मध्यंतरी हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती त्यावेळी लिहिलेली ही कविता
'हेल्मेट 'वर कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांनी जर कविता लिहिली असती तर कदाचित ती अशीच लिहिली असती .
विडंबनाचा एक प्रयत्न
'हेल्मेट' पाडगांवकरांच्या शैलीत
हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
मराठीतून त्याला कवच म्हणता येतं
हिंदीतून त्याला शिरस्त्राण म्हणता येतं
हेल्मेट हेच त्याचं दुसरं नेम असतं
हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
हेल्मेटच्या सक्तीचा सरकारी कायदा आहे
खरं तर हेल्मेटचा आपल्यालाच फायदा आहे
एकदा डोक्यात घातलं की
हेल्मेट झपाट्याने काम करू लागतं
नको असण्यार्यांच्या समोरून कसं
बिनधास्त जाता येतं
घेणेकर्यांचा तर त्रासच मिटला
त्यांना उत्तम टाळता येतं
अगदीच मस्त सोय महाराज
सुंदरींकडे टक लावून पाहता येतं
दारू पिऊन पडलात तरी
डोकं फुटणार नसतं
कारण
हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
प्रतिक्रिया
27 Apr 2015 - 6:21 am | खटपट्या
जबराट !!
तुम्ही पुणेकर नाही हे पक्के...
27 Apr 2015 - 6:23 am | खटपट्या
अरेरे !!
हे वाचले नव्हते...
27 Apr 2015 - 7:29 am | श्रीरंग_जोशी
छानंच जमलंय विडंबन.
यावरून आठवले - खालील चर्चा अजून वाचणे बाकी आहे.
हेल्मेटसक्ती.
27 Apr 2015 - 11:43 am | कविता१९७८
मस्तय
27 Apr 2015 - 11:44 am | पॉइंट ब्लँक
झकास :)
28 Apr 2015 - 11:37 am | मदनबाण
झकास ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt