यथा शास्त्रप्रमाणेनं...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
2 May 2016 - 10:06 pm

सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.

1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे)

(केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले. मग 'केस काढले', म्हणून पुन्हा त्याला अंघोळ घातली गेली.

वरील प्रसंगात घडलेली गोष्ट ही व्यवहारात फक्त "चुकिची-दुरुस्ती" एवहढाच अर्थ लक्षात आणून देते. पण सदर घटना ही धर्माच्या क्षेत्रात घडलेली असल्यामुळे पाहणारे , ती गोष्ट धार्मिक मनानी पाहतात, व्यावहारीक मनानी नाहि. (कारण तो धर्म आहे) थोडक्यात सदर घटना "का व कशासाठी? " म्हणून पाहिली जात नाही.

पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते.

अश्या या गोष्टी व्यवहारधर्मातून धर्मव्यवहारात घुसत ऱहातात.
हा प्रकारही तसा सामान्य आहे. याखेरीज अजून काही प्रकार घडतात, ज्यात विधींची वेळ बदल होते. आणी त्याचंही धर्मशास्त्र होतं.

2)विवाहासंस्कारातील नाम लक्ष्मीपूजन:-
वैदिक पद्धतिनी लग्नविधी झाल्यास, सदर विधी मंगलाष्टकांच्या आधी? की नंतर योग्य? असा एक वाद अगदी हल्लीही ऐकू येतो. याची पहिली तोड अशी की वधू ही लग्न होऊन सासरी माप ऒलांडून आत आली की लगेचंच हे नामलक्ष्मीपूजन करावे, असा नियम आहे. अता घरीच हा विधी करणे "सांगितलेले" असल्यावर , तो मंगलकार्यालयात करणे ही सरऴ सरळ सोय आहे. मग तो मंगलाष्टकांच्या आधी होवो अथवा नंतर! ( पाकशास्त्रात कुकरमधे डाऴ आधिच्या डब्यात लावावी ? की नंतरच्या? असा वाद पेटणार नाही. पेटला, तर त्याची तोड काय कुठे लावल्यानी कमी/अधिक शिजते? यावर निघेल. पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो! )
ज्यांना हे पटतं, किंवा अन्य कारणांनी आवश्यक वाटतं ते हा विधी आधी करतात. पण बहुसंख्य लोक हा विधी मंगलाष्टकांच्या नंतर करावा.., असेच मानणारी असतात. जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. मग हे असे एंजॉई
@यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे?

@बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का?

@कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे?

@पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे?

इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात!

सदर लेखन इथे मांडण्यामागे हेतू इतकाच की अश्या प्रसंगी सजग-कर्त्यांनी वरील गोष्टी समजून घेउन आडमुठेपणा, राजकारण इत्यादी करणाय्रांना जमेल तसे रोखावे. किंवा सवाई राजकारण करून त्यांची ताकद कमी करावी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांची त्रासापासून सुटका होईल.

(ता. क. - ह्या प्रकारचे आणखिही गोंधळ याच धाग्यावर जमेल तसे मांडत राहीन, जेणेकरून ते माहित होतील. )

संस्कृतीधर्मसमाजविचारअनुभवमत

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 10:12 pm | विजय पुरोहित

ठीक आहे. मुंज्या मुलाला दुसरी अंघोळ घडली. काय बिघडलं? एरवी होळी खेळताना वाटेल ते रंग वापरुन अनेकवेळा नहात असेल!

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 10:14 pm | विजय पुरोहित

पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते.

बुवेश माझ्या मुंजीत तरी हे घडलेलं नाही. क्वचित कुठेतरी घडलेलं असेल णून सर्वा धर्म येडा समजायची गरज नाही.

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 10:16 pm | विजय पुरोहित

पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते हे कुठे पाहिलेत. किरकोळ घडत असेल हिंदु धर्मात. बाकी प्रसिद्ध धर्मांचे पाहिलेत काय?

