इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही.
चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो.
हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
प्रतिक्रिया
8 Sep 2015 - 4:50 pm | नाखु
शनीवारी टाकला असता तर आत्तापर्यंत ५० तर नक्कीच झाले असते.
अभामिपापुनवाआमुशसार्ख्याच्सम्जणाराभोळ्याचिमणाच्यादोस्त्दातरूचामित्रबॅट्याचास्नेहीबुवांचा फॅन नाखुस भाजीपाला
8 Sep 2015 - 4:51 pm | जेपी
आवडीचा विषय -
तुळजापुर ला गेलात तर मटण जरुर खावे,
एखाद्या मराठा मित्राच्या घरी .
त्रिखंडात मिळणार नाही.
आठवुण तोंड पाणावले.
8 Sep 2015 - 4:55 pm | विशाल कुलकर्णी
यस्स स्पेशली बोकडच ! लै जबरा चव असती. त्याबरोबर गरमागरम शेरवा (रश्श्याला आमच्या भागात शेरवा म्हणायची पद्धत आहे) नुसता ओरपायचा.
12 Sep 2015 - 2:02 pm | अभ्या..
उमरग्याच्या जवळ खस्गी (कसगी) म्हणून गाव आहे. तिथे बाजार मटन असते. मंगळवारच्या बाजाराच्या दिवशी ते दुकान उघडते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ६ ते ७ बोकड पडतात. एक पाल असते. अॅल्युमिनियमच्या थाळीत रस्सा अन भाकरी हाणायसाठी फोर व्हीलरवाल्यांची पण गर्दी असते. कंदुरीची आठवण करुन देणारी अस्सल माराठवाडी मटणाची टेस्ट.
12 Sep 2015 - 7:19 pm | जेपी
कसगीवाल्यांन एक शाखा लातुरात पण चालु केलती.फ्रेंचायझी टाईप.सुरुवातीला चव चांगली होती पण नंतर बंद पडल.
13 Sep 2015 - 11:31 pm | बोका-ए-आझम
सेक्टर ४३ मध्ये असलेला दीपक ढाबा. त्याचं बटर चिकन आणि मलाई मटन खायला प्रचंडच गर्दी असते. आम्हाला एक तास वाट पाहिल्यावर मिळालं आणि तेही पार्सल घेऊन यावं लागलं. तिथे बसून खायला जागाच नव्हती.
8 Sep 2015 - 4:58 pm | जेपी
पुण्यात मिळणार बोल्हाईचे मटण हा आजपर्यंत न कळलेला प्रकार आहे.
कुणी खुलासा करेल का ?
8 Sep 2015 - 5:01 pm | विशाल कुलकर्णी
मेंढीचे मटण म्हणजे बहुतेक बोलाईचे मटण.
8 Sep 2015 - 5:02 pm | बबन ताम्बे
.
8 Sep 2015 - 5:04 pm | सौंदाळा
खुप पुर्वी फक्त बोल्हाईचेच मटण खाणार्या एका मित्राने सांगितले होते.
ज्या लोकांची कुलदेवी क्षक्षक्ष असते (देवीचे नाव आता लक्षात नाही म्हणुन क्षक्षक्ष लिहिले आहे) त्यांना बोकडाचे मटण निषिद्ध असते अशी समजुत आहे. म्हणुन ते बोल्हाईचे मटण खातात.
8 Sep 2015 - 5:15 pm | अनिरुद्ध.वैद्य
शेळी, मेंढी का बकरी … काय फरक पडतो? खावा की ;)
बाकी बोकडाचे मस्त असते. नागपुर ट्रीपमध्ये एक संध्याकाळ खास सावजी बोकड मटणासाठी असते :)
9 Sep 2015 - 9:15 pm | लालगरूड
बोल्हाई ही मेंढी ची जात आहे. एकदम चविष्ट बोकडापेक्षा...
