३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही.
परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला.
मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो.
टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले.
मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो.
कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला.
मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो.