क्रेकन
द मॉन्स्तर!
क्रेकनने त्याला गिळले.
आणि तो एका अंधार पोकळीत घुसला!
अंधार आणि फक्त अंधार!
डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही.
"आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला.
"हो" अरब म्हणाला.
"शैतानाची कलमे लक्षात आहेत?"
"हो"
"वागशील त्यानुसार?"
"हो"
"चांगलं की वाईट?"
"वाईट"
"नाग की गरुड़?"
"नाग"
"बकरा की गाय?"
"बकरा"
"स्वर्ग की नरक?"
"नरक"
"प्रेम की द्वेष?"
"द्वेष"
तो हसला!
"शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?"
"जमीन!"
"नाग आणि बकरे तुला मदत करतील."
तो अंधार पोकळीतून बाहेर आला.
समोर पूर्ण वाळवंट!
वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती.
त्याच्या कानात आवाज घुमला
'तू जमीन निवडलीस'
पायरेट ऑफ़ डेज़र्ट!
पायरेट ऑफ़ अरेबिया!
त्याने जहाज बघितले.
अत्यंत अतिप्रचंड!
जहाजावरून एक दोरी खाली आली.
अत्यंत जाड!
काळी!
सुळसुळ!
साप!!!
जहाजाच्या प्रत्येक दोरीच्या जागी साप होता!!
छोटे,मोठे,जाड,बारीक!
तो जहाजावर चढला.
जहाजावर बरीच माणसे होती!
बोकडाचे तोंड असलेली!
'नाग आणि बकरे तुला मदत करतील'.त्याला शब्द आठवले.
आणि तेव्हापासून सुरू झाले,
पायरेटचे तांडव!!!!!!
प्रतिक्रिया
2 Jan 2016 - 6:39 pm | DEADPOOL
घोस्टहंटर-१
www.misalpav.com/node/34123
घोस्टहंटर-२
www.misalpav.com/node/34140
घोस्टहंटर-३
www.misalpav.com/node/34145
घोस्टहंटर-४
www.misalpav.com/node/34161
घोस्टहंटर-५
www.misalpav.com/node/34185
घोस्टहंटरच्या निमित्ताने!
www.misalpav.com/node/34200
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १
www.misalpav.com/node/34204
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २
www.misalpav.com/node/34253
2 Jan 2016 - 6:41 pm | DEADPOOL
मंडळी माफ करा,भाग छोटा झालाय!
पुढील भाग मोठा येईल!
(मोबाईलवर टंकलय!!!)
3 Jan 2016 - 11:41 am | पिंगू
मोबाईलवर टंकल्यावर इतका वेळ लागणारच. बाकी हा भाग पण मला उत्कंठावर्धक वाटला.
3 Jan 2016 - 3:28 pm | DEADPOOL
thanks pingu
2 Jan 2016 - 6:55 pm | यशोधरा
पुढील भाग लवकर येऊदेत!
2 Jan 2016 - 8:24 pm | DEADPOOL
थँक्स यशोधरा!
3 Jan 2016 - 12:00 am | अनिरुद्ध.वैद्य
छान!
पण जरां लवकर टाका हो ... विसरायला होतंय! त्यात त्या मागच्या झोपेत मारणारिचा आणि इथला पायरेट काय कळून नाही राहिलंय!
3 Jan 2016 - 10:10 am | DEADPOOL
दोघांचा सम्बंध पुढील भागांत कळेल!
'ती'ही येईल!
3 Jan 2016 - 11:17 am | मयुरMK
मोठा भाग येऊ द्या जरा :) . छान लिहिलंय
3 Jan 2016 - 6:22 pm | DEADPOOL
thanks MAYUR!