७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

अजया's picture
अजया in जनातलं, मनातलं
8 Jun 2015 - 10:09 am

दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता! मग पुढच्या दिड शतकी धाग्यात दोन कट्टे होतील इतपत काथ्या कुटुन प्रगती झाली!त्यात ७चा कट्टा अानंदी हाॅलला होणार म्हंटल्यावर शहाण्यासुरत्या;)लोकांनी कट्टयाची सूत्र हातात घेऊन तिसरा धागा काढला!त्यानुसार पाताळेश्वरला गप्पा आणि राजधानी थाळी नक्की झालं एकदाचं.मात्र कट्टयाला कोण कोण येणार हे मात्र गुलदस्त्यात होते.
सातला विशाखा पाटील अनिवासी पुणेकर असल्याने साडेदहाला दिल्या वेळेआधीच पाताळेश्वरला हजर!तिचा फोन आला आणि ती सोडुन कोणीच मिपाकर तिथे आलेले नसल्याची वार्ता तिने दिली!आम्ही (मी आणि माझा नवरा)डेक्कन जवळ पोहोचलोच होतो.तिला म्हंटलं आलोच आम्ही पाच मिनिटात.दोन अनाहिता भेटल्या तरी राॅकिंग कट्टा होऊ शकतोच ना;) पण त्यानंतर रितसर रस्ता चुकत आम्हाला जवळच्या अंतराला पोहोचण्यात अर्धा तास गेला.जाऊन बघतो तर मिपाकरांनी पाताळेश्वराचे प्रांगण भरलेले अाणि साक्षात नीलकांतनी कट्टयाला हजेरी लावलेली!एका वडाच्या झाडाखाली पारावर सर्व मिपाभुतं जमलेली!आम्ही यायला आणि युनिफाॅर्मातले गुरुजी जायला एकच गाठ पडली.ते गेल्यानंतर त्यांचे काही दु दु मित्र गणपती सरस्वती बारसं बाटल्या असं बोलत असलेलं ऐकलं बुवा!खखो वडावरचा मुंजा जाणे!
एक हिंदी भाषक काका कोण होते कळले नाही.एका बाजूला पारावर अोक काका आणि एक मिपाकर होते.ते नंतर दिसले नाहीत.त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.उत्साही विनायक देशपांडे काका नीलकांतशी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार मोडमध्ये होते.उपास आणि त्यांची सौ.,चिमी ,विशाखा पाटील एका झाडाखाली पारावर बसले होते.वल्ली दोन ग्रंथ हातात घेऊनच आलेले!चिनार,प्रशांत आणि एक्का काका बहुधा पुढल्या कटाची माहिती असल्याने सुहास्यवदनाने सगळ्यांशी गप्पा मारत होते! वात्रट कार्टी सगा ,सूड, टकाचे सोंग घेतलेला दु दु अभ्या(!)आणि एक डु आय डीचा डु आयडी बनलेला दमामि(म्हणे)यांचे कटकारस्थान सुरु होते.अभ्याला प्रत्यक्ष न पाहिल्याने तो टका बनून लाजत आणि लपत होता.अभ्या कुठे फेडशील हे पाप?=))
या सर्वात एक पाहाताक्षणी वात्रट दिसाणारे कार्टे दमामि नाव घेऊन वावरत होते!दमामि अाम्ही ओळखल्या असल्याने त्याची पंचाईत होऊन तो असंबंध्द उत्तरं द्यायला लागला.पण तेवढ्यात जोराचा पाऊस आल्याने सगळ्यांची पळापळ सुरु झाली.पाताळेश्वराच्या नंदी असलेल्या वर्तुळाकृती जागेत काही तर पलीकडे काही असे आपोअाप दोन ग्रुप पडले.धोधो पावसाने शत्रुपक्ष आणि आम्ही यामधला खंदक पाण्याने भरुन गेला;)
