समता

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
29 Dec 2015 - 5:59 pm

प्रियेसी बरोबर गेलो मी तिच्या घरी ,
पोहोचण्या आधीच होती जातीची दरी
'जात काय ह्याची' - त्यांनी तिला विचारल
दलित , सवर्ण - समतेच ज्ञान मी पाझरल

[ ते ]

अद्भुत तेवर विश्वास आहे आमचा ,
पण चमत्कार फक्त विसरायचा
'जात' नाही ती 'जात'असते पोरा
'वैरी ' नाही करायचा समाज सारा

'फळा'पुसला कि समानतेलाही इथं पुसतो ,
'आंतरजातीय विवाह' सगळ्यांनाच इथं सलतो
पण ,जे झालं ते आता 'चार भिंतीत' इथं विसरायचं ,
अन , आपण 'सगळे समान' असच बाहेर बोलायचं

[मी ]

ह्या 'सैतानाचा' आता कंटाळा आलाय ,
ह्या 'ठासण्याचा' आता कंटाळा आलाय
ह्या 'व्यापाराचा' आता कंटाळा आलाय
फक्त 'फायदाच 'काय तो 'प्राधान्य' झालाय

कावराबावरा नाही झालो ,मी तुमच्यामुळे ,
कावराबावरा नाही झालो ,मी तुमच्या बंदीमुळे
कावराबावरा नाही झालो , मी कुणा मुळेच
प्रिये , पण सगळा हे होतंय ते स्वार्था मुळेच

[माझं मन ]

जाती ,धर्मासाठी वरचढ करता कशाला ?
माणुसकीची 'शोकयात्रा' मिरवता कशाला ?
ही कुजलेली युद्धे खेळता कशाला ?
स्वार्थासाठी देशाला 'पुरता' कशाला ?

तुमचं रक्त आलाय कुठून अन कशासाठी ?
रक्तरंग एक आहे ,नाही माणसाला मारण्यासाठी ?
चमकणार हि अंधुक झालेले , बघितलय मी ,
जातीयतेच्या आणीबाणीत , सडवनार नाही मी ,

बोलू नका कि माझं बोलण पटतंय तुम्हाला ,
तुमच्या डोळ्यानेच लाथाडली मळ मला
पण ,जे झालं ते इथं आता चार भिंतीत विसरायचं ,
अन , आपण सगळे समान असच बाहेर बोलायचं

( Apologies for typing mistakes :P )

संस्कृती

प्रतिक्रिया

हम्म्म... जातिव्यवस्था संपत नाही याचे सर्वात मोठे कारण जातींची उतरंड आहे...

पालीचा खंडोबा १'s picture

29 Dec 2015 - 8:56 pm | पालीचा खंडोबा १

छानच