गुलाम अली साहब
'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली. 'का करू सजनी आये ना बालम' या ठुमरीतुन ति भेटत नसल्याची जी व्याकुळता पेश केलित ती अगदी लाजवाब आहे.