विश्वभरातील अन्याय्य विचार आणि वर्तन करणार्‍या 'त्या' पुरुषांनो- आणि 'त्या' स्त्रीया सुद्धा तुमचा जाहीर निषेध

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
11 Dec 2015 - 4:55 pm

"वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता" या धागा लेखात गोवेकर महिलांनी " 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या (गोव्याबाहेरच्या) लोकांची दृष्टी जेव्हा बदलतात.." अशा स्वरुपाची नाराजी व्यक्त केली आहे; मी महाराष्ट्रातल्या ज्या भागतून येतो तेथे मी गोवेकर मुली अथवा स्त्रीयांबद्द्ल कोणतीही नकारात्मक अयोग्य भावना कधी ऐकली अथवा पाहिली नाही, परंतु एका स्त्रीला जेव्हा दुसरी स्त्री अनुमोदन देते आहे तेव्हा काही शहरातील काही समुह गटांकडून असा त्रास होत असला पाहीजे. अशा प्रकारे समुह,गाव,शहर,प्रांत,जात,धर्म,भाषा,वर्ण असे कोणतेही कारण देऊन त्या समुहातील स्त्रीयांना विशीष्टपणे कॅटेगराईज करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे सर्वथा गैर आणि निषेधार्ह आहे. अर्थात हे खरेतर असे गोवेकर स्त्रीयांबाबत होते असे नाही, पुण्या मुंबईतल्या मुली स्वैर असतात/वागतात अशा प्रकारची टिका मी माझ्या हैदराबदच्या भेटीत एका ज्येष्ठ (वयाने) मराठी (मेडीकल) डॉक्टर स्त्रीकडून ऐकली किंवा अलिकडे पुण्याच्या मुलींबद्दल व्हॉट्स-अपवरून तथाकथीत विनोद पाहण्यात आले. सांगण्याच तात्पर्य हे केवळ गोव्या-पुण्या अथवा मुंबई बाबत होत असे नव्हे, अगदी इंग्रजी चित्रपट पाहून पाशात्य स्त्रीयांबद्दल, किंवा भारतीय स्त्रीया त्यांच्या पोषाखातून पोटाचे प्रदर्शन करतात त्या स्वैरच असतात असा पुर्वग्रहकरून त्यांना अपमानास्पद बोल लावणे सर्वस्वी चुकीचे आहे. विनोद करणे हि वेगळी गोष्ट आहे पुर्वग्रह करून शिक्के मारणे हा चांगला विचारही नाही चांगला विनोदही नाही. असेच चुकीचे विचार ऐकुन काही लोकांचे चुकीचे निर्णय काही स्त्रीयांसाठी घातकही ठरु शकतात.

स्त्री अमुक एक पोषख करते अथवा अमुक पद्धतीने वागते, पुरुषांशी मोकळेपणाने बोलते वावरते, किंवा तिची स्वतःची व्यक्तीगत जिवनातील निवड अमूक राहिली आहे म्हणून तिच्या बाबत अपमानास्पद विचार बाळगणे सर्वस्वी निषेधार्ह आहे. विश्वभरातील असा अन्याय्य विचार आणि वर्तन करणार्‍या 'त्या' पुरुषांनो- आणि 'त्या' स्त्रीया सुद्धा आम्ही तुमचा जाहीर आणि तीव्र निषेध करतो.

वावरसंस्कृतीसमाजजीवनमानराहणीप्रकटनविचारसद्भावनाअनुभव

प्रतिक्रिया

जाहीर तीव्र निषेध तर आहेच.

अशा प्रकारे समुह,गाव,शहर,प्रांत,जात,धर्म,भाषा,वर्ण असे कोणतेही कारण देऊन त्या समुहातील स्त्रीयांना विशीष्टपणे कॅटेगराईज करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे सर्वथा गैर आणि निषेधार्ह आहे.

विनोद करणे हि वेगळी गोष्ट आहे पुर्वग्रह करून शिक्के मारणे हा चांगला विचारही नाही चांगला विनोदही नाही.

अत्यंत सहमत.

लेखन विषयाशी अत्यंत सहमत !
त्याच प्रमाणे, स्त्रीयांकडूनही पुरुषांसदर्भात असे पूर्वग्रह पोसले व पसरवले जातात ते ही डोक्यात जातं. उदा: टिपिकल, पुरूष म्हणजे 'एका माळेचे मणी' या अर्थाचे जोक्स वगैरे !
मी अशा स्त्रीयांच्याही वर्तनाचा निषेध करते !

