आर.एम.च्या बंगल्यात सगळे घोस्टहंटर जमले होते.
"वेलकम मंडळी! आर.एम. म्हणाले."
सगळी मंडळी जेवणाच्या टेबलावर बसली.
"आपण सर्व येथे ग्रेगच्या परत येण्यानिमित्त जमलो आहोत."
ग्रेगने आपला ग्लास उंचावला!
"ग्रेग तू अत्यंत शूरवीर आहेस. ज्या अँद्रिआला १८व्या शतकापासून कोणी मारू शकलं नाही तिचा तू अंत केलास!"
ग्रेगने मनिषकडे बघितले!
मनिष मस्तपैकी खुर्चीत रेलून बसला.
"तर या अत्यंत खास प्रसंगी एक खास पेय!"
आर.एम. ने एक अत्यंत जुनी बोतल काढली.
१७५४ सालची अरेबिया वाइन!
पाइरेट ऑफ़ द अरेबियाच्या जहाजावरची!
सर्व घोस्टहंटर आश्चर्यचकित झाले.
"सर ती पाइरेट ऑफ़ द अरेबियाची गोष्ट सांगा ना," एक जण म्हणाला.
आर.एम.नी क्षणभर विचार केला.
आणि गोष्ट सांगण्यास सुरुवात केली!
--------------------------
३० वर्षांपूर्वी!
रो नुकताच भारतातून परतला होता. त्याची पत्नी भारतात त्याच्या मुलाला जन्म देतांना वारली.
मात्र मुलगा वाचला.लंडनला त्याच्या मुलाचा सांभाळ त्याची बहीण लेसोथो करत होती.
घोस्टहंटर हा त्याचा पिढीजात व्यवसाय होता!
-----------------
रो आपल्या ऑफीसमध्ये बसला होता.आजही त्याच्याकडे अनेक केसेस पेंडिंग होत्या.
"कोली कॉफी मागव." त्याने असिस्टंटला ऑर्डर दिली.
कॉफी घेता घेता कोली धावतच त्याच्याकडे आली!
"सर ते..........!"
आणि ती धाडकन खाली कोसळली!
तिच्या मागोमाग एक व्यक्ती हळुवार पावले टाकत आली.
"सॉरी मी रो, पण माझे नाव ऐकताच बऱ्याच लोकांची अशी अवस्था होते."
रोने त्या व्यक्तीला निरखून बघितले.
उंच,भक्कम बांधा,गोरा रंग, लांब नाक.टिपीकल अरबी पेहेराव,आणि सोबत पंधरा अंगरक्षक!
"मी अल् बिन खालेद, सौदीचा राजपुत्र!"
-----------------
रो रियाध मध्ये होता.
स्वर्गात!
कारण सौदीच्या राजाच्या राजवाडा म्हणजे स्वर्गच होता!
आणि या स्वर्गात अनेक अप्सरा नाच करत होत्या.
रोच्या कानावर स्वर पडत होते.
'एहसान से ज्यादा नुकसान करेगी,
हर्जाना भी तो चुकाना!
बंदूक दिखा दिखा के क्या प्यार करेगी,
चेहरा भी कभी दिखाना!'
"ही सुंदरी मला अफगाण मध्ये सापडली.हिला ते गुलाम म्हणून विकनार होते. मी तिला त्यांच्या तावडीतून सोडवली!"राजपुत्र म्हणाला.
"ती तुम्हाला दुवा देत असेल."
"नाही देणार."
"का?"
"कारण मी तिला गुलाम म्हणूनच विकत घेतली!"
रो चकितच झाला.
"वेलकम टू अरेबिया मि.रो! उद्या तुम्हाला तुमच्या केसची कागदपत्रे व माहिती मिळेल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आजपर्यंत अठ्ठावन घोस्टहंटर ही केस सोडविण्यास आले होते.मात्र त्यातील चोवीस जणांचा म्रुत्यू झाला."
"आणि बाकीचे?" रोने विचारले.
"वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये!"
सौदीचा राजपुत्र रो कडे न बघताच ताड़ ताड़ पावले टाकत बाहेर गेला!
-----------------
सकाळीच सौदीच्या राजाचा सचिव रो कडे आला.
त्याच्या हातात सोन्याची पेटी होती.
ती पेटी रोसमोर ठेऊन काहीही न बोलता तो बाहेर गेला.
रोने पेटी उघडली.
पेटीत एकही कागद नव्हता.
फक्त एक अष्टकोनी नाणे होते!
बशीच्या आकाराचे. नाण्याच्या कडांवर आठ साप होते. प्रत्येक सापाच्या तोंडात दुसऱ्या सापाची शेपटी होती.नाण्याच्या मधोमध एका बोकडाच्या तोंडाचा पुरुष उभा होता, आणि त्याच्या हातात दोन साप होते.
रो ला काहीच उमजत नव्हते.
थोड्या वेळाने सचिव आत आला.
त्याने राजपुत्राचे पत्र रोला दिले.
"पायरेटची निशाणी!!!!!"
-----------------
रो तीन दिवस सौदी फिरत होता!
मात्र त्याला कुठलीही माहिती मिळाली नाही.
कुणालाच याविषयी माहिती नव्हती.
आता रो समोर एकच उपाय होता!
त्याचे वडील!
'मॉन्टेग्रो!'
क्रमशः
(पुढील भागात 'पायरेटशी गाठ!')
प्रतिक्रिया
22 Dec 2015 - 11:18 pm | DEADPOOL
www.misalpav.com/node/34185
22 Dec 2015 - 11:26 pm | DEADPOOL
www.misalpav.com/node/34200
23 Dec 2015 - 12:04 pm | नन्दादीप
लय भारी चाललाय... थोडे मोठे भाग टाका...
23 Dec 2015 - 2:18 pm | DEADPOOL
थँक्स नन्दादीप!
23 Dec 2015 - 12:22 pm | मराठी कथालेखक
बेंझीन रिंगच्या कथेची आठवण झाली ना राव
23 Dec 2015 - 5:05 pm | DEADPOOL
तिथूनच प्रेरणा घेतलीय!
{ढापलिय!!!!! ;)}
23 Dec 2015 - 9:26 pm | टुकुल
मस्त...
23 Dec 2015 - 9:45 pm | DEADPOOL
तुमीपन एखांदा लेख लीवा की राव!
लय दिस झाल्यात!