8 Sep 2015 - 5:03 pm | विशाल कुलकर्णी
पुण्याच्या आसपासचे काही फारसे माहीत नाही. सोलापूरातुन हैदराबादकडे जाताना हैदराबाद रोडवर एक 'चाचा'चा धाबा आहे. त्याच्याकडे मटणाचे लोणचे मिळते. लै कातिल प्रकार असतो तो.
8 Sep 2015 - 5:11 pm | अनिरुद्ध.वैद्य
आमच्यासारख्या लोकांकडे पाहून खुश व्हा. आमच्या घरात फक्त अंडच (कोंबडीचच) खायला चालत :(
सदासर्वकाळ बाहेरचेचा मटणखाऊ
8 Sep 2015 - 5:34 pm | बाबा योगिराज
आईच्या हातच काळ्या वाट्नातल मट्न येक लम्बर. आहा हा हा...
.
.
निस्त्या आट्वनिन त्वंडाला पानी सुट्ल.... (स्मा. क.)
.
.
.
------ धा ठिकानी तर्री वरपनारा बाबा.
8 Sep 2015 - 6:03 pm | अनिरुद्ध.वैद्य
:D
8 Sep 2015 - 5:44 pm | विशाल कुलकर्णी
पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं मस्ट आहे मटण हाणायला :)
8 Sep 2015 - 6:21 pm | प्रसाद गोडबोले
इथे आमच्या चिंचवड साईडला सगळे बोल्हाई च बनवतात , त्यात मजा येत नाय राव . तुमच्या माहीतीत पुण्यात कोठे भारी मटन मिळणारे हॉटेल असल्यास कळवा ... श्रावण संपला की भेटुच !
8 Sep 2015 - 6:26 pm | होबासराव
बोकड मस्ट्..आणि तर्रि..प्लिज कळवा
8 Sep 2015 - 6:45 pm | बाबा योगिराज
चांदणे चौकातुन पिरंगुट कडे जाताना डाव्या हाताला तलाव लागतो...... तलवाच्या फुडच (डाव्या हातालाच) गारवा नावाच हाटिल हाये. येक लम्बर मटन मिळत. हांडी (भांड) न देता कुकर मध्ये शिजवून डायरेक्ट कुकरच पुढ्यात आणुन ठेवतील.
काळ्या रश्यातल मटन / चिकन वाह......... लय भारी. झक्कासच.
.
.
.
.
संध्याकाळचा नजारा पन झक्कासच....
9 Sep 2015 - 12:24 am | गणामास्तर
इथे आमच्या चिंचवड साईडला सगळे बोल्हाई च बनवतात
असे काही नाही. 'पन्हाळगड','राजवर्धन' ला बोकडाचं सुद्धा मिळतं.
9 Sep 2015 - 12:12 pm | प्रसाद गोडबोले
पन्हाळगड ला जाऊन आलोय , फारच सर्वसामान्य मटण होते , काही मजा आला नाही राव
9 Sep 2015 - 1:59 pm | गणामास्तर
राजवर्धन ट्राय करुन पाहा एकदा..चांगली आहे त्यांची चव.
बनवा प्लॅन, आम्ही येउचं.
27 Oct 2015 - 11:10 pm | प्रसाद गोडबोले
नुकताच राजवर्धन ला जाऊन आलो ... एकच नंबर मटन आहे !!
30 Oct 2015 - 2:59 pm | राजेंद्र मेहेंदळे
बागबान किंवा ब्लु नाईल मधे खाउन बघा एकदा
2 Nov 2015 - 5:01 pm | लई भारी
ब्लु नाईल काय झेपल नाही राव! आणि बागबान मध्ये आत एन्ट्री मिळायची मारामार, विशेषतः विकांताला, त्यामुळे बरेच दिवस इच्छा राहिलीय!
2 Nov 2015 - 5:08 pm | बॅटमॅन
ब्लू नाईल ओक्के आहे. लई भारी वाटलं नाही.
बागबानमध्ये तर एकटा असताना प्रवेशच नै दिला, म्हणे सिंगल नॉट अलाउड. गेलात उडत म्हटलं मग, इतर लय हाटेले आहेत.