आता अलीकडे इ एक्का नीलकांत उपास अनाहिता आोक काका आणि पलिकडे उरलेले दु दु लोक्स!!तेवढ्यात भर पावसात भिजत सुरंगी ताईने येऊन बोलण्याची सूत्र हातात घेऊन सर्वाना गप्प करुन टाकले!नीलकांतला सर्वांनी इतकी सजेशन देऊनही न कंटाळता प्रत्येकाशी संवाद सुरु होता.तेवढ्यात ओककाकांच्या हातावर बांधलेला दोरा तुटला!तो वेड्या बहिणीची रे वेडी माया म्हणत सुरंन्गीताईने बांधुन दिला.तिथे असलेल्या एका वात्रट अनाहितेला दोरा का नाडी हा प्रश्न आवरला नाही असे ऐकले,ख.खो. नंदी जाणे=))(ओककाका ह. घ्या हो!तुमच्या ज्ञानाचा आदर आहे.)
तेवढ्यात बॅटमॅन हजर झाल्याने खंदका पलिकडची कूमक वाढली!मग या सर्वांचा समाचार घ्यायला मी आणि विशाखा खंदक ओलांडुन डायरेक शत्रुपक्षात एन्ट्री मारली!
तिथे शहाण्या अभ्याने हळूच मी टका नाही,पैचान कौन करुन कन्फुजन वाढवले आणि मग तो अभ्या आहे असे सांगीतले.तरी वाटतंच होतं एवढा शहाणा दिसाणारा मुलगा टका कसा=))
त्यामुळे दमामिची उलटतपासणी सुरु केली!दमामि नाहीच पण साक्षात टवाळ असे चेहेर्यावर छापलेला हा कोण हे कळणार तोच बाकीचे नेमस्त पक्षीय पण खंदक ओलांडुन जमा झाले.मधेच मृत्युंजय हजेरी लावुन गेले.गप्पा सुरु असताना अचानक एक दुबईवासी कुटुंब तिथे आले.ते गृहस्थ स्वतः मिपाकर आहेत.समोर जमलेला ग्रुप बघुन चौकशी करता हा मिसळपावचा कट्टा असल्याचे कळल्याने ते आवर्जून भेटायला आले.जय मिपा!
आता सगळ्याना जेवायला जाण्याचे वेध लागलेले.दंबुकधारी बाबा पाटलांना राजधानीला यायला सांगुन बाकीच्यानी राजधानीकडे कूच केले.इथे नीलकांतने मात्र सगळ्यांचा निरोप घेतला.
राजधानीला आल्यावर कटात सामिल लोकांनी सो काॅल्ड दमा मि ला अनाहितांत बसवल्याने चोरुन लपुन वावरणार्या,अनाहितांना न घाबलणार्या टकाचे सोंग उघडे पडले!!त्याची जेवताना मग अनाहितांनी प्रेमळ विचारपूस केली,महत्त्वाचे सल्ले दिले;) टक्याच्या वधू संशोधनाबाबत काही चिंतन करण्यात अाले.समस्त दारु आवडणार्या अविवाहित मुलींना टक्यासाठी मागणी घालण्याच्या विषयावर चर्चा केल्या गेली!या सर्व चिंतनमननानंतरही शिल्लक राहिलेल्या टक्याला सुरन्गी ताई स्वतःबरोबर गाडीने नेऊन लां....ब सोडायला रिक्षात घालून घेऊन जाताना बालके सूड सगा यांनी त्याला साश्रु नयनांनी निरोप दिला.कल्जी घ्यायला सांगीतली.ते भावविभोर दृश्य बघून उरलेल्यांचे ड्वाले पानावले:(
टकाचा बंदोबस्त करुन बाकीची मंडळी सूड सगा वल्ली एक्का काका वाल्गुद महाशय विशाखा आणि श्री व सौ अजया महात्मा फुले म्युझियम जवळच असल्याने बघायला गेले.तिथे इ. दुशली ब च्या मुलांसाठी असलेल्या वस्तू बघुन कट्टयाची सांगता झाली!
ता.क:ज्या दिपक_कुवेत यांच्या आगमनार्थ कट्टा होणार होता ते या कट्टयाला न येता आदल्या दिवशी पक्षी तीर्थ कट्टा करुन रविवारी निमुटपणे तुळशी बागेत गेले.यावरुन सर्व काही ध्यानात आले आहे;)सहानुभूती दाखवल्या गेली आहे!

