'विठू माझा लेकुरवाळा' या गीताच्या चालीत खालील गीत सावकाश गुणगुणावे.
_____________________________________________________
पप्पू माझा लेकुरवाळा
संगे खांग्रेसींचा मेळा
दिग्गीराजा खांद्यावरी
खुर्शिदाचा हात धरी
पुढे चाले राज बब्बर
मागे नगमा ही सुंदर
कपिल आहे मांडीवरी
अंबिका, गिरीजा बरोबरी
अहमद आहे कडेवरी
शीला करांगुली धरी
रे़णुका म्हणे राहुला
करी खांग्रेसींचा सोहळा
प्रतिक्रिया
17 Apr 2015 - 3:23 pm | hitesh
.
17 Apr 2015 - 11:36 pm | श्रीरंग_जोशी
लेकुरवाळा - या शब्दाचा नेमका अर्थ काय काय?
विडंबन आवडले.
18 Apr 2015 - 12:20 am | अत्रुप्त आत्मा
+१
18 Apr 2015 - 1:46 pm | लॉर्ड फॉकलन्ड
आभार.
लेकुरवाळा म्हणजे खूप लेकरे (मुलेबाळे) असलेला.
19 Apr 2015 - 9:58 am | विवेकपटाईत
मस्त आवडली...
21 Apr 2015 - 6:15 pm | प्रसाद गोडबोले
=))