म्हणजे काय
12 Nov 2014 - 1:47 pm | जेपी
हितेस भाय,
आमच्या देखत तुमचे तीन जन्म झाले तरी तुमाला अनाहिता माहिती नाही.कुठल्या जगात राहता.नाय मंजे आब्यास बघता तुमी इतच राहात असणार की .
12 Nov 2014 - 1:49 pm | सतिश गावडे
हितेस भाईंचे आधीच्या दोन जन्मामधील नावे काय होती?
12 Nov 2014 - 2:05 pm | टवाळ कार्टा
=)) काय तो निरागसपणा ;)
12 Nov 2014 - 2:57 pm | जेपी
आमच्या नानांचा जीव असाच चुकीच्या ठिकाणी खरड टाकुन गेला.
हितेस भाय तु बी ती चुक करु न ये *wink*
12 Nov 2014 - 5:25 pm | hitesh
कुनास ठाउक...
लोकानी माझ्या नावासाठी नाना , उदयन आणि माई यांच्यावर मटका लावला आहे !
12 Nov 2014 - 5:28 pm | जेपी
हितेस भाई,
कुठला मटका लावला आहे. कल्याण का मुबंई ? सांगा.आकडेमोड करुन सांगतो कुठला लागेल.
11 Nov 2014 - 12:12 am | खटपट्या
उद्धवा अजब तुझे सरकार !!
11 Nov 2014 - 2:21 pm | वेल्लाभट
धाग्याचा विषय बदला हो; हा फार पकाऊ झालाय आता. चालायचा नाही.
:D
11 Nov 2014 - 2:26 pm | मराठी_माणूस
बाकी वरील प्रश्न खुप जणांना लागु आहे , जसे आज पर्यंतची सगळी सरकारे, प्रिंट मिडीआ, टीव्ही मीडीआ, फिल्म इंडस्ट्री
ईत्यादी
14 Nov 2019 - 11:33 pm | सौंदाळा
५-वर्षांपुर्वीचा लेख आज पण चपखलपणे लागू होतोय.