कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून.....
(मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे)
------------------------------------------------------
दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले
हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले
शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली
मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली
जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले
कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले
दरवेळी बंडखोर वळविले असे नाही,पण असेही क्षण आले
तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.
भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला अन नेता झालो
पडणारी सीट,कशी जिंकून द्यावी,याच निवडणूकीत शिकलो
झोपडपट्टीतील दादाने इलेक्शनचे धनुष्य छान पेलले
दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले
(बिन खात्याचा मंत्री)
अमोल केळकर
४/११/२०१४
मला इथे भेटा
प्रतिक्रिया
4 Nov 2014 - 5:51 pm | विवेकपटाईत
दिल्लीची वारी फुकट गेली वाटते. ...कविता आवडली
4 Nov 2014 - 5:55 pm | माहितगार
नेमकी !
5 Nov 2014 - 9:16 am | अमोल केळकर
धन्यवाद
अमोल केळकर
5 Nov 2014 - 9:38 am | श्रीरंग_जोशी
२००४ मध्ये नवे केंद्र सरकार स्थानापन्न झाल्यावर रामदास आठवले व थोरले साहेब यांच्याबद्दल एकदम फर्मास दोन फुल एक हाफ आले होते. सदर विडंबन वाचून त्याचे स्मरण झाले.
5 Nov 2014 - 11:36 am | रामदास
दो इंतजारमें याची आठवण झाली.
5 Nov 2014 - 2:11 pm | पुतळाचैतन्याचा
छानजमालि आहे कविता...आवडलि
7 Nov 2014 - 8:15 am | चुकलामाकला
भट्टी जमलिय.