समता
प्रियेसी बरोबर गेलो मी तिच्या घरी ,
पोहोचण्या आधीच होती जातीची दरी
'जात काय ह्याची' - त्यांनी तिला विचारल
दलित , सवर्ण - समतेच ज्ञान मी पाझरल
[ ते ]
अद्भुत तेवर विश्वास आहे आमचा ,
पण चमत्कार फक्त विसरायचा
'जात' नाही ती 'जात'असते पोरा
'वैरी ' नाही करायचा समाज सारा
'फळा'पुसला कि समानतेलाही इथं पुसतो ,
'आंतरजातीय विवाह' सगळ्यांनाच इथं सलतो
पण ,जे झालं ते आता 'चार भिंतीत' इथं विसरायचं ,
अन , आपण 'सगळे समान' असच बाहेर बोलायचं
[मी ]