तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
30 Apr 2016 - 3:18 pm

मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना
अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते
ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला
दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून ,
अर्धातास, निमुट उभा रहात,
आमच्या गप्पा ऐकणार्या
तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते
“आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले
दमुन झोपले आहेत बिचारे.
नाही तर आम्ही दोघेच येतो भाजी घ्यायला ”
त्या वेळी मी पण तिला ठसक्यात सांगते
“हा पण काल रात्री दोन वाजता घरी आला आहे”
त्यावेळी तिच्या कडे बघून न बघितल्यासारखे
करणारा तू मला फार म्हणजे फार आवडतोस

शहारुख खान चा सिनेमा
तुझ्या सोबत बघताना
अचानक आपले बाळ
बेंबीच्या देठापासून
जोरात ओरडत रडायला लागते
(तुझ्यावरच गेला आहे तो,
सगळे तुझेच गुण तो आतापासुनच उधळतो आहे)
मला सिनेमा अर्धवट टाकून उठायचा
प्रचंड वैताग आलेला असतो
आणि आजूबाजू चे लोकही
शुक शुक करायला लागलेले असतात
त्या वेळी तू तुझ्या चेहर्यावर दिसणारी
नाराजी लपवत
बाळाला घेउन बाहेर जातोस,
त्याला शांत करतोस,
आणि बाळ झोपल्यावर
आत येताना
न विसरता
माझ्यासाठी पॉपकॉर्न आणि कोक घेउन येतोस
तेव्हा तू मला फार म्हणजे फार आवडतोस

पोळ्या करणारी बाई दोन दिवस आलेली नसते
सासु बाई सुध्दा गावाला गेलेल्या असतात
आता संध्याकाळी जेवायला काय करायचे?
असा प्रश्र्ण् माझ्या पुढे असतो,
कारण कालच खिचडी करुन झालेली असते
आणि त्या नंतर तुला रात्री गुपचुप उठुन ,
किचन मधे डबे शोधताना
मीच पकडलेले असते
अशा वेळी माझा एकंदर रागरंग बघून
तू हॉटेल मधे जाउ म्हणतोस
मी उगाचच “नको रे फार खर्च होतो असे म्हणते”
तेव्हा तू “अग खर्चाचे जाउ दे ग,
एखाद दिवस गेलो हॉटेल मधे
म्हणुन काही फरक पडत नाही”
असे म्हणत गाडी काढतोस
"बघ हं अजून विचार कर
या महिन्यात सहाव्यांदा चाललो आहोत आपण होटेल मध्ये "
असे लटकेच म्हणत मी गाडी तून उतरते
"जाउदे ग असला विचार करता जाऊ नकोस,
एनजॉय् द् एव्हिनिंग "
असे तू म्हणतोस
तेव्हा तू मला फार म्हणजे,
फार म्हणजे फार,
म्हणजे अतिशयच्,
म्हणजे अपरीमित,
म्हणजे अशक्य इतका,
म्हणजे खुपच जास्त,
म्हणजे नको तेवढा,
म्हणजे लैच म्हणजे लैच् आवडतोस.

खादाडमाऊ झोपेशु

क्रमशः (मागच्या जन्माची गोष्ट पुढच्या भागात)

dive aagarअदभूतअनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीनागद्वारप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीरोमांचकारी.शृंगारकरुणसंस्कृतीपाकक्रियाप्रेमकाव्यऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

पैसा's picture

30 Apr 2016 - 3:37 pm | पैसा

फारच रोमांचक कविता आहे!

सस्नेह's picture

30 Apr 2016 - 3:47 pm | सस्नेह

मिपावरील सर्वात रोमँटिक कविता !
पैजारबुवा __/\__

सविता००१'s picture

30 Apr 2016 - 3:48 pm | सविता००१

लै भारी

जव्हेरगंज's picture

30 Apr 2016 - 3:56 pm | जव्हेरगंज

i

असंका's picture

30 Apr 2016 - 3:58 pm | असंका

मजेशीर आहे.

धन्यवाद.

हाँटेलिंग पिच्चर गंमत

IT couple दिसतय

नीलमोहर's picture

30 Apr 2016 - 4:12 pm | नीलमोहर

'तेव्हा तू मला फार म्हणजे,
फार म्हणजे फार,
म्हणजे अतिशयच्,
म्हणजे अपरीमित,
म्हणजे अशक्य इतका,
म्हणजे खुपच जास्त,
म्हणजे नको तेवढा,
म्हणजे लैच म्हणजे लैच् आवडतोस.'

- भावविवशता कळली, पोचली, टोचली.

कानडाऊ योगेशु's picture

30 Apr 2016 - 4:24 pm | कानडाऊ योगेशु

- भावविवशता कळली, पोचली, टोचली.

+ १
हेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2016 - 4:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आशय मला प्रामाणिक वाटला.

- दिलीप बिरुटे

नाखु's picture

30 Apr 2016 - 4:19 pm | नाखु

आणि योग्य अनुक्रमे आल्याने पोहोचली.

dive aagar
अदभूत

अनर्थशास्त्र
अभंग
अविश्वसनीय
आरोग्यदायी पाककृती
काणकोण
काहीच्या काही कविता
कोडाईकनाल
गरम पाण्याचे कुंड
जिलबी
नागद्वार
प्रेम कविता
फ्री स्टाइल
भूछत्री
रोमांचकारी.
शृंगार
करुण

पुढील भागाच्या प्रतिक्षेतल्या परिक्षेत....

वैभव जाधव's picture

30 Apr 2016 - 4:20 pm | वैभव जाधव

पैजारबुवा रॉक्स!

चांदणे संदीप's picture

30 Apr 2016 - 4:26 pm | चांदणे संदीप

फुटलो! =)) =))

लैच!

Sandy

याचीच वाट पाहत होतो. :-))

DEADPOOL's picture

30 Apr 2016 - 5:56 pm | DEADPOOL

दंडवत घ्या!

बाबा योगीराज's picture

30 Apr 2016 - 6:07 pm | बाबा योगीराज

तुमच्या लेखनास आमचा (सदा) एकच प्रतिसाद,

_____/\____

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2016 - 6:36 pm | टवाळ कार्टा

ख्याक

विजय पुरोहित's picture

30 Apr 2016 - 7:43 pm | विजय पुरोहित

धन्य धन्य माऊली...

मितभाषी's picture

30 Apr 2016 - 8:09 pm | मितभाषी

भारी.

खटपट्या's picture

30 Apr 2016 - 10:15 pm | खटपट्या

मनातील कविता...फारफार आवडली..

रेवती's picture

1 May 2016 - 8:49 am | रेवती

कविता आवडली.

रातराणी's picture

1 May 2016 - 10:09 am | रातराणी

खादाडमाऊ झोपेशु हे नाव कै च्या कै म्हणजे लईच ब्येक्कार आवडल्या गेल्या आहे. कवितेबद्दल काय बोलणार! नेहमीप्रमाणे १ नंबर!!

जेपी's picture

1 May 2016 - 10:11 am | जेपी

आवडल..

अभ्या..'s picture

1 May 2016 - 7:19 pm | अभ्या..

हीहीहीहीहीहीहीही.
माउलीनी घडवलाच सत्संग.
दंडवत हो.