आजपासुन नास्तिक...
आताशा वाटु लागलंय द्याव फेकुन हे श्रद्धा नावाचं जळमट;
होतेय नुसती घुसमट यात , काढायलाही धजावत नाहीत हात इतकी किळसवाणी जळमट..
काढायला जाता सर्वांग किळसवाणे करणारे...
आताशा वाटु लागलंय पद्धतशीरपणे शिकवलंय आपल्याला पाळायला श्रद्धा;
शिकवलंय पाया पडायला "जेजीच्या", लावलेत अंगारे आपल्याही नकळत..
भारुन टाकलेय आपले मस्तक त्याच्यात त्या उग्र दर्पाने...
आताशा वाटु लागलंय मुद्दामच शिकवलंय आपल्याला मोठ्यांचा आदर करायला, खोटं न बोलायला
कारण त्याशिवाय का चालणार आहे समाजाचा गाडा अव्याहतपणे, व्यवस्थितपणे..