भान सुटलेल्या निवेदीतांच्या निवेदनातील (निसटत्या) बाजू

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
7 Mar 2017 - 2:17 pm

देश कसा एकत्र राहील त्या एवजी देश इतिहासात एक कसा नव्हता यावर फोकस करणारी जी काही प्राध्यापक मंडळी गेल्या काही दशकात दिल्लीत एकत्रित जमून त्यांचे तत्वज्ञान गल्ली पर्यंत पोहोचावे असा त्यांचा जोरकस प्रयत्न चालू आहे आणि उथळ माध्यमांची साथ पाहता ते होण्यास खूप कालावधी लागेल असे नव्हे. असो अशा देश विभाजनावर फोकस असलेल्या दिल्लीतील प्राध्यापक मंडळीतील एक नाव म्हणजे निवेदीता मेनन या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील एक प्राध्यापक आहेत. त्यांची मुक्ताफळांची उधळण गेली काही वर्षे चालू आहे त्यात काही नवे आहे असे नव्हे, अलिकडे संघाच्या विरोधात राळ उडवण्यात त्यांचा पुढाकार असतो त्यामुळे संघ आणि भाजपा विरोधकांना आणि विरोधी माध्यमांना या बाईंचा पुळका येतो. अलिकडील राजस्थान विद्यापीठातील घटने बद्दल त्यांचा स्वतःचा एक लेख वाचनात आला. हिंदूत्ववादी ट्रोल्स त्यांची बाजू समजावून घेऊ शकणार नाहीत पण इतर बहुतेकांना ती समजावी अशी काही अपेक्षा त्यांच्या या लेखातून व्यक्त होताना दिसते.

मी स्वतः संघीय अथवा इतर विशीष्ट राजकीय चष्मे वापरत नाही तेव्हा निवेदीता मेननांची भूमिका पुन्हा एकदा तपासून पहावी असा विचार त्यांच्या या लेखाच्या निमीत्ताने केला.

त्यांचा विद्यार्थ्यांना उद्देशून असलेला पहिला मुद्दा

As young students, you should read for yourself and find out the history of how Kashmir and the states of the North East were brought into India, and ask yourself why these places have to be retained in India through the massive presence of armed forces.

आता हे बोलण्यात / लिहिण्यात देश विरोधी काय आहे असा काहीसा त्यांचा सवाल आहे. ब्रिटीशांनी भारताचे एकत्रिकरण कसे केले आणि नेहरु आणि पटेलांनी ते कसे टिकवले यात बहुतेकांसाठी नवे काही नाही पण याच गोष्टीकडे या विदुषी (?) नकारात्मक चष्म्याने पाहू इच्छितात आणि इतरांनीही नकारात्मक चष्म्यातून पहावे असे त्यांना वाटते. एकीकडे यात देश विरोधी काही नाही असे म्हणावयाचे आणि भारतीय सैन्य आपल्याच देशातील भागात आकुपाईंग फोर्स असल्या प्रमाणे चित्र रंगवायचे आणि यात देश विरोधी काय आहे असा प्रश्न उपस्थित करावयाचा असा कांगावेखोरपणाच अधिक वाटतो. भारतीय संघराज्यात कायदा सुव्यवस्था हि सर्वसाधाराणपणे राज्य सरकारांच्या आखत्यारीतील बाब आहे, बंदुका आणि लूटीच्या बळावर कायदा सुव्यवस्था मोडकळीस आणली तरच संघशासन संसदेच्या अनुमतीने हस्तक्षेप करते व शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापने साठी सैन्य दलांचा उपयोग करते. परकीय सत्तांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप एवढ्यावरच थांबत नाहीत तर संबधीत प्रदेशातील जनताच विरोधात आहे असे चित्र रंगवून देश अस्थीर करण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्नांचीही शक्यता असते. देशभरातील सामान्य जनतेसाठी देशाची अस्थीरता म्हणजे देशात अराजक एवढाच अर्थ उरणार असेल तर सर्वसामान्य जनतेने सरकार कडून शांतता सुव्यवस्था स्थापनेची अपेक्षा करावयाची का या आमचा देश अधिक अस्थीर करा म्हणावयाचे ?

