दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता! मग पुढच्या दिड शतकी धाग्यात दोन कट्टे होतील इतपत काथ्या कुटुन प्रगती झाली!त्यात ७चा कट्टा अानंदी हाॅलला होणार म्हंटल्यावर शहाण्यासुरत्या;)लोकांनी कट्टयाची सूत्र हातात घेऊन तिसरा धागा काढला!त्यानुसार पाताळेश्वरला गप्पा आणि राजधानी थाळी नक्की झालं एकदाचं.मात्र कट्टयाला कोण कोण येणार हे मात्र गुलदस्त्यात होते.
सातला विशाखा पाटील अनिवासी पुणेकर असल्याने साडेदहाला दिल्या वेळेआधीच पाताळेश्वरला हजर!तिचा फोन आला आणि ती सोडुन कोणीच मिपाकर तिथे आलेले नसल्याची वार्ता तिने दिली!आम्ही (मी आणि माझा नवरा)डेक्कन जवळ पोहोचलोच होतो.तिला म्हंटलं आलोच आम्ही पाच मिनिटात.दोन अनाहिता भेटल्या तरी राॅकिंग कट्टा होऊ शकतोच ना;) पण त्यानंतर रितसर रस्ता चुकत आम्हाला जवळच्या अंतराला पोहोचण्यात अर्धा तास गेला.जाऊन बघतो तर मिपाकरांनी पाताळेश्वराचे प्रांगण भरलेले अाणि साक्षात नीलकांतनी कट्टयाला हजेरी लावलेली!एका वडाच्या झाडाखाली पारावर सर्व मिपाभुतं जमलेली!आम्ही यायला आणि युनिफाॅर्मातले गुरुजी जायला एकच गाठ पडली.ते गेल्यानंतर त्यांचे काही दु दु मित्र गणपती सरस्वती बारसं बाटल्या असं बोलत असलेलं ऐकलं बुवा!खखो वडावरचा मुंजा जाणे!
एक हिंदी भाषक काका कोण होते कळले नाही.एका बाजूला पारावर अोक काका आणि एक मिपाकर होते.ते नंतर दिसले नाहीत.त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.उत्साही विनायक देशपांडे काका नीलकांतशी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार मोडमध्ये होते.उपास आणि त्यांची सौ.,चिमी ,विशाखा पाटील एका झाडाखाली पारावर बसले होते.वल्ली दोन ग्रंथ हातात घेऊनच आलेले!चिनार,प्रशांत आणि एक्का काका बहुधा पुढल्या कटाची माहिती असल्याने सुहास्यवदनाने सगळ्यांशी गप्पा मारत होते! वात्रट कार्टी सगा ,सूड, टकाचे सोंग घेतलेला दु दु अभ्या(!)आणि एक डु आय डीचा डु आयडी बनलेला दमामि(म्हणे)यांचे कटकारस्थान सुरु होते.अभ्याला प्रत्यक्ष न पाहिल्याने तो टका बनून लाजत आणि लपत होता.अभ्या कुठे फेडशील हे पाप?=))
या सर्वात एक पाहाताक्षणी वात्रट दिसाणारे कार्टे दमामि नाव घेऊन वावरत होते!दमामि अाम्ही ओळखल्या असल्याने त्याची पंचाईत होऊन तो असंबंध्द उत्तरं द्यायला लागला.पण तेवढ्यात जोराचा पाऊस आल्याने सगळ्यांची पळापळ सुरु झाली.पाताळेश्वराच्या नंदी असलेल्या वर्तुळाकृती जागेत काही तर पलीकडे काही असे आपोअाप दोन ग्रुप पडले.धोधो पावसाने शत्रुपक्ष आणि आम्ही यामधला खंदक पाण्याने भरुन गेला;)
आता अलीकडे इ एक्का नीलकांत उपास अनाहिता आोक काका आणि पलिकडे उरलेले दु दु लोक्स!!तेवढ्यात भर पावसात भिजत सुरंगी ताईने येऊन बोलण्याची सूत्र हातात घेऊन सर्वाना गप्प करुन टाकले!नीलकांतला सर्वांनी इतकी सजेशन देऊनही न कंटाळता प्रत्येकाशी संवाद सुरु होता.तेवढ्यात ओककाकांच्या हातावर बांधलेला दोरा तुटला!तो वेड्या बहिणीची रे वेडी माया म्हणत सुरंन्गीताईने बांधुन दिला.तिथे असलेल्या एका वात्रट अनाहितेला दोरा का नाडी हा प्रश्न आवरला नाही असे ऐकले,ख.खो. नंदी जाणे=))(ओककाका ह. घ्या हो!तुमच्या ज्ञानाचा आदर आहे.)
तेवढ्यात बॅटमॅन हजर झाल्याने खंदका पलिकडची कूमक वाढली!मग या सर्वांचा समाचार घ्यायला मी आणि विशाखा खंदक ओलांडुन डायरेक शत्रुपक्षात एन्ट्री मारली!