2 Nov 2015 - 5:26 pm | अभ्या..
हाटेल मालक बच्चनच्या बागबानचा लै चाहता दिसतोय. बच्चनचा एकटेपणा बघवला नसेल रे . ;)
2 Nov 2015 - 5:35 pm | बॅटमॅन
अगदी अगदी =))
2 Nov 2015 - 9:23 pm | टवाळ कार्टा
WTF
2 Nov 2015 - 9:27 pm | अभ्या..
काय डब्ल्यु टी एफ बे?
वाटतो तुला फुकट ? की वाईन टक्याला फुकट?
2 Nov 2015 - 9:30 pm | प्यारे१
प्रगो सारख्या 'संवेदनशील मनाच्या लेखकास' शब्द बोचतील बरं.
संदर्भ - फ*****
2 Nov 2015 - 9:52 pm | टवाळ कार्टा
रुचीहिन प्रतीसाद =))
3 Nov 2015 - 4:18 pm | कपिलमुनी
फ***** = फकीरचंद
*दरचो* = चादरचोर असे वाचावे
3 Nov 2015 - 4:22 pm | टवाळ कार्टा
=))
2 Nov 2015 - 9:50 pm | टवाळ कार्टा
वाईच तु फूट
3 Nov 2015 - 12:58 pm | मालोजीराव
मटण टकाटक आणि मटण कराची झाक आहेत बे, ट्राय कर
3 Dec 2016 - 12:45 pm | विनटूविन
टेस्टलेस असते ते
8 Sep 2015 - 5:54 pm | द-बाहुबली
ना खाऊंगा , ना खाने दूँगा च्या औचित्यावर हा धागा आहे की ...विडबंन आहे.. जे काही आहे एक सणसणीत चपराक आहे.
8 Sep 2015 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
नाय ओ ! तुमी ह्ये वाच्लं नाय कां ?
7 Jan 2019 - 3:56 pm | वपाडाव
पंख लागले त्या धाग्याला
7 Jan 2019 - 7:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
पंख नाय लागले. त्याचा पत्ता थोडासा बदलला आहे. :)
https://www.misalpav.com/node/32647 इथे आहे ते.
मिपा सिक्युअर सर्वरवर गेले आहे. त्यामुळे सगळे जुने दुवे http:// ऐवजी https:// ने सुरु होतात.
जुन्या दुव्यांत तेवढा s टाकला की ते लेख दिसू लागतात.
8 Sep 2015 - 6:08 pm | बोका-ए-आझम
राजस्थान-हरयाणामध्ये मिळणारं लाल मास हापण एक खल्लास प्रकार. काहीतरी वेगळाच मसाला असतो पण लागतं खल्लास. जैसलमेरसारखं अफाट वाळवंट, शेकोटी, टिपिकल राजस्थानी कडक रोटी अाणि गरमागरम लाल मास हा खास थंडीत अनुभवण्याचाच प्रकार आहे.
9 Sep 2015 - 12:22 pm | विशाल कुलकर्णी
मागच्याच आठवड्यात खाल्लं लाल मास. कोट्यात होतो आठवडाभर. दोन-तीन वेळा खाल्लं. आणि मग आठवलं श्रावण चालु आहे ते ;)
9 Sep 2015 - 1:07 pm | सुयशतात्या
कोट्यात लै भारि जेवण मिलते राव..
12 Sep 2015 - 11:21 am | बोका-ए-आझम
हे दोन्हीही एकाच देवाने निर्माण केलेले आहेत. तस्मात दाने दाने पे किंवा पीस पीस पर लिखा है खानेवाले का नाम असे म्हणावे आणि लाल मास हाणावे!
8 Sep 2015 - 6:37 pm | अत्रुप्त आत्मा
:-D :-D :-D
==================
समां तर :- पुढिल भाग- टनाटन मटन ! :P
8 Sep 2015 - 6:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मटण खात नाही तस्मात पास. पण चिकन, मासे आणि अंड्याचे उत्तम प्रकारही शेअर कराचं इथे.
8 Sep 2015 - 6:53 pm | आदूबाळ
ग्रीक मटणाची पाकृ नसल्याने धाग्याचा णिशेध.
