वर्जीनल कवी, लाडके मिपावासी स्पा आणि उल्लेखलेल्या समस्त मिपाकरांची मापी मागून
आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29893
---------------------------------------------------------------------------------
माताय, अंगातल्या टवाळकीमुळे खूप जिल्ब्यांसोबत मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय.
टैम्पास करून घ्या मंडळी ... \m/
**************************************************
किती आठवणीने वाचावे तुझे लेख मी "ते" वाचून चित्त घाबरे अता
भुलवावे जगा किती पांडुब्बा कोणालातरी भान यावे अता
नसे शुद्ध उल्हास न पावन किनारे नको ठाकुर्ली आता नको कल्याण ते
कोणत्याही स्टेशना मिळे ठोकरा ’सीट’ मिळणेच आख्यान व्हावे अता
सुक्या देहाशी प्याक फुटावे किती सीटप्स माराव्या पुन्हा
तुला सगळ्यांनी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, (अशी) बाडी करावी स्वत:
नको हनुमाना न भीमा हवी मज उराशी हवा आर्नोल्ड तो
स्वत:चे स्पर्श स्वत:च्या अंगास तैसे करूनच मसल्स पहावे अता
तुला भावते ती जूनी न्हाव्याची सखी बोबडी रे (, कशी रे) तुझी टवळ्या
आहेच ती अडाणी..., तिची एक शीवी, झणझणीत(,) दूर अज्ञान व्हावे अता
नसे तू आत्मुदा, नसे तू विसोबा, नसे फक्त गोरा बैटू तू स्वत:
आळशी पांडू तू मिपाचा असे ज्ञान तुम्हास व्हावे अता
जरी "अच्चा अच्च जाल तल" देतोस पृच्छेविना (,) तू सापडच माझ्या हाती रे
पुन्हा वर सांगतो हे नीलकांता कंपूचेच कल्याण व्हावे अता
**************************************************
वृत्त : सुमारमाला
"लखन"वी : रंपंपं रंपंपं रंपंपं हो … रंपंपं रंपंपं रंपंपं हो … ए जी … ओ जी …
टवाळ
प्रतिक्रिया
2 Jan 2015 - 1:34 pm | मुक्त विहारि
झक्कास...
2 Jan 2015 - 1:36 pm | प्रचेतस
=))
बॅटन व्यवस्थित पेललास रे टवाळा.
मिपाजिलबीसम्राट उपाधी शोभूनच दिसत्ये आता.
2 Jan 2015 - 2:51 pm | बॅटमॅन
मला आपलं ते उगीचच "बॅटन बॅटन मॅन" आठवलं. =))
2 Jan 2015 - 1:40 pm | स्पंदना
एकच विषय धरुन केलं असत तर विडंबन.
यात शब्दा श्बदाला विषय बदलतो आहे. अजिबात जमल नाही.
आणि टका, दिसली कविता पाड विडंबन हे काही बरोबर नाही. कधी काही गोष्ते अस्पर्श रहाव्या अस वाटतं, त्यात मूळ कविता येते. इतक सुंदर, वृत्तबद्ध कोठे मिळतय आजकाल वाचायला. प्रेम अन समाजातली घाण सोडून दुसरी कोणती भावना येथे व्यक्त होते?
माफ करा पण मला अजिबात नाही आवडल हे विडंबन.
2 Jan 2015 - 1:45 pm | टवाळ कार्टा
हे मला सुध्धा वाटलेले...बरे झाले मोकळेपणाने सांगितले...पुढल्यावेळी लक्षात ठेवीन
अरे मग कवींनी कवीतेखाली पाटी लावावी..."विडंबन करण्यास मनाई"...नाही हात लावत त्या कवीतांना
आणि विडंबन केल्याने मूळ कवीता तेव्हाच विसरलली जाते जेव्हा विडंबन "अत्युत्तम" असते...वर तुम्हीच लिहिले आहे की हे विडंबन इतके जमले नाही (जे मलासुध्धा थोडेफार जाणवलेले)...मग मूळ कवीता चांगलीच वाटणार
2 Jan 2015 - 1:55 pm | स्पंदना
हे असं कुणी लिहायची गरज नसते. मनाला भावणार्या काही गोष्ती आपल्या आपण उलगडाव्यात. जस की सूर्योदय अन सुर्यास्ताचा क्षण. पौर्णीमेच्या रात्री चंद्र भर माथ्यावर असताना एखाद्या माळरानावर दुरुन ऐकू येणारी मंद गीताची धून. बेला के फूल ऐकताना येणारी मंद गुंगी. हे सगळ अस्पर्श रहावं अस मन ठरवत. रातराणीच्या फुलांचा मंद गंध खिडकीत उभा राहून घ्यायचा असतो, तिला उपटुन हातात घेउन नाचायची नसते. प्राजक्ताच्या झाडाखाली उभे राहून वरुन टप टप पडणारी फुलं अनुभवायची असतात, झाडावर चढुन ती ओरबाडुन वास घ्याय्चा नसतो. हे सगळ मन ठरवतं, कारण त्या गोष्टी तेव्हढ्या तरल असतात. नुकत्या जनमलेल्या बाळाला ज्या हळुवारपणे हाताळावं, तश्या असतात काही गोष्टी. आणि हे सगळ मन ठरवतं.
2 Jan 2015 - 3:19 pm | टवाळ कार्टा
मग याच प्रमाणे प्रत्येकाची आवड वेगळी असते...आणि वाचणार्याला सुध्धा मूळ कवीता वाचायची की विडंबन याचा पर्याय असतो"च"
मग बोलणचं संपलं की...कारण तुम्ही जे वर लिहिले आहे ते तुमच्यासाठी जरी ग्गोगोड मोरपंखी पान असेल तसेच कोणा दुसर्यासाठी "दवणीय" सुध्धा असू शकते याचा विचारच तुम्ही केलेला नाही
2 Jan 2015 - 5:13 pm | बॅटमॅन
दुसर्याला काय वाटेल याचा विचार करण्यासारखी क्षुद्र गोष्ट त्यांना आवडत नसेल हो. पाप लागत असेल.