तिथे शहाण्या अभ्याने हळूच मी टका नाही,पैचान कौन करुन कन्फुजन वाढवले आणि मग तो अभ्या आहे असे सांगीतले.तरी वाटतंच होतं एवढा शहाणा दिसाणारा मुलगा टका कसा=))
त्यामुळे दमामिची उलटतपासणी सुरु केली!दमामि नाहीच पण साक्षात टवाळ असे चेहेर्यावर छापलेला हा कोण हे कळणार तोच बाकीचे नेमस्त पक्षीय पण खंदक ओलांडुन जमा झाले.मधेच मृत्युंजय हजेरी लावुन गेले.गप्पा सुरु असताना अचानक एक दुबईवासी कुटुंब तिथे आले.ते गृहस्थ स्वतः मिपाकर आहेत.समोर जमलेला ग्रुप बघुन चौकशी करता हा मिसळपावचा कट्टा असल्याचे कळल्याने ते आवर्जून भेटायला आले.जय मिपा!
आता सगळ्याना जेवायला जाण्याचे वेध लागलेले.दंबुकधारी बाबा पाटलांना राजधानीला यायला सांगुन बाकीच्यानी राजधानीकडे कूच केले.इथे नीलकांतने मात्र सगळ्यांचा निरोप घेतला.
राजधानीला आल्यावर कटात सामिल लोकांनी सो काॅल्ड दमा मि ला अनाहितांत बसवल्याने चोरुन लपुन वावरणार्या,अनाहितांना न घाबलणार्या टकाचे सोंग उघडे पडले!!त्याची जेवताना मग अनाहितांनी प्रेमळ विचारपूस केली,महत्त्वाचे सल्ले दिले;) टक्याच्या वधू संशोधनाबाबत काही चिंतन करण्यात अाले.समस्त दारु आवडणार्या अविवाहित मुलींना टक्यासाठी मागणी घालण्याच्या विषयावर चर्चा केल्या गेली!या सर्व चिंतनमननानंतरही शिल्लक राहिलेल्या टक्याला सुरन्गी ताई स्वतःबरोबर गाडीने नेऊन लां....ब सोडायला रिक्षात घालून घेऊन जाताना बालके सूड सगा यांनी त्याला साश्रु नयनांनी निरोप दिला.कल्जी घ्यायला सांगीतली.ते भावविभोर दृश्य बघून उरलेल्यांचे ड्वाले पानावले:(
टकाचा बंदोबस्त करुन बाकीची मंडळी सूड सगा वल्ली एक्का काका वाल्गुद महाशय विशाखा आणि श्री व सौ अजया महात्मा फुले म्युझियम जवळच असल्याने बघायला गेले.तिथे इ. दुशली ब च्या मुलांसाठी असलेल्या वस्तू बघुन कट्टयाची सांगता झाली!
ता.क:ज्या दिपक_कुवेत यांच्या आगमनार्थ कट्टा होणार होता ते या कट्टयाला न येता आदल्या दिवशी पक्षी तीर्थ कट्टा करुन रविवारी निमुटपणे तुळशी बागेत गेले.यावरुन सर्व काही ध्यानात आले आहे;)सहानुभूती दाखवल्या गेली आहे!
प्रतिक्रिया
8 Jun 2015 - 10:13 am | यशोधरा
लै भारी. मज्जा केलेली दिसतेय. व्हिडिओ शूटींग करायचे होते ना..
8 Jun 2015 - 10:15 am | किसन शिंदे
का वो? तिथं जवळच्या जवळ तुम्ही कट्ट्याला गेला नाहीत??
8 Jun 2015 - 10:26 am | यशोधरा
त्या दिवशीच सक्काळी ६ ते दुपारी ४ परेंत हापिसात होते.. :(
दुत्त शिंदे!
8 Jun 2015 - 10:31 am | किसन शिंदे
अच्छा, असं झालं तर...
8 Jun 2015 - 11:02 am | यशोधरा
दुत्त दुत्त, अगदीच दुत्त दुत्त शिंदे!
8 Jun 2015 - 10:32 am | सतिश गावडे
हे "दुत्त दुत्त शिंदे!" असं असायला हवं.
8 Jun 2015 - 12:52 pm | बॅटमॅन
पुढे तब्येतीप्रमाणे ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ (यातील स्वर व व्यंजनांचे प्रमाण स्वादानुसार ठरवावे) , दोनपाच स्मायल्या, इ. टाकाव्यात.
8 Jun 2015 - 1:23 pm | यशोधरा
कोणाच्या तब्येतीप्रमाणे? किसनाच्या? मग एकपण नको की! ;)
9 Jun 2015 - 6:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
दुत्ताजी शिंदे असं म्हणाला असतात तर पुणिपत नावाची कादंबरी लिहिला आली असती.
9 Jun 2015 - 7:35 am | यशोधरा
=))
9 Jun 2015 - 10:13 am | किसन शिंदे
=))
9 Jun 2015 - 7:37 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
9 Jun 2015 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
8 Jun 2015 - 10:21 am | यसवायजी
भारीच. फोटो टका.
8 Jun 2015 - 10:22 am | ज्ञानोबाचे पैजार
फोटु नाय तर कट्टा नाय
पैजारबुवा,
8 Jun 2015 - 10:22 am | चिनार
अजया ताई..मी पण होतो की कट्ट्याला !
8 Jun 2015 - 10:42 am | अजया
दुरुस्ती केली आहे!
8 Jun 2015 - 10:23 am | दमामि
हा कोण तोतया दमामि????
आम्ही आहोत अजून.....
8 Jun 2015 - 10:24 am | चिमी
कट्टा कम वर्षा सहल बेस्ट्च झाली :)
ते दुबईवासी कुटुंब शरद काकांचे नातेवाईक होते हे ऐकुन मनात विचार आला की हे जग किती लहान आहे .....