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 10:20 pm | विजय पुरोहित

जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. हे कुठे घडले? माझ्या तरी पाहण्यात नाही. असो. जर तुम्ही पाहिले असेल तर त्यांना समजावून सांगणे हा पर्याय आहे.
उगाच कुठे तरी क्षुल्लक घडलेल्या घटनांसाठी पुरा हिंदु धर्म जबाबदार धरू नये.

स्पा's picture

2 May 2016 - 10:19 pm | स्पा

कै च्या कै लोजिक

प्रचेतस's picture

2 May 2016 - 10:26 pm | प्रचेतस

पांडूशी सहमत
-
पांडुबंध

सूड's picture

2 May 2016 - 10:58 pm | सूड

+१

-धरबंध

चौकटराजा's picture

3 May 2016 - 8:53 am | चौकटराजा

+११

( शास्त्र) धर सोड बंध !

नाखु's picture

3 May 2016 - 8:55 am | नाखु

त्रस्तबंध

खटपट्या's picture

3 May 2016 - 10:46 am | खटपट्या

हे बंध रेशमाचे...

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 10:25 pm | विजय पुरोहित

यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे?

@बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का?

@कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे?

@पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे?

इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात!

बुवा हे सर्व मानवी स्वार्थ आहे जो प्रत्येक व्यवसायात दिसून येतो. त्याला केवळ हिंदु धर्माशी निगडीत करु नका ही विनंती.

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2016 - 10:32 pm | अत्रुप्त आत्मा

हिंदूधर्माला मी यात कुठेही आणलेलं नाहिये. तुम्हीही आणू नका. धन्यवाद.

तसेच हा काथ्याकूट नाही. पुनश्च धन्यवाद.

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 10:49 pm | विजय पुरोहित

मग मौजीबंधन कुठल्या धर्मात करतात बरे?

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2016 - 10:55 pm | अत्रुप्त आत्मा

तुम्हाला प्रतिसाद आकलन झालेला नाही.

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 11:55 pm | विजय पुरोहित

वा! ठीक आहे की मौजीबंधन हिंदु धर्माशी निगडीत नाही ते!!! नवीनच माहिती कळली हो बुवा!!!
आभार आपले!!!

छान किस्से आहेत. अजून येऊद्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 May 2016 - 10:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टनाटनी लोकांच्या टनटनाटी प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. बाकी बुवा लेख अजिबात पटला नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2016 - 10:34 pm | अत्रुप्त आत्मा

नो प्राब्लेम्स!

सुरवंट's picture

2 May 2016 - 10:36 pm | सुरवंट

टमरेल लेख

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2016 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा

मटरेल प्रतिसाद!

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 10:54 pm | विजय पुरोहित

मटरेल = material = strong and physical...
धन्यवाद बुवेश. इतका चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल....

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2016 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा

तुझा हेतू कऴला . अता तुला या धाग्यावर मी एकही प्रतिसाद देणार नाही.

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 10:59 pm | विजय पुरोहित

बुवा असं अरेतुरे नाही म्हणायचं! आपण देवतांचे सेवक आहोत ना! असे भान घसरु नाहि द्यायचे!

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 11:02 pm | विजय पुरोहित

असो. इतके एकेरीवर येणार असाल तर जौ देत! आम्ही पण प्रतिसाद नै देत! माझं काय बिघडतंय! तुमच्याच व्यवसायाचे तीनतेरा वाजवताय! खिक्क!!!

भीमाईचा पिपळ्या.'s picture

2 May 2016 - 11:21 pm | भीमाईचा पिपळ्या.

बुवा एक प्रामाणिक माणूस आहे. आपल्याच व्यवसायातील न्यून अधिक बाजूवर परखड भाष्य करायला दानत लागते.
मी आयुष्यात अजुन कधी पूजा करून घेतली नाही. पण यापुढे खास बुवाकडून पूजा पाठ करून घेतला जाईल.

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 11:29 pm | विजय पुरोहित

भीपि सर... तुम्हाला पाहीजे तर तुम्ही त्यांच्याकडून पूजा बांधून घ्या. हरकत नाही. कसे आहे? आपण जो व्यवसाय करतो त्याच्या नीतिमत्वांशी थोडे तरी प्रामाणिक असावे. असो...

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 11:31 pm | विजय पुरोहित

आणी न्यून अधिक बाजू ठरवणारे तुम्ही आम्ही कोण हो!
आपण तर सामान्य माणसेच ना?

बुआ एक प्रामाणिक माणूस आहे>>>>>>>
आपल्या बाजूने बोलणारे सगळे प्रामाणिक असतात.
व्यवसायातील न्यून अधिक बाजूवर परखड भाष्य
करायला दानत लागते.>>>>>>>>
उद्या कोणी खाटीक हातात सुरा घेऊन भूतदया या विषयावर प्रवचन द्यायला लागला, तर ते चालेल का?
मी आयुष्यात अजुन कधी पूजा करून
घेतली नाही.>>>>>>>>>
यावरून आपले धर्मविचार कळून येतात.

mugdhagode's picture

3 May 2016 - 9:41 am | mugdhagode

हिंदु धर्माचा अभ्यास वाढवा.

हिंदु धर्मात एका व्याधाने व्याध गीता सांगितली आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 9:45 am | अत्रुप्त आत्मा

@उद्या कोणी खाटीक हातात सुरा घेऊन भूतदया या विषयावर प्रवचन द्यायला लागला, तर ते चालेल का?››› नाहीच चालणार . मी काही अंध:श्रद्धेवर प्रवचन देत नाहिये. उलट श्रद्धाच लबाडीनी पाऴतात, आणी तिचा वापर करुन दुसय्रांचा छळ करतात. हे दाखवतोय.

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 10:58 pm | विजय पुरोहित

"हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! बुवा यापेक्षा त्या पार्टीला "अरेबाबा हे सगळे पूजाविधी फेक आहेत. ते नाही केले तरी काही बिघडणार नाही!" हे सांगणं जास्त समयोचित नाहि का?
तसंही यातूनच जास्त अपेक्षित समाजप्रबोधन घडेल नाही?

बुआ हजारदा विचारलं आधुनिक सत्यनारायण कसा घालतात?
म्हणजे नेहमीसारखा घरी घालतात कि 'काशी' घालतात?
काशी- काशीक्षेत्र
गैरसमज नकोत!

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 11:15 pm | विजय पुरोहित

खिक्क...

बुआ जर समजा आधुनिक सत्यनारायण 'घालताना' तुमच्या ग्राहकांना जर उशीर होत असेल तर तुम्ही काय करतात?
जर एखाद्या क्लायंटने कमी दक्षिणा दिली तर तुम्ही काय करतात?
बरं टम्रेल, बुलुक, पुचुक ही तुमच्या आधुनिक सत्यनारायनातील खास मंत्रावळी का?

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 11:35 pm | विजय पुरोहित

हे हे हे...

बुआ जर तुमच्या वडिलांनी तुमच्या एखाद्या मुद्द्यावर विरोध दर्शवला तर लगेच,

तुझा हेतू कऴला . अता तुला या मुद्द्यावर मी
एकही प्रतिसाद देणार नाही, असे म्हणतात का?

नाव आडनाव's picture

3 May 2016 - 10:57 am | नाव आडनाव

बुआ जर तुमच्या वडिलांनी तुमच्या एखाद्या मुद्द्यावर विरोध दर्शवला तर

वडिलांनी ??? इथे वडील कसे आले? जरा आवरा साहेब ...

इथे जर असा शब्द वापरला आहे.
आमच्या भाषेत ही कंडीशनल प्रॉबबिलिटी आहे.
वडील फक्त रूपक म्हणून!

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 11:59 am | अत्रुप्त आत्मा

डुआयडी ठेव णाय्रा भेकडांची कुठल्याच पातऴीवर दखल घेतली जाणार नाही,.त्यामुळे त्यांचा प्रतिवाद करायचाही प्रश्नच नाही . मग ते स्वत:ला काहिही समजोत. असतात शिखंडीच!

हे दु आयडी वाल्यांविषयी असल्याने आम्हास वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही.
असो आमचे बुआ भीष्माचार्यासारखे धारातीर्थी पडले तर नाहीत.

