लेखनप्रकार (Writing Type)
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही.
चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो.
हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
प्रतिक्रिया
लै भारी विडंबन
१) ज्ञानप्रबोधिनी गल्लीत '' मराठा दरबार " तांबडा - पांढरा रस्सा कीती पण हाना. मी तर तिथं गेल्यावर पाणी पितच नाही. मटाण पण १दम झ्याक.
२)" कावेरी हाॅटेल" ह्यांच्या बर्याच शाखा आहेत पण अलिकडे चव आणि किंमत बिघडलीय.
3)" आवारे खानावळ" कुमठेकर रोड जेवणाचे आधी तास अर्धा तास जावा प्रतिक्षेत ठेवतात ते. मटाण १दम झटका. पण बसायची जागा जेमतेम असते.
४) "पुरेपूर कोल्हापूर" हे सांगवीत होते आता बंद झालेय. इथले मटणाचे प्रकार १दम हाटके. पुण्यात ह्यांची शाखा सुरू असल्यास कळवा. कळविणाऱ्यास माझेतर्फे वझडी प्लेट फ्री.
बायदवे मी आधी फक्त बोलाईच खायचो पण आता १० वर्षे झाले बोकडाचं पण मटाण खायला लागलोय कायच फरक नाय पडला.
कावेरी आणि पुरेपूर कोल्हापूर अगदी बकवास झाले आहे !!
कोल्हापुरात फौजी म्हणून एका हॉटेलात आजवर खाल्लेले सगळ्यात उत्तम मटण होते... त्याला आता ५ वर्ष झाली. मुंबईत हॉटेल चैतन्य (सिद्धिविनायक मंदिर रोड), मालवण कट्टा (शिवसेना भवनाजवळ) उत्तम ऑप्शन आहेत. मुरुडची पाटील खानावळ पण मटणासाठी फेमस हाय.. :)
पुण्यातील सांगा ना हाॅटेलं १ तर तोंड खवळलय आता
ही ऐकीव माहीती दिसतेय .
मी मे महिन्यात पाटील खानावळीमध्ये गेलो होतो. अतिशय वाइट चवीचे (मटण / मासे दोन्ही) जेवण होते.
पाटील खानावळीत मटणाचे माहिती नाही पण मासे अप्रतिम मिळाले होते.
१९९८ साली जेव्हा ती खरच खानावळ होती तेव्हा नारळी पोफळीच्या बागेत लाकडी बाक आणि टेबल लावलेले होते
नंतर २००५ (का २००६ आठवत नाही) पाटील खानावळीचे हॉटेल झाले होते थोडी धाकधुक वाटत होती पण चांगले मासे मिळाले.
नंतर अलिबाक मुरुडला पर्यटकांची गर्दीच इतकी वाढली की परत जावे वाटलेच नाही.
ऐकीव नक्कीच नाही... स्वत: जाऊन आलोय. तिथे मासे निर्विवाद मस्त मिळतात, यात शंका नाही :)
बंद झालं काका. अप्रतिम होतं यात शंकाच नाही.
आजोबा, चैतन्य सुरु आहे हो ;-)
सिद्धिविनायक रोडला शिफ्ट झाले आहे ते. सेनाभवनासमोर असलेले बंद झाले. मी दोन महिन्यांपूर्वी गेलेलो. ह्या आठवड्यात जाऊन येतो परत आणि कन्फर्म सांगतो :)
Zomato वर अगदी १०-१५ दिवसांपूर्वीचे रिव्हू आहेत - https://www.zomato.com/mumbai/chaitanya-dadar-west
चैतन्य तिथे आहे अाणि दणक्यात चालू आहे असा खात्रीलायक रिपोर्ट आहे. बोला, कधी जायचं?
चव ढेपाळलीये !
काही नवीन (तशी जुनीच ) ठिकाणं चागंली वाटलेली -
१. खेड शिवापूर ला जगन्नाथ भेळ शेजारचं जगदंबा … झक्कास थाळी आहे एकदम, सुक्क मटण,रस्सा,भाकरी आणि इंद्रायणी भात …तूप वाटी सह
२. कोंढवा सासवड रोड वरच शिवम हॉटेल
३. पाचगणी च्या रुस्तम्स मधली मटण सल्ली बोटी दोराबजी पेक्षा भारी
४. खडकवासला पानशेत रोड वरचं 'समाधान' हॉटेल आपलं फेवरेट …मटण,चिकन नेउन द्यायचं हॉटेलवर ते बनवून देतात (आपल्याला पाहिजे तसं ) आणि किलोप्रमाणे चार्जेस लावतात
५. भोर -महाड रोड वरचं आपटी गावाजवळच मटन तर एकदम झकास, बाउलभर सुक्क आणि रस्सा
६. वेल्ह्याच्या 'स्वप्नील' मधली मटन थाळी पण ट्रेक चा सगळा शीण घालवणारी
७. जुन्नर च्या बेल्हे गावातलं बाजाराच्या दिवशी मिळणारं पालातल मटन अफलातूनच, तो पालात बसून खायचाच एकंदर अनुभव मस्त
१. खेड शिवापूर ला जगन्नाथ भेळ शेजारचं जगदंबा … झक्कास थाळी आहे एकदम, सुक्क मटण,रस्सा,भाकरी आणि इंद्रायणी भात …तूप वाटी सहनुकतेच काही दिवसांपुर्वी जगदंबा ला जेवलो ! तुफ्फान मटन आहे :) इतका तुडुंब जेवलो होतो कि सीटबेल्ट लावायला पोट नको म्हणत होते =))))
सिंहगड रोडवर 'शेतकरी' पण बरे आहे तसे.
परवाच दादरला सिध्दीविनायक देवळाच्या आजुबाजुला पुरेपुर कोल्हापूरची पाटी पाहीली. पार्कींगची जागा नसल्यामुळे बेत रहीत केला. परत रेल्वेने जाउन ताव मारायचा विचार आहे. कोणी बरोबर येणार असल्यास स्पॉन्सर बनण्यास मी तयार हाये.
पार्टी असेल तर का नाही? ;-)
पुरेपूर कोल्हापूर म्हणजे फसवाफसवी आहे असं माझं ठाम मत झालं आहे.
म्हणजे? इस्कटून सांगा. बेत बदलता येइल.
म्हणजे पुरेपूर कोल्हापूर. पांढरा आणि तांबडा पण काही खास नाहीत.
त्यापेक्षा दादर सयानी रोडवरचं स्वराज्य आणि
बांद्रा पूर्वचं सदिच्छा मस्त आहे. चेंबूरचं मालवण कट्टा पण वगलं आहे. बोला. कुठे भेटायचं? एक छोटेखानी मुंबई कट्टापण होऊन जाईल.
पुरेपूर कोल्हापूर नाही आवडल. तसं तर कोल्हापूरातलं ओपलचपण नाही आवडल. मटणाच्या नावाखाली काहीही उकडलेलं खपवलं तिथे.
कोल्हापुरतलं ओपल बिघडलय पाक. त्यापेक्शा रुइकर कॉलनीतलं परख मस्त आहे. एकट्याला संपनार नाही एवढ जेवन असते ताटात.
कोल्हापुरातनं गगनबावड्याला जायच्या रस्त्यावर चिकन / मटण खायला चांगले हॉटेल कोणते?
अधुन मधुन तिकडन जाणे होते पण चांगले हॉटेल अजुन मिळाले नाही.
धन्यवाद :)
नेक्स्ट मंथ वारी आहेच! तेव्हा ट्राय करून बघतो. बाकी NH4 वरच देहाती आणि २ ४ अजून हॉटेले दिसली.
ती कशी काय?
आणि पद्माबद्दल काय अभिप्राय?
परख ची वाढती गर्दी बघता परख खरंच चांगलं असावं.
सामिष वर्ज्य आहे त्यामुले फर्श्ट हँड सांगू शकत नाही.....
पद्मा पण ओपलच्या वाटेने जात आहे. देहाती बद्दल ऐकून आहे पण अनुभव नाही.
dehati ठीक ठाक आहे .
bhavani मंडपात "गावरान" किंवा त्या ओळीत असलेले फक्त संध्याकाळी चालू असणारी थाळी सिस्टीम असलेली हॉटेल लई भारी मटण करून देतात .
पद्मा पण तेवढं आवडलं नाही .
भीष्म शरपंजरी पडलेले असताना त्यांना मटणाची चोपायची इच्छा झाली होती, ती युथिष्ठिराने पुरवली असे काही वाचल्याचे आठवते.
याला इच्छामटण म्हणायचे की की दयामटण ??

चित्रगुप्त काकांनी मला विवश केले. ;=)
फक्त, युधिष्ठिर काय मीटरात बसेना म्हणून अर्जुनाला घेतले.
इच्छामटण बोले भीष्म अर्जुनासी शरपंजरी निजल्या निजल्या पार्था, आण सत्वरें मटण वाटीभर, शिजल्या शिजल्या गरमागरम अळणी सूप पितोच कसे फुर्र करून तर्रीदार मस्त रश्श्यात भाकर खातो कुस्करून ना कुठली आस ना ध्यास तरी शरांचा टोच साही मटण खाल्ल्याशिवाय मात्र इच्छामरण मी घेणार नाही कावराबावरा अर्जुन दावी खिसा रिकामा प्यान्टीचा वदे, भक्षितो भाजीपाला कठीण काळ मासांताचा कृष्ण धावला शिष्टाईस करून तिरका डोळा सांगे पाच पांडवांसी करा लेको कॉन्ट्री गोळा!
Sandy
इच्छामटण बोले भीष्म अर्जुनासी शरपंजरी निजल्या निजल्या पार्था, आण सत्वरें मटण वाटीभर, शिजल्या शिजल्या गरमागरम अळणी सूप पितोच कसे फुर्र करून तर्रीदार मस्त रश्श्यात भाकर खातो कुस्करून ना कुठली आस ना ध्यास तरी शरांचा टोच साही मटण खाल्ल्याशिवाय मात्र इच्छामरण मी घेणार नाही कावराबावरा अर्जुन दावी खिसा रिकामा प्यान्टीचा वदे, भक्षितो भाजीपाला कठीण काळ मासांताचा कृष्ण धावला शिष्टाईस करून तिरका डोळा सांगे पाच पांडवांसी करा लेको कॉन्ट्री गोळा!
Sandy
खाश्या सदाशिव पेठेत "नागपुर हॉटेल" भिंतीकड़े तोंड करून बसायला लागते पण रस्सा असला का दिल खुश हो जायेगा
हा हा !
भिंतीकडे तोंड करून जेवणारे लोक दिसायचे आणि फार मज्जा वाटायची. मी खात नसल्याने कधी आत गेलो नाही पण दाराला लावलेल्या हिरव्या पडद्यातून हे विहंगम दृश्य दिसत असे, जे जगात कुठेही परत पहायला मिळाले नाही !
बाकी जगातल्या एकमेवाद्वितीय गोष्टी पुण्याच्या सदशिव पेठेतच पहायला मिळाल्या.
(जाऊ दे- नकोच त्या आठवणी !)
एकमेवाद्वितीय गोष्टी पुण्याच्या सदशिव पेठेतच पहायला मिळाल्या.
>>
आख्या त्रिलोकात एकमेव सदाशिव पेठ असल्याने तिथे अद्वितीय गोष्टी घडणारच!
पत्ता द्या जरा … खूप नाव ऐकलंय
नागपूर हॉटेल ला दुपारी १२.४५ नंतर आणि संध्याकाळी ८-८.३० नंतरच जेवण संपलेलं असतं राव, २ वेळा अनुभव आलाय. बाकी नुसत्या वासावरून तरी जेवण फक्कड असावं
बाबानो बाह्मणांनी नाॅनव्हेज खायच नसत. मासे व अंडी चालतील.
बाह्मणांनी नाॅनव्हेज खायच नसत.अस्स का हो भाऊ ? रेफेरंस द्या.
हेमंता, तुला आपल्या हिंदू धर्माचे काडीमात्र ज्ञान नाहीये तरी उगा कशाला हसे कसून घेतोयस स्वतःचे?
हेमंता, तुला आपल्या हिंदू धर्माचे काडीमात्र ज्ञान नाहीये.
येथे ज्ञानाची काय गरज आहे. पुरातन काऴी भाज्याचे, अन्नधान्यांचे जास्त प्रकार नव्हते. म्हणून भात आणि मांसाहार चालायचा. आता शाकाहारी अन्नधान्ये मुबलक प्रमाणात मिळते. तसेही माणसाचे दात व अातडे मांसाहार करण्यास अनुकूल नसतात.
जुन्या काळी सगळे असूनही लोक सर्रास मांसाहार करायचे. ब्राह्मण काय आभाळातून पडलेत काय?
(ब्राह्मण) बॅटमॅन.
याज्ञवल्क्य ऋषींचा काहीतरी एक रेफेरेंस आहे न हो गोथम सिटी नरेश? की बा "कोवळे लुसलुशीत गोमांस खाणे मी अजिबात सोडणार नाही" वगैरे??
तसे भरपूर रेफ़रन्स काढता येईल … कोणास कोणते मास द्यावे … बैल कधी कापावा गाय कोणती अन कधी कापावी … बकरी कोणती खावी
वगैरे वगैरे …
भीष्मांनी ८४ प्रकारचे प्राणी खाण्यायोग्य सांगितले आहेत! सो बिनधास्त खावा.
येस सरजी, याज्ञवल्क्यांचा आहे बहुधा, नीट आठवत नाही. जरा बघून सांगतो.
नक्की आठवणारे रेफरन्सेस म्ह.
१. वसिष्ठ ऋषी जनक राजाकडे आले असता त्यांच्यासाठी गोमांस शिजवण्यात आले. संदर्भ: उत्तररामचरित.
२. कुठल्या प्रकारचा नैवेद्य पितरांना दिला तर ते किती दिवस संतुष्ट राहतात याचे एक कोष्टक महाभारतात दिलेले आहे, त्यातच बीफचाही उल्लेख आहे. नक्की पर्व आणि अध्याय क्रमांकासाठी प्रचेतस ऊर्फ वल्ली यांना संपर्क करावा लागेल.
हे झाले बीफबद्दल. त्याबद्दल अजूनही बरेच उल्लेख आहेत. नुस्त्या मांसाहाराबद्दल बघायचे तर ढिगाने उल्लेख आहेत. श्राद्धानिमित्त शिजवलेल्या मांसाला नाकारणारा ब्राह्मण हा खरा ब्राह्मणच नव्हे असेही उल्लेख आहेत, बहुधा गृह्यसूत्रांमध्ये.
इतके असून सध्या ब्राह्मण हा वारसा नाकारतात आणि नाके मुरडतात हे अतिरोचक आहे. मांस खाऊन आपल्या धर्माची परंपराच आपण पुढे चालवतो आहोत हे त्या मूर्खांच्या गावीच नसते. अगदी कलियुगातले उदाहरण बघायचे झाले तर बंगालमधील ब्राह्मण परंपरेने चिकन-मटन-मासे सगळेच खातात. ते या अडाण्यांना माहिती तरी असते की नाही कुणास ठाऊक?
(शाकाहारी दहशतवादाचा कट्टर मांसाहारी शत्रू) बॅटमॅन.
(किमान महाराष्ट्रात) ब्राह्मणांनी मांस खाऊ नये असं बंधन कधीपासून सुरु झालं?
बहुतेक संपूर्ण भारतात काही विशिष्ट जातींनी मांसाहार करु नये असं कधीपासून सुरु झालं?