फोटो आणि पुढच्या कट्ट्याच्या प्रतिक्षेत..
-चिमी :)
8 Jun 2015 - 10:26 am | बॅटमॅन
मस्त झाला कट्टा...एकदम मज्या आली.
8 Jun 2015 - 11:04 am | नाखु
देवा कट्टा करून फोटो न टाकंणार्यांना माफ कर !!!
हळहळ सांत्वनकर
खालची आळी
पाराजवळ
8 Jun 2015 - 11:06 am | पियुशा
वाह ! एकदम खुमासदार व्रुतांत .आता लगोलग फटुटु येऊ दयात "फोटु नाय तर कट्टा नाय"
8 Jun 2015 - 11:08 am | टवाळ कार्टा
या वृत्तांतातील मनाचे श्लोक माझ्या वृत्तांतात दुरुस्त कर्ण्यात येतील :)
8 Jun 2015 - 11:14 am | मदनबाण
वृतांत आवडला... फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
'हसीना' मान जाएगी?
पाकिस्तानी मुहाजीरांचे 'रॉ कनेक्शन'
8 Jun 2015 - 11:26 am | स्वीत स्वाति
मला खूप इच्छा होती कट्ट्याला हजेरी लावण्याची पण येऊ शकले नाही...
पुढील कट्टा जर पुन्हा प्राधिकरण मध्ये झाला तर मला सोयीस्कर होईल.
बघा काही जमते का....
फोटो टाका ...
फोटो पाहून समाधान मानेन.
8 Jun 2015 - 11:27 am | चुकलामाकला
फोटो नाय तर कट्टा नाय!
8 Jun 2015 - 11:28 am | अत्रुप्त आत्मा
@आणि एक डु आय डीचा डु आयडी बनलेला दमामि(म्हणे)यांचे कटकारस्थान सुरु होते.अभ्याला प्रत्यक्ष न पाहिल्याने तो टका बनून लाजत आणि लपत होता.अभ्या कुठे फेडशील हे पाप?=))
या सर्वात एक पाहाताक्षणी वात्रट दिसाणारे कार्टे दमामि नाव घेऊन वावरत होते! दमामि अाम्ही ओळखल्या असल्याने त्याची पंचाईत होऊन तो असंबंध्द उत्तरं द्यायला लागला. पण तेवढ्यात जोराचा पाऊस आल्याने सगळ्यांची पळापळ सुरु झाली.पाताळेश्वराच्या नंदी असलेल्या वर्तुळाकृती जागेत काही तर पलीकडे काही असे आपोअाप दोन ग्रुप पडले.धोधो पावसाने शत्रुपक्ष आणि आम्ही यामधला खंदक पाण्याने भरुन गेला;) >>> इथे मला आमने सामने ढणुष्य बाण रोखलेल्या फौजा दिसल्या!
@तेवढ्यात बॅटमॅन हजर झाल्याने खंदका पलिकडची कूमक वाढली!मग या सर्वांचा समाचार घ्यायला मी आणि विशाखा खंदक ओलांडुन डायरेक शत्रुपक्षात एन्ट्री मारली! >>> आ.........क्रमण!
8 Jun 2015 - 11:32 am | स्पंदना
चला एकतरी कट्टा झाल्याचा व्रूतांत आला बाबा.
काय नाही तरी नंदीचा फोटो टाक ना!
8 Jun 2015 - 11:41 am | नूतन सावंत
अजया, मी येण्याआधीच आणि मी गेल्यानंतरच्या वृतान्ताने बहार आणली.टकासाठी वधूसंशोनाचे काम माझ्या नणंदेकडे सोपण्यात आले आहे. त्याची वधूच्या बाबतीतील मुख्य अटसुद्धा तिला सांगितली आहे.
टकाला अनाहितांमध्ये बसवण्याचा कट झाला असयाचे लक्षात आले होते.पण त्यात एक्काजीही सामील असल्याचे आताच कळते आहे.उपस्थित सर्व मिपाकरांना भेटून आनंद झाला.
इतक्या अनोळखी व्यक्तींसोबत (पण अनोळखी तरी कसं म्हणू?) मी इतका वेळ सहजपणे आनंदात काढणे हे आजवर मला ओळखणाऱ्या माझ्यासाठीही नवीन होते.
शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल.
जय मिपा.
8 Jun 2015 - 11:46 am | टवाळ कार्टा
आणि इथे उग्गीच काहीजणी ....जौदे ;)
रच्याकने आपला एक कंपू बनवावा कै?
8 Jun 2015 - 4:58 pm | खटपट्या
भावना पोचल्या...
बाकी कट्टा जबरद्स्त झालेला दीसतोय. अजयातै, ई.ए., सूड, वल्ली यांचे व्रुत्तांत जबराट आहेत...
8 Jun 2015 - 11:42 am | स्नेहानिकेत
वृतांत मस्तच!!!! पण फ़ोटो कुठे आहेत? फ़ोटो नाय तर कट्टा नाय!!!!!
8 Jun 2015 - 11:50 am | पिलीयन रायडर
टका हाये का अजुन शिल्लक!!! अजया ताईने तर धुवांधार गोळीबार केलाय!!
ख त रा लिहीलाय वृतांत!!
8 Jun 2015 - 11:57 am | टवाळ कार्टा
ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
8 Jun 2015 - 12:09 pm | गणेशा
अप्रतिम कट्टा वर्णन .. आवडेश...
