महाराष्ट्रातल्या एक माणसाने अथक प्रयत्न करुन सायलेंट ऑबझर्व्हर नावाचे एक सयंत्र शोधुन काढले त्याचा सत्कार "चला हवा येऊ द्या" कार्येक्रमात ८ मार्च च्या दिवशी अनेक स्त्रीयांनी केला हे आपण पाहीले असेल.
परदेशात नोकरी करुन भारतात स्थायीक झालेल्या माणसाने हे उपकरण शोधले जे सोनोग्राफी मशीनने काय काय दाखवले ते रेकॉर्ड करते. हे रेकॉर्डींग पाहिले की समजते की सोनोग्राफी सेंटर्स ना सेक्स रेशो संदर्भात किती सामाजीक जाणिव आहे. यामुळे सोनोग्राफीत गर्भ लिंग दाखवले गेले असेल तर ते स्पष्ट होते अन्यथा कितीही कायदे केले आणि सोनोग्राफी मशीनवर कायद्याचे फलक लावले तरी स्त्रीयांचे पुरुषांच्या प्रमाणातले घटते आकडे हेच दाखवतात की दाल मे कुछ काला है.
महाराष्ट्रातल्या बहुदा पाच कोटी जनतेला हे माहितच नव्हते की महाराष्ट्रातल्या सोनीग्राफी धारक संघटनेने या मशीनवर असा सायलेंट ऑबझर्वर लावण्यास विरोध केला. यामुळे म्हणे गोपनियता भंग होतो. स्त्रीया शिल्लकच राहिल्या नाहीत तर स्त्री विषयक कसली गोपनियता असे म्हणत मुंबई हायकोर्टाने त्याची याचीका फेटाळली.
तरीही मुलगा पाहिजे म्हणणारे यावर उपाय शोधुन काढायला तत्पर आहेत असेच म्हणावे लागेल.
फक्त सोनोग्राफीनेच भ्रुणाचे लिंग समजते असे काही नाही.
खालील लिंक उघडुन पहा म्हणजे समजेल की यावर अजुनही मार्ग आहेत आणि ते जाहिरपणे इंटरनेटच्या माध्यमातुन मार्केटींग केले जातात याबाबत काय करायचे ?
http://www.tellmepinkorblue.com/
( मी जाहीर करतो मला एकच मुलगी आहे आणि मी या पध्दतीचे मार्केटीग करत नाही. या साईटवर बंदी घालायला हवी )
हे किट मागवा म्हणजे सोनोग्राफी वाल्याकडे जायला नको आणि त्यांचा रिपोर्ट घ्यायला नको. ह्या प्रकाराने लिंगनिदान होणार असेल तर १००० पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांची संख्या आज ८०० ते ९०० च्या घरात आहे ती आणखी घसरेल. मग पांडवकालात जे घडले ते घडेल. दोन पुरुषांची एक पत्नी किंवा त्याहुनही जास्त. ( अर्थात आजकालच्या स्त्रीयांना असे जाहीर लग्न पटायला हवे ) पांडवकालात पुरुष क्लोन टेक्नीक होते ज्यामुळे सेक्स रेशो तेव्हाही बिघडला असावा. कारण सगळे ९९ कौरव पुरुष होते आणि क्लोन होते असे म्हणतात.
दुसरा पर्याय ही आहे ज्याबाबत समलैंगीकता कायदेशीर ठरवण्यावर विचार मंथन चालु आहे. फार बोकाळले आहे सध्या हे सर्व. पुर्वी नाही म्हणायला एखाद्या बायल्या असायचा ज्याच्या बाबत काही उलटे सुलटे बोलले जायचे.
आजकाल " गे " आणि बायोसेक्स्युअल्स ची संख्या वाढताना दिसते आहे कारण जबरदस्तीने मुलांचे लग्न लावणे मागे पडत आहे. करीयरच्या कारणावरुन सुशीक्षीतात विवाह करण्याचे वय वाढताना दिसत आहे. त्या जोडीला इंटरनेट माध्यमातुन अश्या गे जोडीदारचा शोध घेणे, चॅट करणे सोपे झाले आहे.