बाकी लोकांना मूर्ख म्हणण्यापेक्षा अडाणी म्हणणं काही अंशी योग्य. माहिती नसते. घरात परंपरागत हे खायचं नाही ते खायचं नाही असंच सांगितलं जात असतं. कारण? आपल्यात खात नाहीत. यापलिकडं उत्तर नसतं. आजूबाजूचा गोतावळा अशाच मानसिकतेमधला, मित्रांची आडनावं विचारुन मैत्री करायला परवानगी या सगळ्यात एका मर्यादित वर्तुळापलिकडं जाणं होत नाही, वाचायला मिळत नाही, मिळालं तरी स्वीकारण्याची मानसिकता आणि त्याहून जास्त गरज वाटत नाही.
महाराष्ट्राचं माहिती नाही. बघावं लागेल. बाकी महाराष्ट्रातही सारस्वत ब्राह्मण हे पारंपरिकरीत्या मांसाहार करतात. बाकीचे त्यांना 'आपल्यातले' मानत नसले म्हणून काय झाले.
पूर्ण भारताचं बघायचं तर जैन-बौद्ध धर्मप्रसारानंतर हे जरा जास्त सुरू झाले असे दिसते. त्याआधी तितके दिसत नाही. त्यानंतरही हा प्रकार हळू हळूच वाढत गेला. इ.स. १ ते १००० पर्यंतचे उल्लेख चाळून पाहिले पाहिजेत नेमकेपणासाठी. तरी मजा म्हणजे सारस्वत, कान्यकुब्ज वगैरे काही मांसाहारी ब्राह्मण पोटजाती अजूनही टिकून राहिल्या हे विशेष.
बॅटमॅन भाऊ!!!
कान्यकुब्ज अन शरयुपारीन ब्राह्मण म्हणजे यूपी मधले ब्राह्मण कट्टर शाकाहारी असतात, माझ्या माहिती प्रमाणे मांसाहार करणारे ब्राह्मण म्हणजे शाक्त परंपरेतले कश्मीरी, मैथिल अन बंगाली ब्राह्मण हे होत
कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले होते खरे. सोर्स चेक करावा लागेल.
बाकी मैथिली अन बंगाली तर आहेतच, काश्मिरीही त्यांतच आले. मैथिली ब्राह्मण पारंपरिकरीत्या कासव खातात हेही एका मैथिली गृहस्थाकडूनच ऐकले आहे.
"जो दिन मछली मिले खा लो एकादशी बारबार आती रहेगी"
ही म्हण आहे मैथिल समाजात! घ्या समजून काय ते!!
कान्यकुब्ज कन्फर्म नाहीत खात, महा कट्टर ब्राह्मण असतात इतकेच काय तर ते शरयुपारीन ब्राह्मणवृंदास हलके समजतात त्याचे एक्सप्लेनेशन असे की "रामजी जब अयोध्या वापस आये तो उन्होंने एक भोज रखा था जिसमे शरयुपारीन गधे चले गये जबकी रामजी ने एक ब्राह्मण (रावण) का वध किया था, और कान्यकुब्ज कभी भी ब्रह्महत्यारे का भोज नहीं खाते है" इतके कट्टर मिळाले होते.
आमच्या इथे एक झा म्हणून आहेत. मैथिली ब्राह्मण.
नुकतंच बोलणं झालं. म्हणे आमच्यात बघत पण नाहीत मांसाहाराकडं.
काही लोक मासे खातात बंगाल कडचे, चिकन नाही.
चिकनही खातात. प्युअर व्हेजिटेर्यन जेवणाला काहीजण तुच्छतेने "ब्राह्मनेर बिधोबा" अर्थात ब्राह्मण विधवेचे जेवण असेही म्हणत असल्याचे ऐकले आहे.
बंगाली ब्राह्मणांमध्ये खातात पण अल्लोवेद ;) नाही.
मासे अल्लोवेद आहेत.
ट्रोजनकालीन ग्रीक मटण तसे