8 Jun 2015 - 12:12 pm | विशाल कुलकर्णी
यायची इच्छा होती, पण रवीवारी नेमके काही वैयक्तीक कारणामुळे श्रीवर्धनला एका मित्राच्या घरी जावे लागले. त्यामुळे उत्सुकता परत वाढीला लागली आहे. पुढच्या कट्ट्याच्या वेळी हजर राहण्याचा प्रयत्न करेन.
ता.क. (हवेतर आगाऊ जाहिरात म्हणा ;) ) माझ्या मागील)दिवे आगारच्या पोस्टवर मिपाकरांनी 'रुपनारायणा'बद्दथोआवर्जून चौकशी केल्यामुळे उत्सुकता बळावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा वाट वाकडी करुन तिथे भेट देवून आलो. लवकरच वृत्तांत पोस्टेन स्वतंत्र धाग्यावर.
8 Jun 2015 - 12:25 pm | मृत्युन्जय
काय बोलता तो दमामि दमामि नव्हता? टक्का होता? आणि अनाहितांनी दमामिला ओळखले आहे? आयला तर मग दमामि म्हणजे नक्की कोण हे कृपया स्पष्ट करावे. एकुण चाललेल्या कुजबुजीवरुन दमामि हा अनाहितांपैकी कोणाचा तरी आयडी आहे असे समजते. तर मग दमामि कोण?
बाक्की दोन्ही कट्टे मस्त झाले.
8 Jun 2015 - 4:12 pm | दमामि
काही चुकलं तर जोड्यानं हाणा पण अनाहिता नका म्हणू भौ!
9 Jun 2015 - 10:19 pm | सूड
जोडे तयार आहेत, कधी हाणू बोला फक्त!! =))
10 Jun 2015 - 12:23 am | टवाळ कार्टा
चायला आधी गुलाबजाम आणि आता जोडे???
10 Jun 2015 - 5:49 pm | सूड
ते रसगुल्ले होते.
जल्लां मना र्हाव्न र्हाव्न येक संवशेव येतांय. ह्या टक्यान खाल्लेले रसगुल्ले आन ह्या दमामिस द्यायाच्या जोड्यांचा संबंध टक्यान् लावला कसां? नाय म्हंजे मना काय बोलियाचा हाय ता कल्ला कांय मंडली?
10 Jun 2015 - 7:07 pm | टवाळ कार्टा
अर्रे हो रसगुल्ले :)
10 Jun 2015 - 7:09 pm | सतिश गावडे
खाल्ल्या पाकाला जागला हं तू बाळ टका.
10 Jun 2015 - 7:59 pm | अत्रुप्त आत्मा
ख्याssssक्क!
11 Jun 2015 - 11:04 pm | काळा पहाड
कल्ला कल्ला. दमामि म्हणजे टका आणि टका म्हणजे दमामि.
12 Jun 2015 - 11:32 am | टवाळ कार्टा
:)
8 Jun 2015 - 12:34 pm | विनोद१८
@...सुरन्गी :- शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल.
यातच सारे आले, असा विश्वास निर्माण होणे हेच मिपाचे यश.
8 Jun 2015 - 12:41 pm | टवाळ कार्टा
आयला यात ज्याला लिफ्ट मिळाली त्याचा कैच वाटा नै का :)
8 Jun 2015 - 1:23 pm | विनोद१८
नक्कीच आहे.
8 Jun 2015 - 2:26 pm | हाडक्या
ज्याने लिफ्ट घेतली त्याच्या धाडसाचे ही कौतुक करावे तेवढे कमीच आहे.. ;)
9 Jun 2015 - 6:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत.
आणि अतिअवांतर होईल तरी सांगतो. टक्या इथे कितीही मस्ती करत असला तरी सज्जन आहे (माझ्यापेक्षा जरा कमी, पण सज्जन).
9 Jun 2015 - 7:40 am | अजया
सहमत आहे!पोरगं अगदीच टवाळातलं नाही!!
9 Jun 2015 - 8:16 am | सदस्यनाम
वा वा. थोड्याच् दिवसात अन्नाहिता विरचित मर्यादापुरुषोत्तम टका रामाचे गुणवर्णन वाचायला मिळणार. धन्य त्या पैठणी कला.
9 Jun 2015 - 9:49 am | टवाळ कार्टा
ओ...मी राम कॅटेगरीतला नै....किस्ना चालेल ;)
9 Jun 2015 - 7:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही मॅनेज होणार तुझ्याच्यानी.
9 Jun 2015 - 9:08 pm | टवाळ कार्टा
तो तुमचा भ्रम आहे
10 Jun 2015 - 6:16 pm | सतिश गावडे
आपणास मुद्दा कळलेला नाही.
8 Jun 2015 - 12:45 pm | काळा पहाड
ही दु दु काय भानगड आहे?
8 Jun 2015 - 2:55 pm | आदूबाळ
दुष्ट दुर्जन
8 Jun 2015 - 12:52 pm | स्वाती राजेश
मस्त कट्टा वर्णन ... :)
8 Jun 2015 - 12:56 pm | प्रचेतस
तसं बघायला गेलं तर सर्वात आधी मी पाताळेश्वरला जाऊन पोचलो होतो. १०.१५ वाजताच. लेणी बघून नंदीमंडपाच्या ओसरीवर जाऊन बसलो तेव्हढ्यात अभ्याचा फोन आला की तो डेक्कनला ५/१० मिनिटात पोचतोय. मग तिथून डेक्कनवर चितळेबंधूंपाशी त्याला घ्यायला गेलो. अजूनही त्याला यायला ५ मिनिटे बाकी होती तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस येथून वि.ल. भावे कृत 'महाराष्ट्र सारस्वत' हाअजोड ग्रंथ खरेदी केला. दुसर्या खंडात शं. गो. तुळपुळे यांनी लिहिलेली पुरवणी आहे. तेव्हढ्यात अभ्या आलाच. मग त्याला घेऊन पाताळेश्वरात पोचलो. बहुतेक सर्व मिपाकर आले होते. तुफ्फान कलकल नुसती. गुर्जी नुसते ५ मिन्टं भेट देऊन निघून गेले बहुधा जुळ्यांच्या चौकशीचा मारा व्ह्यायच्या भितीने सूंबाल्या केला की का न कळे.
हर्षद शहा त्यांच्या पत्नीसह आले होते. शरदकाकांना भेटून एकदम मस्त वाटले. त्यांच्याशी परत एकदा निवांतपणे गप्पा मारायची इच्छा आहेच.
नंतर काय मुसळधार पावसात गप्पा सुरु झाल्या. पाऊस उघडल्यावर परत एकदा मी, टका आणि ओककाका यांचेबरोबर लेणीदर्शनाचा कार्यक्रम झाला. मग राजधानीत गेलो. आमरस अमर्यादित नसल्याने खूपच निराशा झाली. हाटेलला दिलेल्या नकारार्थी फीडबॅकमुळे आमचे एक सभ्य मित्र खूप रागावले होते :).
नंतर उरलेले मोजके जण म. फुले वस्तुसंग्रहालयात गेलो. फारसे काही बघण्यासारखे नहई पण टॅक्सिडर्मी आणि प्राचीन बंदुका, तलवारी यांचे दालन छान आहे. तिथेच एक ताम्रपट होता. बॅट्या आणि मी तो वाचण्यासा अल्पसा प्रयत्न केला. धन्या तिथेच खुर्चीवर बसल्याबसल्या झोपायचा प्रयत्न करत होता. संग्रहालयातच परत थोड्या गप्पा मारुन निघालो मग.
8 Jun 2015 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा
@ गुर्जी नुसते ५ मिन्टं भेट देऊन निघून गेले बहुधा जुळ्यांच्या चौकशीचा मारा व्ह्यायच्या भितीने सूंबाल्या केला की का न कळे.>>> ╰_╯ ╰_╯ काड्यालाऊ दुष्ट हत्ती! ╰_╯ मला काम होतं हे माहीत असून ╰_╯ सवई प्रमाणे ╰_╯ आग लावालीस! ╰_╯ दू दू दू ╰_╯ ढिश्शुम! ╰_╯
8 Jun 2015 - 1:05 pm | प्यारे१
सातारला जावे लागल्याने कट्टा हुकला आहे.
असो!
8 Jun 2015 - 1:17 pm | Maharani
खुमासदार वृ..आता फोटो येऊदेत..
8 Jun 2015 - 1:19 pm | अजया
एक्का काका फोटो टाकतील.
8 Jun 2015 - 1:47 pm | पद्मावति
तुमच्या चुरचुरित वृतांताने चार चांद लागले आहेत.....मजा आली वाचून.
8 Jun 2015 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं खुसखुशीत कट्टावर्णन !!! =))
आता काही फोटो... खास लोकाग्रहास्तव ;)...
अचानक आलेल्या मुसळधार पावसाने मिपासैन्याची उडवलेली दाणादाण...
(१)
.
पावसाने चिंब होऊन विखुरलेल्या सैन्याने थोडा वेळ लढाई विसरून पाताळेश्वराच्या नंदीगृहाचा आसरा घेतला आणि आपापल्या कुमकेची परत जमवाजमव करून दुसर्या गटावरच्या हल्ल्याची आखणी सुरू केली त्यावेळची काही क्षणचित्रे...
(२)
.
(३)
.
(४)
.
(५)
डावीकडून: प्रशांत, सगा, अभ्या, इस्पिक एक्का, सूड, टका, वल्ली
.
(६)
डावीकडून: विनायक देशपांडे, सगा आणि अभ्या, निलकांत, टका, सूड, प्रशांत, चिनार, उपास (चिनारच्या मागे उंचावर), वल्ली
.
पावसाचा जोर थांबल्यावर परत घमासान सुरू झाले. बर्याच वेळाने दोन्ही बाजूंच्या पोटात कावळे ओरडू लागल्याने तह करून सर्वांनी "राजधानी"वर हल्ला करण्याचे ठरवले. शेवटी "सैन्य पोटावर चालते" असे म्हणतात ते खोटे नाही याचा प्रत्यय आला !!
तहाचा पुरावा म्हणून सगळ्यांचे एकत्र फोटो झाले...
(७)
डावीकडून:
श्री. अजया, अजया, चिमी, सुरंगीताई, विशाखाताई, चिनार, ब्याट्या (खिशात हात), नीलकांत, प्रशांत, म्रुत्यंजय (खांद्यावर हात, पट्ट्यांचा ती शर्ट), सतीश गावडे (ज्याच्या खांद्यावर म्रुत्युंजयचे हात. एका हात खिशात, एक हात बाहेर), सूड (अर्धी चड्डी), अभ्या (सूड आणि सगाच्या मागील डोके), श्री आणि सौ उपास.
.
(८)
डावीकडूनः श्री. अजया, अजया, चिमी, सुरन्गीताई, विशाखा पाटील, चिनार, बॅटमॅन, नीलकांत, प्रशांत, मृत्युंजय, सगा, अभ्या, सूड, इस्पिकचा एक्का, उपास
.
नंतर सैन्य कूच करण्याआधी अनेक मैत्रीपूर्ण संवादांचे आदानप्रदान झाले...
(९)
.
(१०)
उजवीकडील टोपी घातलेले शशिकांत ओक, झब्बा घातलेले देशपांडेकाका आणि त्यांच्या बाजूला हिरव्या निळ्या पट्ट्यांचा टी शर्ट घातलेले दुबैस्थित वाचनमात्र मिपाकर.
.
सरतेशेवटी पोटातल्या कावळ्यांचा विजय होऊन सैन्याला पोटपूजेच्या दिशेने कूच करणे भाग पडले...
(११) व (१२)
...
.
शत्रूला हल्ल्याचा सुगावा लागू नये म्हणुन सैन्याने गटागटाने कूच केले...
(१३)
.
वाटेत अनेक शिलेदारांनी "गृहमंत्र्यांनी दिलेली तंबी" आणि "मित्रराष्ट्रांबरोबरचे करार" इत्यादी अनेक कारणे सांगून काढता पाय. असे अनेक मोहरे गळले तरीपण उरलेले सैन्य न घाबरता झाशीच्या राणीकडून स्फूर्ती घेत मोठ्या शिताफीने राजधानीवर चालून जात होते...
(१४)
सर्व कुमक पोचेपर्यंत अगोदर पोहोचलेल्या पहिल्या फळीने राजधानीवर मोर्चेबंदी केली होतीच्च... मिपाकर फौजच ती, स्ट्रॅटेजीमध्ये कमी कशी पडेल ? ;) ...
(१५)
.
सगळी फौज जमल्यावर एकजुटीने राजधानीवर हल्ला चढवला आणि तिच्या खजिन्याची मनसोक्त लूट केली !
खजिन्याचा ठोकळ अंदाज येण्यासाठी हा त्याच्या साठवणीच्या रिकाम्या पेट्या. बाजारातला इनोचा खप वाढून त्याची चणचण भासू नये केवळ याच एका भूतदयावादी विचाराने सर्व भरलेल्या खजिन्याचे फोटो टाकले नाहीत ;) ...
(१६)
खजिना लुटण्याच्या नादात आणि त्याबरोबर चाललेल्या टिपिकल मिपासंवादांत फोटो काढणे विसरलो, हे गुपित उघड न करण्याचे ठरले असल्याने, ते गुपित मी तुम्हाला सांगणार नाही ;) )...
.
(१७) व (१८)
...
सगळे जेवण वाढण्याअगोदरच जेवण सुरू करण्याची घाई पाहून सैन्य किती भुकेले होते आणि जेवण चवदार होते हेवेसांन :)
.
आधीच झालेल्या दमदार पावसानंतर झालेला टकानिरोपसमारंभ इतका हृदयद्रावक होता की त्याचे फोटो टाकले तर मिपावर महापूर येईल या भितीने त्याचे फोटो काढले नाही. ;)
मात्र टकाला सुरन्गी तैंच्या अनुभवी शासकीय हाती सोपवून "इसको अच्चा खर्चापानी देनेका" असं सांगून टेंपोत... आपलं रिक्षात... बसवून दिले ;) :)
.
8 Jun 2015 - 2:13 pm | काळा पहाड
ती फोटोखाली नावं ल्ह्या ओ..
8 Jun 2015 - 2:13 pm | नाखु
१६ फोटोपैकी ५ दिसले म्हणूर पाचोळी प्रतीसाद.
सोत्ताच्या खिशात हात घातलेल्या बॅट्या आहे काय?
मागे वळून पाहण्याचे प्रयोजन काय? पोट्पूजेला जाताना.
प्रशांत भौ आणि सगा यांच्या सस्मित छबीने "हसमुखराय आणि कं" याद आली.
झाशी राणी चौकातील शुक्शुकाटाचे कारण मिपा कट्टा नक्की नाहीये ना?
शहा साहेब दिसले नाहीत (का मलाच ओळखू आले नाहीत) ख.खो.दे.जा.
कट्टा वाचक
नाखु
8 Jun 2015 - 2:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
आमाला तर बॉ सग्ळे फोटू दिसताहेत ! :) (तुमचा एक साधारण तृतियांश गणेशा का झाला बर ?! ;) )
सोत्ताच्या खिशात हात घातलेल्या बॅट्या आहे काय?
हो.झाशी राणी चौकातील शुक्शुकाटाचे कारण मिपा कट्टा नक्की नाहीये ना?
मिपाफौज कूच करत असताना कोणाची टाप आहे की वाट मोकळी करून देणार नाही ?! :)शहा साहेब दिसले नाहीत
जोरदार पावसामुळे ते घरी निघून गेले. मिपाकर एकमेकांची ओळख करून घेऊन मोकळेपणाने बोलू लागल्यावरच फोटो काढणे सुरू केले. त्यामुळे ते फोटोंत नाहीत.टीप : इतर व्यक्तीगत प्रश्नांना संबंधीत व्यक्तीच उत्तरे देऊ शकतील ;)
8 Jun 2015 - 2:48 pm | सूड
कोकणात फक्त गौर आणायला जाताना मागे वळून पाहात नाहीत, इथे तसला काही प्रकार नसल्याने लोक बिन्धास्त मागे वळून पाहात होते. प्रयोजन जाणून घ्यायचे असल्यास कट्यास हजेरी लावणेचे करावे. ;)
8 Jun 2015 - 2:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझा एकदोन नविन नावांत गोंधळ होण्याची शक्यता आहे.
वल्ली कृपया फोटोखाली (निदान गृपफोटोखाली) नावे टाकावी ही विनंती.
8 Jun 2015 - 2:35 pm | सतिश गावडे
या ओळीखालिल फ़ोटोत डावीकडून:
श्री. अजया, अजया, चिमी, सुरंगीताई, विशाखाताई, चिनार, ब्याट्या (खिशात हात), नीलकांत, प्रशांत, म्रुत्यंजय (खांद्यावर हात, पट्ट्यांचा ती शर्ट), सतीश गावडे (ज्याच्या खांद्यावर म्रुत्युंजयचे हात. एका हात खिशात, एक हात बाहेर), सूड (अर्धी चड्डी), अभ्या (सूड आणि सगाच्या मागील डोके), श्री आणि सौ उपास.
त्याखालील फ़ोटोत हेच सारे. फक्त उजव्या टोकाला सौ उपास यांच्या जागी एक्का काका.
बाकीचे इतरत्र फ़ोटोत विखुरले आहेत. स मं नी फ़ोटोंना क्रम दिल्यास कुठल्या फ़ोटोत कोण आहे हे सांगता येईल.
8 Jun 2015 - 2:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
फ़ोटोंना क्रम दिला आहे.
8 Jun 2015 - 2:37 pm | अत्रुप्त आत्मा
तुफ्फान लिवलय हो येक्का काका! :-D
@ आधीच झालेल्या दमदार पावसानंतर झालेला टकानिरोपसमारंभ इतका हृदयद्रावक होता की त्याचे फोटो टाकले तर मिपावर महापूर येईल या भितीने त्याचे फोटो काढले नाही. ;)
मात्र टकाला सुरन्गी तैंच्या अनुभवी शासकीय हाती सोपवून "इसको अच्चा खर्चापानी देनेका" असं सांगून टेंपोत... आपलं रिक्षात... बसवून दिले ;) :) >> :-D __/\__ कहर! :-D
8 Jun 2015 - 2:57 pm | आदूबाळ
दोन नंबरच्या फोटोवरून "कॉलर को थोडासा उपर चढा के.." हे गाणं आठवलं.
8 Jun 2015 - 2:57 pm | सतिश गावडे
फ़ोटो क्रं. ५ डावीकडून: प्रशांत, सगा, अभ्या, इस्पिक एक्का, सूड, टका, वल्ली
फ़ोटो क्रं. ६ डावीकडून: विनायक देशपांडे, सगा आणि अभ्या, निलकांत, टका, सूड, प्रशांत, चिनार, उपास (चिनारच्या मागे उंचावर), वल्ली
फ़ोटो क्रं. १० उजवीकडील टोपी घातलेले शशिकांत ओक आणि त्यांच्या बाजूला हिरव्या निळ्या पट्ट्यांचा टी शर्ट घातलेले दुबैस्थित वाचनमात्र मिपाकर.
8 Jun 2015 - 2:16 pm | अजया
भरल्या ताटाच्या फोटुशिवाय वृत्तांताला मजा नाही!!
8 Jun 2015 - 2:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
ब्येष्ट ! आता मात्र इनोचा खप एकाएकी वाढणार !
(आम्ही कट्ट्याला न येऊ शकलेल्या मिपाजनांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले होते, हे नमूद करून ठेवत आहोत.)
8 Jun 2015 - 5:32 pm | रेवती
बाबौ! किती ते पदार्थ! चला. ईनो घेण्याची घटिका जवळ आली. ;)
8 Jun 2015 - 2:25 pm | पद्मावति
चटकदार वर्णन+रंगतदार फोटो= एंटरटेनमेंट! एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट!
8 Jun 2015 - 3:31 pm | स्वीत स्वाति
बरोबर ...मस्त च
8 Jun 2015 - 2:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटोओळख करून दिल्याबद्दल वल्ली आणि सगा यांना धन्यवाद !
8 Jun 2015 - 3:55 pm | सूड
सहा तारखेचा कट्टा उरकून रात्री घरी परतायला अंमळ उशीर झाल्याने भल्या पहाटे नऊ वाजता जाग आली. ब्रश करणे वैगरे आन्हिके उरकेस्तवर साडेनऊ होतायेत तोवर सगा उर्फ धन्या यांनी फोनवले. मग चहा घेऊन सगळे पाताळेश्वराला निघालो. गाडीला किक मारेस्तवर आपल्याला कुवेतकरांच्या काही कामाखातर दत्तवाडीत वाकडी वाट करायची असल्याचे कळले. ते झाल्यानंतर विश्रामबागवाडा कुठेशिक आला या प्रश्नाने धन्याने डोक्यात तारे चमकवले. कुवेतकरांना तुळशीबागेपाशी सोडून मंडळी मार्गस्थ झाली.