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानाट्यपाकक्रियाइतिहासबालकथाबालगीतविडंबनम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीविनोदसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलज्योतिषसामुद्रिकराजकारणमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

9 Jun 2015 - 7:38 pm | बॅटमॅन

बट ही लव्ह्स इन्फार्मेषण. ऑफ एणी काईण्ड.

दमदार पुणे कट्ट्याचे जोरदार फोटो आणि वर्णन वाचून/पाहून खल्लास झाल्या गेले आहे !

उपास's picture

8 Jun 2015 - 4:16 pm | उपास

इतके वर्ष मिपावर असून मिपाचा पहिलाच कट्टा जमवता आला, खूप मजा आली सगळ्यांना प्रत्यक्ष भेटून.. निलकांतची भेट हा विशेष सुखद धक्का होता.. माझ्याकडे कुणाचेच नंबर नसल्याने थोडा साशंक होतो पण झालीच भेट वेळेवर :)
वृत्त्तांत जोरदार.. फोटोसुद्धा जबरीच.. जे कट्ट्यासाठी हजेरी लावू शकले त्यांना धन्यवाद आणि ज्यांनी (कुठल्याही कारणाने) दांडी मारली त्यांना टुकटूक :)

स्रुजा's picture

8 Jun 2015 - 4:31 pm | स्रुजा

काय पण वर्णन !! हाहाहा.. दमामि आयडी चं रहस्य सुटलं म्हणायचं ;)

यशोधरा's picture

8 Jun 2015 - 5:12 pm | यशोधरा

सगळेच वृ मस्त!

वा! वा!! कट्ट्याचे वर्णन आहे की लढाईचे!
मजा वाटली. सर्वांचे फोटू पाहून धन्य जाहल्या गेले आहे.
राजधानी हाटेल नव्याने उघडलेले दिसते. शिवाय ताटांचे फोटू मला लंबगोलाकार दिसतायत.
पावसामुळे कट्ट्यांना काहीही फरक पडत नाहीसे पाहून बरे वाटले.

शाह काकांनी त्यांची स्केचेसची फाइल आणली होती. खुपच छान स्केचेस होती..

कविता१९७८'s picture

8 Jun 2015 - 5:53 pm | कविता१९७८

मस्त वृतांत अजया, कट्टाही जबरी झालेला दिसतोय

विशाखा पाटील's picture

8 Jun 2015 - 5:58 pm | विशाखा पाटील

मस्त वृत्तांत!
मी लेण्या कम मंदिरात पोहोचले तेव्हा शरदकाका आलेले होते. ते माझ्याकडे अन मी त्यांच्याकडे फक्त बघत होतो. कंटाळून मी बागेत आल्यावर पाठोपाठ शरदकाका आले आणि 'मिपाकर का?' असे विचारले. मग आमचा कट्टा सुरू झाला. तेवढ्यात कपाळावर गंध लावलेली, डोक्यावर टोपी असलेली, धोतर नेसलेली एक बटूमूर्ती सुहास्य वदनाने तुरूतुरू चालत आली. 'मला ओळखा पाहू?' असा प्रश्न विचारताच त्यांना विनाविलंब उत्तर देण्यात आले. ५ मिनिटातच तो आत्मा गायबला.
एव्हाना भारतीय प्रमाण वेळ पाळणाऱ्या मंडळींचे आगमन होऊ लागले होते. श्री. आणि सौ. शहा यांचे विशेष कौतुक वाटले. त्यांच्याशी बोलायला थोड्या वेळाने तिकडे मोर्चा वळवू, असे ठरवत असतानाच पावसाची एन्ट्री झाली. पावसाचा वेग इतका वाढला की दुखुर उधळत नंदीच्या खुरांपाशी आश्रय घ्यावा लागला. त्यांना भेटायचे राहून गेले, याची हळहळ वाटतेय.
उत्सवमूर्ती आणि येणार, येणार म्हणून दवंडी पिटणारे काही जण गैरहजर होते.

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 6:07 pm | टवाळ कार्टा

बाकीचा वृत्तांत पुस्तकात छापणार कै? ;)

विशाखा पाटील's picture

8 Jun 2015 - 7:10 pm | विशाखा पाटील

नै रे, मी फक्त गाळलेल्या जागा भरल्या. तुझा वृत्तांत लवकर टाक बरं.

संदीप डांगे's picture

8 Jun 2015 - 7:20 pm | संदीप डांगे

हैला... इत्ता सब हुवा आउर वो पनीर.कुवेत दिकैच नै बावा...

लोग बी सुम्मडीमें कट्टेका टायटलकोईच फाटेपे मारके गुपचूप है..

सतिश गावडे's picture

8 Jun 2015 - 7:49 pm | सतिश गावडे

पनीर.कुवैत हमारे साथ आये थे मिया. बोले, धन्यामिया मेरेको पनीर नै होना. फिर इत्ता इत्ता फिश फ्राय आऊर प्रान्स दबाया.

संदीप डांगे's picture

8 Jun 2015 - 8:32 pm | संदीप डांगे

अच्छा. वो छे तारिक के कट्टेमें थे क्या...? मेरकू लगा छे अउर सात दोनोमे रेनेवाले थे क्या... आय माय स्वारी बरंका.. वो फटू नै दिक्या उनका... इस्लिये वाईच चवकशी कर्‍या..

स्वाती दिनेश's picture

8 Jun 2015 - 7:42 pm | स्वाती दिनेश

कट्टा,कट्ट्याचा वृत्तांत,फोटो सगळेच टॉप..
(स्वगत-इनोची बाटली संपली.. आता??)
स्वाती

सानिकास्वप्निल's picture

8 Jun 2015 - 7:45 pm | सानिकास्वप्निल

वाह! दमदार कट्ट्याचा खुमासदार वृतांत आवडला
फोटो पण मस्तं, मज्जा आली वाचताना :)

मस्त कट्टा वर्णन अजया!छान मज्जा केलेली दिसतीये.

अमितसांगली's picture

8 Jun 2015 - 8:06 pm | अमितसांगली

केरळमध्ये उभ्या पावसात जळायला लागलोय...

केव्हापासून होतंय हे असं?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 7:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

इनोने अंघोळ करा.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

8 Jun 2015 - 8:41 pm | ईश्वरसर्वसाक्षी

टका भौ तो किसी भी फोटो मे दिखाइच नही.

खटपट्या's picture

9 Jun 2015 - 6:50 am | खटपट्या

फोटो क्र. ४,५,६ नजरेखालून घालावे. दर्शन होईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 8:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तनमननानंतरही शिल्लक राहिलेल्या टक्याला सुरन्गी ताई स्वतःबरोबर गाडीने नेऊन लां....ब सोडायला रिक्षात घालून घेऊन जाताना बालके सूड सगा यांनी त्याला साश्रु नयनांनी निरोप दिला.

_/\_ तेथे कर माझे जुळती.
बाकी सगाला अश्रु आलेले का आनंदाश्रु आलेले हे प्रत्यक्ष भेटीत कळेल. मजा मिसली एवढं मात्र खरं :(

प्रचेतस's picture

8 Jun 2015 - 8:52 pm | प्रचेतस

तू लेका पुण्यातल्या एकाही कट्ट्याला येत नाहीस. दुत्त दुत्त.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 8:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यनि करतो.

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 9:18 pm | टवाळ कार्टा

व्यनी करा असे लिहायचे अस्ते =))

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 9:19 pm | टवाळ कार्टा

पिंचि पुण्यात नाही??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 9:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही.

बहारदार कट्टा वृत्तांत आणि फोटो!! राजधानी नविनच सुरु झाले आहे असे वाटत आहे. थाळीचा आकारही कल्पक आहे.

प्रचेतस's picture

8 Jun 2015 - 10:51 pm | प्रचेतस

३/४ वर्षे झाली राजधानी सुरु होऊन. सुकांताची सर नाही पण.

काळा पहाड's picture

8 Jun 2015 - 11:18 pm | काळा पहाड

छ्या! पुणं पुर्वीचं राहिलं नाही

जुइ's picture

9 Jun 2015 - 12:05 am | जुइ

नाहीतर पुढिल भारत भेटीत इथे जायचा विचार होत ;-)

शशिकांत ओक's picture

9 Jun 2015 - 12:19 am | शशिकांत ओक

आज कट्टा भेटीचा धावता आढावा प्रत्यक्षापेक्षा उठावदार होता. कट्ट्यावर पडलेल्या पावसाने हजेरी लावत मिपाकरांच्या आनंदात सहभागी मी ही आहे असे दाखवून दिले...!

श्रीरंग_जोशी's picture

9 Jun 2015 - 6:19 am | श्रीरंग_जोशी

लै मजा केलेली दिसत आहे कट्टेकर्‍यांनी. मिपामालकांना बर्‍याच वर्षांनी कट्ट्यात सामिल झालेलं पाहिलं.
फोटोजही आवडले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 6:31 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

१००.
धाग्याची १००री झाल्याबद्दल अजया तैंना दात उपटायचा चिमटा, टकाचा पत्ता आणि कडक बुंदीचे लाडु देउन सत्कार करणेत येत आहे =))

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 7:24 am | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या ह्या ह्या =))))))

स्वीत स्वाति's picture

9 Jun 2015 - 9:15 am | स्वीत स्वाति

बाकी वर्णन मस्त

मी मिस् केला हाही कट्टा...

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2015 - 9:52 am | टवाळ कार्टा

=))

झकासराव's picture

9 Jun 2015 - 10:10 am | झकासराव

दमदार झालाय की कट्टा. :)

पैसा's picture

9 Jun 2015 - 10:19 pm | पैसा

कं लिवलंय! कं लिवलंय!