बोका-ए-आझम's picture

11 Dec 2015 - 5:22 pm | बोका-ए-आझम

असं मत हे त्याच त्या वर्तुळात आणि परीघात फिरणाऱ्या आणि संकुचित मानसिकता असणाऱ्या लोकांकडून होतं आणि दुर्दैवाने चित्रपटांत केल्या जाणाऱ्या stereotypical चित्रणाने त्याला हातभार लागतो.

पैसा's picture

11 Dec 2015 - 5:31 pm | पैसा

स्टिरिओटाईप समजुतींचा निषेध. पुण्यामुंबईतल्या स्त्रियांबाबत असा विचार होतो याचा अनुभव सुद्धा आहे. एकदा मुंबईहून वर्धेला जात होते. जळगाव की भुसावळ कुठेतरी रिझर्व्हेशनच्या डब्यात काही शहरी नोकरदार दिसणारे लोक चढले. त्यानी मी आणि माझी चुलतबहीण आम्हाला चक्क सीटवरून झोपलेले उठवले आणि आपण बसू लागले. विरोध केला तर हे आमचे रुटीन आहे, इथे टीसी पोलीस कोणी येणार नाही वगैरे भाषा सुरू केली.

सगळ्यात वाईट म्हणजे त्यातल्या एकाने "मुंबई पुण्याच्या बाया लै शान्या समजतात स्वतःला" अशी कॉमेंट मारली. बाकी लोक नुसते बघत राहिले. ते उतरून गेले तशी आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की त्या भागात हे नेहमीच चालतं.

पुरुष म्हणजे असेच हा स्टिरोटाईप विचार काही बायकाच नव्हे तर अनेक पुरुषही करतात आणि त्यात काही चूक आहे असे त्यांना जाणवतही नाही. ही आपले संस्कार आणि शिक्षण कमी पडत आहे याची खूण म्हणावी का?

मी-सौरभ's picture

11 Dec 2015 - 5:38 pm | मी-सौरभ

पोप्कॉर्न कोण आन्तोय रे??

असल्या होलसेल निषेधाच्या धाग्याचा निषेध.
माहीतगारांनी नेहमीच्या माहीतीपूर्ण धाग्या ऐवजी असा अपेक्शाभंग केल्याबद्दल त्यांचा निषेध.
.
.
निषेधाचे बोर्ड आमच्याकडून बनवून न घेतल्याबद्दल अजूनच निषेध.

सूड's picture

11 Dec 2015 - 6:46 pm | सूड

स्त्री अमुक एक पोषख करते अथवा अमुक पद्धतीने वागते, पुरुषांशी मोकळेपणाने बोलते वावरते, किंवा तिची स्वतःची व्यक्तीगत जिवनातील निवड अमूक राहिली आहे म्हणून तिच्या बाबत अपमानास्पद विचार बाळगणे सर्वस्वी निषेधार्ह आहे. विश्वभरातील असा अन्याय्य विचार

हे पुरुषांच्या बाबतीत पण होतं हो, काय सांगायचं आता!! असो.

नाखु's picture

12 Dec 2015 - 9:15 am | नाखु

सहमत.
मागे कुठल्यातरी धाग्यात शाळेला सोडायला आलेल्या पुरुष पालकाशी वितंडवाद व हीन आरोप करणार्या स्त्रीला, त्याच सोसायटीतील स्त्रीयांनी जाब विचारणे सोडाच साधा अटकाव ही केला नव्हता असे प्रतिसाद कर्त्याने सांगीतले.

घाऊक प्रमाणात विचार करणे आणि मुलांना त्यांच्या कळत्या वयातच असे करण्यापासून परावृत्त करणे.वेशभूषेवरून्,किंवा फक्त विशीष्ठ प्रांत /समूह्/जात्/देशाची व्यक्ती म्हणून काही पूर्वग्रह दूषीत मते बनवू नयेत म्हणून आपणच घरापासून काळजी घ्यायला हवी..

