संस्कृती

मनावरील ते शूर्प ओरखडे १ : (ईस्टेटीची परात)

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 8:14 pm

आज सकाळीच भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम ! हा लेख लिहिण्याचा योग आला, भारतीय स्त्रीच्या या आकर्षणा मागे पुर्वार्जीत मालमत्तेत स्त्रीयांना सहसा वाटा मिळत नसे -आता कायदा बदलला आहे- त्यामुळे कदाचित जिवन लढ्याच्या स्पर्धेतून येणारा पण ज्या संपत्तीवर तुमचा तांत्रिक-नैतिक दृष्ट्या अधिकार असणे अभिप्रेत नाही तिचा मोह करणारी स्त्री कुठे दृष्टीस पडली की स्त्री आदर्श असते टाईप मनात तयार झालेल्या प्रतिमांना तडे जाऊन मनावर क्वचित शूर्प ओरखडे उमटतात.

संस्कृतीअनुभव

भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम !

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 10:09 am

वस्तुतः मानवजातीला सोने जड जवाहीर्‍यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहे, भारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे.

संस्कृतीसमाजअर्थकारण

पुणेरी पगडी

Dinesh Satpute's picture
Dinesh Satpute in जनातलं, मनातलं
16 Feb 2016 - 7:44 pm

मी नगरला असताना मित्र म्हणायचे कि तुला नगरमध्ये गाडी चालवता आली तर जगात तू कोठेही गाडी चालवू शकतोस.आम्हा नगरकरांचा हा समज किती खोटा आहे हे मला पुण्यनगरीत आल्यावर समजले.नगरमध्ये गाडी चालवताना सिग्नलला गाडी थांबल्यावर सिग्नल कळत नसल्याने गाडीवर मागे बसला आहे त्याला आम्ही 'सिग्नल आहे का?'असं विचारायचो.पुण्यात सिग्नलला थांबल्यावर 'पोलिस आहे का?'असं विचारतात.

संस्कृतीप्रकटन

पनिपत नंतर......

मनराव's picture
मनराव in जनातलं, मनातलं
16 Feb 2016 - 7:33 pm

पनिपतच्या पराभवानंतर मराठी युद्ध कैद्यांचे काय झाले यावर एक लेख काल लोकसत्ताला वाचला.......

२२ हजार युद्ध कैद्यांनां अहमद शहा अब्दालीने आपल्या बरोबर अफगाणिस्तानात न नेता बलुचीसस्तान मधे कलातचा खानाच्या स्वाधीन केले... त्या कैद्यांचे पुढे काय झाले याबद्द्लचा हा लेख आहे.

तोच लेख मिपा बांधवांसाठी डकवत आहे....

संस्कृती

दिल से सलूट....

dipak bhutekar's picture
dipak bhutekar in जनातलं, मनातलं
14 Feb 2016 - 12:29 pm

नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

धोरणमांडणीसंस्कृतीसमाजविचारप्रतिसादसद्भावनाप्रतिक्रियालेखबातमीमतसल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतप्रतिभा

चौकस

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
14 Feb 2016 - 5:16 am

निवेदक : तेंव्हा मंडळी .............. अपराध पोटात घाला चुकलं माकलं माफ करा.
( एक लहान मुलगा हेल्मेट घालून स्टेजवर येतो.)
अरे हे कोण आले. ए बाळा काय हवय तुला. आणि इथं कसा आलास? ए बाळा...... अरे ए बाळा.
मुलगा : ( हेल्मेट काढतो ) काय म्हणालात ओ काका अज्जिबात ऐकू आलं नाही. हेल्मेटमुळे काही ऐकूच येत नाही
बघा.
निवेदक: अरे मी विचारले कोण आहेस तू. इथे काय करतोयेस? ते हेल्मेट का घातले आहेस.
मुलगा: ओ काका मी मीच आहे. माझी आई म्हणते की उगाच नसत्या चौकशा करणार्‍या चहाडबुचक्या माणसाना
अज्जिब्बात नाव सांगायचे नाही.

संस्कृतीप्रश्नोत्तरे

आयडीचे डू-आयडीस पत्र

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
10 Feb 2016 - 3:03 pm

तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं.

नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो.

मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' .... च्या, जुन्या-जाणत्या आयडींना छपरी प्रतिसाद टाकून चिथवशील तर ब्लॉक करीन !' तेंव्हापासनं तू फक्त गोग्गोड लिहू लागलास.

धोरणसंस्कृतीइतिहासविडंबनशब्दक्रीडाप्रकटनसद्भावनाअभिनंदनचौकशीविरंगुळा

ब्रिटीश महासत्तेचा आधार, लंडनच्या मनोर्‍यातील द्रोण कावळे !!

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
7 Feb 2016 - 7:42 pm

एकेकाळी ज्यांच्या सत्तेच्या प्रदेशात म्हणे सूर्य मावळत नसे आजही जागतीक पाच मोठ्या महासत्तात ज्या देशाचे नाव घेतले जाते त्या ब्रिटीश महासत्तेचा आधार कोणता ? आधार म्हणून प्रत्येकजण ब्रिटीशांची वेगवेगळी सामर्थ्यस्थाने सांगेल ज्यात त्यांची पंक्च्युआलिटी ते त्यांचे उत्कृष्ट आरमार इत्यादी पण जर कुणी लंडनच्या मनोर्‍याची माहिती घेतली तर हे सर्व खोटे आहे. भारतीयांची मुर्तीपूजा, त्यांच्या गणपतीचे दूध पिणे ते कावळ्याच्या रूपात येऊन मृतात्म्यांनी पिंड खाणे अशा अंधश्रद्धांवर केवळ भारतीयांचीच मोनोपॉली आहे असा दोष दिला जातो.

संस्कृतीमाहिती

स्त्री - काल आणि आज

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
4 Feb 2016 - 8:21 pm

पूर्वी चार भिंतींमध्ये
जखडलेली स्त्री होती.
रांधा वाढा उष्टे काढा
आयुष्य ती जगत होती.

कावळा तिला शिवत होता
चार दिवसाची हक्काची
सुट्टी तिला मिळत होती.

स्त्री आज स्वतंत्र आहे
घरा बाहेर पडली आहे.
ऑफिसात जात आहे
धंधा हि पाहत आहे.

मुलांना शिकवत आहे
स्वैपाक हि करीत आहे.
थकलेल्या शरीराने
अहोरात्र खटत आहे.

कावळा आज शिवत नाही
हक्काची चार दिवसाची
सुट्टी हि मिळत नाही.

मुक्त कवितासंस्कृती