कट्ट्याच्या ठिकाणी पोचल्यानंतर देशपांडेकाका, शरद, नीलकांत, प्रशांत, विशाखा पाटील ही सगळी मंडळी आधीच हजर होती. अत्रुप्तगुर्जींही हजर असल्याने त्यांच्याकडे 'कथानायकाच्या' जुळ्यांच्या बारशाची चौकशी झाली, पण फार काही माहिती मिळाली नाही. त्यांना एकेठिकाणी सुपारी असल्याने, बाकीच्यांना वाटाण्याच्या अक्षता देऊन ते निघून गेले. ते होतंय तोवर दमामि आला. त्याने ओळख करुन दिली. तेवढ्यात मिपाचे कोल्हापूर कट्ट्याला आलेले वाचक हर्षद शाह यांनी सपत्निक हजेरी लावली. वल्लीसोबत दोन डॉटवाला अभ्यादेखील आला आणि मग गप्पाटप्पा सुरु झाल्या.
चिमी, विशाखातै, अजयाकाकूतै, सुरंगीतै वैगरे मंडळींचा अनाहिती कट्टा सुरु झाला. बाकीची मंडळी वाकाटकांपासून नुसत्याच टकापर्यंत चर्चा करण्यात गुंतली. पावसाने थोडी पांगापांग झाली. पाताळेश्वराच्या नंदीमंडपात पुन्हा लोक नवनवे काथ्ये घेऊन कुटत होते. 'त्यात आपण मोजकेच का लिहीतो' इथपासून ते 'मराठीत 'ळ' नव्हताच तो दिवाळीत आपण शेजार्यांकडनं सोर्या उसना आणतो तसा कर्नाटकातनं उसना आणला आहे' इथवर चर्चा झाल्या. अभ्याने आणलेल्या दाण्याच्या चटणीची पाकीटं माझ्या ब्यागेत पडली, त्यातलं एक नाईलाजाने प्रशांतला द्यावं लागलं. चटणीबद्दल आभार मानले असता अभ्याने 'गप बस *ड्या' अशी खास सोलापूरी प्रतिक्रिया दिली.
पुढे सगळ्यांनी राजधानी गाठलं. राजधानीच्या अगदी समोरचाच रस्ता बघून ओककाकांना दाभोलकरांच्या आठवणीने भरुन आलं. पण एव्हाना आमच्या पोटात एव्हाना रेडे पळू लागल्याने स्वागतासाठी उभ्या असलेल्या टिळेकर्याकडनं टिळे लावून घेऊन आम्ही जेवणाच्या टेबलापाशी आलो. दाभोलकारांच्या आठवणींना उजाळा देणारी मंडळी येईस्तवर आम्ही हात धुवून आमरसाच्या वाट्या रित्या केल्या होत्या.
दमामिला अनाहितांच्या समवेत बसावं लागलं तिथेच त्याने आपण टका असल्याचा गौप्यस्फोट केला आणि हिंदी शिरीयलीच्या फ्याशनीनुसार अजयाकाकूंपासून सुरंगीतैपर्यंत सगळ्यांनी 'काय' असे उद्गार काढले. आमच्याकडली लोकं पानातला मुगाचा शिरा संपवण्यात गुंग असल्याने तिकडे काय चाल्लंय त्याच्याशी शष्प घेणं-देणं नव्हतं.
जेवणानंतर यत्ता दुशली ब च्या मुलांची सहल फुले संग्रहालयात गेली. दंबूकवाले डाक्टर येथे सोबत होते. ब्याट्याने हळुच्कन लायसन्स कसं मिळवायचं वैगरे माहिती काढून घेतली. भरल्या पोटाने आणि पेंगुळल्या डोळ्यांनी मंडळी आपापल्या घरी पोचली.
8 Jun 2015 - 4:12 pm | सूड
'ऑ अच्च जालं तल' वैगरे प्रतिक्रिया आधीच फाट्यावर मारण्यात आल्या आहेत.
8 Jun 2015 - 4:21 pm | दमामि
नाना कुठे गेले नाना? ( फडणविसांबद्दल बोलतोय) कुणितरी त्या तोतया दमामिवर गार पाणी ओतायचे होते.
8 Jun 2015 - 4:50 pm | सतिश गावडे
हे नाट्यमयता आणण्यासाठी लिहिले आहे असे समजतो आणि तुम्हाला माफ करतो.
अभ्या तीन डॉटवाला आहे.
चटणीच्या दोन पाकिटांपैकी एक पाकिट मी घेणार होतो आणि एक वल्लीला देणार होतो. तुमच्याकडे ते तात्पुरते ठेवण्यास दिले होते. मी मन मोठे करून माझे पाकिट तुम्हाला दिले. दुसरे पाकिट तुम्ही प्रशांतला दिले. आता वल्ली जेव्हा "माझे पाकिट मला द्या" म्हणेल त्यास तेव्हा काय सांगावयाचे?
येथे सुकांता किंवा दुर्वांकूर प्रमाणे अमर्याद आमरस नसल्याने विरस झाला.
8 Jun 2015 - 5:05 pm | सूड
त्यासाठी अभ्याचा सोलापूरी डॉयलॉक उपयोगात आणायचे ठरविले आहे, अर्धे पाकीट अुरले आहे. सांच्याला घेऊन जाअू शकता. नंतर शिल्लक न राहिल्यास मंडळ जबाबदार नाही.
9 Jun 2015 - 6:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बट बॅटमॅन डसन्ट नीड अ गन. ही डसन्ट किल.
9 Jun 2015 - 9:50 am | टवाळ कार्टा
हे मकेस ओथेर्स सुफ्फेर ;)