वा वा! अनाहितांच्या लाडोबाला लांSSSब सोडल्याची कथा श्वास रोखून वाचली. दोडोबांनी अशी काय संधी न देता य: पलायते स: जीवति! असे म्हणत सूंबाल्या ठोकला भौतेक!

यग्झॆक्टली त्याच वेळेला रत्नांग्रीत एका नवरा नवरीला अक्षता फेकून मारत असलेने दूरध्वनी करून टका आणि बॆट्याची चौकशी करू शकले नाही. मात्र अजया आणि विशाखा यांणी ते काम चोख बजावले असे कळते.

काही लोकांना दुसर्‍यांची चवकशी करायची उगीच हौस असते. जरा लोकांना मोकळं सोडा की! ;-)

पैसा's picture

9 Jun 2015 - 11:13 pm | पैसा

ते हौसेने चवकशी करायचं काम फक्त पुणेकरांचं. मी फक्त खास खास लोकांची चौकशी करते.

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2015 - 12:28 am | टवाळ कार्टा

आब्बां??? अब मई खासंम खास बन गयां???

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 11:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही सूड आणि सगाजीराव वाकडे ह्यांना विसरलात असं नम्रपणे लक्षात आणुन देतो.

पैसा's picture

9 Jun 2015 - 11:14 pm | पैसा

ते दोघे पुण्यात हरवायची शक्यता नै!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 11:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हणुन चौकशीचं नाही करायची :O!!!

बाकी तुमचे धनकवडी आय.बी.एम. जवळ कोणी नातेवैक आहेत का हो? एक पत्ता विचारायचा होता. =))

पैसा's picture

9 Jun 2015 - 11:20 pm | पैसा

आमच्याकडे पत्ते सांगायचे पयशे घेत नैत!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 11:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धनकवडी आयटी पार्कमधे आयबीएम कुठे आहे ते सांगतील का ते जरा? एका मित्राला पुढच्या वेळी टेंपोत बसवुन तिकडे धाडायचाय. :)

पैसा's picture

9 Jun 2015 - 11:34 pm | पैसा

टेंपोत बसवायला मदत लागली तरी बिनधास सांगा!

गरजू पाटिल.'s picture

10 Jun 2015 - 7:46 pm | गरजू पाटिल.

एकूनात कट्टा एकदम सोलिड झालेलाय. अजयातै अन॑ सुडाचे वृत्ता॑त एकदम ईशय इषेश, एक्का काक्का॑चे फोट्टॉवृत्त गोडात आन्हिक गोड ...... बाकी, लोक्स ओलखू येव लागलेत फोटुतन॑.. पुण्यातल्या म्होरल्या कट्ट्याला यायला आवडेल. बेत चा॑गलय, अजयतैचा फोटो पावसात जळायासाठी टाकल्याचे वाट्टे.

प्रीत-मोहर's picture

10 Jun 2015 - 8:28 pm | प्रीत-मोहर

सहीच झालाय की कट्टा!!!

देशपांडे विनायक's picture

11 Jun 2015 - 6:47 pm | देशपांडे विनायक

७ च्या कट्ट्याची सफलता
पाताळेश्वर मंदिराच्या आवारात वडाची झाडे आहेत . भली मोठी आहेत
त्या झाडाच्या छायेत मिपा चा कट्टा सुरु झाला
आणी थोड्या वेळात पाऊस आला
आणखी थोड्या वेळाने त्याने रूद्र रूप धारण केले
मंडळी वडाचा आडोसा सोडून गाभारा गाठू लागली
पण चार पाच जण तेथेच राहिले
एकाला जाताच येणार नव्हते
दुसरा तर त्याला कोणत्याच परिस्थितीत साथ न सोडण्याचे वचन देऊन बसलेला
पावसाने आणखी जोर वाढवला
झाडाखाली थांबलेले भिजत होते पण त्या दोघांना सोबत करत होते
पण पाऊस लवकर थांबेल असे वाटेना
आणि मग मात्र
व्हील चेअर ढकलून नेण्यासाठी आणि पायऱ्या वरून ती उचलण्यासाठी
त्या दोघांना तो मदत करू लागला
मी गाभाऱ्याकडे मोर्चा वळवला तो THANKS म्हणण्यासाठी
माणुसकीचे दर्शन झाल्यावर दुसरे काय करावयाचे ?

सतिश गावडे's picture

11 Jun 2015 - 6:59 pm | सतिश गावडे

छान प्रतिसाद. सेंटी कर दिया देशपांडे काका आपने.