अगदी ताजे उदाहरण आहे मी मुलासोबत चिंचवडहून पुण्याला गाडीवरून चाललो होतो,पिंपळे सौदागरच्या चौकात (बर्याच मॉल व आय टी मुळे हा भाग पूर्णतः कॉस्मोपॉलीटीन झाला आहे. सिग्नलला काही पूर्वांचल भागातील तरूण तरूणी चालले होते.मुलाने उन्त्सुकतेने म्हटले "बाबा हे चिनी लोक भारतात येतात शिकायला नोकरीला ?" मला त्यांच्या पेहरावावरून आणि एकून तोंडावळ्यावरून ते चिनी नाहीत तर भारतातल्याच सप्त्कन्या प्रदेशातून आहेत हे जाणवले.(मिझोराम-त्रिपुरा ई). आणि मी मुलाला लगेच म्हटले तुला जर भारतातल्या दुसर्या राज्यात अगदी आंन्ध्र/ओरिसात गेला आणि त्यांनी तू पाकीस्तानी/इतर देशातला आहेस असे म्हटले तर काय वाटेल (तुझी भाषा त्यांना व त्यांची भाषा तुला कळत नसल्याने).

तो रागाने उसळून म्हणाला "नाही आवडणार मी भारतीय आहे आणि महाराष्ट्रातून आहे हे त्यांना सांगीन आणि त्यांनी मला मराठी+भारतीय समजावे अशीच अपेक्षा ठेवीन." योगायोगाने नंतर टीव्हीवर त्याला एका सांस्क्रुतीक कार्यक्रमात दोन चार राज्यांचे नृत्य पाहायला मिळाले त्यात असेच पूर्वांचल भागातील्ही एक होते आणि आपोआप उत्तर मिळाले.

दुर्दैवाने आजही सुशिक्षीत+शहरी लोक सर्व स्वेटर विकणार्या आणि पूर्वांचल भागातील युवक युवतींना नेपाळी-चिनी म्हणून संबोधतात आणि त्याचा त्यांना काय त्रास होत असेल त्याचा कोणीही विचार करीत नाहित

हिंदुस्तान मेरा वतन नुस्ते अंमलात आणणार्या सोन्याबाप्पुंचा पंखा

नाखु

पैसा's picture

12 Dec 2015 - 7:41 pm | पैसा

पुरुषांनी घरकाम करणे म्हणजे कमीपणा, बायकांना आर्थिक निर्णय, प्रॉपर्टीच्या बाबत वगैरे कळत नाही, असे अनेक स्टिरिओटाईप सर्वत्र बघायला मिळतात. त्यात बायकांचे बायकांबद्दल आणि पुरुषांचे पुरुषांबद्दल गैरसमज हा अजून एक मोठा विषय.

पूर्वांचलातील लोकांना नेपाळी समजणे हे तर खरेच खूपदा घडते. मीच परवा अशी चूक केली होती. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणार्‍या मुलीचा चेहरा बघून विचारले होते "तुम नेपाल से आयी हो?" त्यावर ती जरा हसली आणि म्हणाली "नहीं, आसामसे." ऐकून "इतनी दूर से आयी हो क्या," म्हणत तिथून निघाले खरी. पण आसामी लोकाणा सरसकट नेपाळी समजायची चूकच आहे. दिल्लीत मधे एका मुलाचा असाच विनाकारण खून झाल्याची घटना आठवली.

अजया's picture

11 Dec 2015 - 7:12 pm | अजया

पुरुषांबाबतही होतं खरं.मान्य आहे.
बायकांचे पण पुरुषांबाबत उगाचच अनेक पूर्वग्रह असतात हे अनुभवले आहे.मी स्वतःही त्याला अपवाद नाही.मला केसांचा पोनी घालून फिरणारे बुवा लोक उगाच थिल्लर फालतु वाटत असत.ते नंतर अनुभवाने बदलले!

प्रमोद देर्देकर's picture

11 Dec 2015 - 7:32 pm | प्रमोद देर्देकर

अहो माहितगार हे नविन आहे काय जगाच्या अदिपासुन अंतापर्यंत हे चालतच राहणार. किती लोकांना काय काय समजावणार?

पद्मावति's picture

11 Dec 2015 - 10:54 pm | पद्मावति

उत्तम विषय.
सरसकटीकरण वाईटच.
स्टीरिओटाइपचं अजुन एक उदाहरण म्हणजे युरोपियन, अमेरिकेन ( श्वेतवर्णीय) स्त्री किंवा पुरूष सर्रास लग्नाबाहेर अफेअर्स करतात, त्यांना कुटुंबसंस्थेची अजिबात किंमत नसते, त्यांची मुलं बिघडलेली असतात.. वगैरे वगैरे.

