“पता नहीं. कुछ हो रहा हैं अन्दर...”
अकोल्याला (माझं शहर) आलो कि मी नं चुकता शहरातल्या त्या भागात फिरायला जातो जिकडे शहरातले मोठे मार्केट, भाजी बाजार आणि बरीच दाट वस्ती आहे. हिंदू, मुसलमान, सिंधी, मारवाडी असे प्रामुख्याने काही ना काही व्यवसाय करणारे लोक तिकडे राहतात. तिकडली दाटीवाटीने उभी असलेली दुकानं, होटेलं, लोकांची गर्दी, गोंगाट, खरेदी-विक्रीची, जाणाऱ्या-येणाऱ्यांची गडबड, ई सगळं फिरून फिरून, त्या गर्दीत मिसळून पाहायला फार आवडतं मला.