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 1:37 pm | अत्रुप्त आत्मा

स्पष्टीकरण द्यायची गरज भासली, यातच सर्वकाही आलं.

पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा
प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा
पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते.
असो!>>>>>>>>
बुआ मग ज्यांना हे पटत नाही त्यानी 'पाक'स्थानात जायला हवं असं आमच प्रांजल मत आहे

टवाळ कार्टा's picture

3 May 2016 - 12:53 am | टवाळ कार्टा

बर्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळालेला दिसतोय =))

बुवांनी त्यांच्या व्यवसायातले अनुभव मांडलेत जसे इतर त्यांच्या दुसय्राकोणत्या संदर्भातले मांडतात.मिपा लेखमाला पाहा.बारीकसारीक नियमांवरून काहीजण वाद घालतात.
सहमत.

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 9:33 am | अत्रुप्त आत्मा

कंजूसकाकांना बरोब्बर समजले.
धन्यवाद काका.

प्रचेतस's picture

3 May 2016 - 9:40 am | प्रचेतस

कारण ते तुमच्या बाजूने बोललेत.

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 9:46 am | अत्रुप्त आत्मा

असो!

प्रचेतस's picture

3 May 2016 - 9:49 am | प्रचेतस

=))

नाखु's picture

3 May 2016 - 9:52 am | नाखु

अता तुम्ही नवकाव्याकडे वळा पाहू !!!

ता.क. भावविष्वचे पुढील भाग कधी???

सनईचौघडा's picture

3 May 2016 - 9:01 am | सनईचौघडा

हम्म कथा कोणाची , व्यथा कोणाला?

तुषार काळभोर's picture

3 May 2016 - 11:21 am | तुषार काळभोर

सर्वोच्च न्यायालयाचा एखाद्या केसमधला निकाल हा भविष्यात थेट 'प्रत्यक्ष कायदा' म्हणून समजला जातो.

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 12:04 pm | अत्रुप्त आत्मा

हरकतंही नाही. कारण त्याची लायकताही असते. इथे लायकता असण्याचाही प्रश्न नाहिये. जी आहे ती सोयच आहे. त्याची धर्माचा आधार घेऊन जाणिवपूर्वक गैरसोय करणाय्रांचा पंचनामा मांडावा.... म्हणून हे लिहिलय

कपिलमुनी's picture

3 May 2016 - 12:23 pm | कपिलमुनी

साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात

हजारो वर्षापूर्वी एक योगी एका जंगलात राहत होता . तिथे तो एक गुरुकुल चालवत असतो . वीस एक शिष्यगण त्याच्या जवळ राहून शिक्षण घेत असतात . एके दिवशी एक मांजर गुरु शिकवत असतांना येते . आणि मध्ये मध्ये करू लागते . त्यामुळे शिष्यगण विचलित होतात . मग योगी एका शिष्याला त्या मांजरीला बांधून ठेवायला सांगतो . मग दुसऱ्या दिवशीही असेच होते . परत योगी शिष्याला ,वर्ग चालू असेपर्यंत मांजरीला बांधून ठेवायला सांगतात. मग रोज असे सुरु राहते वर्ग चालू होण्याआधी मांजरीला बांधणे . मग अनेक वर्ष जातात जुने शिष्य गुरु होतात . ते पण मग मांजरीला बांधण्याचा कार्यक्रम चालू ठेवतात . मध्ये अनेक वर्ष जातात . आता ते मांजर पण राहत नाही ते गुरु आणि शिष्य पण राहत नाहीत .पण वर्ग चालू होण्यापूर्वी नवीन गुरु नवीन मांजर आणून दारात बांधतात शिष्य विचारतात हे मांजर का बांधले आहे ? गुरु सांगतो ते माहित नाही पण हि आपली परंपरा आहे .

तात्पर्य : मांजर बांधणे व्यवहाराची गोष्ट ! पण तीच परंपरा ( कधी कधी धार्मिक आचरण) म्हणून रूढ होते .
मूळ व्यवहाराचा हेतू विसरला जातो.