म्हणजे काय स्त्रीयांची संख्या घटली म्हणजे लगेच बलात्कारच वाढतील असे नाही. त्या ऐवजी समलैगीकतेला सामाजीक मान्यता मिळुन सामाजीक प्रश्नाला पर्यायी उत्तर मिळेल असा कल समाजच दाखवत आहे. हे समाजाच्या, कुटुंब व्यवस्थेच्या, सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही ह्यावर चर्चा सुरुच आहे.
भारतात एकंदरीतच जनसंख्येच्या स्फोटाला काहीतरी उपाय पुढील १०० वर्षात मिळेल असे समजायला हरकत नाही.
प्रतिक्रिया
12 Mar 2016 - 6:06 pm | गरिब चिमणा
भारतात एकंदरीतच जनसंख्येच्या स्फोटाला काहीतरी उपाय
पुढील १०० वर्षात मिळेल असे समजायला हरकत नाही.>>>>>>>>>>>
2040 साली भारताची लोकसंख्या स्टेबल होणार आहे,पाणि ,रोजगार याच्या यांच्या कमतरतेमुळे आणि शिक्षणाच्या प्रभावाने बर्थ रेट २.१ च्या आसपास येईल तेव्हा लोकसंख्या स्टेबल होईल,महाराष्ट्राचा बर्थरेट आताच २.१ आहे,म्हणजे आपण आताच लोकसंख्या स्टेबल केली आहे,प्रश्न आहे उत्तरेकडील राज्यांचा ,त्यांचा बर्थ रेट ४ च्या आसपास आहे
12 Mar 2016 - 9:00 pm | राजेश घासकडवी
बाकी सगळं पटलं, पण सेक्स रेशोमुळे गे पुरुषांची संख्या वाढते आहे हे तर्कट अजब आहे. लेस्बियन स्त्रियांची संख्या घटलेली आहे का?
12 Mar 2016 - 9:07 pm | गॅरी शोमन
राजेशजी,
माझ्या लेखनातुन असा अर्थ निघत आहे का ? सेक्स रेशो मुळे स्त्रीयांची संख्या कमी झाली तर पुरुषांना विवाहासाठी स्त्रीया मिळणार नाहीत असा प्रश्न आहे. यावर समाजाने गे- विवाह हा पर्याय काढला आहे. ( हा प्रश्न आहे म्हणुन नाही तर विवाह विषयक धारणा बदलत आहे. ) ज्या मुळे ह्या प्रश्नाला पर्यायी उपाय दिसतो आहे.
मला असे म्ह्णायचे आहे.
12 Mar 2016 - 10:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
समलिंगी संबंध ही एक मानसिक लैंगिक स्थिती (sexual orientation) आहे... कोणत्याही परिस्थितीवर उपाय म्हणून समजून-उमजून केलेली तडजोड नाही, हे ध्यानात घेतलेत तर तुमचा तर्क योग्य दिशेने जात नाही हे ध्यानात येईल.
सेक्स रेशो मुळे स्त्रीयांची संख्या कमी झाली तर पुरुषांना विवाहासाठी स्त्रीया मिळणार नाहीत असा प्रश्न आहे. यावर समाजाने गे- विवाह हा पर्याय काढला आहे. ( हा प्रश्न आहे म्हणुन नाही तर विवाह विषयक धारणा बदलत आहे. )
या दाव्याला कोणता पुरावा आहे ? आजपर्यंतचा इतिहास हेच सांगतो की, जगातल्या कोणत्या समाजाने समलैंगिकता सहजासहजी स्विकारलेली नाही. कित्येक मोठ्या धर्मांत तर समलैंगिकांना मृत्युदंडाची शिक्षा सांगितली गेली आहे. समाजाच्या भितीने समलैंगिकांना त्यांचे संबंध गुप्त ठेवावे लागले आहेत/लागत आहेत.
अलिकडल्या कालात, काही व्यक्तींनी सतत केलेल्या संघर्षामुळे आणि काही समाजात विकसित झालेल्या / होत असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनांमुळे, समलैंगिकता आजार/विकृती नसून भिन्नलैंगिकतेसमान मानसिक स्थिती आहे हे, नाईलाजाने का होईना, पण कायदेशीररित्या तरी मानले गेले आहे, इतकेच !
सर्व समाजाने समलैंगिकता मोकळ्या मनाने स्विकारणे, आजच्या पाश्च्यात्य देशांतही कठीण आहे... तिला समाजाने काढलेला पर्याय समजणे कल्पनेपलिकडचे आहे !
=================
लैंगिकता हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे आणि प्रत्येकाला त्या बाबतीत निर्णय घेण्याची मोकळीक असली पाहिजे असे माझे व्यक्तीगत मत आहे. हा प्रतिसाद, लेखातले/प्रतिसादातले दावे वाचून वाचकांचा गैरसमज होऊ नये, केवळ यासाठीच लिहिलेला आहे.
13 Mar 2016 - 8:55 am | आदूबाळ
+1
"पूर्वी"च्या तुलनेत "हल्ली" जास्त गे दिसतात कारण LGBT ला असलेला सामाजिक दर्प (! सोशल स्टिग्मा) काही प्रमाणात तरी कमी झाला आहे. त्यामुळे जाहीरपणे गे असलेले लोक (पक्षी: फडताळातून बाहेर आलेले LGBT) वाढले आहेत. "पूर्वी" ते लपून असायचे म्हणजे ते नव्हतेच असा निष्कर्ष काढणं चूक आहे.
(याला ऑबसर्वेशन बायस की कायसं म्हणतात ना? उदा० विसाव्या शतकात मानसिक आजार असलेल्या व्यक्तींचं प्रमाण वाढलं कारण त्याआधी त्या विकारांना मानसिक आजार म्हणतात हेच माहीत नव्हतं, वगैरे.)
12 Mar 2016 - 9:21 pm | राजेश घासकडवी
या मांडणीत 'पुरुषांना लग्नासाठी स्त्रिया मिळाल्या नाहीत तर ते इतर पुरुषांकडे लैंगिक सुखासाठी वळतात' असा अर्थ अभिप्रेत आहे. लैंगिकता - स्ट्रेट असणं किंवा गे असणं - हे असं निवडलं जात नाही. गे असणं हे जन्मजात असतं. धनंजय यांनी मिपावर लिहिलेला अप्रतिम 'कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे' हा लेख वाचून पाहावा.
12 Mar 2016 - 9:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुरुवात एका स्पृहणिय प्रकल्पाच्या माहितीने केली याबद्दल लेखकाचे अभिनंदन !
हे मशिन दिवसेदिवस अधिकाधिक मान्यता प्राप्त करत आहे व त्यामुळे बेकायदेशीर लिंगनिदानाला आवर घालण्याच्या प्रयत्नांना भरीव मदत होईल.
परंतु, लेखातल्या महाभारतासंबंधीच्या दाव्यांना कोणताही शास्त्रिय पाया नाही. तसेच, समलैंगिकतेचा या मशिनशी काही संबंध नाही किंवा भविष्यातल्या समलैंगिकतेच्या प्रमाणात या मशिनने काही फरक पडेल याबद्दल शास्त्रिय तर्क/पुरावे नाहीत. त्यामुळे, त्या असंबंधित गोष्टींच्या उल्लेख करून, स्वतःच लेखकाने, एवढ्या चांगल्या प्रकल्पावरची चर्चा भरकवटण्याचा उद्देश कळला नाही. :(
12 Mar 2016 - 11:02 pm | अत्रे
कालच 'मातृभूमी' नावाचा हिंदी चित्रपट पहिला। त्यात भविष्य कमी सेक्स रेशो ने काय होऊ शकते याची खूप भयानक कल्पना केली आहे।
12 Mar 2016 - 11:28 pm | सुबोध खरे
http://www.dnaindia.com/mumbai/report-exclusive-maharashtra-government-s...
13 Mar 2016 - 9:34 am | आनंदी गोपाळ
खरे साहेब रेडिऑलॉजिस्ट आहेत. त्यांनी लिंक दिली आहेच, पण खाली मी लिहितोय त्याबद्दल ते जास्त डीटेल सांगू शकतील,
पण हे सायलेंट ऑब्जर्वर म्हणजे एक ५०० जीबीची हार्ड डिस्क आहे, जी सील्ड पेटीत बसवून सोनोग्राफ्या केल्या त्या व्हिडिओचा बॅकप घेते. कुणा सरकारी बाबूला संशय आला तर तो ते व्हिडिओज चेक करणार अशी काहीशी कन्सेप्ट आहे. या ५०० जीबी हार्ड डिस्क प्लस पत्र्याच्या पेटीचे ३० ते ५० हजार रुपये उकळण्यालाही विरोध आहे.
13 Mar 2016 - 12:39 pm | अभ्या..
माझ्या माहीतीनुसार हे सायलेंट ऑब्झर्वर चालू केल्याशिवाय सोनोग्राफी मशीन चालू होत नाही. त्याचा लॉग इन अॅन्ड लॉगाउट टाइमात केलेल्या कामाची नोंद हार्डडिस्कला राहते असे काहीतरी आहे. त्याचा अॅक्सेस सरकारला द्यायला प्रायव्हसी मुद्द्यावर तंत्रज्ञांचा विरोध आहे. असेही एकले आहे. जास्त माहीती आपणांकडून किंवा खरेसाहेबांकडूनच मिळेल.
लेटेस्ट न्युज इतकीच की चार दिवसाखाली दोन पोर्टेबल सोनोग्राफी मशीन (वॅन मध्ये बसवलेली) जिल्ह्यात जप्त करण्यात आली. या मशीन कर्नाटकातील आहेत अशी चर्चा आहे. हे ऑब्जर्व्हर फक्त महाराश्ट्रात सक्तीचे आहे का?
13 Mar 2016 - 1:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
या मशिनची किंमत अवास्तव जास्त ठेवली असेल तर त्याला विरोध असायलाच हवा व ती सरकारी हस्तक्षेपाने योग्य तेवढीच ठेवली पाहिजे.
या मशिनने सोनोग्राफीचा योग्य (कायदेशीर) उपयोग करणार्या वैद्यकीय व्यावसायीकांना (त्यांच्या बाजूचे कायदेशीर पुरावे साठविले गेल्यामुळे) व्यावसायाचे संरक्षक उपकरण म्हणून उपयोग आहे. त्यामुळे, भ्रष्ट सरकारी अधिकार्यांकडून अथवा इतरांकडून त्यांना ब्लॅकमेल करणे शक्य होणार नाही (कमीत कमी तसे करणे कठीण होईल) असे वाटते.
याबाबतीत, सोनोग्राफी करत असलेल्या व्यावसायीकांचे, विषेशतः डॉ खरे यांचे, व्यावहारीक मत जाणण्यास उत्सुक आहे.
13 Mar 2016 - 10:40 am | राही
शीर्षकातला 'बायल्ये' हा शब्द अजिबात आवडला नाही.
निषेध.
13 Mar 2016 - 12:11 pm | तर्राट जोकर
+१०००
लेखकाला गे ह्या स्थितीबद्दल शून्य माहीते आहे व तृतीयपंथी म्हणजे गे अशी काही पूर्वग्रहदूषित भावनेने गे लोकांकडे बघत आहे. गे लोक स्त्रैण असतात असा गैरसमज भारतीयांत आहे. असे काही नसते. गे पुरुष रोजच्या बघण्यातले पुरुषी हावभाव असणारे, मर्दानी सौंदर्य असणारे, संभोग सोडून इतर प्रत्येक बाबतीत साधारण पुरुषांपेक्षा कुठल्याच बाबतीत वेगळे नसणारे असू शकतात.
एखादा पुरुष स्त्रैण हावभाव करत असेल म्हणजे तो गेच असेल असेही नाही. कोणत्याही पुरुषाच्या कोणत्याही सामाजिक, सार्वजनिक, बाह्य वर्तनावरुन तो गे की स्ट्रेट असे सांगता येणार नाही.
तृतीयपंथी किंवा स्त्रैण असणे ही गे वा लेस्बियन असण्यापेक्षा वेगळी शारिरीक व मानसिक स्थिती आहे.
13 Mar 2016 - 2:31 pm | हाडक्या
या अनुशंगाने एक प्रश्न डॉक्तर लोकांसाठी,
इथे या विकी पेजवर
Country/region at birth under 15 15–64 over 65 total
World 1.07 1.07 0.99 0.80 1.01
(इथे =१.० म्हणजे सम प्रमाण (पुरुष = स्त्री)
>१.० (उदा. १.०१) म्हणजे (पुरुष > स्त्री)
<१.० (उदा. ०.०८) म्हणजे (पुरुष < स्त्री)
)
असा सर्वसाधारण रेशो दिसतोय. सर्व प्रगत देशात सर्वसाधारण पणे असाच रेशो आहे. म्हणजे निसर्गतःच जन्मतः पुरुष जन्मणे याची शक्यता ही थोडीशी जास्त आहे असे नाही का वाटत. (तसेच स्त्रिया या दीर्घायुषी असण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असू शकते असेही इथे दिसते. पण ते अवांतर )
मुद्दा असा की जे होते ते चूकच. नक्कीच. पण हजारास ९०० हे प्रमाण इतकेसे वाईट आणि अगदी द्रौपदी वगैरे परिस्थिती येईल अशी भिती असे म्हणण्याजोगे नक्कीच नाहीत. (यास अजून १००-४०० वर्षांचा विदा घेऊन अभ्यास व्हायला हवा तरीही)
यापेक्षा स्त्रियांना समाजात मिळणारी दुजाभावाची वागणूक, त्याबद्दलचे समज वगैरे सुधारले तर आपोआप असा फरक करणे कमी होईल असं वाटतं.
(त्याचबरोबर "मुलगा झाला म्हणून आम्हाला वाईट वाटलं, आम्हाला मुलगीच हवी होती" असे म्हणणार्यांना देखील "सेक्सिस्ट" आणि जेंडर बायस जोपासणारे का म्हणू नये असं नेहमी वाटतं )
13 Mar 2016 - 3:07 pm | राजेश घासकडवी
ही सगळी क्लिष्ट गणितं आहेत खरी. जन्माच्या वेळी सर्वसाधारणपणे जास्त पुल्लिंगी मुलं जन्माला येतात. इतकंच नाही, तर ही शक्यता कितवं मूल आहे यावरूनही बदलते. म्हणजे, पुल्लिंगी मूल असण्याची शक्यता जसजसं जास्तीवं मूल जन्माला येतं तसतशी कमी होत जाते. (मला आकडे नक्की माहीत नाहीत पण उदाहरण समजावून देण्यासाठी लिहितो आहे) म्हणजे समजा सगळी पहिल्यांदा जन्माला आलेली मुलं घेतली तर प्रमाण ११० पुल्लिगी ला १०० स्त्रीलिंगी आहे. तर सहावं मूल जन्मायच्या वेळी हे प्रमाण १०० पुल्लिंगी १०० स्त्रीलिंगी असं असतं.
गेल्या काही दशकांत स्त्रियांचं गुणोत्तर कमी होताना दिसतं त्यातला काही भाग यामुळे झालेला असावा असा माझा अंदाज आहे. याचं कारण पूर्वी प्रत्येक स्त्रीला सरासरी अधिक मुलं होतं. आता ती कमी होतात. अर्थात, गुणोत्तरातली केवळ दोनेक टक्के घटच या मॉडेलमुळे समजावून घेता येते.
तसंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे पुरुष सरासरी कमी जगतात, स्त्रिया सरासरी जास्त जगतात. त्यामुळे सर्वसाधारण लोकसंख्येतलं प्रमाण ० ते १ वयोगटातल्या प्रमाणापेक्षा वेगळं असतं.
14 Mar 2016 - 9:48 am | आनन्दा
हो.. बहुधा पूर्वीच्या काळी टोळीने राहताना युद्ध/आपत्ती यांमध्ये देखील पुरूषांची मरण्याची संख्या जास्त असे, अश्यावेळी कुठेतरी हा समतोल झाला असेल. - (हे विधान पुराव्याशिवाय केलेले आहे)
अवांतर -
एव्हढेच नव्हे, तर मला असे लोक काही अंशी दांभिक देखील वाटतात. त्यांना खरे तर मुलगाच हवा असतो, पण तसे दाखवायचे असते.
पण त्या वेळेस एक मुलगा असेल आणि दुसरी मुलगी हवी असणे, किंवा एक मुलगी असणे आणि दुसरा मुलगा हवा असणे याला जेंडर बायस म्हणता येणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे.
14 Mar 2016 - 10:00 am | सुबोध खरे
ते तसे नाही
ज्यांना दोन मुली असतात ते आवर्जून आम्हाला दुसरी मुलगीच हवी होती असे( न विचारताही) सांगतात.कारण त्याने आपण पुरोगामी आहोत हे सहज सिद्ध करता येते. अपवादात्मक लोक प्रामाणिकपणे सांगतात कि आम्हाला मुलगा हवा होता पण मुलगी झाली. पण "ठीक" आहे.
हे म्हणजे एम बी बी एस ला प्रवेश हवा होता तो मिळाला नाही कि होमियोपाथीला प्रवेश घ्यायचा आणि होमियोपाथीच कशी चांगली हे लोकांना ( न विचारताही) सांगत सुटायचे
पण ज्यांना दोन मुलगे असतात ते मात्र बहुतेक वेळेस आम्हाला दुसरा मुलगाच हवा होता असे सांगत नाहीत. बहुतेक बायका अशा वेळेस सांगतात मुलगी झाली असती तर "हौस मौज" करता आली असती पण "ठीक" आहे.
हा पूर्वग्रह( bias) नसून दांभिकपणा ( hypocracy) किंवा नाकबुली (denial) आहे.
14 Mar 2016 - 10:41 am | तर्राट जोकर
आनंदा आणि खरे, दोघांच्याही प्रतिसादाला कचकून समर्थन.
14 Mar 2016 - 3:23 pm | हाडक्या
आनन्दा आणि खरे काका, एग्झॅक्टली.. हेच मी म्हटलंय. :)
दांभिकता ..!!
15 Mar 2016 - 7:03 am | गॅरी शोमन
मुलगा वंशाचा दिवा अशी जनरीत आहे. या करता अनेक मुलींना जन्म देणारे आई-बाप आहेत. अश्या वेळी जर एकच मुलगी किंवा दुसरीही मुलगीच हवी म्हणणारे किंवा दुसर्या मुलीवर नियोजन करणारे आई-बाप हे नक्कीच पुरोगामी आहेत.
15 Mar 2016 - 1:12 pm | सुबोध खरे
दुसरी मुलगीच हवी यात गैर काहीच नाही. पण ते डिनायलमुळे( कोल्ह्याला द्राक्षे आंबट) नसावे https://en.wikipedia.org/wiki/Denial
आणी ते सर्व लोकांना अट्टाहासाने सांगणे
किंवा एखाद्याने प्रामाणिकपणे मला एक मुलगा आणि एक मुलगी हवी असे सांगितले तर त्याच्याकडे रागाने पाहणे हा दांभिकपणा आहे.
15 Mar 2016 - 1:55 pm | सूड
पॉपकॉर्न घेऊन बसलो आहे. =))