आताशा वाटु लागलंय द्याव फेकुन हे श्रद्धा नावाचं जळमट;
होतेय नुसती घुसमट यात , काढायलाही धजावत नाहीत हात इतकी किळसवाणी जळमट..
काढायला जाता सर्वांग किळसवाणे करणारे...
आताशा वाटु लागलंय पद्धतशीरपणे शिकवलंय आपल्याला पाळायला श्रद्धा;
शिकवलंय पाया पडायला "जेजीच्या", लावलेत अंगारे आपल्याही नकळत..
भारुन टाकलेय आपले मस्तक त्याच्यात त्या उग्र दर्पाने...
आताशा वाटु लागलंय मुद्दामच शिकवलंय आपल्याला मोठ्यांचा आदर करायला, खोटं न बोलायला
कारण त्याशिवाय का चालणार आहे समाजाचा गाडा अव्याहतपणे, व्यवस्थितपणे..
जरा मोठे होताच शिकवले, पाया पडलं की जाते रक्त डोक्याकडे, म्हणुनच तर झाले इथे आर्यभट्ट , विवेकानंद..
मग का झाले तिकडे डार्विन, आइनस्टाईन ? का ते ही टेकवतच होते डोकं वेगळीकडे, वेगळ्याप्रकारे ?
आताशा वाटु लागलंय मुद्दामच शिकवलं नाही तटस्थ विचार करायला..
सांगितल्या गोष्टी सत्याच्या विजयाच्या वा असत्याच्या पराजयाच्या.
आताशा सांगावसं वाटतंय जगाला कुठे होतो विजय सत्याचा, चांगुलपणाचा नेह्मीच ?
क्रुरपणे मारनारेही जगतात आनंदाने अन् करतात सहन वेदना काही संभाजी, याच समाजासाठी , तुमच्या माझ्यासाठी.
आताशा वाटु लागलंय मुद्दामच शिकवलंय आपल्याला जिवंतपणाची कदर करायला;
नाहीतर उठला असता एखादा आदिम अन् अन फेकुन दिलं असतं त्यानं हे जगणं भयाण अंधारात जिथुन हे आलंय वासनेचा उत्कट वा लिबलिबीत हात पकडुन..मग कसा राहिल यांच्या समाजाचा गाडा सुरक्षीत, एकसंध.
म्हणे 'इथं केलं ते इथंच फेडायचय !' मग का नाही फेडावं लागलं अनन्वित अत्याचार्यांना ?
म्हणे 'उपरवाला सब देखता है|' मग का नाही केला हस्तक्षेप, होताना अबलेवर अत्याचार, निरपराध्यावर वार ?
म्हणे 'आहे हे सर्व माया' मग देउ का एक सणसणीत ? होतील वेदना का त्याही माया ?
मग का खाताय अन्न नावाची माया ? का घेताय हवा नावाची माया दर श्वासाला अव्याहतपणे?
बरं मग काय म्हणावी प्रेरणा तुमच्या माझ्या उत्पत्तीमागे ? का घडवतात , वाढवतात फक्त वासना
करतात तयार वासनेची अनुभुती घ्यायला ? समाजाचं नवीन पिक घ्यायला ?
म्हणतात कळाले सत्य त्यांना . मग त्यांनी का सांगीतले आम्हाला ? का आम्ही जगावं असच ,मनाची खोटी वा खरी समजूत काढत , जगाच्या रहाटगाडग्याची चाकं फिरवत ?
शोधावी का प्रेरणा या उत्पत्तीमागची ? का मानावं जे आहे त्यालाच सत्य - जसं मानत आलोय ? अन् जगावं याच समाजात एक प्रतिष्ठीत म्हणुन ?
प्रतिक्रिया
26 Jan 2016 - 7:33 am | नाव आडनाव
चांगलं लिहिलंय मित्रा. आवडलं.
26 Jan 2016 - 9:56 am | भंकस बाबा
का फेडावे लागले नाही अकबराला, ओरंगजेबाला, हिटलरला
एका वाक्यात इतिहास उभा केला की ओ राव!