( गोष्ट नेटवरून चोप्य पस्ते)

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 1:35 pm | अत्रुप्त आत्मा

तात्पर्य : मांजर बांधणे व्यवहाराची गोष्ट ! पण तीच परंपरा ( कधी कधी धार्मिक आचरण) म्हणून रूढ होते .
मूळ व्यवहाराचा हेतू विसरला जातो.

››› बुल्स आय! हाच मुद्दा आहे.

प्रचेतस's picture

3 May 2016 - 1:46 pm | प्रचेतस

म्हणजे फ़क्त कपिलमुनी आणि कंजूस यांनाच मुद्दा समजलेला आहे तर. :)

नाखु's picture

3 May 2016 - 2:05 pm | नाखु

सम्जला असे मान्य करा नाही तर गुद्दा खावा हा का ना का .

मुद्देसूद नाखु

चौकटराजा's picture

4 May 2016 - 7:20 am | चौकटराजा

इथे गुद्दा मरण शक्य नाही . फारतर गुद्देसूद स्माएल्या अंगावर सोडता येतील. गुद्दा मारायचा तर कट्टा आला व कट्टा आला की खर्च आला.

अद्द्या's picture

3 May 2016 - 2:06 pm | अद्द्या

जर हे सगळं खरं असेल ,

तर तुम्ही करत असलेला व्यवसाय म्हणजे लोकांची फसवणूक होत नाही का ?

जर सगळ्या प्रथा / रूढी / परंपरा या कुठल्या न कुठल्या अश्याच तत्सम फालतू गोष्टीवरून / कारणावरून सुरु झाल्या असतील .

तर एकुणातच सगळेच "पंडित " "बुवा" "भडजी " हे शुद्ध फसवणूक करती आहेत सगळ्यांची असं म्हणताय का तुम्ही ?

याच प्रथांच्या नावाखाली घडलेले किस्से सांगण्यासारखे खूप आहेत , पण विषयांतर होईल.

शाम भागवत's picture

3 May 2016 - 2:26 pm | शाम भागवत

मला वाटले की एक गुरूजी लिहित आहेत तर, लक्ष्मीपूजन का करतात? त्यामागे कोणता हेतू असतो? नववधूला लक्ष्मी का समजायचे? वगैरे कळेल म्हणून वाचायला घेतले तर.. जाऊ दे.

कपिलमुनी's picture

3 May 2016 - 2:27 pm | कपिलमुनी

सगळ्या प्रथा अश्याच तत्सम फालतू गोष्टीवरून / कारणावरून सुरू झाल्या नाहीत.
हिंदू धर्मामधल्या ज्या प्रथा आहेत त्या पुराणांमध्ये , ग्रंथांमध्ये लिहिल्या आहेत. त्या प्रमाणे त्या केल्या जातात.
ज्यांचा या गोष्टीवर ( देवावर आणि कर्मकांडावर) विश्वास आहे ते या गोष्टी करतात. कोणताही पंडित सांगितलेले विधी करत असतो. यात फसवणूक कुठे आली ?

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 2:34 pm | अत्रुप्त आत्मा

दॅट्स इट मुनिवर.
धन्यवाद.

अद्द्या's picture

3 May 2016 - 2:44 pm | अद्द्या

धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.

इथून आली , कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलंय म्हणून ते अंतिम सत्य असतं का ?

एखादी पद्धत /परंपरा त्या काळात "साधी व्यवहाराची " म्हणून त्यांनी लिहून ठेवली असेल , आणि आत्ता हे सो कॉल्ड पंडित लोक त्यांना धार्मिक गोष्टींचा मुलामा देऊन असच केलं पाहिजे तसाच केलं पाहिजे म्हणत कैच्याकाय वेळ काढत असतील आणि काही तरी फालतू कारण काढून "धर्मात सांगितलंय " च्या नावाखाली गल्लाभारून "दक्षिणा " उकळत असतील तर ती फसवणूक नाही का ?

( सगळेच बुवा असं करतात म्हणत नाहीये )

टवाळ कार्टा's picture

3 May 2016 - 2:47 pm | टवाळ कार्टा

असे असेल तर ते तर त्यांच्या पुस्तकाला अंतिम आदेश/डायरेक्ट कायदाच मानतात त्यांना बदलून दाखवा

अद्द्या's picture

3 May 2016 - 2:50 pm | अद्द्या

मी कोणालाही बदलायला सांगत नाहीये ,
प्रत्येक जण आपापल्या धंद्यात येनकेन प्रकारे चुना लावताच असतो . त्याची वारंवारिता आणि आकार बदलू शकतो एवढंच .

मी फक्त विचारतोय , कि हे असं हि असू शकतं का , आणि नसेल तर का

शाम भागवत's picture

3 May 2016 - 2:59 pm | शाम भागवत

का करायच व कस करायच या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. का ते प्रथम समजावून घेऊया. मग कस करायच याला किती महत्व द्यायचे ते कळेलच की. पण कसे करायचे यावरच भर द्यायचा असेल तर फक्त टीआरपी वाढेल.

का करायचं याचं उत्तर आहे तयार ,

पुस्तकात सांगितलंय , आई वडील - आज्जी आजोबा हे करत होते , आजूबाजूचे करतात , आमच्या गावात हे असं करतात .

pick your choice

शाम भागवत's picture

3 May 2016 - 3:21 pm | शाम भागवत

:-))

टवाळ कार्टा's picture

3 May 2016 - 3:11 pm | टवाळ कार्टा

काडी होती रे =))

अद्द्या's picture

3 May 2016 - 3:13 pm | अद्द्या

ते समजलं ,

मी पाणी ओतलं या वेळी =]]

शाम भागवत's picture

3 May 2016 - 3:16 pm | शाम भागवत

:-))

कपिलमुनी's picture

3 May 2016 - 3:34 pm | कपिलमुनी

या प्रथांच्या मुळाशी जावे लागेल. माझा अंदाज असा:
पूर्वी पंचमहाभूतांची पूजा व्ह्यायची. नंतर मातृपूजन,लिंगपूजन सुरू झाले.
नंतर पावसासाठी इंद्र , धनधान्यासाठी लक्ष्मी ईई. पूजा सुरू झाल्या ( बहुतांशी मंत्रांमध्ये देवांची स्तुती केली आहे. जेणेकरून त्या प्रसन्न होतील.) मूर्तीपूजा सुरु झाल्यावर त्या मूर्तीची सजावट, तिची स्वच्छता या साठीचे मंत्र तयार झाले. काळानुरूप या पूजा पद्धतीत बदल होत गेले आहेत . मूळ संहीता / ग्रंथ मौखिक परंपरेने जपली जात असल्याने त्यात बरेच प्रथा अ‍ॅड होत गेल्या. तशाच बर्‍याच कालबाह्य काढल्या गेल्या.
आजदेखील एखादी गोष्ट कालबाह्य वाटली तर काढून टाकायला हवी.

पण लोकांची त्या प्रथा, कर्मकांडावर श्रद्धा आहे. राखी बांधली नाही तर फार फरक पडत नाही, पण बहिणीने राखी बांधली तर आनंद वाटतो , कारण पद्धत, प्रथा , आपल्यामधे हे संस्कार खूप खोल रुजले आहेत.
(नंतर सविस्तर लिहिन)

आत्मूसबुवांचा धागा आला की त्यावर प्रतिसाद खरडायचा. का खरडायचा माहीत नाही. पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ती.

मग धागा कितीही टमरेल असो

सुरवंट म्हणालं धागा टमरेल आहे
आणि जिलब्यांची रांग लागली!

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 2:36 pm | अत्रुप्त आत्मा

इतकी अक्कल चालली तर!
तेव्हढीच आहे म्हणायची!

यावर कधीतरी लिहीन.सध्यातरी बुवा विरुद्ध नवग्रह बोलर असा सामना खेळवला जातोय.
यातले कितीजण बिनबुवांचे लग्न उरकणारे आहेत हे पाताळेश्वरालाच म्हैत.

प्रमोद देर्देकर's picture

3 May 2016 - 3:27 pm | प्रमोद देर्देकर

हेच कंजुशकाका एकच मारा पर सॉलीड मारा, भटजी असे करतात , भटजी असे लुटतात असा सुर कायम ऐकु येतो अरे मग कशाला बारशापासुन अगदी वर गेल्ल्यावर सुध्द्दा भटजी लागतो सगळ्याला.
तुमचे तुम्ही करा की ही सगळी कामे भटजी शिवाय.
आणि भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुन.
एक नविन प्रथा करा ना सुरु स्वागतच केलं जाईल.

टवाळ कार्टा's picture

3 May 2016 - 3:40 pm | टवाळ कार्टा

ज्जे बात...यासाठी मस्तानी उकळ पुणेकराकडून

प्रमोद देर्देकर's picture

3 May 2016 - 5:04 pm | प्रमोद देर्देकर

खीऽ क .
आधीची जी बाकी ती तर मिळु दे. मग नविन साठी क्लेम लावेन. पुणेकर नेहमी थकबाकी ठेवतात.

नाखु's picture

4 May 2016 - 9:16 am | नाखु

"उकळ"लेली मस्तानी कशी लागेल चवीला??
काहीही टक्या श्री !!!

जा नवी (आण) अत्ता

शाम भागवत's picture

4 May 2016 - 9:33 am | शाम भागवत

फुकट मिळवलेली

नाखु's picture

4 May 2016 - 9:39 am | नाखु

(क्षीण) कोटी विनोद होता..

भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुन

हेच लॉजीक पेशंट लोकांना पण लागू होते. डॉक्टर म्हणत नाहीत की माझ्याकडून उपचार करून घ्या म्हणून. तरीपण लोक्स डॉक्टरांकडे जावून उपचार करून घेतात, व परत त्याच डॉक्टरचा शक्य होईल त्या ठिकाणी उद्धार करत बसतात.

कपिलमुनी's picture

3 May 2016 - 4:03 pm | कपिलमुनी

विधी चुकीचा झाला किंवा शॉर्टकट मारला तर भटजीचा सुद्धा उद्धार होतो

विधी चुकीचा झाला किंवा शॉर्टकट मारला

भटजी विधी चुकीचा करतोय किंवा शॉर्टकट मारतोय हे किती जणांना लक्षात येतं?

संदीप डांगे's picture

3 May 2016 - 4:16 pm | संदीप डांगे

भयंकर फरक आहे. धार्मिक विधी ऐच्छिक व अनावश्यक बाब आहे, तसेच सरकारने भटजींना लायसन्स दिलेले नाही, लायसन्स नसलेले व्यक्ती भटजीगीरी करु शकत नाहीत असा काही दंडक नाही.

उपचाराची गरज पेशंटलोकांना हौस म्हणून नसते. त्यामुळे डॉक्टर जर लुबाडत असतील तर त्याविरुद्ध मिळेल तिथे उद्धार करण्याचा हक्क पेशंटला आहेच.

तुमच्याकडून अशा सरमिसळीची अपेक्षा नव्हती, सरसकटीकरणाचीही. ;)

स्पा's picture

3 May 2016 - 4:32 pm | स्पा

+ १

टवाळ कार्टा's picture

3 May 2016 - 4:49 pm | टवाळ कार्टा

एकतर मोदकने टाईमपास म्हणून काडी टाकलीये नैतर प्रतिसाद प्रचंड हुकलेला आहे

मोदक's picture

3 May 2016 - 4:53 pm | मोदक

:))

काडी होती रे. :D

टवाळ कार्टा's picture

3 May 2016 - 5:05 pm | टवाळ कार्टा

=))

भटजीने आता एकदोन विधिक्रम बदलले अथवा गाळले तरी एवढं मनावर घेऊ नये कारण तेवढ्याने एक दोघांच्या मीपणाला हुशारीला ठेच बसली तरी लग्न काही अवैध ठरत नाही.शिवाय सध्या पुर्वीसारखे एक पिवळ्या कागदावर नोंदणीचे प्रमाणपत्र मिळत नाही परस्पर.त्यासाठी दोनदोन साक्षीदार पॅनकार्ड ओळखपत्रासह सर्वांना निबंधकासमोर हजर राहून सह्या फोटो द्यावे लागतातच.