एनी वे नवीन भारतीय पिढी खासकरुन महानगरीय जिवन आणि इंग्रजी शिक्षणातून समोर येत असलेल्या पिढीसाठी भारत भारताची एकतेची गरज म्हणजे काय ? आहे हे त्यांनाच विचारून समजावून घ्यावयास हवे कारण या निवेदीता मेनन आणि त्यांचे दिल्लीस्थीत सहकारी यांची अशा तुटलेपणातून होणारी वाढ वैचारीक तुटलेपणात प्रतिबिंबीत होते आहे का आणि त्याच स्थितीतून महानगरीय जिवन आणि इंग्रजी शिक्षणातून समोर येत असलेल्या पिढी पुढे येत आहे का ? मग स्वतःच्या देशा बाबात त्यांच्या मनात आहे तरी काय अशी शंका साहजीकच उपस्थीत होते.

२) निवेदीता मेननांचा दुसरा मुद्दा देशाचा नकाशा उलट्या दिशेनेही पाहता येतो मग त्यात तुम्ही भारतमाता कशी पाहता ? आणि भारतमाता हि संकल्पना केवळ हिंदुत्ववाद्यांची निर्मिती आहे असा काहीसा रोख आहे. या वर त्यांचा भर यासाठी की मुस्लिम लोक भारतमाता ही संकल्पना प्रतिक आहे म्हणून स्विकारत नाहीत हे एक; दुसरे मातेच्या स्वरुपात पाहील्यामुळे त्यांच्याच शब्दात ...so if some group wants to leave the nation, it can only be seen as amputation or dismemberment.... त्यांचा इतरत्रचा स्त्रीवादी मुद्दा म्हणजे यातून भारतीय स्त्रीवर केवळ मातृत्वाचीच जबाबदारी पुरुषकेंद्री हिंदूत्ववादी लादत असतात आणि स्त्रीयांना इतर बाबतीत गौण भूमिका दिली जाते.

मातृत्वाचे कौतुक केले म्हणजे स्त्रीयांना इतरभूमिका हिंदू धर्म नाकारतो असे काही नसावे, पण तरीही तिसरा मुद्दा आपण तुर्तास बाजूस ठेऊ. प्रतिकाचा शुन्य विचार करुन कोणतीही मानवी संस्कृती अस्तीत्वात असु शकेल का ? तशी ती इस्लामिक संस्कृतीही शुन्य प्रतिकाधारीत आहे का या बद्दल मी संदर्भांसहीत साशंकता मागच्या मिपाधागाचर्चातून मांडलेल्या आहेतच तरीही भारत या संकल्पनेशी भारतमाता या संकल्पने शिवाय इतर मार्गानेही ते जोडून राहू शकत असतील तर हरकत नाही पण याच प्रकारे इश्वर या संकल्पनेशी इतर मानवी समुदाय ज्यात हिंदूंचाही समावेश होतो वेगवेगळ्या पद्धतीने जोडून घेतात त्यातही काही वावगे नाही ही बाजूही निवेदीता मेननांनी आणि त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी कट्टरपंथीय मूलतत्ववादी इस्लामीक आणि इतर मुर्तीपुजाविरोधी धर्मीय लोकांपुढे प्रकर्षाने मांडावयास हवी पण तसे आग्रहाने करताना त्या दिसत नाहीत, हिंदूंमधील कट्टरांचा कट्टरवाद धर्माधिष्टीत राष्ट्रवाद त्यांना नको आहे मात्र त्याचवेळी धर्माधिष्टीत पाकीस्तानी राष्ट्रवादापुढे नमते घ्यावे काश्मिर आणि इशान्येकडच्या धर्मांधते संकुचितते बाबत दहशतवादा बाबत तडजोडीची भूमिका घ्यावी असा दुटप्पी विरोधाभासयूक्त विचार मांडताना त्या दिसतात.