8 Sep 2015 - 7:50 pm | प्रसाद गोडबोले
ग्रीक मटनाची पाककृती ब्यॅटुअण्णां कडे मिळु शकेल =))
8 Sep 2015 - 9:57 pm | बॅटमॅन
ट्रोजनकालीन ग्रीक मटण तसे शिंपलच दिसतेय असे होमरबाबांच्या वर्णनातून जाणवते. मटणापेक्षाही ते लोक्स बीफ जास्त खात. बैल मारायचा, मोठ्या शेकोटीवर सळया त्याच्या पीसेसमधून आरपार घालून सरकवायच्या , विस्तवावर ते चहूबाजूंनी शेकून घ्यायचे आणि ते बीफ कबाब वाईन व ब्रेडसोबत हाणायचे अशी वर्णने आहेत. नेस्टॉरच्या पायलॉसमधील राजवाड्याच्या मेन रूममध्ये अशी एक शेकोटी होती जिथे मेजवानीच्या वेळी तरणे राजपुत्र जसे लागेल तसे पीसेस भाजून घ्यायचे असे उल्लेख सापडतात.
बाकी नंतरच्या काळाचा अभ्यास अजून नसल्यामुळे रेशिपी देऊ शकत नाही तरी क्षमस्व!
8 Sep 2015 - 7:00 pm | नया है वह
?
8 Sep 2015 - 7:43 pm | एक एकटा एकटाच
लै भारी विडंबन
8 Sep 2015 - 8:30 pm | सत्याचे प्रयोग
१) ज्ञानप्रबोधिनी गल्लीत '' मराठा दरबार " तांबडा - पांढरा रस्सा कीती पण हाना. मी तर तिथं गेल्यावर पाणी पितच नाही. मटाण पण १दम झ्याक.
२)" कावेरी हाॅटेल" ह्यांच्या बर्याच शाखा आहेत पण अलिकडे चव आणि किंमत बिघडलीय.
3)" आवारे खानावळ" कुमठेकर रोड जेवणाचे आधी तास अर्धा तास जावा प्रतिक्षेत ठेवतात ते. मटाण १दम झटका. पण बसायची जागा जेमतेम असते.
४) "पुरेपूर कोल्हापूर" हे सांगवीत होते आता बंद झालेय. इथले मटणाचे प्रकार १दम हाटके. पुण्यात ह्यांची शाखा सुरू असल्यास कळवा. कळविणाऱ्यास माझेतर्फे वझडी प्लेट फ्री.
बायदवे मी आधी फक्त बोलाईच खायचो पण आता १० वर्षे झाले बोकडाचं पण मटाण खायला लागलोय कायच फरक नाय पडला.
9 Sep 2015 - 8:50 am | सुहास झेले
कावेरी आणि पुरेपूर कोल्हापूर अगदी बकवास झाले आहे !!
कोल्हापुरात फौजी म्हणून एका हॉटेलात आजवर खाल्लेले सगळ्यात उत्तम मटण होते... त्याला आता ५ वर्ष झाली. मुंबईत हॉटेल चैतन्य (सिद्धिविनायक मंदिर रोड), मालवण कट्टा (शिवसेना भवनाजवळ) उत्तम ऑप्शन आहेत. मुरुडची पाटील खानावळ पण मटणासाठी फेमस हाय.. :)
9 Sep 2015 - 2:06 pm | सत्याचे प्रयोग
पुण्यातील सांगा ना हाॅटेलं १ तर तोंड खवळलय आता
9 Sep 2015 - 3:09 pm | कपिलमुनी
ही ऐकीव माहीती दिसतेय .
मी मे महिन्यात पाटील खानावळीमध्ये गेलो होतो. अतिशय वाइट चवीचे (मटण / मासे दोन्ही) जेवण होते.
9 Sep 2015 - 6:39 pm | सौंदाळा
पाटील खानावळीत मटणाचे माहिती नाही पण मासे अप्रतिम मिळाले होते.
१९९८ साली जेव्हा ती खरच खानावळ होती तेव्हा नारळी पोफळीच्या बागेत लाकडी बाक आणि टेबल लावलेले होते
नंतर २००५ (का २००६ आठवत नाही) पाटील खानावळीचे हॉटेल झाले होते थोडी धाकधुक वाटत होती पण चांगले मासे मिळाले.
नंतर अलिबाक मुरुडला पर्यटकांची गर्दीच इतकी वाढली की परत जावे वाटलेच नाही.
10 Sep 2015 - 12:05 am | सुहास झेले
ऐकीव नक्कीच नाही... स्वत: जाऊन आलोय. तिथे मासे निर्विवाद मस्त मिळतात, यात शंका नाही :)
9 Sep 2015 - 3:18 pm | बोका-ए-आझम
बंद झालं काका. अप्रतिम होतं यात शंकाच नाही.
10 Sep 2015 - 12:09 am | सुहास झेले
आजोबा, चैतन्य सुरु आहे हो ;-)
सिद्धिविनायक रोडला शिफ्ट झाले आहे ते. सेनाभवनासमोर असलेले बंद झाले. मी दोन महिन्यांपूर्वी गेलेलो. ह्या आठवड्यात जाऊन येतो परत आणि कन्फर्म सांगतो :)
Zomato वर अगदी १०-१५ दिवसांपूर्वीचे रिव्हू आहेत - https://www.zomato.com/mumbai/chaitanya-dadar-west
19 Sep 2015 - 2:25 am | बोका-ए-आझम
चैतन्य तिथे आहे अाणि दणक्यात चालू आहे असा खात्रीलायक रिपोर्ट आहे. बोला, कधी जायचं?
10 Sep 2015 - 3:06 pm | मालोजीराव
चव ढेपाळलीये !
काही नवीन (तशी जुनीच ) ठिकाणं चागंली वाटलेली -
१. खेड शिवापूर ला जगन्नाथ भेळ शेजारचं जगदंबा … झक्कास थाळी आहे एकदम, सुक्क मटण,रस्सा,भाकरी आणि इंद्रायणी भात …तूप वाटी सह
२. कोंढवा सासवड रोड वरच शिवम हॉटेल
३. पाचगणी च्या रुस्तम्स मधली मटण सल्ली बोटी दोराबजी पेक्षा भारी
४. खडकवासला पानशेत रोड वरचं 'समाधान' हॉटेल आपलं फेवरेट …मटण,चिकन नेउन द्यायचं हॉटेलवर ते बनवून देतात (आपल्याला पाहिजे तसं ) आणि किलोप्रमाणे चार्जेस लावतात
५. भोर -महाड रोड वरचं आपटी गावाजवळच मटन तर एकदम झकास, बाउलभर सुक्क आणि रस्सा
६. वेल्ह्याच्या 'स्वप्नील' मधली मटन थाळी पण ट्रेक चा सगळा शीण घालवणारी
७. जुन्नर च्या बेल्हे गावातलं बाजाराच्या दिवशी मिळणारं पालातल मटन अफलातूनच, तो पालात बसून खायचाच एकंदर अनुभव मस्त
3 Jun 2016 - 12:07 pm | प्रसाद गोडबोले
नुकतेच काही दिवसांपुर्वी जगदंबा ला जेवलो ! तुफ्फान मटन आहे :) इतका तुडुंब जेवलो होतो कि सीटबेल्ट लावायला पोट नको म्हणत होते =))))
9 Sep 2015 - 12:23 pm | विशाल कुलकर्णी
सिंहगड रोडवर 'शेतकरी' पण बरे आहे तसे.
9 Sep 2015 - 1:30 pm | खटपट्या
परवाच दादरला सिध्दीविनायक देवळाच्या आजुबाजुला पुरेपुर कोल्हापूरची पाटी पाहीली. पार्कींगची जागा नसल्यामुळे बेत रहीत केला. परत रेल्वेने जाउन ताव मारायचा विचार आहे. कोणी बरोबर येणार असल्यास स्पॉन्सर बनण्यास मी तयार हाये.