2 Jan 2015 - 5:16 pm | सूड
हा विचार टकानेही विडंबन पाडताना केलेला दिसत नाही ब्याट्या!!
2 Jan 2015 - 5:20 pm | टवाळ कार्टा
पण हे "विडंबन" आहे...ते "टवाळकीच" असणारै...सिरियस विडंबन काय असते त्याचे उदाहरण मिळेल काय
2 Jan 2015 - 5:25 pm | बॅटमॅन
यग्जाक्टलि असेच म्हणतो! सूडराव, हा प्रतिसाद पहा.
2 Jan 2015 - 5:28 pm | सूड
विडंबन टवाळकी असणार हे मान्य, पण तू ज्या मुद्द्यावर सपोर्ट करतोयेस तो मुद्दा चुकीचा वाटला.
अर्थात कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी निरीक्षण नोंदवलं.
2 Jan 2015 - 5:31 pm | बॅटमॅन
हम्म, हे बाकी बरोबर आहे. धन्यवाद.
2 Jan 2015 - 5:37 pm | अत्रुप्त आत्मा
@सिरियस विडंबन काय असते त्याचे उदाहरण मिळेल काय>> तात्काळ देऊ काय? :)
2 Jan 2015 - 6:17 pm | अत्रुप्त आत्मा
चल तर मग..सत्शिष्या...
ये धावत धावत इकडे.. :)
एक..,दोन..,साडे..माडे..,तीssssssssssन...!
2 Jan 2015 - 7:20 pm | टवाळ कार्टा
कहर...म्हूनच म्ह्न्तो...तुमीच गुरु ;)
3 Jan 2015 - 3:16 pm | विशाल कुलकर्णी
थोडंसं अवांतर ,रिक्षा फिरवतोय म्हणा हवं तर.... ;)
<<सिरियस विडंबन काय असते त्याचे उदाहरण मिळेल काय>>>
गंभीर विडंबनाचे उदाहरण, अर्थात माझी रिक्षा ;)
खरेसाहेब…माफ़ करा : ३ : दिवस असे की …
3 Jan 2015 - 4:33 pm | पैसा
संवेदनेची अविता आवडली.
2 Jan 2015 - 3:39 pm | सूड
आधीच चिर्कुट तशातच पद्य व्याला*
मग विडंबनदंश झाला तयाला
झाली तशातच त्या आत्मूबाधा
काय वर्णू त्याच्या टवाळ्या अगाधा!! *mosking*
*या ओळीचा श्रेयअव्हेरः मेवे यांची एक जुनाट खरड. ;)
2 Jan 2015 - 5:21 pm | टवाळ कार्टा
चांगलयं :)
2 Jan 2015 - 10:02 pm | खटपट्या
आवो !! आमचा क्वापीरैटै हा !!
3 Jan 2015 - 8:50 am | टवाळ कार्टा
आय माय स्वारी बर्का...
2 Jan 2015 - 1:47 pm | टवाळ कार्टा
आणि मिपावर मी इतके जिल्बीपाडू लिखाण बघितले आहे (विषेशतः निवडणूकीच्या काळात)...त्यावेळेस कोणालाही हा उपदेश करण्यात आला नव्हता...ये नाईन्साफी हय :(
2 Jan 2015 - 2:46 pm | सतिश गावडे
अच्चा अच्च जाल तल
2 Jan 2015 - 3:19 pm | टवाळ कार्टा
हल्कत
2 Jan 2015 - 3:06 pm | सूड
कधीपासून होतायेत या अशा कविता?
2 Jan 2015 - 3:20 pm | टवाळ कार्टा
तु कदीपासून दाक्तर झालोस
2 Jan 2015 - 5:46 pm | अत्रुप्त आत्मा
@कधीपासून =))))) होतायेत या अशा कविता?>>मागेच केलेलं विधान पुन्हा करतो.हा सुडुक प्रचंड सखोल आहे! =))
2 Jan 2015 - 5:26 pm | बॅटमॅन
पांडुब्बाच्या कवितेत पांडूचा यमकदर्शी अन तितकाच तरल चित्रदर्शी शब्द नसल्याने निषेध.
2 Jan 2015 - 9:33 pm | सतिश गावडे
हेच म्हणतो.
3 Jan 2015 - 8:51 am | टवाळ कार्टा
पुढच्या वेळी लक्षात ठेवीन ;)
2 Jan 2015 - 5:41 pm | वेल्लाभट
मेलो हसून !
2 Jan 2015 - 7:21 pm | टवाळ कार्टा
वाटलेलेच कि यायाम ग्रुपमधल्या कोणालातरी समजेल ;)
3 Jan 2015 - 12:12 pm | स्वामी संकेतानंद
=))
3 Jan 2015 - 1:49 pm | अत्रुप्त आत्मा
स्वामिज्जी का हसतायत,हे मला नेमकं माहित्ये! :-D
3 Jan 2015 - 7:55 pm | टवाळ कार्टा
आमाला पण सांगा की :)
3 Jan 2015 - 3:02 pm | विशाल कुलकर्णी
प्रयत्न छान जमलाय.अर्थात विडंबन करताना मुळ कवितेतले वृत्त पाळता आले असते तर अजून बहार आली असती. धन्यवाद !!
3 Jan 2015 - 7:54 pm | टवाळ कार्टा
इतके आले असते तर डायरेक्ट कवीताच नसती का केली :(