26 Jan 2016 - 1:50 pm | गामा पैलवान
भंकस बाबा,
औरंगजेबाने अनेक पापे केल्याचे हताश उद्गार मरतांना काढले. तो खिन्नमनस्क अवस्थेत मेला.
आ.न.,
-गा.पै.
26 Jan 2016 - 2:34 pm | उगा काहितरीच
म्हणून का जस्टिफाय होतात त्यानं केलेले कृत्य ? हजारो लोकांच्या वेदना एकीकडे अन् एकीकडे केवळ हताश उद्गार . आहे का बरोबर हा न्याय ? निसर्गाचा / देवाचा ?
26 Jan 2016 - 9:58 am | एस
लेख आवडला. पापपुण्य व त्यांचा हिशेब हे फक्त मानवी मनाची समजूत घालण्याचे स्युडोमेडिसिन आहेत.
26 Jan 2016 - 10:02 am | कंजूस
जुनाच विषय.
26 Jan 2016 - 10:12 am | पैसा
सगळे आपल्या मनाचे खेळ हो!
26 Jan 2016 - 2:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
मन हा माणसात उत्क्रांत झालेला एक नैसर्गिक रोग आहे... तो सतत आपली रुपे बदलत राहतो आणि त्याला उपायही नाही. द्या सोडून. ;)
आयुष्याकडे इतक्या गंभीरपणे पाहू नका, सरतेशेवटी ती एक तात्पुरती परिस्थिती आहे (Do not take life so seriously, after-all it is a temporary situation) :)
4 Feb 2016 - 10:42 pm | सतिश गावडे
मुक्तकाला आणि या प्रतिसादालाही.
5 Feb 2016 - 11:18 am | अत्रुप्त आत्मा
+++++१११११
@
:- सदर वाक्यामुळे लेख पूर्णत्वाला गेला ,असे आग्रहानि म्हणावेसे वाटते. :)
5 Feb 2016 - 10:56 am | मन१
मी रोगबिग काय नाय ओ.
.
.
संपादक कृपया ह्या खोडसाळ, भडकाउ आणि वैयक्तिक शेरेबाजी करणार्या प्रतिसादावर कारवाई करतील काय ?
26 Jan 2016 - 3:47 pm | संदीप डांगे
ही अवस्था चांगली आहे. फक्त टेम्पररी आहे इतकंच.
26 Jan 2016 - 4:16 pm | मनोजगोसावी
विचार पटले. धन्यवाद!
28 Jan 2016 - 9:16 am | अभिजीत अवलिया
चांगले लिहिलेय ...
28 Jan 2016 - 10:30 am | माहितगार
श्रद्धा म्हणजे काय ? आणि श्रद्धेचे मुल्य तर्काने तोलावे का भावनेने हे दोन मुद्दे अभ्यसनीय असावेत. बाकी का कोण जाणे धागा लेखातून उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उत्तरे धागा लेखातच नाहीत ना असे वाटले.
28 Jan 2016 - 11:29 am | उगा काहितरीच
मला तर नाही वाटत असं . प्रश्नांची उत्तरे मिळावीत याच उद्देशाने टाकला होता धागा इकडे . पन अजूनतरी अनुत्तरीतच आहेत प्रश्न . मी पूर्णपणे आस्तीक ही नाही अन् पूर्णपणे कडवा नास्तीकही नाही. थोडासा आस्तीकतेकडे झुकणारा आहे. त्यामुळे आस्तीक/श्रद्ध लोकांकडून उत्तरे अपेक्षित होती !
4 Feb 2016 - 7:22 pm | Ram ram
लेख आवडला, शंभु राजांविषयी आठवलं की रक्त सळसळतं आणि मनाला खूप वेदना हाेतात.
4 Feb 2016 - 8:44 pm | एक एकटा एकटाच
सुरेख मांडलय
4 Feb 2016 - 11:30 pm | बाजीगर
आपण enlightment /साक्षात्कार ला पोहोचलात.बरोबर विचाराला पोचलात.आता नका मागे फिरू. होऊन जा निर्मळ नास्तिक ! चांगुलपणावर श्रध्दा असलेला !!