राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.