एकीकडे मी देश विरोधी काय बोलले म्हणायचे आणि ...so if some group wants to leave the nation,... nation-states are both dissolving as in Europe, and being reasserted in other places, including India. अशा वाक्यांची पेरणी करावयाची nation-states are both dissolving as in Europe याला वसुधैव कुटूंबकम म्हणत असतील -आणि एतदेशियांच्या हितांच्या रक्षणाची सुयोग्य काळजी घेतली जात असेल तर भारतीय संस्कृतीत त्यात तत्वतः आक्षेप घेण्यासारखे काही नाही हा भारतीय संस्कृतीतील उदात्त विचार अथवा अटल बिहारी वाजपेयींनी काश्मिर बाबत केवळ मानवतेच्या भूमिकेतून चर्चेची दाखवलेली तयारी या गोष्टी या मेनन आणि त्यांच्या सहकार्‍यांना दिसत नाहीत. मोदी नेतृत्वातील भाजपाने वैचारीक दृष्ट्या विरोधी पिडीपीसोबत केलेली तडजोड दिसत नाही.

nation-states are....being reasserted in other places, including India. हे वाक्य चटकन लक्षात न येणारे पण द्वैअर्थी आहे आणि खास करुन मेननांदींच्या तोडून बाहेर पडते तेव्हा भारतातील काश्मिर आणि इशान्येकडच्या राज्यांना त्या नेशन स्टेट म्हणून पाहू इच्छितात का अमुक तमुक राज्य मांगे आजादी च्या घोषणा द्यायच्या आणि कायद्याच्या बडग्यातून वाचण्यासाठी आम्ही भारतापासून नाही सत्तेतल्या राजकीय पक्षापासून आजादी मागतोय असले बालीश भाषिक खेळकरणे, शेवटी तुम्हाला तुमचा देशाशी नाते मातेचे नसेल पण इतर जे काही नाते आहे ते काय आहे आणि त्या नात्या बाबत प्रश्न का उपस्थित केले जाऊ नयेत ?

निवेदीता मेननांनी भारताचा नकाशा उलटा करुन दाखवला चौकोनी किंवा अष्टकोनी किंवा कशा आकारात दाखवला तरी मातीला माता मानणारा सर्वसाधारण भारतीय संघ-भाजपा-हिंदू हे शब्द अस्तीत्वात नसले तरिही भारत देशात मातेचे प्रतिक बघणे थांबवेल अशी मेननादींची अपेक्षा कितपत रास्त आणि वस्तुस्थितीस धरुन आहे हा प्रश्न शिल्लक राहतो. नकाशा उलटा दाखवण्यात अथवा बघण्यात राष्ट्रविरोधी आणि बेकायदेशीर काही नाही हे म्हणतानाच त्यांनी उलटा दाखवलेला नकाशा भारतात बनलेला नाही आणि भारतीय सिमा कशा दाखवव्यात याच्या अपेक्षेत बसत नसेल तर खालील कायद्यांचे बंधन निवेदीता मेनन पाळतील का ?

Section 2(2) of the Criminal Law Amendment Act, 1961 as amended by Criminal Law Amendment (Amending) Act, 1990. It reads as under:-

1. Questioning the territorial integrity or frontiers to the interests of safety and security of India.-(1) Whoever by words either spoken or written, or by signs, or by visible representation or otherwise, questions the territorial integrity or frontiers of India in a manner which is, or is likely to be, prejudicial to the interests of the safety or security of India, shall be punishable with imprisonment for a term which may extend to three years, or with fine, or with both.
(2) Whoever publishes a map of India, which is not in conformity with the maps of India as published by the Survey of India, shall be punishable with imprisonment which may extend to six months, or with fine, or with both.
(3) No court shall take cognizance of an offence punishable under Sub-section (2), except on a complaint made by the Government." (चुकभूल देणे घेणे)

1961 मधला कायदा बहुधा भाजपा सरकारने केला नसावा आणि तसेही कायदे संसदेने बनवलेले असतात आणि सर्व भारतीयांनी पाळणे अभिप्रेत असावे.

निवेदिता मेननांचा चौथा मुद्दा भारमातेचे चित्र गौरवर्णीयच का दाखवता ती मैसपाळणारी सावळ्या रंगाची एखादी गवळण का असू शकत नाही ? मला वाटते प्रत्येक भारतीय मातेत तिचा वर्ण धर्म जात न पाहता भारतीय माणूस भारतमाता पाहू शकेल अगदी बुरखाधारी मुस्लिमस्त्रीचे तिरंगा घेतलेले चित्र भारतमाता म्हणून दाखवण्यात काही हरकत आहे असे नव्हे. पण दाराच्या बाहेर बुरखा घालणारी मुस्लिम स्त्री घरात इतर भारतीय स्त्रीयांसारखीच वेषभूषा करते याचा निवेदीता मेननांना विसर न पडो म्हणजे झाले.

निवेदीता मेननांचा पाचवा मुद्दा त्यांचा हिंदूंना नव्हे हिंदूत्ववादी धर्माधिष्टीत राजकीय आयडीयॉलॉजीला विरोध आहे, धर्माधिष्टीत राजकीय आयडीयॉलॉजीला विरोध असेल तर तो सर्वच धर्मातील धर्माधिष्टीत राजकीय आयडीयॉलॉजीला असावयास हवा त्यातून संघ आणि भाजपालाच वेगळे काढणे न समजता येण्यासारखे आहे.

संघ आणि भाजपा सरकारवर टिकाकरताना त्यांना ना देश ना इतरकाही कशाचाही धरबंध राहतो असे दिसत नाही. त्यांनी सैन्याला मिळनार्‍या जेवण्याच्या दर्जा बाबतच्या सोशल मिडीया वॉरवरुन सरकारला टिका केली याचा उद्देश सैनिकांना चांगला आहार मिळावा हा असेल तर ठिक पण निवेदिता मेननांच्या तोडूंन जेव्हा टिका बाहेर पडते तेव्हा त्यांना भारतीय सैन्याला फितवायचे आहे किंवा कसे असा प्रश्नही मनात तरळून जातो. सैन्यास चांगले अन्न देणे गरजेचे आहे, पण देशाकरता जेवण नाही मिळाले तरी लढण्याची तयारी हवी असते
आणि म्हणुन अशा तक्रारीं सोडवण्यासाठी सैन्यांतर्गत स्वतंत्र प्रक्रीया असते आणि तिचाच अवलंब करणे आणि जाहीर वाच्यता शक्य तेवढ्या टाळणे गरजेचे असते याचे भान निवेदिता मेननांना आणि त्यांच्या चेल्यांना असण्यचे काही कारण दिसत नाही.

पण मुख्य म्हणजे नव्या पिढीने - इंग्रजी माध्यमातून आणि महानगरीय जिवन जगणार्‍या नव्या पिढ्यांनी सुद्धा- आपल्याला दिसणार्‍या भारत देशास एकात्मतेची राष्ट्रीय एकतेची राष्ट्रभक्तीची गरज आहे का या बद्दल अधिक विचार करणे गरजेचे असावे. असो.

* संदर्भ :As Jodhpur University Goes on ‘Anti-National’ Witch-Hunt, Here’s the Incredible Backstory By Nivedita Menon on 17/02/2017 हा लेख thewire.in वर हा धागा लेख लिहिताना जसा पाहीला.

(लेखात दिलेल्या कायदे विषयक दाखल्याबाबत उत्तरदायकत्वास नकार लागू)

राजकारणमाध्यमवेध

प्रतिक्रिया

१)भारताचे इंग्रजांच्या सत्तेला उलथवून टाकण्याचे प्रयत्न चालू असले तरी ते प्रत्यक्षात मात्र १९४७ साली इंग्रजच सत्ता सोडून निघून गेले आणि जाताना त्यांच्या मनाप्रमाणे तुकडे करून गेले हे बरेचजण विसरतात.
२) काश्मिर इकडे पसंत नसेल तर पाकिस्तानही (प/पू) पसंत का असावा?
३) हे सर्व जेत्याच्या मर्जीने झाले होते.काश्मिर हवा होता तर तो इंग्रजांकडून भीक मागून का नाही मिळवला?
४) इतर देशांत ते त्यांच्या देशास मदर कन्ट्री का म्हणतात? ती मादर /माता कल्पना भारताने तर लादली नाही.
५) सिंधी लोकांना फाळणीनंतर स्थलांतरीत म्हणून जमिनी मिळाल्या त्या काश्मिरी पंडीतांना मिळाल्या असत्या. आता ते हाकलले गेल्याने तसे झाले नाही.

सुमीत's picture

7 Mar 2017 - 8:28 pm | सुमीत

थोड्क्यात काय तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूरे पूर गैर फायदा घेणारे हे लोक.
हे का नाही जात कश्मीर आणी नोर्थ इस्ट राज्या मध्ये रहायला? स्वतः सरकार ने दिलेले लाभ ओरपणार, सुरक्षित उच्च राहणीमान मिरवणार आणि परत देशा बद्दल गरळ ओकणार.