उगा काहितरीच's picture

12 Dec 2015 - 12:46 am | उगा काहितरीच

१००% सहमत!
रच्याकने सरसगटीकरण चुकच! मग ते पुण्यामुंबईच्या मुलींच्या बाबतीत असो की त्या भलत्या पुढारलेल्या ,ॲडव्हान्स असतात असे किंवा ग्रामीण भागातील मुली अशा नसतातच असेही.

सरसकटीकरण अनेक प्रकारचं असतं. घरात बायकोला मदत करणारा नवरा असला की बायको आळशीच असली पाहिजे. आमच्याकडे नाही बाई अशी सवय असं बायकाच म्हणतात. हाऊसवाईव्ज ना काम नसतं अस नोकरदार म्हणतात, नोकरी करणार्‍या बाईचं घराकडे लक्ष नसतं असं गृहिणी म्हणतात.

बाहेरच्या देशांत संस्कार, मुल्यं, कुटुंबवत्सल भावना नसतात असा उगीच च भारतीयांचा गैरसमज आहे. आमची संस्कृती आमची संस्कृती करत बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा दुटप्पीपणा आपण आपोआप च करतो.

इथुन भारतात जाताना लसीकरण करुन जाणारे भारतीय बघितले की काय म्हणायचं कळत नाही. बरं येऊन एक च वर्ष झालेलं असतं

भारतीय नोकरदार नुसती ओझी वाहतो, पार्कांमध्ये फिरायला जाणे, शहराबाहेर जाणे, मित्रांबरोबर एंजॉय करणे असले प्रकार त्यांच्या गावी ही नसतात असा इथे काम करणार्‍या भारतीयांचा उगाचच समज असतो.

बाहेर राहणारे भारतीय खोर्‍याने पैसा ओढतात हा इथल्यांचा स्टीरीओटाईप.

आम्ही कट्यार स्क्रीन करतो आहोत आमच्या शहरात . थिएटर वाल्याने सुरुवातीपासुन इतका त्रास दिला की विचारता सोय नाही. अगदी ठरवुन नियमांवर बोट ठेवुन अडवुन पाहत होता. ब्युरॉक्रसी चा अर्क ! परवा आय सी एम ए कडुन फिल्म मिळाल्यावर थिएटर मध्ये गेलो. त्याचं टेस्टिंग करत होतो. एक एक करत त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत गेलो तसं त्याला आम्ही तांत्रिक बाजु समजणार्‍यांपैकी आहोत हे कळलं आणि मग आम्हाला म्हणे मागच्या एका भारतीय सिनेमाच्या वेळेस त्रास झाला म्हणे फार तेंव्हापासून आम्ही भारतीय सिनेमे लावत नाही !! सिनेमा कोणता ? तर म्हणे लंच् बॉक्स आणि म्हणे एवढा त्रास सहन करुन २० च लोकं बघुन गेले . काय बोलणार कप्पाळ? पण हा देखील स्टीरीओटाईप च. भारतीय कारभार असाच भोंगळ हे त्याने आम्हाला जरा गोड शब्दात म्हणजे "तुम्ही नाही हां तसे" अशा थाटात बोलुन दाखवला. या दिडशहाण्याने लंच बॉकच्स च्या वेळी झालेला लॉस आमच्या कडुन भरुन घेतला असावा.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2015 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार

अशा स्वैर वर्तन करणार्‍या स्त्रीया आम्हाला का भेटत नाहीत?

काळा पहाड's picture

12 Dec 2015 - 3:44 pm | काळा पहाड

तुमच्या वयाच्या स्वैर वर्तन करणार्‍या स्त्रीया भेटणं जरा अवघडच नाही का, परा काका?

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2015 - 7:35 pm | परिकथेतील राजकुमार

अहो मग तुमच्या वयाच्या पण चालतील आजोबा.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2015 - 7:51 pm | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif
परावाणी!

संदीप डांगे's picture

12 Dec 2015 - 7:48 pm | संदीप डांगे

काही प्रतिसादकांचे प्रतिसाद वाचून करमणूक झाली. ;-)