10 Sep 2015 - 12:10 am | सुहास झेले
पार्टी असेल तर का नाही? ;-)
10 Sep 2015 - 12:11 am | बोका-ए-आझम
पुरेपूर कोल्हापूर म्हणजे फसवाफसवी आहे असं माझं ठाम मत झालं आहे.
10 Sep 2015 - 7:21 am | खटपट्या
म्हणजे? इस्कटून सांगा. बेत बदलता येइल.
11 Sep 2015 - 12:23 am | बोका-ए-आझम
म्हणजे पुरेपूर कोल्हापूर. पांढरा आणि तांबडा पण काही खास नाहीत.
त्यापेक्षा दादर सयानी रोडवरचं स्वराज्य आणि
बांद्रा पूर्वचं सदिच्छा मस्त आहे. चेंबूरचं मालवण कट्टा पण वगलं आहे. बोला. कुठे भेटायचं? एक छोटेखानी मुंबई कट्टापण होऊन जाईल.
10 Sep 2015 - 12:17 pm | अनिरुद्ध.वैद्य
पुरेपूर कोल्हापूर नाही आवडल. तसं तर कोल्हापूरातलं ओपलचपण नाही आवडल. मटणाच्या नावाखाली काहीही उकडलेलं खपवलं तिथे.
11 Sep 2015 - 11:12 am | संजय पाटिल
कोल्हापुरतलं ओपल बिघडलय पाक. त्यापेक्शा रुइकर कॉलनीतलं परख मस्त आहे. एकट्याला संपनार नाही एवढ जेवन असते ताटात.
11 Sep 2015 - 11:18 am | सौंदाळा
कोल्हापुरातनं गगनबावड्याला जायच्या रस्त्यावर चिकन / मटण खायला चांगले हॉटेल कोणते?
अधुन मधुन तिकडन जाणे होते पण चांगले हॉटेल अजुन मिळाले नाही.
11 Sep 2015 - 12:56 pm | अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद :)
नेक्स्ट मंथ वारी आहेच! तेव्हा ट्राय करून बघतो. बाकी NH4 वरच देहाती आणि २ ४ अजून हॉटेले दिसली.
ती कशी काय?
आणि पद्माबद्दल काय अभिप्राय?
11 Sep 2015 - 1:10 pm | असंका
परख ची वाढती गर्दी बघता परख खरंच चांगलं असावं.
सामिष वर्ज्य आहे त्यामुले फर्श्ट हँड सांगू शकत नाही.....
12 Sep 2015 - 10:46 am | संजय पाटिल
पद्मा पण ओपलच्या वाटेने जात आहे. देहाती बद्दल ऐकून आहे पण अनुभव नाही.
12 Sep 2015 - 10:56 am | अद्द्या
dehati ठीक ठाक आहे .
bhavani मंडपात "गावरान" किंवा त्या ओळीत असलेले फक्त संध्याकाळी चालू असणारी थाळी सिस्टीम असलेली हॉटेल लई भारी मटण करून देतात .
पद्मा पण तेवढं आवडलं नाही .
8 Sep 2015 - 9:26 pm | चित्रगुप्त
भीष्म शरपंजरी पडलेले असताना त्यांना मटणाची चोपायची इच्छा झाली होती, ती युथिष्ठिराने पुरवली असे काही वाचल्याचे आठवते.
याला इच्छामटण म्हणायचे की की दयामटण ??
17 Jan 2019 - 11:57 am | चांदणे संदीप
चित्रगुप्त काकांनी मला विवश केले. ;=)
फक्त, युधिष्ठिर काय मीटरात बसेना म्हणून अर्जुनाला घेतले.
इच्छामटण
बोले भीष्म अर्जुनासी
शरपंजरी निजल्या निजल्या
पार्था, आण सत्वरें मटण
वाटीभर, शिजल्या शिजल्या
गरमागरम अळणी सूप
पितोच कसे फुर्र करून
तर्रीदार मस्त रश्श्यात
भाकर खातो कुस्करून
ना कुठली आस ना ध्यास
तरी शरांचा टोच साही
मटण खाल्ल्याशिवाय मात्र
इच्छामरण मी घेणार नाही
कावराबावरा अर्जुन दावी
खिसा रिकामा प्यान्टीचा
वदे, भक्षितो भाजीपाला
कठीण काळ मासांताचा
कृष्ण धावला शिष्टाईस
करून तिरका डोळा
सांगे पाच पांडवांसी
करा लेको कॉन्ट्री गोळा!
Sandy
9 Sep 2015 - 9:06 am | कैलासवासी सोन्याबापु
खाश्या सदाशिव पेठेत "नागपुर हॉटेल" भिंतीकड़े तोंड करून बसायला लागते पण रस्सा असला का दिल खुश हो जायेगा
9 Sep 2015 - 10:24 am | खेडूत
हा हा !
भिंतीकडे तोंड करून जेवणारे लोक दिसायचे आणि फार मज्जा वाटायची. मी खात नसल्याने कधी आत गेलो नाही पण दाराला लावलेल्या हिरव्या पडद्यातून हे विहंगम दृश्य दिसत असे, जे जगात कुठेही परत पहायला मिळाले नाही !
बाकी जगातल्या एकमेवाद्वितीय गोष्टी पुण्याच्या सदशिव पेठेतच पहायला मिळाल्या.
(जाऊ दे- नकोच त्या आठवणी !)
9 Sep 2015 - 1:35 pm | अनिरुद्ध.वैद्य
एकमेवाद्वितीय गोष्टी पुण्याच्या सदशिव पेठेतच पहायला मिळाल्या.
>>
आख्या त्रिलोकात एकमेव सदाशिव पेठ असल्याने तिथे अद्वितीय गोष्टी घडणारच!
9 Sep 2015 - 1:15 pm | अनिरुद्ध.वैद्य
पत्ता द्या जरा … खूप नाव ऐकलंय
10 Sep 2015 - 2:44 pm | मालोजीराव
नागपूर हॉटेल ला दुपारी १२.४५ नंतर आणि संध्याकाळी ८-८.३० नंतरच जेवण संपलेलं असतं राव, २ वेळा अनुभव आलाय. बाकी नुसत्या वासावरून तरी जेवण फक्कड असावं
9 Sep 2015 - 12:12 pm | हेमंत लाटकर
बाबानो बाह्मणांनी नाॅनव्हेज खायच नसत. मासे व अंडी चालतील.
9 Sep 2015 - 12:23 pm | पगला गजोधर
अस्स का हो भाऊ ?
रेफेरंस द्या.
9 Sep 2015 - 12:41 pm | बॅटमॅन
हेमंता, तुला आपल्या हिंदू धर्माचे काडीमात्र ज्ञान नाहीये तरी उगा कशाला हसे कसून घेतोयस स्वतःचे?
9 Sep 2015 - 12:59 pm | हेमंत लाटकर
हेमंता, तुला आपल्या हिंदू धर्माचे काडीमात्र ज्ञान नाहीये.
येथे ज्ञानाची काय गरज आहे. पुरातन काऴी भाज्याचे, अन्नधान्यांचे जास्त प्रकार नव्हते. म्हणून भात आणि मांसाहार चालायचा. आता शाकाहारी अन्नधान्ये मुबलक प्रमाणात मिळते. तसेही माणसाचे दात व अातडे मांसाहार करण्यास अनुकूल नसतात.
9 Sep 2015 - 1:36 pm | बॅटमॅन
जुन्या काळी सगळे असूनही लोक सर्रास मांसाहार करायचे. ब्राह्मण काय आभाळातून पडलेत काय?
(ब्राह्मण) बॅटमॅन.
9 Sep 2015 - 1:17 pm | कैलासवासी सोन्याबापु
याज्ञवल्क्य ऋषींचा काहीतरी एक रेफेरेंस आहे न हो गोथम सिटी नरेश? की बा "कोवळे लुसलुशीत गोमांस खाणे मी अजिबात सोडणार नाही" वगैरे??