पैसा's picture

7 Mar 2017 - 11:08 pm | पैसा

यावर चर्चा वाचायला आवडेल

माहितगार's picture

8 Mar 2017 - 9:35 am | माहितगार

धर्म-ट्राईब आधारीत फुटीरता आणि हिंसेक मार्गांचा अवलंब करणार्‍या गटांचे समर्थन करावयचे -चक्क विरोधाभास आहे- तर धर्माधारीत राजकारणावर टिका करावयाच्या नैतिक अधिकाराला काही मर्यादा आहे की नाही. टिका करावयाची असेल तर दोन्हीवर एकसारखी करा. तेही बाजूस ठेवू भारतीय राज्यघटना हि काही दमनकारी घटना नाही, सर्वांनाच विकासाच्या संधी देण्याचा राज्यघटना पुरेपूर प्रयत्न करते ह्या मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष करुन हकनाकच्या अलगाववादाला खतपाणी घालणे खटकणारे वाटते.

या सर्व वैचारीक हल्ल्याला खरे तोंड नव्या पिढीस द्यावयाचे आहे, देशाचे स्वातंत्र्य आणि एकसंघ देशाचे लाभ हातात आयते पडलेली नव्या पिढीस देशाच्या एकते विषयीची आत्मियता पातळ न होता तोंड देऊ शकेल का ? की आमच्या पुढच्या पिढ्या मेननादींच्या मोर्चात सामील होणार आहेत हा प्रश्न अधिक गंभीर वाटतो.

माहितगार's picture

8 Mar 2017 - 5:28 pm | माहितगार

मिपा वरील चर्चा खुपशी पुढे जाताना दिसत नाहीए, विषय निघालाच आहे तर, तीन लेखांकडे लक्ष्य वेधावेसे वाटते; जे एन यूचे प्राध्यापक Avijit Pathak यांचा लेख आला आहे पण यात काही तरी हातचे राखून आहे काही मिसींग आहे हे जाणवते . ते जरासे Sreemoy Talukdar यांच्या लेखाने उलगडल्यासारखे वाटते. Sreemoy Talukdar त्यांच्या लेखात संजीव सान्याल यांच्या The Left paralysis लेखाकडे निर्देश करतात तो संजीव सान्याल यांचा लेख उल्लेखनीय वाटतो.

एकुलता एक डॉन's picture

8 Mar 2017 - 1:20 am | एकुलता एक डॉन

(निसटत्या) बाजू

अश्लील अश्लील अश्लील

माहितगार's picture

8 Mar 2017 - 8:56 am | माहितगार

डॉनराव 'निवेदनातील' हा शब्द आवर्जून वाचावा हे वेगळे सांगण्याची गरज भासू नये. हेवेसांनलगे

ट्रेड मार्क's picture

8 Mar 2017 - 3:06 am | ट्रेड मार्क

बहुतेक शाळेपासूनच ब्रेनवॉशिंग चालू आहे . माझ्या माहितीप्रमाणे सध्याच्या शाळेच्या अभ्यासक्रमात (महाराष्ट्रातील) शिवाजीमहाराज व त्यांच्या कारकिर्दीविषयीची माहिती फक्त दीड पानात उरकली आहे. बाकी मग औरंगजेब कसा चांगला होता, गझनी व टिपू सुलतानाने कशी हिंदूंना मदत केली, त्यांच्यामुळे हिंदूंचं जीवनमान कसं सुधारलं ही सर्व माहिती शाळेपासूनच मुलांच्या डोक्यात भरली जात आहे. भारतविरोधी विचारांचे हे लोण अगदी मुंबईमधील कॉलेजांपर्यंत पोचलेले आहे. जर अभ्यासक्रम आणि शाळाकॉलेजांतील शिक्षकच प्रदूषित विचारांचे असतील तर मुलं दुसरं काय शिकणार?

