✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

ए — एस, Tue, 08/04/2015 - 23:22
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!) प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे - ('खरे' कवी यांची माफी मागून...) 'नसतेच मिपा हे जेव्हा देह हलता-बोलता बनतो तुंबलेली उरकती कामे संसार नेटका होतो आ वासून पाहे तीही स्वतः उठून चहा जेव्हा करतो बायकोपण करते कौतुक नेटपॅकही शाबूत राहतो तू सांग सखे वाट्टेल ते तुजसाठी करेन मी आज एक सोडून तुळशीबाग जग सारे तुला फिरवितो नको फुकाचे वादविवाद ना डु-आयडींचे ट्रोलिंग वटवट ना वाचे कुठची दिन सुखेनैव हा कटतो (...अर्ज किया है...) ना स्पर्धा कुठली न ईर्ष्याही काही स्कोअर-सेटलिंगला आता स्कोपच नाही असे हेवनवासी होती आयडी काही आता काडीही नाही, अन् आयडीही नाही! (गाणे परत सुरू...) ना अजून झालो कोता, जाणार ना मी हो 'कुठेही' झालंय का मिपा सुरू, मी हळूच उघडून बघतो...! नसतेच मिपा हे जेव्हा...' ;-)

प्रतिक्रिया द्या
16514 वाचन

💬 प्रतिसाद (32)

मस्त!

विकास
Tue, 08/04/2015 - 23:24 नवीन
Image removed. पूर्ण सहमत!
  • Log in or register to post comments

हाहाहा. एक नंबर.

मधुरा देशपांडे
Tue, 08/04/2015 - 23:34 नवीन
हाहाहा. एक नंबर. हितचिंतक, मधुरा
  • Log in or register to post comments

उत्तम!

जुइ
Tue, 08/04/2015 - 23:36 नवीन
झकास जमले आहे!!
  • Log in or register to post comments

वाह, खुप सही.

पद्मावति
Wed, 08/05/2015 - 01:28 नवीन
वाह, खुप सही.
  • Log in or register to post comments

खासच

श्रीरंग_जोशी
Wed, 08/05/2015 - 01:31 नवीन
खासच आहे विडंबन. अजुन येऊद्या :-) .
  • Log in or register to post comments

ब्येष्ट !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/05/2015 - 01:45 नवीन
ब्येष्ट !
  • Log in or register to post comments

मिपा बंदचे 'फायदे' मिपावरच

प्यारे१
Wed, 08/05/2015 - 03:12 नवीन
मिपा बंदचे 'फायदे' मिपावरच सांगताय? मस्त जमलंय हे वे सां न ल.
  • Log in or register to post comments

तंतोतंत!

नाखु
Wed, 08/05/2015 - 08:40 नवीन
प्यारे माझे प्रतीसाद ढापतोय काय असा सौंशय येऊ लागलाय (ह.घ्या) घरघरकी कहानीवाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पण मिपा बंद असल्याचा एक

एस
Wed, 08/05/2015 - 23:49 नवीन
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

क्या बात ! खुलली आहे प्रतिभा

स्रुजा
Wed, 08/05/2015 - 04:17 नवीन
क्या बात ! खुलली आहे प्रतिभा ;)
  • Log in or register to post comments

उत्तम !

माझिया मना
Wed, 08/05/2015 - 06:33 नवीन
आवडले एकदम ब्येश्ट!
  • Log in or register to post comments

झकास जमलंय विडंबन!

जडभरत
Wed, 08/05/2015 - 07:07 नवीन
झकास जमलंय विडंबन!
  • Log in or register to post comments

बेष्ट जमलय स्वॅप्सभौ!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 08/05/2015 - 07:07 नवीन
बेष्ट जमलय स्वॅप्सभौ!
  • Log in or register to post comments

मस्तच कळलंय विडंबन.

अजया
Wed, 08/05/2015 - 07:11 नवीन
मस्तच कळलंय विडंबन. तुळशीबागेवर भारी राग हो तुमचा!
  • Log in or register to post comments

नाव नका काढू हो त्या अभद्र

एस
Wed, 08/05/2015 - 12:01 नवीन
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

@नाव नका काढू हो त्या अभद्र

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/05/2015 - 12:14 नवीन
@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> Image removed. मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

ही: ही: ही: ही:! दू दू बुवा!

एस
Wed, 08/05/2015 - 12:34 नवीन
ही: ही: ही: ही:! दू दू बुवा! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ह्ही!

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/05/2015 - 07:20 नवीन
ह्ही ह्ही ह्ही!
  • Log in or register to post comments

मस्त....

मुक्त विहारि
Wed, 08/05/2015 - 08:30 नवीन
सुंदर विडंबन
  • Log in or register to post comments

खी खी खी. =)) जबराट.

प्रचेतस
Wed, 08/05/2015 - 08:34 नवीन
खी खी खी. =)) जबराट.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Wed, 08/05/2015 - 09:34 नवीन
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))
  • Log in or register to post comments

हा हा लय भारी :)

नीलमोहर
Wed, 08/05/2015 - 09:46 नवीन
अनर्थशास्त्र ?? हे काय असतं ?
  • Log in or register to post comments

आवडले

पाटील हो
Wed, 08/05/2015 - 09:48 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments

माताग्रामेच द्वादशानी मूल्यम

पगला गजोधर
Wed, 08/05/2015 - 09:57 नवीन
"माताग्रामेच द्वादशानी मूल्यम !" बहु सुन्दरं अस्ति !
  • Log in or register to post comments

हम्म..

सस्नेह
Wed, 08/05/2015 - 10:13 नवीन
आमचीच कविता लिवलीय ! तुंबलेली कामे,..बैलाचा डोळा...!
  • Log in or register to post comments

कळकळ, तळमळ, हळहळ पोचली

वेल्लाभट
Wed, 08/05/2015 - 11:06 नवीन
कळकळ, तळमळ, हळहळ पोचली
  • Log in or register to post comments

धन्यवाद हो धन्यवाद!

एस
Wed, 08/05/2015 - 12:03 नवीन
धन्यवाद हो धन्यवाद! तुम्हांलाही आणि वरील सर्वांनाही..! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

१ नंबर

तुडतुडी
Wed, 08/05/2015 - 12:02 नवीन
१ नंबर
  • Log in or register to post comments

जबराट जमलंय..

चिगो
Wed, 08/05/2015 - 12:15 नवीन
जबराट जमलंय मिपा-बंद-स्फुर्त विडंबनकाव्य.. लै कलाकार तुम्ही, स्वॅपभौ..
  • Log in or register to post comments

कसचं कसचं! :-) *

एस
Wed, 08/05/2015 - 23:51 नवीन
कसचं कसचं! :-) * *(प्रतिसादकल्पनामूळश्रेय - श्री. दमामि यांचा एक प्रतिसाद.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय

प्यारे१
Wed, 08/05/2015 - 12:42 नवीन
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!
  • Log in or register to post comments

+१ . . आपल ते हे..छानय विडंबन

रातराणी
Wed, 08/05/2015 - 13:22 नवीन
+१ . . आपल ते हे..छानय विडंबन!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा