आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/31745
कमुंची माफी मागून
--------------------------------------------------------------------------------------------
"तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतोय" त्याच्या पोटाच्या घेराने कच्चकन आवळून सांगितलं आणि टीव्हीवर "ये तो बडा टॉइंग है" बघत असलेल्या त्याला इलॅस्टिक काचत गेली. तो सुन्न होऊन स्वतःच्या पोटाकडेच पाहत होता.
शेजारच्या बेडरूममध्ये अती ताणल्याने फाटलेली "रूपा" पायपुसण्याबरोबर बाहेर आली आणि बरंच काही सांगून गेली.
अशी (पर्फ़ेक्ट फ़िटिंगची आणि स्टाईलची) निवड करता येते? दोन्हीपैकी एक? आणि ती निवड करायचा हक्क (वाढलेल्या पोटामुळे) मला आहे? आणि "आराम का मामला" निवडायचे मग "अपना लक"चं काय करायचं? (कंबर त्यात बसून आजूबाजूने मैदा बाहेर न येणे) कसं शक्य आहे? आणि निवडलं तरी हे (इलॅस्टिक तुटणे) इथेच थांबेल? पूर्वी थांबलंय? (तेव्हा कदाचित पट्ट्यापट्ट्याने वाचवले एका पिढीला...आणि त्याच्या आधी धोतराने...एकदम हवेशीर)
त्याचं पोट गुरगुरू लागलं. क्षणाक्षणाला विस्फोट होत होते. टीव्हीत टिपेला पोचलेलं "वैद्य पाटणकर शारंगधर काढा" त्यात भर घालत होते. तो फ्लॅटच्या गॅलरीमध्ये मोकळ्या हवेत हवा मोकळी करण्यासाठी आला..
"इनर पीस.. इनर पीस" ग्यालरीत त्याचे पोट त्याला "अंदरकी बात" शिकवत होत.
"एक्झॅटली! हेच तर हवं आहे."
१ ल्या मजल्यावरून समोरच दिसणार्या "सुलभ" दृश्याकडे बघत त्याच्या मनात विचार आला. त्याने खाली डोकावून पाहिलं तर पोटात शांतता होती
आणि
"इनर पीस ..इनर पीस" पुटपुटत त्याने स्वतःला किचनमध्ये झोकून दिले.
प्रतिक्रिया
23 Jun 2015 - 1:29 pm | पैसा
मला वाटलं तू गंभीर लिहायला लागलास का काय! आता मिपाचं आणि गुर्जींच्या तांब्याचं काय होणार म्हणून जरा कल्जीच पडली होती! पण नाही!! तू निराश केलं नाहीस!
23 Jun 2015 - 1:33 pm | टवाळ कार्टा
आम्ही अता तांब्या लांब ठेव्लाय (ऐच्छिक व्हिआरेस आहे)
23 Jun 2015 - 2:34 pm | खटपट्या
याऐवजी "त्याने स्वतःला शौचालयात झोकून दीले" असे असते तर तांब्या टच आला असता.
असेही मस्त जमले आहे.
23 Jun 2015 - 2:59 pm | टवाळ कार्टा
हात आवरला...आणि तसेही हवा मोकळी झालेलीच =))
30 Jun 2015 - 10:25 am | जडभरत
ईईईईईईईईईईईईईईईईईईश्श्श्ष्श्श्श्श्श्ष्ष्श!!!!
हा ड्वायलॉक म्हणताना गोलमाल मधील उत्पल दत्त आठवावा१
23 Jun 2015 - 1:36 pm | स्पा
नय जम्या
23 Jun 2015 - 2:03 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टू पां डुब्बा!
सदर जिल्बी एकसंध पडलेली नाही. ;-)
बरेच कुंथावे... आपलं ते हे..मूळ कथेत गुंतावे लागलेले दिसत आहे.
23 Jun 2015 - 1:51 pm | उगा काहितरीच
मागे कुठल्या तरी लेखावर वाचले होते वर्णन तीन चमचे कायम चूर्ण खाल्ल्यावरचे.
23 Jun 2015 - 2:00 pm | तिमा
तिकडे सगळं स्पष्ट होतं, पण इथे पीस की पिस हे कळल्याशिवाय प्रतिक्रिया देता येणार नाही.
23 Jun 2015 - 2:30 pm | दमामि
नाड़ी असेल तर पिस, इलॅस्टिक असेल तर पीsssssस.
हाकानाका.
23 Jun 2015 - 2:32 pm | टवाळ कार्टा
खिक्क...बाकी नाडी कधीही चांगली...अॅडजस्टेबल असते...पण तुटल्यावर घोळ होतो =))
23 Jun 2015 - 2:56 pm | दमामि
जरा विवेक बुद्धिने विचार करा, नाडीच्या भविष्यात काय योग आहे ते कसे कळणार? आत गेली तर? म्हणून इलॅस्टिकचे महात्म्य अधिक आहे.
अनुभवी दमामि.
23 Jun 2015 - 2:39 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
23 Jun 2015 - 2:52 pm | सूड
Piece, Peace, Peas की पिस (feather, feather!!) हे टायटल वाचून कळलं नाही.
नायकाने रुपा आणि अपना लक पेक्षा जॉकी किंवा बेनेटन वापरली असती तर हे असले इलास्टिक तुटण्याचे प्रकार घडले नसते.
आणि तोंडाला आवर घालून ती ऊर्जा वजने उचलण्यात वापरली असती तर मैदाही जमा झाला नसता.
24 Jun 2015 - 12:06 pm | खटपट्या
कीती परखड मत ..!!
24 Jun 2015 - 12:14 pm | स्पा
ख्याक
25 Jun 2015 - 10:20 am | टवाळ कार्टा
"जास्त Peas खाल्ले आणि जर पोटाला असणारा Piece करकचून बसला असेल तर Inner Peace शोधायला आधी पाचव्या खोलीत* जाउन पिसासारखे हलके होउन यावे" हाच संदेश द्यायचा होता. ;)
*अधिक माहितीसाठी कृपया उ.न.क.संस्थापक व अध्यक्ष श्री.आदि जोशी यांच्याशी संपर्क करावा :)
24 Jun 2015 - 11:54 am | एक एकटा एकटाच
हा हां हा.........
खतरनाक
24 Jun 2015 - 5:09 pm | मुक्त विहारि
मस्त...
24 Jun 2015 - 7:53 pm | वेल्लाभट
वाह ! पीसफुल
29 Jun 2015 - 6:29 pm | जडभरत
"शेजारच्या बेडरूममध्ये अती ताणल्याने फाटलेली "रूपा" पायपुसण्याबरोबर बाहेर आली आणि बरंच काही सांगून गेली."
समस्त भारतीय कुटूंबात इनर वेयरचा अंतिम उपयोग काय होतो हे अतिशय चलाख निरीक्षण लेखकाने नोंदविले आहे. त्यांच्या निरीक्षण शक्तीचे कौतुक करावे तितके कमीच!
29 Jun 2015 - 6:32 pm | सूड
त्या कॉमन मॅनसारख्या असल्या तर!! सुपरमॅनसारख्या असल्या तर केराच्या टोपलीत टाकण्यावाचून गत्यंतर नसतं. =))
30 Jun 2015 - 11:36 am | टवाळ कार्टा
खिक्क
30 Jun 2015 - 12:50 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))