काश्मीरमध्ये सैनिकांवर हल्ले करतात ते त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य पण सैनिकांनी प्रतिकार केला तर मात्र ते अत्याचार होतात. हिंदूंचे सण म्हणजे मूर्खपणा आहे, पर्यावरणाला धोकादायक आहेत असे खुले मार्केटिंग चालू आहे. सध्या आपले सणवार बघण्यासाठी कॅलेंडरची आवश्यकता नाही. स्वयंघोषित पर्यावरणवाद्यांचा आरडाओरडा चालू झाला की कोणता हिंदू सण आहे हे पण कळतं. पाणी वाया जाण्याबद्दल आरडाओरड झाली की रंगपंचमी, वायू व ध्वनिप्रदूषण म्हणजे दिवाळी हे समजून जायचं.

यांच्या लाडक्या पाकिस्तानात किंवा सौदीला स्थलांतर करा म्हणलं तर लगेच गळे काढतात. पुढे काय काय बघायला मिळणार आहे काय माहित! समान नागरी कायदा आणि बहुसंख्य होण्याकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या "अल्पसंख्यांकां"ची संख्या रोखण्यासाठी कडक कायदे करायला पाहिजेत. देशात लागू असलेल्या कायद्याने राहायचं नसेल तर सरळ बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि निवेदिता मेनन, कन्हैया, उमर खालेद यासारख्यांना देशद्रोही जाहीर करून शिक्षा द्यायला पाहिजे.

बाकी प्रतिसाद वाचले आहेत वेळे अभावी उत्तरे नंतर देईन. प्रतिसादांसाठी आभार.

संदीप डांगे's picture

8 Mar 2017 - 10:43 am | संदीप डांगे

भारताचे तुकडे करण्याचा हा एक मोठा प्लान आकार घेत आहे असे दिसते. An Idea can be dangerous than thousand wars. ह्याला वेळीच रोखणे आवश्यक.

ज्या पद्धतीने वरचेवर हा मुद्दा येत आहे त्या अर्थाने हे फार भयंकर प्रकरण आहे ह्याची खूणगाठ मारलेली बरी.

तुम्ही लेखाचे शीर्षक दुरुस्त कराल का..? एक तर निवेदीतांच्या असे लिहून अकारण बहुवचनाकडे रोख आहे आणि इतर अनावश्यक शब्द असल्याने मूळ लेखाचा विषय शीर्षकातून डोकावर नाहीये.

(मला हे शीर्षक वाचून "बातम्या देणार्‍या महिला निवेदकांच्या झालेल्या चुका" असा कांहीसा विषय वाटला होता)

माहितगार's picture

8 Mar 2017 - 12:15 pm | माहितगार

शिर्षकात नेमकी काय दुरुस्ती करु ? तुम्हीच सुचवा. कारण 'भान सुटलेल्या' अशा रोख ठोक टिके सोबत आदरार्थी बहुवचन वापरले जावे असा उद्देश होता. निवेदीता हा शब्दच निवेदक शब्दाशी उच्चार साधर्म्य असल्यामुळे एकवचनातही 'निवेदीतेच्या' मध्येही तो फील येणारच. एक पर्याय असा की "'निवेदीता मेनन' यांच्या मांडणीतील निसटत्या बाजू" असा काही अधीक ठिक असेल का ?

निवेदीता मेनन (JNU) आणि X X X X विचार.

येथे तुम्हाला हवा तो शब्द भरा.

("देशद्रोही" असा शब्द वापरलात तर तुमच्यावर मोदीभक्त असल्याचा आरोप होईल. नुसत्या फुल्या फुल्या ठेवल्या तर... जौदे. समजुन घ्या.)

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2017 - 1:17 pm | श्रीगुरुजी

निधर्मांधांच्या लाडक्या जी एन साईबाबाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिल्यामुळे त्यावर या निवेदिता बाईचे व जनेविमधील देशद्रोही टोळक्याचे काय मत आहे?

सुबोध खरे's picture

8 Mar 2017 - 8:40 pm | सुबोध खरे

देश द्रोही असे सरळस्पष्टपणे म्हणण्यास हरकत नसावी. एकसंध भारताविरुद्ध काहीही बोलणे हे घटनेनुसार देशद्रोहच आहे.
अशा हरामखोर बाईला साईबाबाच्या शेजारच्या कोठडीत जन्मठेपेत सश्रम तुरुंगवासात बसवावे.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे या वाचनाची आठवण झाली.

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे काय करणार मग..?